Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋन्मेष , दही कांदा भाजीया
ऋन्मेष , दही कांदा भाजीच्या रेसिपी बद्दल धन्यवाद! आज केली होती. छान झाली होती.
दही कांद्याची रेसिपी मला पण
दही कांद्याची रेसिपी मला पण द्या. कुठं आहे?

जेम्स वांड, मस्त थाळी.
प्राजक्ताचे पाहून मलाही पराठे करावे वाटले. जिरे, ओवा,कसूरी मेथी, तिखट मीठ, हळद, तेल. तिखटामिठांच्या पुऱ्याचेच कमी तेलकट व्हर्जन.
दही कांद्याची रेसिपी मला पण
दही कांद्याची रेसिपी मला पण द्या. कुठं आहे?
>>>
या खालील व्हिडिओमध्ये
https://www.instagram.com/reel/C96bULmv8bQ/?igsi=MWRvbDY4MnFvcDd3NQ==
राजस्थानी दही प्याज की सब्जी
थॅंक्यू ऋ, एकदम सोपी आहे.
थॅंक्यू ऋ, एकदम सोपी आहे.
जिरे, ओवा,कसूरी मेथी, तिखट
जिरे, ओवा,कसूरी मेथी, तिखट मीठ, हळद, तेल. तिखटामिठांच्या पुऱ्याचेच कमी तेलकट व्हर्जन.
संपूर्ण मन तृप्ती अन्न ! सोबतीला आंब्याच्या लोणच्याची फोड विथ भरपूर खार किंवा लसणीची चटणी किंवा पुदिना कोथिंबीर चटणी किंवा खर्डा किंवा खर्डा + दही इतके असले की माणसाला अजून लागतेच काय ?
निगुतीने केलेल्या काही भाज्या (खासकरून मातोश्रींच्या हाताच्या) रोज मिळाल्या तर मी नॉनव्हेज पक्षी निहारी, कोरमा, बिर्याणी इत्यादी पण सोडून देईन ! जितकी लॉस्ट अँड रस्टिक भाजी तितकी मजा जास्त
@ जेम्स,
@ जेम्स,
जैपर को जीमण
झकास स्थानीय मेजवानी, “जाऊ तिथे लोकल अन्न खाऊ”संघटनेत स्वागत.
सुंदर फोटो.
बेजड रोटी …
कितीतरी दिवसांनी ऐकला हा उल्लेख. मध्यभारत आणि त्यालगतच्या महाराष्ट्रातल्या भागात याचेच एक वेरियेशन करतात - बिर्रे की रोटी (@ मनिम्याऊ, you must be knowing the recipe, do post when you can; in a separate thread)
मस्त मेनु सगळे !
मस्त मेनु सगळे !
अनिंद्य
अनिंद्य
झकास स्थानीय मेजवानी, “जाऊ तिथे लोकल अन्न खाऊ”संघटनेत स्वागत.
आम्ही फाऊंडर मेंबर ह्या क्लबचे. कारण की मार्केटिंग मध्ये त्यातही गवर्नमेंट कॉम्प्लायन्स आणि त्या आधी फील्ड इंजिनियर म्हणून सरकारी कंत्राटे क्षेत्रात काम केल्यावर जवळपास सगळी राज्यं फिरून झालीत त्यात एकेक राज्यात 3-9 महिने राहण्याचे काम पडत असे, तेव्हा मात्र स्थानिक फूड खायचे हा दंडक घालून घेतला होता, फूड फिलॉसॉफी हजारो वर्षांवर जाऊन evolve झालेली असते स्थानिक वातावरण, पाणी, हवा, जमिनीचा पोत इत्यादी जमेस धरून तिचे इमानेइतबारे पालन केल्यास तब्येतीला बरे पडते हा स्वानुभव.
नवीन फोटो सगळे तोंपासू .
नवीन फोटो सगळे तोंपासू .
वड्या आवडल्या श्रवण धन्यवाद.
शनिवारी आमच्याकडे रक्षाबंधन होतं. खूप जण होती त्यामुळे घाईत फोटो घेणं जमल नाही. पु पो, बटाटा भाजी ,मसालेभात आणि मटार करंजी ऑर्डर केली होती. सगळं छान होतं. ठाण्यात तनुजा मराठे म्हणून एक जण आहेत त्या ऑर्डर घेतात. त्यांचे डबे वगैरे ही स्वच्छ आणि डिसेंट असतात. पण त्या ऑर्डर घरपोच देत नाहीत. आपल्याला जावं लागतं किंवा मग स्विगी वैगरे तत्सम काही तरी.
मी घरी मिरचीचं लोणचं, वर दाखवलेल्या वड्या आणि मसाला चणे ( श्रावण महिना म्हणून ) एवढं घरी केलं होतं.
भट्टीतले चणे तेलाच्या फोडणीतच तिखट, थोड मीठ, वगैरे घालून दोन मिनिटं परतायचे, नंतर त्यात खोवलेला नारळ घालायचा . लिंबू पिळायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. नुसते चणे छान लागतातच पण हे कैक पटीने जास्त छान लागतात. ज्यांच्या कडे मुलं आहेत त्यांनी नक्की करून बघा.
भट्टीतले चणे म्हणजे फुटाणे ना
भट्टीतले चणे म्हणजे फुटाणे ना?
हे चणे. आम्ही लहान असताना
हे चणे. आम्ही लहान असताना पांढऱ्या वाटण्याचे जे मिळत त्याला आम्ही फुटाणे म्हणत होतो. हल्ली मिळतात की नाही कोण जाणे.

हे भट्टीतले चणे सालांसकट
हे भट्टीतले चणे सालांसकट वापरायचे का?
होय सालासकट च वापरायचे.
होय सालासकट च वापरायचे.
Intresting.. चण्यांचा हा असा
Intresting.. चण्यांचा हा असा प्रकार कधी खाल्ला नाही.
बाकी ते सालासकटच खायला मजा येते. कोण साल काढून पण खाते का?
>>भट्टीतले चणे तेलाच्या
>>भट्टीतले चणे तेलाच्या फोडणीतच तिखट, थोड मीठ, वगैरे घालून दोन मिनिटं परतायचे, नंतर त्यात खोवलेला नारळ घालायचा . लिंबू पिळायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.>> ममो, काय आठवण करुन दिलीत!श्रावणातल्या शुक्रवारी कुठे ना कुठे आमंत्रण असे तेव्हा बर्याचदा हे असे चणे असत.
श्रावणातल्या शुक्रवारी कुठे
श्रावणातल्या शुक्रवारी कुठे ना कुठे आमंत्रण असे तेव्हा बर्याचदा हे असे चणे असत. >बरोबर, हे चणे श्रावणी शुक्रवार हळदी कुंकू स्पेशल..
हल्ली हळदी कुंकू करत नाहीत कोणी. पण श्रावणातल्या एका रविवारी (सगळी जण घरात असतात म्हणून. ) संध्याकाळी हे चणे आणि साखर वेलची घातलेलं दूध (जास्त नाही पाव वाटी फक्त ) देते सर्वांना.
… पांढऱ्या वाटण्याचे जे मिळत
… पांढऱ्या वाटण्याचे जे मिळत त्याला आम्ही फुटाणे म्हणत होतो…
हे नवीन आहे.
तुम्ही नंतर फोटोत दाखवलेल्या पदार्थालाच “फुटाणे” म्हणून ओळखत आलोय. बालभारतीत वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा असे होते जे टणाटणा उडत जायचे 😀
फोडणी वगैरे टाकून छानच लागत असणार 👍
सगळे फोटो मस्त.
सगळे फोटो मस्त.
फोडणी दिलेले चणे म्हणे प्रोटीन का प्रोटीन, फायबर का फायबर और टेस्ट भी.
नक्की करणार.
हे फोडणीचे फुटाणे काहीतरी
हे फोडणीचे फुटाणे काहीतरी जबरदस्त सापडलेले आहे लगेच करण्यात येणार आहे.
नक्की करून बघा , ह्यात आमचूर
नक्की करून बघा , ह्यात आमचूर पावडर, चाट मसाला, किंचित गरम मसाला अशी variations ही करता येतील.
पण तरी गोडा मसाला घरात लागतोच. मसाला आणि गोडा हे दोन शब्द जरा कॉन्ट्रेडिक्टरी आहेत. पण तरी गोडा मसालाच हा. आज केला. अजून हाताचा वास जात नाहीये.
आमच्या स्वयंपाकात मसाला, लसूण, तिखट , तेल हे सगळंच कमी असतं. निम्म्या भाज्यांना तर कोणताही मसाला घालत नाही. मसाला थोडा घातला तरी ओव्हर पॉवर होतो असं आम्हाला वाटत.
ह्या धाग्यावर भुक खवळते शिवाय
ह्या धाग्यावर भुक खवळते शिवाय मी आत युं करीन नी त्यूं करीन असा निर्धार होतो आणि पुढे काहीही केले जात नाही अगदीच बेशरम पणा
बदाम कूकी अस्मिता सॅल्युट आहे तुला.
ऋ, कांदा दही भाजी पहिल्यांदा ऐकली थँक्यु करून बघेन मी.
कोणाला केरळी मिक्स भाजी माहितेय का ज्यात नारळ दूध, बीन्स, गाजर, फ्लावर तत्सम भाज्या असतात, अवियल क्का कहितरी म्हणतात. मला बनवायची आहे.
नक्की करून बघा , ह्यात आमचूर
नक्की करून बघा , ह्यात आमचूर पावडर, चाट मसाला, किंचित गरम मसाला अशी variations ही करता येतील.
माझ्याकडे आत्ता मस्त हिंग फ्लेवरचे फुटाणे आहेत, मला वाटते पुरेसे मीठ लावून खारवलेले + भाजताना हिंगाच्या पाण्याचे हाबके देऊन तो स्वाद पण त्यात नीट इन्फ्युज झाला आहे त्यामुळे चमचाभर तेलात फोडणीला घालून वरतून कोथिंबीर + खोबरे घातले की तसेच भारी लागतील.
आशू, रेसिपी वगैरे मला कळत
आशू, रेसिपी वगैरे मला कळत नाही पण मला ती केरळाची एवियल भाजी आणि ग्रीन थाय करी दोन्ही similar वाटते. दोन्हीत नारळाचे दूध असावे बहुधा.
>>>>हिंग फ्लेवरचे फुटाणे
>>>>हिंग फ्लेवरचे फुटाणे
रोचक आहे.
आमचा कालचा जन्माष्टमी प्रसाद.
आमचा कालचा जन्माष्टमी प्रसाद.


राजमा, शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि चपाती
आणि हा जन्माष्टमी नैवैद्य
अरे वाह मस्त!
अरे वाह मस्त!
हे वाल, शेवगे, काळया वाटाण्याचे सांबर हे सगळे या दिवसाचे यशस्वी कलाकार असतात. आमच्याकडे काळा वाटाणे सांबर आणि आंबोळ्या असायचे कारण ते माझ्या आवडीचे.
धन्यवाद ऋन्मेऽऽष
धन्यवाद ऋन्मेऽऽष
Pages