एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह सर काहीतरी बरळू नका.
माझा कलीग दुर्दैवाने तेव्हा सेमी कंडक्टर प्लांट मध्ये कामाला गेला होता. दुर्दैव्वाने तो उग्र वाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात मारला गेला.
मी स्वतः पंजाबात GNDTP भटिंडा मध्ये दोन वर्षे होतो. त्या लोकांशी ह्या बाबतीत बोलत असे.
पाकिस्तान चा हद्दीत जाऊन पिकनिकही करून आलेला आहे.

मी त्या ट्वीटमध्ये एका अक्षराचाही बदल केलेला नाही. ट्वीटची लिंक दिली आहे. तिथे जाऊन वाद घाला.

पंजाब पोलिसांनी त्या काळात निरपराध तरुणांना उचलून मारले हे मान्य करायला एवढा काय त्रास होतोय?

ते तर पतली गाली से निकल गये,
आता ही बातमी वाचा
Brother of Bageshwar Dham's Dhirendra Shastri arrested
ह्या बाबावर मी एक लेख लिहिला होता.

Satluj हा चित्रपट ऐंशी-नव्वदीच्या दशकातील पंजाबमध्ये पोलिसांनी केलेल्या कथित बेकायदेशीर हत्यांवर आधारित आहे. त्या काळात पंजाबमध्ये आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता होती.

लोकसत्तामध्ये लिहिल्याप्रमाणे, काही लोकांना हा चित्रपट खलिस्तानी हिंसेचे समर्थन करणारा वाटतो.

जर हा चित्रपट फक्त न्यायालयाबाहेरील हत्यांवर आधारित असता, तर भाजपने त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. उलट, त्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहनच दिले असते. त्यात नक्कीच हिंसेंच भलामन केली असणार.

कित्येक पंजाबीच्या मनातून भिद्रनवले अजून नाही गेलेला. अजूनही त्याचे फोटो सुवर्ण मंदिरात आहे असं ऐकलं आहे.

पोलिसांनी अकारण त्या पोरांना उचललं याबद्दल काही नाही. आकडे घेऊन खेळत बसलेत.
सीबीआय कोर्टाने पोलिसांना शिक्षा केली त्याबद्दल काही नाही.

A day after ED move, Madan Mitra, one of Mamata Banerjee’s oldest aides, joins rebels
The move comes a day after the Enforcement Directorate summoned Madan Mitra's wife and two sons in connection with the alleged municipality recruitment scam.

ईडी, सीबीआय, इ. भाजपच्या रिक्रूटमेंट एजन्सीज आहेत.
पण भाजपला हे लोक कशासाठी हवे आहेत? काहीही करून इतर पक्ष संपवायला?

भरत
त्याना ते bill पास करून घ्यायचं आहे. त्यासाठी आता सहा MP कमी आहेत. असे मी वाचले.

हे मदन मित्रा आमदार आहेत.
विधेयक पास करायला शरद पवार मदत करतील - विधेयकाच्या बाजूने मत देतील. द्रमुक मतदानात भाग घेणार नाही म्हणतात.

केशवकुल, सोनम वांगचुक यांचं रागा भेटायला आला नाही तर जनमानसात त्याचं चित्र खराब होईल असं वक्तव्य पाहिलं.

सीजेपीच्या समर्थकांचाही रागा कधी येणार असा धोशा सुरू आहे. यातला एक अर्पित शर्मा युरोपात आहे. एका आप समर्थकाने विरोधी पक्षनेता राहुल परदेशात काय करतोय असं विचारलं. तो स्वतः अमेरिकेत आहे. दिपके अमेरिकेत परत जाणार आहे की इथेच राहणार आहे?
आंदोलन सरकार विरोधात आहे, मंत्र्याचा राजीनामा हवाय तर रागा तिथे येतोय की नाही, यावर फोकस का? की त्याने येऊन उपोषण मागे घ्या असं सांगितलं की उपोषण सोडायला निमित्त मिळेल?

त्या व्हिडियोत लोक पिकनिकला आल्यासारखे दिसताहेत.

काही दिवसांपूर्वी वांगचुक म्हणाले होते, तुम्ही सुद्धा एकेक दिवस उपोषण करा. इथे फुकट मिळतंय म्हणून हादडू नका. याची क्लिप पाहिली.

वांगचुक तीन वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांना भेटले होते आणि त्यांचं कौतुक केलं होतं. ३७० रद्द केल्याबद्दल त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं होतं.

दिपकेची राहुल गांधी , काँग्रेसबद्दलची ताजी वक्तव्य आणि भारत जोडो बद्दलचं ट्वीट पाहिलं आहे.

वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावं.

--
नम वांगचूक यांची उपोषणाची कृती आणि त्यांची मागणी यात तार्किक ताळमेळ दिसत नाही. त्यांच्या आमरण उपोषणाच्या कृतीमुळे आपल्या सगळ्यांना त्यांच्याविषयी आदर आणि काळजी वाटणं साहजिक आहे.
पण त्यांची मागणी काय आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. धर्मेंद्र प्रधान काय अतिशय प्रज्ञावंत, द्रष्ट्या आणि कल्याणकारी कॅबिनेट मंत्रीमंडळातील एक नालायक मंत्री आहे का की ज्याच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचूक आपले प्राण पणाला लावत आहेत?
शिक्षण क्षेत्रातील विध्वंस तर‌ दहा बारा वर्षांपूर्वीच सुरू झाला जेव्हा फक्त बारावी पास आणि नकली पदवीधर व्यक्तीकडे शिक्षणाचं खातं सोपवण्यात आलं होतं. युद्धपातळीवर JNU, HCU, JU, JAMIA सारख्या विद्यापीठांना उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. थोडक्यात, NEET च्या परीक्षेचा पेपरफुटीचा प्रकार आणि NTA ने चालवलेला सत्यानाश म्हणजे चांगल्या शैक्षणिक धोरणाचे काही वाईट परिणाम नसून दहा बारा वर्षापूर्वी सुरू‌ असलेल्या विध्वंसाचा कळस आहे!
आश्चर्याची बाब म्हणजे‌ देशभरात शैक्षणिक ‌क्षेत्राची वाताहत होत असताना दोन वर्षांपूर्वीच सोनम वांगचूक यांनी धर्मेंद्र प्रधान यांचं भरभरून कौतुक केलं होतं.
असं असलं तरी लोकशाहीत राजकीय विरोधाची मक्तेदारी कुणा एका व्यक्तीकडे किंवा पक्षाकडे नसते. त्यामुळे, त्यांची आजची कृती सरळसरळ बाद ठरवता येणार नाही.
सुज्ञ लोकांना ठाऊक आहे की लोकशाही मूल्यव्यवस्थेचा आदर करून विरोध मान्य करणं यांच्यासाठी'सद्गुण विकृती' ठरते. यांच्यात 'सद्गुण विकृती'चा अभाव असल्याने नैतिक दबावाचा प्रश्नच उद्भवत नाही. शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या वेशीवर शेकडो शेतकरी मृत्युमुखी पडले तेव्हा फरक पडला नाही. उलट, शेतकऱ्यांनाच यांनी देशद्रोही ठरवलं. काॅक्रोच बिचारे तर त्यांच्याच Semiotics मुळे चहुबाजूंनी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले असल्याने काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे सोनम वांगचूक यांनी स्वतःचा‌ प्राण पणाला लावू नये. त्यांनी केलेल्या मागणीपेक्षा त्यांचा प्राण महत्त्वाचा आहे.
गावखेड्यांमध्ये‌ कितीही मोठा आजार असला तरी खेडोपाडी फिरणारे डाॅक्टर सलाइन चढवून मोकळे होतात. आजार इतका गंभीर आणि दुर्धर आहे की फक्त प्रधानच्या राजीनामा साठी आंदोलन करणं म्हणजे कॅन्सरच्या पेशंटला सलाइन चढवणं आहे

शरद बाविस्कर यांची पोस्ट

पंजाब पोलिसांनी त्या काळात निरपराध तरुणांना उचलून मारले हे मान्य करायला एवढा काय त्रास होतोय?

प्रतिसाद नीट वाचत चला!

अशा तरुणांना "कुठूनही उचलून आणलेले नव्हते" तर बहुसंख्य असे मारले गेलेले होते ते दहशतवाद्यांचे नातेवाईक होते. त्यांच्या विरुध्द्व सज्जड पुरावा नव्हता हे मान्य आहे पण

जसे पोलिसांना माहिती देणाऱ्यांना किंवा पोलिसांच्या नातेवाईकांना दहशतवादी मारत होते तोच न्याय के पी एस गिल यांनी दहशतवाद्यांना लावला.

पंजाब मध्ये दहशवाद शमला याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे.

हे वाचलं नाही का?

जसे पोलिसांना माहिती देणाऱ्यांना किंवा पोलिसांच्या नातेवाईकांना दहशतवादी मारत होते तोच न्याय के पी एस गिल यांनी दहशतवाद्यांना लावला>>>>
हेच मी माझ्या पंजाबी मित्राच्या वडिलांकडून ऐकलं होत. Desperate times call for desperate measures.

उग्रवाद्यांनी सोपा मार्ग निवडला.
सरकारने त्याहूनही सोपा मार्ग निवडला.
Military  solution does  not really solve  the problem: Julio Ribeiro
The way to defeat terrorists is to win the hearts and minds of the wider community, says Julio Ribeiro who served as D-G Police, Punjab, at the height of Sikh terrorism in the mid-80s

जय श्रीराम.

win the hearts हे धोरण शांततेच्या काळात ठीक आहे.
Bullet for bullet हे धोरण त्यांच्याच काळात राबवले गेले. बनावट चकमकी आणि बेपत्ता होण्याचे आरोप त्यांच्या वरही भरपूर झालेत. ते फक्त win the hearts करत बसले नाहीत म्हणूनच त्यांना तत्कालीन सरकारने पद्म भूषण दिलेला.

दहशतवाद्यानविरुद्ध लढताना अमुक एक उपायच चांगला आहे असं काही नाही. तेथील लोकांचा विश्वास मिळवणे हे पण योग्यच आहे. प्रसंगी हिंसा पण करावी लागते.

ज्युलिओ रिबेरो

त्यांना झेपलं नाही म्हणून त्यांना राज्यपालांचा सल्लागार नम्हणून नेमले आणि के पी एस गिल याना पोलीस महासंचालक पदी नेमले.

आपल्या कनिष्ठाला मिळालेले यश त्यांना झेपले नाही.

सगळीकडे कबुतरे उडवून कार्यभाग होत नाही.

तुमचं चालू द्या

केशवकूल - चंदा चोरी प्रकरण फार गंभिर आहे. राम मंदिराच्या नावाने हजारो कोटी रुपयांचा चंदा मिळाला आहे.

देवाघरी चोरी करणारे हे निर्ढावलेले लोक आहेत. किती सोईस्कर रित्या अनेकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. वेगळा धागा हवा.

प्रश्नांचे "Good Night" लावले कि लगेच पळून जातील..

प्रश्नांचे उत्तर नसले कि असे फाटे फोडायचे किंवा बगल द्यायची.

काश्मीर मधील १ लाख पंडितांना जीव आणि अब्रू मुठीत धरून पळायला लावणाऱ्या अतिरेक्यांचे हृदय जिंकायचे कि हृदय परिवर्तन करायचे?

का पोलिसांच्या नातेवाईकांना मारणाऱ्या अतिरेक्यांची आरती ओवाळायची?

श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला धनुष्य उचलायला सांगितले आरतीचे ताट नव्हे

काहीतरी भंपक लिहायचे

चालू द्या

तुमच्या कडे उत्तर असेल तर सांगा पाहू?
चंदा / चढावा चोरी करणारे लोक कुठल्या पार्टीचे होते?
अयोध्येत BJPला कुणी पळवले?
उद्याच्या बौद्धिक माघे हे प्रश्न विचारा आणि मग इथे उत्तर लिहा.

फार्स विथ द डिफरंस
Welcome Back!>>> केकू, का कुणास ठावूक, पण मी हे वाचताना चुकून, "Welcome Back, to celebrate शिमगा !".... असं वाचलं,...कदाचित डोळ्यांना झालेल्या सवयीमुळे असेल... Rofl Rofl

अरे नको.
विसरा तो घोष आता लारी लाप्पा लारी लपा
आता ओठावरी रखुमाई वरा बाप्पा!
आपण गुडी पाडवा साजरा करू.

भारत दौरा ?

किती दिवसान्चा मुक्काम आहे?

https://x.com/GitanjaliAngmo/status/2078698266431279120

I have lost faith in Safdarjung Government Hospital.
The hospital told us
@Wangchuk66
’s potassium had dropped to 2.9, describing it as alarming and life-threatening. Yet, in its public health bulletin, it conveniently omitted the actual number, referring only to "decreasing potassium levels." When after 10 hours and repeated requests, they allowed us to take samples of his blood at 10.30 pm, an independent laboratory test reported 3.5, well within the normal range.
Despite repeated requests, the hospital has refused to discharge him or allow us to shift him to a private hospital of our choice. With around 30 police personnel stationed on our floor and well over 100 across the hospital, our movement is severely restricted. It is not medical care. It is illegal detention.
If anything happens to Sonam, the hospital authorities and the government must bear full responsibility.
I have therefore moved the High Court and sought an urgent hearing today, praying for permission to shift Sonam before his health deteriorates further. No family should have to fight the system simply to choose where their loved one receives medical care.

Pages