एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तवलीन आँटींना पेपर लीक, सीबीएसई तले घोळ याबद्दल कळलं एकदाचं.
मग त्यांनी शिक्षणक्षेत्राबद्दल लिहायचं ठरवलं.
मग त्या थेट नेहरूंपर्यंत पोचल्या.
नेहरूंनी आय आय टी काढल्या. पण त्यामुळे उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय मुलांचाच फायदा झाला.
गरीब उपेक्षित पोरांसाठी महत्त्वाच्या अशा शालेय शिक्षणाकडे नेहरूंनी अजिबात लक्ष दिले नाही.
मी २०१३ साली ( सालापासून म्हणायचंय का तवलीन आँटी?) मोदीभक्त होते. मोदीजी तेव्हा स्वतःला पंप्र झाल्याचे समजतच होते. त्यांनी मला भेटायला बोलावलं. आणि मी आधी काय काम करायला हवं असं विचारलं. मी शिक्षण आणि आरोग्याबद्दल सांगितलं.
पण मोदींनी त्यातलं काहीच केलं नाही.

नेहरूं आणि त्यांचे भूत दोन्ही अमर आहेत.
मला वाटायचं की संसदेत नेहरूंचे भूत केल्या दीड दशकात यायला लागले. भाजप महासचिवांकडून कळलं की नेहरु गेल्या नंतर लगेच यायला लागले होते.

भाजपने राज्यसभेत आप फोडला. आता लोकसभेत तृणमू़ल फोडला. परिसीमन विधेयक पुन्हा आणतील लवकरच.>>> जे नेते स्वतःच पलटी मारतात त्यांनी तरी ह्या बद्दल तक्रार करू नये.
काल मी wire मध्ये आलेला INDIA BLOCK च्या बैठकीचा वृत्ताब्त वाचला. AAP आणि DMK अर्थातच नव्हते. त्याना परत कसे आणायचे हा एक चर्चेचा मुद्दा होता.
CJP बद्दल CONGRESS has become salty. CONGRESS ने DMK शी घटस्फोट घेतला त्याचे कारण काय? मला तरी अजून समजलेले नाही. CPI ML च्या ही काही तक्रारी होत्या, किती दिवस अशी लाथाळी चालत रहाणार आहे.
कठीण आहे. सामान्य जनता अजूनही Batman च्या प्रतीक्षेत

"Nothing will be 'left' in Left Front post elections": Rahul Gandhi accuses LDF of compromising ideology.
येउ द्या अजुन.
don quixote chasing windmills,
Boss, enemy इकडे आहे.

शुभ वर्तमान
SFI ने आपले स्वतःचे आंदोलन सुरु केले आहे, धर्मेंद्र प्रधान च्या राजीनाम्यासाठी. अजून एक सवता सुभा.
ठीक आहे,
NSUI काय करत आहे?
NSUI to दिप्के. "मरते दम तक तुम्हारा साथ नही देंगे."

अभ्यास वाढवा.
NSUI आणि युथ काँग्रेसने देशात ५० हून अधिक ठिकाणी यावर आंदोलने केली आहेत. एक महिना झाला. पोलिसांच्या लाठ्या, वॉटर कॅननचा मार खात आहेत. तुमच्या पुण्यातही झालं.
https://www.thehindu.com/news/national/nsui-holds-protest-outside-educat...

सीबीएसई ऑन स्क्रीन पेपर तपासणी संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी वाचा फोडली त्यातल्या दोघांना राहुल भेटला.
दिग्विजय सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने त्याला भेटायला बोलावलं व त्याचं म्हणणं समजून घेतलं.
तुमचे सर जिथे टी आर पी तिथे आम्ही म्हणून धागा चालवताहेत.

तुम्ही कसे काय अण्णा.२ ला भुललात?
२० १०-११-१२ जनलोकपाल आंदोलन कधी झालं त्याबद्दल मायबोलीवर धागा आहे. तोच बावळटपणा आता सुरू आहे.
दिप्के आंदोलना बद्दल मी अड्ड्यावर लिहिलं आहे.

NSUI आणि युथ काँग्रेसने देशात ५० हून अधिक ठिकाणी यावर आंदोलने केली आहेत. एक महिना झाला. पोलिसांच्या लाठ्या, वॉटर कॅननचा मार खात आहेत. तुमच्या पुण्यातही झालं.>>> हे मला माहित नाही असे वाटते का ? आमच्या पुण्यात झाले. किती लोक आले होते? कुठे झाले? हीच तर खव खव आहे. दिपके च्या मागे इतके तरुण आणि आपण आंदोलन करतो आहोत त्याबद्दल कोणी बोलत नाही.
सगळ्यांनी बसून विचार विहिमय करून एकत्र येऊन जोरदार धक्का द्यावा हा विचार नाही.
DMK सारख्या जुन्या मित्रपक्षाला ओवरनाईट सोड चिठ्ठी, मान्य करतो कि इथे मात्र माझ वाचन कमी पडते आहे.

डीएम केला टाटा बाय बाय करताना बोलून घेतलं होतं. आता डीएम के तर टीव्हीके सोबत युती करू शकत नाही ना?

जंतर मंतर वरचं आंदोलन पाहून friendly exhibition match आठवलं.
२०१०-११ IAC सारखाच माहौल बनवायचा प्रयत्न. तेव्हा मैं भी अण्णा टोप्या. आता झुरळाची टी शर्ट्स
तेव्हा मंचावर असलेले लोक इथे पडद्यामागे होते, पण लगेच समोर आले. (आप)
तेव्हा मेन स्ट्रीम टीव्ही चॅनेल. आता यु ट्युबर्स.
संसदेत विधेयक पास होऊन अण्णांच्या उपोषणाचं नाटक संपणार होतं, त्यादिवशी नलिनी सिंग एन्डीटीव्हीच्या विष्णु शोमला म्हणाल्या होत्या, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल कव्हर करत असल्यासारखा वागतो आहेस. तोही म्हणे की तशीच एक्साइटमेंट आहे. आता जनलोकपाल जाऊ दे, लोकपालाचं आणि महालेखापालाचं नावही कोणाला माहीत नसतं.
सरन्यायाधीशांनी ज्या सौरभ दासला झुरळ म्हटलं , त्याला मी बराच काळ ट्विटरवर फॉलो करतोय. आता काँग्रेस समर्थकांनी त्याच्या जुन्या ट्वीट्स बाहेर काढल्या. तो चक्क मोदी फॅन होता.
२००० च्या नंतर जन्मले ल्या लोकांना गुजरात दंगे माहीत नसतात, त्यांच्याशी देणंघेणं नसतं. तसंच जेन झीला जन लोकपालच्या नावाखाली झालेला खेळ माहीत नसेल.
जिथे वागळे, गुहांसारखे लोक भाबडं वागू शकतात, तिथे ही तर मुलं आहेत.
-
तेव्हाही मायबोलीवर धागे काढले होते आणि लोक भारावले होते. आता तर जिथे टीआरपी तिथे आम्हीवाल्या आयडीला आयतं खाद्य मिळालं.

दिपकेला पोलिस प्रोटेक्शन , आंदोलनाला तत्काळ परवानगी , त्याच्या हातात संघी प्रकाशकाने छापलेलं आंबेडकरांचं सो कॉल्ड आत्मचरित्र.

तुम्ही भोळेपणात वागळेंना मागे टाकाल.

एकूण तुम्ही पण त्यांच्या सारखेच वागत आहात. आत्ता आणि इथे काय होते आहे हे पहा,
डीएम केला टाटा बाय बाय करताना बोलून घेतलं होतं.>>> उपकार केले. सर्व दल बदलू हेच सांगू शकतात.
राहुल गांधी महान आहे, मान्य. मी गुहा यांचे विवेचन आणि त्याला कोन्ग्रेसच्या कोणीतरी, सॉरी नाव आठवत नाही, दिलेले उत्तर दोनीही वाचले आहेत. . तरीही राहुल गांधी BATMAN नाही. असे माझे मत आहे. माघून मधून आपले मातीचे पाय दाखवल्या शिवाय रहावत नाही.
२०१४ आपण सोडून देऊ, पण नंतरही निवडनुका झाल्या. आपण त्यातून काही शिकलो नाही. उलट आपण पण देवळात जाऊ लागलो. पब्लिक के लिये करना पडता है. सत्तर वर्षे राज्य केले, हुकुमशहाला हेवा वाटेल असे जनतेचे प्रेम लाभले पण जनतेला आपण वैद्न्यानिक दृष्टीकोण शिकवला नाही, धर्म जातपात ह्यांचे उच्चाटण केले नाही. हे आपले अपयश आता येऊन आपल्यालाच डसत आहे.
ही माझी मुख्य तक्रार आहे.
ह्या पेक्षा जास्त स्पष्ट लिहिणार नाही, समझनेवालोंको इतना काफी.

तुम्ही राहुल आणि काँग्रेसबद्दल तक्रार करत असाल, तर ती मान्य आहे.
पण म्हणून त्या झुरळ आंदोलनाला खांद्यावर घ्यावं अशी अपेक्षा असेल तर ते मान्य नाही.
अरविंद केजरीवाल, अण्णा हे संघाचे ट्रोजन हॉ र्स आहेत.
झुरळांविषयी जेवढं वाचतोय, त्यावरून तेही ट्रोजन हॉर्स आहेत, अशी खात्री पटत चालली आहे.
एकाच वेळी विरोधी पक्ष आहेच कुठे? रस्त्यावर का नाही येत, असं म्हणायचं आणि ते रस्त्यावर उतरून जी आंदोलन करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मनोज जरांगे, अभिजित दिपके यांना डोक्यावर घ्यायचं.
तो स्वतःच अमेरिकेतून आलाय आणि म्हणतो राहुल सारखा बँकॉकला जातो. ही भाजपचीच भाषा आहे.

सौरव दास वापरला जातोय ,असं मला वाटतं. पण इतकंही बावळट असू नये. २०१७ मध्ये तो मोदींचा फॅन होता , हे मला हल्लीच कळलं.

राहुलच्या टेंपल रन विषयी - तो हिंदूच नाही असा प्रचार भाजपवाले करत होते. त्यावर त्यांनी शोधलेलं हे उत्तर. संघ भाजपवाले इतके नीच आहेत की तो राजीवचा मुलगा नाही, असं भर सभेत हे लोक सांगतात. आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवतात.
तरीही तो राजकारणात आहे, नाहीतर ती बाई दोन पोरांना घेऊन कधीच मायदेशी जाऊ शकली असती.
तो एकटाच आहे, जो संघाशी शेवटपर्यंत लढेल याची खात्री आहे.

आणि आपल्या देशाची घोडदौड एकपक्षीय लोकशाहीकडे होते आहे. आताच मीनाक्षी नटराजन यांची उमेदवारी रद्द केली. लोकसभेला रश्मी बर्वे यांची केली होती. एस आय आर , मतदार याद्या , मतदान ते मतमोजणीतले घोळ यातून कुठे विरोधी पक्ष निवडून आला तर तो चमत्कार म्हणावा लागेल.

काँग्रेस शिवाय इतर सगळे पक्ष कधी ना कधी भाजपच्या गळ्यात गळा घालून आले आहेत.
काँग्रेसमधलेही नेते तिथे जातच असतात.
ममता २००२ नंतर भाजपसोबत होती. तरीही आताच्या बंगाल निकाल आणि नंतरच्या प्रकारानंतर राहुल ममताच्या पाठी उभा आहे. केजरीवालला मात्र दहा हात दूरच ठेवावे असेच माझे मत आहे.

ही परिस्थिती बदलेल याची मला कसलीही आशा नाही. क्लायमेट चेंज, इकॉनॉमी, शिक्षण, वृक्ष तोड हे दिसत असूनही लोकांचे डोळे उघडत नसतील, तर बुडू देत. आपणही बुडणारच आहोत.

शिरीष पै यांची एक कविता आहे.
poem.jpg

सत्तर वर्षे राज्य केले, हुकुमशहाला हेवा वाटेल असे जनतेचे प्रेम लाभले पण जनतेला आपण वैद्न्यानिक दृष्टीकोण शिकवला नाही, धर्म जातपात ह्यांचे उच्चाटण केले नाही. हे आपले अपयश आता येऊन आपल्यालाच डसत आहे.
ही माझी मुख्य तक्रार आहे. >> या मताशी पूर्णपणे सहमत आहे. भाजपला याच ठिकाणी येण्यासाठी सत्तरपेक्षा फार कमी वर्षे लागतील हे नक्की.

भरत, अपयश हे पक्षाचे नाही. भारतीयांचे असणार आहे. या अनुभवातून आपण शिकणार का? हा खरा प्रश्न आहे.

झुरळांविषयी जेवढं वाचतोय, त्यावरून तेही ट्रोजन हॉर्स आहेत, अशी खात्री पटत चालली आहे.>>:?
मी इथे काही व्यंग केले तर तुम्ही "फक् यू" असे म्हणणार नाही याची खात्री आहे म्हणून लिहितो. हे ही कुणीतरी सरांच्या धाग्यावर लिहिले होते. त्याला धरून लिहितो. With अपोलोजीज.
मोठ्या साहेबांनी बघितले कि तरुणांच्यात मरगळ आहे. कुणीही भजी तळत नाहीयेत, रील बनवत नाहीयेत. कसे होणार देशाचे? मग ते तिरीमिरीने उठले आणि शिक्षण खात्याकडे गेले. आणि त्यांनी NTA आणि CBSE मध्ये घोटाळे करायचे आदेश दिले.
मग जेम्स बॉंड धोवाल साहेबाकडे गेले.
"तुम्ही सांगितल्या प्रमाणे घोटाळे झाले / केले/ होतील. पण आता पुढे काय?"
" मै हु ना!"
मग त्यांनी जागतील RAW एजंटना अक्तीवेट केले.
एका एजंटने बातमी आणली. अभिजित दिपके हा आपल्या कामाचा तरुण आहे. चांगला दलित आहे. म्हणजे तर सोनेपे सुहागा . त्याला बोस्टन मधेच जंतर मंतरची परमिशन दिली गेली. दिल्लीचे तिकीट हातात गिले गेले.
पुढचे सगळे आपल्याला माहित आहेच.
मोदी साहेब खुश. एक खूळखुला और!
जिज्ञासा आभार!
आपण एकमेकांना कन्विन्स करण्यात काही अर्थ नाही,

ओरिजिनल पोस्ट
कोट
देशातला युवा गलितगात्र झाला होता. तेज नाहीसे होऊन त्यास अवकळा प्राप्त झाली होती. यास्तव श्री श्री मोदीजींनी शिक्षण मंत्र्यास पाचारण करून कामगिरी सांगितली. त्याने अनुज्ञा घेऊन नीट ची परीक्षा विस्कटली. मग पुढे जाऊन सीबीएससी चा निकाल लावला. मग मोदीजीनी गूढपुरुष डोवाल जी याना पाचारण करून अमरक देशात वास्तव्यास धाडलेल्या दिपके नामक झुरळास हाती धरून आपल्याच विरोधात विद्रोह करण्याच्या कामगिरी वर नामजाद केले. डोवाल देखील हे ऐकून चिनभिण झाले. पण महामानवाच्या अंतःकरणाचा ठाव घेणे म्हणजे जमुनेच्या डोहात कालियाच्या नकळत खेकडे पकडण्याइतके अशक्य. त्यामुळे त्यांनी ती लगेच अमलात आणली. हे सगळे धुरंधर ५ मध्ये दाखवणार आहेत.
Submitted by चिडकू on 7 June, 2026 - 14:41
अन कोट.

कॉक्रोच पार्टी ऑनला इन सटायर म्हणून स्थापन झाली, तेव्हा मीही तिथे रजिस्टर केलं. मेघनादबरोबरच्या दिपके आणि अन्य दोन झुरळांच्या गप्पा ऐकल्या. मेघनादनेच त्यांना प्रत्यक्ष कृती करा म्हणून सांगितलं. हा सेट अप असू शकतो
मग काय झालं ? नीट आणि osm राहिलं बाजूला. यांचे सपोर्टर्स पाकिस्तानातले आहेत. दिपके भारतात येतोय की त्याला तिथून हाकललाय? जंतरमंतरवर नक्की किती लोक आले? तिथे ट्रान्सजेंडर का होते? भारतवि रोधी घोषणा दिल्या गेल्या का?
दुसरीकडे आप आणि काँग्रेस समर्थकांत वाग्युद्ध सुरू झालं. आप वाल्यांनी समोर यायला फार वेळ लावला नाही आणि प्रमुख झुरळांनी त्यांच्या ट्वीट्स रिट्वीट करायलाही.

हा धागा राजकारण या ग्रुपात आहे.

तो नाही.

हा धागा वाचला जातो, याची पावती अशी अधून मधून मिळत राहायला हवी.

Archaeological Deoartment of Maayboli.
खणा खणा खणा. खणत रहा.
त्यावेळी RSS च्या टार्गेट वर कॉन्ग्रेस सरकार होते. आता कोण आहे?
When you are dreaming, Dream BIG!
मोदी साहेब, सांभाळून आसा. रात्र वैऱ्याची आहे.
CONSPIRACY THEORY NO १!

उत्तर नाही,
मुद्देवंचितांसाठी एक नवीन टेक्निक!

Blessings of 140 crore Indians my greatest strength: Modi>>> एक मिनिट. 140 crore मायनस १ असे म्हणा.

Pages