खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_2026-06-16-08-51-57-756-edit_com.miui_.gallery.jpg

लेकीच्या स्नॅक्स box साठी केलेल्या ज्वारीच्या पिठाच्या बिट्या. स्कूलबस मध्ये खायला हवं असतं

IMG-20260629-WA0009.jpg

PXL_20260704_143146186.PORTRAIT~2.jpg

पावसाळी संध्याकाळ साधून उत्तर भारत/ खासकरून आगरा, मथुरा, दिल्ली भागातील प्रसिद्ध बेडमी + आलू सब्जी बनवली गेली !

बेडमी - मुळात गव्हाच्या पिठात भरड उडदाची डाळ भरून तळलेल्या कचोरी टाईप पुऱ्या, आम्ही उडीद डाळ भरडा थेट पोटात घालून कणिक मळली आणि बेडम्या तळल्या.

सब्जी - मुळात पेठा/ काशिफळ ह्यांची असते त्याला कद्दू की सब्ज़ी म्हणतात, आम्ही बटाट्याची केली. सोबत कोथिंबीर पुदिना लसूण हिरवी मिर्ची चटणी.

उडीद भरडा घातल्यामुळे पुऱ्या दाणेदार टेक्शरच्या होतात, कचोरी सारख्या थोड्या खुसखुशीत (खस्ता) कुरकुरीत बेडम्या भाजीत कुस्करून खायला मस्त लागतात.

मस्त मेनू
दोन्ही photos यम्मी
पार्टी छान झालेली दिसतेय
..
बेडमी पुऱ्या आवडतात
मी शोधतच होते रेसिपी
आता करण्यात येईल
पाऊस आणि गरम पुरी भाजी

पूर्ण रात्रीचे जागरण, पहाटेची वेळ, तरीही उडून गेलेली झोप आणि रात्रीचे जेवण जिरल्यानंतर लागलेली भूक हे काहीही हाडादायला बेस्ट वेळ असते. त्यात पावसाळी वातावरण हा बोनस होता. कोणात काही करायची ताकद नसल्याने ऑर्डर केले.

IMG-20260702-WA0006.jpg

आज काय मेनू बिनु नाही, उशिरा उठल्याने घाईघाईने पळाल्यामुळे आज अण्णाचा आसरा आम्हा गरीब वासरां.

images (37).jpeg

चर्नी-रोड स्थानकाच्या जवळ ऑपेरा हाऊसच्या अलीकडच्या चौकात पेट्रोल पंपाच्या समोर आमचा अन्नदाता उभा ठाकलेला असतो कायम, ऊन, पाऊस, वारा (थंडीचा मुंबईशी अनैतिक सुद्धा संबंध नसतो ते एक असोच), आण्णाकडे असणारी घट्ट हिरवी चटणी मस्त तिखट जाळ असते, अस्सल हिरव्या मिरच्यांच्या स्वाद घेऊन, पहिल्या घासाला उचकी लावणार असली, सोबत पातळ चटणी आणि लाल टोमॅटो + मिर्ची असणारी चटणी !

दोन प्लेट मेदुवडा , अण्णाला दोन लाख दुवा अन् दिवसभर कामाला माणूस मोकळा.

मस्तच पोस्ट जेम्स वांड! Happy
सगळेच फोटो भारी आहेत, अधूनमधून येऊन पाहून जाते.

हा कालचा मेन्यू -
पालक पराठे, दहीभात, मेतकूट, आंबट वरण शिळं, दुधीची खीर, बटाट्याची भाजी.
IMG-20260709-WA0000(1).jpg
दाल मखणी
IMG-20260709-WA0001.jpg

थाई कोकोनट करी (ह्यात काही गोष्टी रेडिमिक्स आहेत)
IMG-20260709-WA0003(1).jpg

भरली वांगी आणि फुलकोबीची भाजी
IMG-20260709-WA0006(1).jpg

फिश स्टिक्स ( तिलापिया आहे बहुतेक) विसरले.
IMG-20260709-WA0005.jpg

छोले, बटर चिकन, फ्रोजन नान, नेपाली चुकौमी ( कोशिंबीर)
IMG-20260709-WA0004.jpg
कैरीची डाळ, कारल्याची भाजी, गाजराची कोशिंबीर
IMG-20260430-WA0002(1).jpg
लिंबाचं लोणचं नुकतंच घातलं होतं आता मुरलंय.
IMG-20260709-WA0007.jpg

केवढं करतेस. सढळ हस्ते भरपूर करत असतेस. मला गाजराची कोशिंबिर व फ्लॉवरची भाजी हवी.

भांड्याआधी त्या पिवळ्या मंद प्रकाशयोजनेमुळे समजतात मला अस्मिताचे फोटो. खाली ट्रेन दिसली की कन्फर्म होते. मग पुन्हा वेगळे कन्फर्म करायला नाव नाही वाचत. त्यापेक्षा आपली पोस्ट टाकतो.
सुप्रभात!
या, पोह्यांचा रविवार उजाडला

IMG-20260712-WA0004.jpg

भारी पोहे ऋ . मला फार आवडतात असे मउ पोहे , एकदम फडफडीत पोह्यापेक्शा Happy
चहा पुरी , लाळगाळू एक्दम . बअरेच दिवसात हा बेत झाला नाही .

काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने केलेले पदार्थ

साबुदाणा बटाटा शॉट्स
Screenshot_2026-07-26-16-13-43-306-edit_com.miui_.gallery.jpg

Caramelized sweet potatoes
Screenshot_2026-07-26-16-13-32-447-edit_com.miui_.gallery.jpg

Pages