Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी काहीही असो हे आंदोलन (?)
बाकी काहीही असो हे आंदोलन (?) आर्टिफिशियली बुस्टेड आहे अशी वारंवार शंका येते आहे.
ते बहुधा असणारच..
ते बहुधा असणारच..
आणि असल्यास वैयक्तिकरित्या माझी काही हरकत देखील नाही. यावर प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्यू वेगळा असू शकतो.
पण सरकारवर अंकुश राहणे गरजेचे. त्यांना जाब विचारला जाणे गरजेचे. नाहीतर ते आपल्याला विकून खातील.
माझा लेक यावर्षीच बारावी
माझा लेक यावर्षीच बारावी झालाय, CBSE मधून. आज तो मला जंतर मंतर ला घेवून गेला होता. २-३ तास होतो आम्ही तिथे. शिक्षण घोटाळे ( नीट, CBSE आणि CUET) साठी accountability आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा याच बाबींवर आज तिथे बोलले जात होते. आम्ही तिथे असताना तरी बरीच गर्दी होती. जंतर मंतर गच्च भरलं होते. तरुण मुलं ( १७ ते २०-२१ वयोगट) खूप होती. एरवी कानावर हेडफोन लावून फिरणारी ही मुलं - मुली तिथे धर्मेश प्रधान - इस्तिफा दो म्हणून घोषणा देत होती.
सोनम वांगचुक आला त्यावेळपर्यंत भरपूर गर्दी झाली होती. त्याच वेळी घरून मेडिकल इमर्जन्सी ची बातमी कळल्याने आम्ही परत आलो.
तरुणांबरोबरच काही माझ्या वयाचे आणि थोडे म्हातारे लोक पण होते. वेगवेगळ्या न्युज चॅनल्स चे बरेच लोक तिथे होते, काहीजण लोकांना प्रश्नही विचारत होते. एका ग्रुप चे उत्तर ऐकलं - हम मोदीजी को सपोर्ट करते है लेकीन ये बच्चो के साथ जो हो रहा है वो गलत है और सरकार को इसपे ऍक्शन लेना चाहिए.
बरेच युट्यूब न्यूज चॅनल पण होते बहूतेक, फोन घेवून रिपोर्टिंग करणारे, सगळ्या भाषा ऐकू येत होत्या. काही influencer पण आले होते तिथे.
समधिश भाटिया होता. माझा मुलगा त्याला फॉलो करतो. आयाम त्याच्याजवळ जावून त्याच्याशी बोलला. समधिश ने त्याला ५-७ मिनिटे वेगवेगळे प्रश्न विचारले. इथे का आलास. सरकारचे काय चुकत आहे, तुझ्या पॉलिटिकल सायन्स च्या पुस्तकातले काय सरकार ने फॉलो करावे असं तुला वाटते. सोशलीझम, मार्क्स बद्दल , आयाम लिहित असलेल्या ब्लॉग मध्ये काय लिहितो याबद्दल... शिक्षण घोटाळ्यांबद्दल, humanitarian आणि nationalism याबद्दल मतं विचारली. माझ्याशी पण बोलला २-३ मिनिटे, थोडे प्रश्न विचारले..त्याच्यासारखे सिरियस प्रश्न नाही विचारले मला. हे सगळं जे चाललं आहे त्याच्याबद्दल मत विचारलं. मी स्केप्टिकल आहे असं सांगितल्यावर , बरोबर आहे तुमचे वय बघता स्केप्टिकल असणं असं म्हणाला.
<<<< एका ग्रुप चे उत्तर ऐकलं
<<<< एका ग्रुप चे उत्तर ऐकलं - हम मोदीजी को सपोर्ट करते है लेकीन ये बच्चो के साथ जो हो रहा है वो गलत है और सरकार को इसपे ऍक्शन लेना चाहिए.
>>>>>
ग्रेट! हा स्टँड आवडला..
आणि तुम्ही तिथे मुलाबरोबर गेलात हे सुद्धा भारी आणि तिथले नेमके चित्र इथे लिहिले हे सुद्धा छान केलेत.
तुमचे वय बघता स्केप्टिकल असणं
तुमचे वय बघता स्केप्टिकल असणं असं म्हणाला.
If at age 20 you are not a Communist then you have no heart. If at age 30 you are not a Capitalist then you have no brains.”
― George Bernard Shaw
"There is nothing permanent
"There is nothing permanent except change." — Heraclitus
https://www.ft.com/content/c361e372-769e-45cd-a063-f5c0a7767cf4?syn-25a6b1a6=1
जर फायनांनशिअल टाईम्स ची पे वॉल बायपास करता येत नसेल, तर जेमीनी कडून हे आर्टीकल कशावर आहे याचा गोषवारा घेऊ शकता. हा ट्रेंड जेन झी बाबत आणखी तिव्र असल्याचे निरीक्षण आहे.
अल्पना, छान अपडेट प्रत्यक्ष
अल्पना, छान अपडेट प्रत्यक्ष मैदानातून.
<<एका ग्रुप चे उत्तर ऐकलं - हम मोदीजी को सपोर्ट करते है लेकीन ये बच्चो के साथ जो हो रहा है वो गलत है और सरकार को इसपे ऍक्शन लेना चाहिए.>> सपोर्ट करत असूनही योग्य भूमिका आहे, जबाबदार भूमिका आहे.
अल्पना , छान अपडेट्स.
अल्पना , छान अपडेट्स.
असा first hand रिपोर्ट भारीच!
>>मी पहील्यापासून नोटीस केलयं
>>मी पहील्यापासून नोटीस केलयं कन्सेप्ट समजण्यात तुम्ही वेळोवेळी खुप गोंधळ घालता.<<
मूळात कान्सेप्टंच फ्लॉड असेल तर तो दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. तुमच्या ध्यान्यात ते येत नाहि, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. असो..
पुढच्या सहा महिन्यात कॉकरोच राहतील पण हि पार्टि जिवंत राहिल का हे बघुया...
>>If at age 20 you are not a
>>If at age 20 you are not a Communist then you have no heart. If at age 30 you are not a Capitalist then you have no brains.”
― George Bernard Shaw<< +१
माझा हातभार -
"द प्रॉब्लेम विथ सोशलिझ्म इज दॅट यु इवेंचुली रन आउट ऑफ अदर पिपल्स मनी."
- मार्गरेट थॅचर
When Injustice becomes law,
When Injustice becomes law, resistance becomes duty - Thomas Jefferson
कॉम्रेड खर्यांनी तेच ते जुनं
कॉम्रेड खर्यांनी तेच ते जुनं झालेलं, काआच्या कसोटीवर न टिकलेलं कोट चिकटवलं आहे. ही अशी माझ्या एका जुन्या वहीत लिहून ठेवलेली असायची तोंदावर मारण्यासाठी. नंतर सारा मुर्खपणा लक्षात आला. आपण इतरांना नाही, तर स्वतःलाच फसवतो आहोत हे लवकर लक्षात आलं.
याला प्रतिवाद म्हणून अनेक कोट्स इथं फेकता येतील. उदाहरणार्थ फ्रेड्रिक एंजल्सः "मार्क्सवाद हा नुसताच रोमँटिसिझम नाही. तो तुमच्या कम्युनिटीच्या ऐतिहासिक आणि आर्थिक माहितीचा आधार घेऊन तुमचं आयुष्य सुसह्य व्हावं म्हणून रचलेला आणि सिद्ध केलेला वैज्ञानिक 'डेटा' आहे".
ही अशी कोट्स लोकांच्या तोंदावर मारून फेकणं हा एकंदरितच भयंकर मोठा मुर्खपणा आहे. हीए कोट्स बोलणारे कालातीत असले तरी कोट्स तशी चिरंतन, कालातीत असतीलच असं नाही. मीही चर्चत भाग घेतोय असं दाखवून चर्चेपासून पळ काढण्यासाठी अशी असंख्य आऊटडेटेड कोट्स फेकून मारू शकतो. कुणीही मारू शकतो. ही भंपकपणाची आणि दिवाळखोरीची लक्षणं आहेत- असं माहित नसलेला कुणीही.
तुमच्या ध्यान्यात ते येत नाहि
मूळात कान्सेप्टंच फ्लॉड असेल तर तो दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. तुमच्या ध्यान्यात ते येत नाहि, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. असो..>>> ते आलंच ध्यानात सर्वांच्या, _____ तो भी टांग उपर
कॉम्रेड खर्यांनी
कॉम्रेड खर्यांनी
हा हा हा
हा चांगला जोक होता
अजून येऊ द्या!
तुम अपनी असली पहचान मान चुके
तुम अपनी असली पहचान मान चुके हो या बाकी चीजोंके बारेमें तुम्हे कुछ कहना नही है?
खरे काका तुमच्या लक्षात येत
खरे काका तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्हाला जस्ट एक माहितीसाठी सांगू इच्छितो तुमचं जे काही सुरुये ते केवळ हास्यास्पद नाही तर केविलवाणे आहे
कधीतरी आयुष्यात नॉर्मल जगायला बघा जमलं तर
खरे काका तुमच्या लक्षात येत
खरे काका तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्हाला जस्ट एक माहितीसाठी सांगू इच्छितो तुमचं जे काही सुरुये ते केवळ हास्यास्पद नाही तर केविलवाणे आहे>>>
दिल्लीत जंतरमंतर इथे झालेल्या
दिल्लीत जंतरमंतर इथे झालेल्या आंदोलनात विविध गंमती बघायला मिळाल्या. कुणी इराणवर अमेरिकेने हल्ला केला म्हणून झुरळे संतप्त आहेत असे मानत होता.

काही कल्पक लोकांनी झुरळाचे कागदी मुखवटे विकून उद्योजकता दाखवली आणि आंदोलनाला एक प्रगल्भ दिशा दिली!
गोदी मिडिया हा शब्द खूप फेमस
गोदी मिडिया - हा शब्द खूप फेमस आहे वाटते. गेले काही दिवसात न्यूज बातम्या फॉलो करत आहे तर जिथे तिथे ऐकू येत आहे.
काल जंतर मंतर वर सुद्धा गोदी मीडिया हाय हाय अश्या घोषणा दिसत होत्या. इथे बघू शकता.
https://www.instagram.com/reel/DZPh5j6zWk3/?igsh=NXRuc2hvMGFnN3Y=
हा अजून एक व्हिडिओ ज्यात पत्रकारितेच्या नावावर कलंक असलेल्या काही जणांना एक्सपोज केले गेले. जे दरवेळी मुद्दाम असली प्रदर्शने खराब करायला टीम बनवून येतात.
https://www.instagram.com/reel/DZPseF5Meo-/?igsh=cnJvcDUxd3UyZTk0
देश खड्यात जायला तेव्हा सुरुवात होते जेव्हा मीडिया विकली जाते. यांच्याविरुद्ध अशी चळवळ निघणे फार गरजेचे होते. जिथे तिथे यांना असा विरोध व्हायला हवा की पक्षपात करताना लाज वाटली पाहिजे. देशाचे सर्वात मोठे गद्दार हे आहेत जर हे निष्पक्ष राहू शकत नसतील तर...
या लोकांनाही भ्रष्टाचारी नेत्यांसारखेच पळवून पळवून मारायला हवे..
तळटीप - त्यादिवशी मी भ्रष्टाचारी नेत्यांना पळवून पळवून मारायला पाहिजे असे म्हणतात काही लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. असे कसे कायदा हातात घेण्याचा सल्ला मायबोलीवर मिळत आहे वगैरे विचार लोकांच्या डोक्यात आले असावेत. त्यांना सांगू इच्छितो की तो एक वाक्यप्रचार आहे. पळवून पळवून मारणे म्हणजे यांना जेरीस आणणे, यांच्या नाकात दम करणे.
उदाहरणार्थ, या लोकांचा बँड वाजवला पाहिजे असे म्हटले तर लगेच मी बँडमास्टर झालोय असे डोळ्यासमोर आणायची गरज नाही
गोदी मिडिया - हा शब्द खूप
गोदी मिडिया - हा शब्द खूप फेमस आहे वाटते. गेले काही दिवसात न्यूज बातम्या फॉलो करत आहे तर जिथे तिथे ऐकू येत आहे. >> कुठे ऐकलं? मला तर काहीच माहिती नाही. नवीनच आहे हे सर्व.
असा एक व्हिडियो पाहण्यात आला
असा एक व्हिडियो पाहण्यात आला आहे की भारताला पुन्हा एकदा प्रगतीपथावर नेणारा झुरळांचा म्होरक्या हे आंदोलन चालू असताना आपल्या अनुयायांना बसून घ्या असे सांगत होता. "बैठ जाओ" तर अनुयायांनी त्याला एक घोषणा मानून "बैठ जाओ" चा गजर चालू केला.
ह्यातून हे आंदोलन किती विचारपूर्वक केले आहे आणि त्याच्या यशस्वी होण्याची जवळपास पूर्ण खात्री कशी आहे हे स्पष्ट होते.
तेव्हा उगाच शंकेखोरपणा सोडा आणि सामिल व्हा!
अरेच्चा तुम्हीच आता गलिच्छ
अरेच्चा तुम्हीच आता गलिच्छ भाषा आणि वैयक्तिक हल्ले याबद्दल प्रवचन देऊन आलात ना? कि ती टैमप्लीज होती?
शेंडे आणि राज यांनी जॉब चेंज
शेंडे आणि राज यांनी जॉब चेंज केला वाटते. अमेरिकेतून डायरेक्ट भारतात.
<<त्यादिवशी मी भ्रष्टाचारी
<<त्यादिवशी मी भ्रष्टाचारी नेत्यांना पळवून पळवून मारायला पाहिजे असे म्हणतात काही लोकांच्या भावना दुखावल्या होत्या>>
भावना नाही दुखावल्या. पब्लिक प्लॅटफॉर्मवर उद्विग्नतेतून व्यक्त होताना घेण्याच्या काळजीबद्दल सांगितलं. लिहायचे तर लिही कुठलेही वाक्प्रचार.
अच्छा.. तुमची पोस्ट आता मागे
अच्छा.. तुमची पोस्ट आता मागे जाऊन वाचली. ती निसटली होती.
पळवून पळवून मारायचे म्हणजे नक्की काय करायचे असे कोणीतरी विचारले होते त्याला दिलेले उत्तर होते ते की त्याचा अर्थ शब्दशः तसा होत नाही इतकेच.
बाकी जर एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला टार्गेट करून न म्हणता मी म्हणत असेल की भ्रष्टाचाऱ्यांना पळवून पळवून मारायला पाहिजे तर पर्सनली मला त्यात वावगे वाटत नाही.
समाजातली कीड ठेचायला हवी यासारखेच एक वाक्य वाटते.
आणि हो, उद्विग्नतेतून नाही सध्या मी उत्साहातून लिहीत आहे
CJP राहुल गांधींचे संसदेतील
CJP राहुल गांधींचे संसदेतील सरकारविरोधातील भाषणं ऐकत नाहीत का? युवकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन आंदोलन करतात हे दिसत नाही का? मेनस्ट्रीम मिडिया जरी ते दाखवत नसेल तरी काँग्रेस दररोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सोशल मीडियावरून जनतेपर्यंत पोहोचत असते. देशातील कुठलाच विरोधी पक्ष युवकांचे प्रश्न मांडत नाही हा CJP चा आरोप चुकीचा आहे. सध्या त्यांनी स्वीकारलेला मार्ग सरकार धार्जिणा आहे.
अमेरिकेत आता बोलायसारखे फारसे
अमेरिकेत आता बोलायसारखे फारसे उरले नसल्याने आता भारताच्या आघाडीकडे लक्ष देण्यात येत आहे.
काल तर एक मत असे ऐकले की
काल तर एक मत असे ऐकले की भाजपनेच मुद्दाम हे सगळे घडवून आणले. याचे कारण त्यांना स्वतःलाही हे बघायचे होते आणि हे सिद्धही करायचे होते की नेपाळसारखे इथे काही होते का आणि तसे इथे काही होत नाही (अनुक्रमे)
देशातला युवा गलितगात्र झाला
देशातला युवा गलितगात्र झाला होता. तेज नाहीसे होऊन त्यास अवकळा प्राप्त झाली होती. यास्तव श्री श्री मोदीजींनी शिक्षण मंत्र्यास पाचारण करून कामगिरी सांगितली. त्याने अनुज्ञा घेऊन नीट ची परीक्षा विस्कटली. मग पुढे जाऊन सीबीएससी चा निकाल लावला. मग मोदीजीनी गूढपुरुष डोवाल जी याना पाचारण करून अमरक देशात वास्तव्यास धाडलेल्या दिपके नामक झुरळास हाती धरून आपल्याच विरोधात विद्रोह करण्याच्या कामगिरी वर नामजाद केले. डोवाल देखील हे ऐकून चिनभिण झाले. पण महामानवाच्या अंतःकरणाचा ठाव घेणे म्हणजे जमुनेच्या डोहात कालियाच्या नकळत खेकडे पकडण्याइतके अशक्य. त्यामुळे त्यांनी ती लगेच अमलात आणली. हे सगळे धुरंधर ५ मध्ये दाखवणार आहेत.
*Fwd post*
Post आवडली. पटली. शेअर करतो.
ज्याने कोणी लिहिली त्याला माझ्यातर्फे धन्यवाद.
यात त्यांनी माझे कौतुक केले आहे
*Fwd post*
----
आज दिवसभर काही जण कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप ठरल्याच्या पोस्ट टाकत फिरत आहेत. पण आश्चर्य याचं वाटतं की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न बाजूला ठेवून यांना फक्त गर्दी मोजण्यात रस आहे!
पेपरफुटी झाली, लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं... पण यावर बोलण्याऐवजी काही जण आंदोलनात किती लोक होते याचं गणित मांडत बसले आहेत.
५००० लोक असोत की ५, निदान ते अन्यायाविरुद्ध उभे राहिले. तुम्ही काय केलं? स्वाभिमान विकून टाळ्या वाजवणं आणि प्रत्येक चुकीला बरोबर ठरवणं हा जर देशभक्तीचा नवा अर्थ असेल, तर याहून मोठ दुर्दैव नाही.
सत्ता कोणाचीही असो, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत. सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत! जनतेला त्रास होत असताना गप्प बसणं म्हणजे अन्यायाला मूक पाठिंबा देणं होय. रस्ते, पाणी, वीज, रोजगार, महागाई,शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर मागणं हा जनतेचा अधिकार आहे, उपकार नाहीत. सत्तेत बसल्यावर टीका सहन होत नसेल, तर जनतेच्या विश्वासाचा दावा करण्याचाही अधिकार राहत नाही. प्रश्न विचारणाऱ्यांना विरोधक समजू नका, तेच लोकशाहीचे खरे पहारेकरी असतात.
लक्षात ठेवा, इतिहासात गप्प बसणाऱ्यांची नोंद नसते,इतिहास लिहिला जातो तो अन्यायाविरुद्ध छाती ठोकून उभं राहणाऱ्यांच्या आणि संघर्षाने तोंड देणाऱ्यांचा!आज आंदोलनाची खिल्ली उडवणारे उद्या याच लढ्याच्या यशाचं श्रेय घ्यायला पहिल्या रांगेत उभे राहतील.
या देशात अजूनही काही लोक सत्यासाठी लढत आहेत, हीच आशेची गोष्ट आहे. त्या प्रत्येक लढवय्याला सलाम!
-- अनामिक
Pages