Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही बहुदा श्रॉडिंजर ची झुरळे असावीत. एकाच वेळी दखल न घेण्याजोगी फालतू आणी टेंपररी फॅड आणी आय बी, मंत्री, गोदी मेडिया यांनी त्रागा करण्याइतकी शक्तीशाली.

आसपास माशा असतील तर हत्ती जोरजोरात कान हलवून त्या माशा हाकलताना दिसतात. ह्याचा अर्थ माशा हत्तीपेक्षा शक्तीशाली आहेत असा होतो का? इतक्या मोठ्या हत्तीलाही कान हलवायला भाग पाडतात म्हणजे त्या माश्या हत्तीपेक्षा स्ट्रॉंग असल्या पाहिजेत!

बोकलत हेच भक्तांच्या मांदियाळीत सामील झालेत>>> मी अपक्ष आहे आणि राजकारणात मला अजिबात इंटरेस्ट नाही. तुम्ही सगळे इथे असता म्हणून मी येतो. लहान असताना मोठेपणी काय होणार हा प्रश्न जेव्हा विचारला जायचा तेव्हा माझे मित्र बोलायचे डॉक्टर व्हायचंय इंजिनिअर व्हायचय पण मी बोलायचो मला एक मायबोलीकर व्हायचं आहे. आणि मी तो झालो याचा मला अभिमान आहे.

हत्ती कान फडफड करत तिथेच थांबतो
सगळ्या कळपाला माशांच्या मागे धावायला नाही लावत

कधी वाटतं बाटगे मुसलमान जास्त कट्टर असे म्हणतात
तसं भाजप पेक्षा भाजप समर्थक जास्त कट्टर आहेत आणि त्रासदायक
एकवेळ मोदी चूक मान्य करतील पण भक्त तेही कसे बरोबर आहे हे पटवून देतील

एका निष्पक्ष नसलेल्या अंजना कश्यप नावाच्या पत्रकार महिलेने पेपर फुटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या खान सरांसारख्या युट्यूब टीचरना कवडीची अक्कल नाही असे म्हटल्याने आज सोशल मिडिया वातावरण तंग होते.

असे सर्वच आदरणीय शिक्षक आता या लढ्यात उतरले आहेत.

थ्री इडियट फेम सोनम वांगचूक यांनी सुद्धा आज कोकरोच पार्टी जॉईन केली आहे.

लढा मोठा होत आहे...

सगळ्या शिक्षकांनी नीट पेपर फुटी आणि सीबीएसई मार्कशीट प्रकरणात सरकारला धारेवर धरलेलं, आता हे शिक्षक सगळे पाकिस्तान चे हस्तक आहेत असे म्हणता येईना, फॉरेन फंडिंग चा आरोप करता येईना मग अंजना बाईंना पुढे करून ते कसे पैशासाठी नाटके करतात असा नारेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला,तो चांगलाच उलटला, शिक्षक लोकांनी तर तिचे वाभाडे काढलेच पण सर्वसामान्य लोकांनी पण ती रिपोर्टिंग ला गेली असताना घोषणा देऊन तिला हाकलून लावले
शेवटी आज तिने माफीनामा सादर केलाय, की सगळे शिक्षक असे नसतात, काहीजण खूप चांगले काम करतात वगैरे, बोलताना अक्षरशः जीवावर आलेलं तिच्या Happy

३० मे ची स्थिती

Petitions signed so far

782,240

आज

Petitions signed so far

800,042

गेल्या पाच दिवसातील प्रगती (?).

जालावरील आभासी जग आणि वस्तुस्थिती या दोन वेगळ्या गोष्टी असतात.

आता सरकारने अभिजित दिपके याना आंदोलनावर बसू द्यावे आणि संपूर्ण दुर्लक्ष करावे. दोन आठवड्यात सगळं थंड होईल.

तरुणांचे प्रश्न वास्तव आहेत पण त्यावर कोणी आपली राजकारणाची पोळी भाजून घेत असेल तर त्याचा तवा थंड होईपर्यंत थांबावे.

चला निदान खरे सरांना इतकी तरी जाणीव झाली की तरूणांचे काही प्रश्न आहेत
अशीच जाणीव सरकारला आणि आयटी सेल ला झाली तर बरे होईल

<<< सरकारने संपूर्ण दुर्लक्ष करावे >>>

बोलायला सोपे असते हे.
पण जिथे सरकारचे समर्थक रोज जाऊन पेटीशन स्कोअर चेक करतात तिथे खुद्द सरकारने दुर्लक्ष करावे हे जमायला जरा अवघडच आहे!

अशीच जाणीव सरकारला आणि आयटी सेल ला झाली तर बरे होईल>>> कोण म्हणतं जाणीव नाही आहे?...फक्त प्रश्नांना हाताळायची पद्धत थोडी कॅज्युअल आहे....म्हणजे कुणी संघटीतरीत्या आवाज उठवला तर त्याला 'राजकीय पोळी भाजणे/ देशात अस्थिरता निर्माण करणे' अशी लेबलं लावा.....कुणी एकटा दुकटा विद्यार्थी बोलला तर त्याला ' पाकिस्तानी' असं लेबल लावा...कुणा विद्यार्थ्यिनीने वसतीगृहातील असुविधांबद्दल तक्रार केली असता तिलाच वसतिगृह सोडण्याची नोटीस द्या....कोण म्हणतं प्रश्नांची जाण नाही आहे?...उगाच काहीतरी कांगाव करु नका...सब चंगासी...जोवर आमच्या मित्रांचे उद्योग (अगदी रिसेप्शन सोहळे सुद्धा बरं) उबदार ठेवण्यत सर्व यंत्रणा फकीरीच्या आविर्भावाने खर्ची घालू शकतो....तोवर सब चंगासी.. Wink

पेटीशन स्कोअर चेक करतात.

ते तुम्हाला वस्तुस्थिती दाखवण्यासाठी.

मला काय फरक पडणार आहे?

एव्हढ्या पोस्ट कसल्या या उत्सुकतेने सहा पाने वाचली.
माझं मत या सहा पानात नाही. ते कदाचित माझ्या एकट्याचं असेल किंवा आणखीही कुणाचं असेल. ते माझे विचार आहेत.

अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी त्या आंदोलनाला विरोध असणाऱ्यांना एक तर कॉंग्रेस पक्षाचे ** म्हटले गेले होते किंवा देशद्रोही. ते आंदोलन फेक आहे हे आज बहुतेक जण स्विकारतात. त्या वेळी काही जणांना पूर्ण कल्पना असून ते मै हूं अण्णा ची टोपी घालून रस्त्यावर लॅपटॉप घेऊन गावागावात मांडव टाकून बसले होते. तर काही हवा आहे म्हणून सामील झाले तर काहींना खरंच बदल होईल असे वाटत होते.
त्या फेक आंदोलनाने जन आंदोलनांवरचा विश्वास उडाला हे पाप केले आहे.

आता सेम परिस्थिती आहे. मी माझ्या टीन एजर मुलांना दूर रहायला सांगितले आहे. पुढे त्यांचा निर्णय. त्या आंदोलनात आए एस एस सुद्धा सहभागी होती. मोहन भागवत यांनी तसे सांगितले होते. पण खूप उशिरा. यादरम्यान अरविंद केजरीवाल हे अण्णांचे हनुमान म्हणून वावरत होते. आज जनलोकपाल बिल आणि प्रत्यक्ष जनलोकपाल कुठे आहे? इतर कुठल्याही नेत्याने अशी फसवणूक केली असती तर?

आता तर नवीन पक्षाचा प्रमुख याच पक्षाशी संबंधित आहे असे फोटो फिरत आहेत. त्यानेही मान्य केले आहे.

या परिस्थितीत ही जेन झी चा असंतोष नियंत्रित करण्यासाठी सरकारी खेळी असू शकते हे माझं मत आहे. दावा नाही.
दूधाने तोंड पोळले कि ताक फुंकून प्यावंं. प्रत्येक वेळी लाटेबरोबर वाहत गेलंच पाहिजे अशी गरज नाही.

** काही वर्षांपूर्वी या नावाचे क्लासेस जोरात होते.

तरुणांचे प्रश्न वास्तव आहेत पण त्यावर कोणी आपली राजकारणाची पोळी भाजून घेत असेल तर त्याचा तवा थंड होईपर्यंत थांबावे.

>>>पोळी भाजण्याचा हक्क फकस्त यका पार्टीला!

खरे काकांना मानलं पाहिजे
अजिबात फरक पडत नसताना केवळ माबो वरच्या अज्ञानी (राज नव्हे Happy ) लोकांना कळावं म्हणून नियमितपणे जाऊन चेक करतात आणि सांगतात
अशी माणुसकी आजच्या जगात दुर्मिळ
नाहीतर कोण आपला वेळ इंटरनेट खर्च करून असलं करेल

खरे काकांना लवकरच माबो रत्न पुरस्कार देण्यात यावा असा मी प्रस्ताव मांडत आहे

Never believe anything in politics until it has been officially denied.
Otto von Bismarck

अभिजीत दिपकेने भारतात येऊन आंदोलन करण्याची घोषणा काय केली, सगळीकडे देशभक्तीचा पूर (?) आला आहे. हे आंदोलन आपचे/ कॉँग्रेसचे / असीम सरोदे - विश्वंभर चौधरी - निखिल वागळे ह्यांचे असे अनेकविध शोध गोदुले पत्रकार लावत आहेत. त्याला अमेरिकेतून हाकलून लावले असाही जावईशोध एका देशपांडे नामक भक्ताने फेसबुकवर प्रसवलेला पाहिला

ओळखा पाहू काय?

कॉकरोच पार्टी ने आज ते केले जे आपल्या पंतप्रधानांनी गेल्या बारा वर्षात केले नाही असा त्यांच्यावर आरोप होतो Happy

मी आता तेच बघत आहे

Cockroach Janata party press conference!

मस्त आहेत ही मुले.. Ooops cockroaches
स्मार्ट इंटेलिंजट डेरिंगबाज !!

मोदी सायबानी एक भव्यदिव्य अशी प्रेस कॉन्फेरेंस घेऊन या कॉकरोच चा तोंड गप्प करायला पाहिजे .जय मुडी जय आर्यावर्त !

"आप"च्या उभरत्या काळात माबोवर एक धागा अतिशय हिट झाला होता. मिर्ची नांवाचा आय्डी हिरीरीने केजरीवालचं समर्थन/गुणगान करायचा/गायचा. पुढे केजरीवालचे खरे रंग बाहेर येउ लागल्यावर तो धागा ओसाड पडला, आणि मिर्चीताईहि अंतर्धान पावल्या..

एक निरिक्षण, बाकि काहि नाहि...

>>
कधी वाटतं बाटगे मुसलमान जास्त कट्टर असे म्हणतात
तसं भाजप पेक्षा भाजप समर्थक जास्त कट्टर आहेत आणि त्रासदायक
एकवेळ मोदी चूक मान्य करतील पण भक्त तेही कसे बरोबर आहे हे पटवून देतील
<<
कुणीही ह्या झुरळांच्या विरुद्ध मत व्यक्त केले की ते बाटगे, अन्धभक्त वगैरे रडीचा डाव खेळायला सुरवात!
अण्णा हजारे यांचे आंदोलन ज्या प्रकार फसले आहे ते बघता लोकांना झुरळांबद्दल शंका येणारच. त्यांना लगेच भक्त, आंधळे पाठिराखे वगैरे म्हणून आपणच बाटगे झुरळ अनुयायी आहोत हे सिद्ध करत आहात.

मुद्द्याला मुद्याने उत्तर द्या. भाजपसारख्या शक्तीशाली पक्षात काही लोकांनी झुरळांच्या विरुद्ध बोलायला सुरवात केली तर ते हत्तीच्या कान हलवण्यासारखेच आहे. माशा झटकून टाकायला. हत्ती आपली चाल कणभरही न बदलता ते करू शकतो.
इतक्या क्षुल्लक प्रतिकाराला भाजप घाबरला वगैरे म्हणणे हास्यास्पद आहे.
व्हायरल जाणे आणि प्रत्यक्षात समाजात संघटन करणे, पक्ष उभा करणे, निवडणु़का जिंकणे वगैरे अनेक मोठे टप्पे यायचे आहेत.

अभिजीत दीपकेची प्रशांत कदमांनी घेतलेली मुलाखत पाहिली. वाटतोय तर साधा.
पण अमेरिकेत कर्ज काढून शिकायला गेलेला विद्यार्थी सगळं सोडून अचानक येत असेल तर तो नक्की कुठल्यातरी संघटनेशॉ जोडलेला आहे. काल एक प्रेस कॉन्फरन्स पाहिली. उच्चशिक्षित लोक पदाधिकारी झाले पण. म्हणजेच अभिजीतला अटक झाली तरी हा पक्ष चालूच राहील. हे सुसंघटीत लोक वाटतात. कदाचित दीपके हा मुखवटा असावा.

गेल्या काही वर्षात अनेक मुखवटे अचानक उगवलेत. हार्दीक पटेल, जिग्नेश मेवानी हे आता विस्मरणात गेले. कन्हैय्या अधून मधून असतो. ट्रिपल श्री आता राजकारणापासून दूर आहेत.

पूर्वी अण्णांच्या आंदोलनाबद्दल असे काही मत व्यक्त केले कि संघोटे हसोबा अशा स्मायल्या टाकत. नवीन नाही.
लोकांना हसवणं ही काही साधी गोष्ट नाही.

Pages