Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुस्लिमांच्या विरोधात जो काही
मुस्लिमांच्या विरोधात जो काही द्वेष आहे त्याला सर्वस्वी तेच कारणीभूत आहेत. बीजेपी काँग्रेस सारखे पक्ष त्यांचा गैरफायदा घेतात हे मात्र नक्की.
मुस्लिमांच्या विरोधात जो काही
मुस्लिमांच्या विरोधात जो काही द्वेष आहे त्याला सर्वस्वी तेच कारणीभूत आहेत>>> म्हणजे? तुमच्या मित्रमंडळात किती मुस्लीम आहेत?
56 इंचाचा अजून एक पराक्रम
56 इंचाचा अजून एक पराक्रम म्हणजे , पत्रकारां सारख्या लोकांना त्यांनी कधीच भीक घातली नाही .
Petitions signed so far
Petitions signed so far
782,240
अ रे रे, काय झालं?
झुरळांना सनस्ट्रोक झाला काय?
सुबोध खरे,
सुबोध खरे,
तुम्ही पुन्हा पुन्हा जाऊन पेटीशन आकडे चेक करत आहात हे बघून आनंद झाला
भाजप आय टी सेलचे सुद्धा तिथे आणि कोकरोच जिथे जिथे आहेत तिथे सातत्याने हल्ले चालू आहेत.
त्यात खूष होण्यासारखं काहीही
त्यात खूष होण्यासारखं काहीही नाही.
दोन दिवसांत काटा फारसा हललेला नाही.
अर्थात ते अपेक्षितच आहे!
तुम्ही काटा हलत आहे की नाही
तुम्ही काटा हलत आहे की नाही यावर लक्ष ठेवून होता हे आवडले
दिल्ली उच्च न्यायालयाने
दिल्ली उच्च न्यायालयाने झुरळां ना *बैलाच्या खाली* बसवलं दूध काढायला.
X चा बंद अकाउंट उघडायला नकार दिला आणि पुढची सुनावणी नेहमीच्या खंडपीठाकडे वर्ग केली. न्यायालयाची सुटी संपल्यावर 7 जुलै ला.
काढा किती दूध काढायचं ते!
Delhi High Court Friday sought responses of the government and the social media giant while simultaneously refusing to restore the account immediately.
Justice P.K.Kaurav directed the Review Committee of the IT department to hear Dipke’s plea challenging the blocking order and posted the matter for hearing on 7 July—a week after the HC opens post vacation.
अर्थात काटा फारसा न हलणे
अर्थात काटा फारसा न हलणे मलाही अपेक्षित होतेच.
तिथे आपली वैयक्तिक माहिती द्यावी लागते. ती सत्ताधारी पक्षाच्या हाती लागली आणि कोण कोण आपल्या विरोधात गेले हे त्यांना समजले तर आपला बदला घेतला जाईल ही भिती आजच्या काळात सामान्य जनतेला असणारच.
<<<<दिल्ली उच्च न्यायालयाने
<<<<
दिल्ली उच्च न्यायालयाने झुरळां ना बैलाच्या खाली बसवलं दूध काढायला.
>>>>
ही अशी भाषा न्यायालयाने वापरली का?
न्यायालयाच्या निकालाची प्रत
न्यायालयाच्या निकालाची प्रत आली की वाचून पहा!
According to a report by The
According to a report by The Indian Express, the Central government ordered the blocking of the X account of CJP in the wake of inputs from the Intelligence Bureau (IB) that raised “national security concerns”.
IB मध्येही सोसायटी च्या whatsapp ग्रूप मधले अंकल्स /आंटीज भरले आहेत की काय ?
खरे सर, तुम्ही एकिकडे म्हणताय की या झ्हुरळांकडून फारसे काही होणार नाही आणी मग त्यांचे X अकाउंट बंद रहाणार म्हणून आनंद व्यक्त करताय हा विरोधाभास नाही का? त्यांचे इन्स्टा अकाउंटही बंद आहे का ? की न्हाणीला बोळा दरवाजा मोकळा ?
<<<
<<<
न्यायालयाच्या निकालाची प्रत आली की वाचून पहा!
>>>
तुम्ही पोस्ट केली आहे तर तुम्हीही कन्फर्म करू शकता.
ही अशी भाषा खरेच न्यायालयाची आहे की आपण त्यात हे आपल्या मनाचे जोडले आहे? की आणखी कुठून कॉपी पेस्ट केले आहे?
त्या दिवशी मी कोकरोच पार्टी वेबसाईट वरून त्यांचा जाहिरनामा इथे फक्त कॉपी पेस्ट केला होता तरीही त्यातील प्रत्येक मुद्द्याची आणि गोदी मिडिया या शब्दाची जबाबदारी मी घ्यावी अशी तुमची अपेक्षा होती तर आता हे जे शब्द मुळात न्यायालयाच्या प्रतीतच नाहीयेत त्या स्वतःच्याच भाषेची जबाबदारी घ्यायला कचरत आहात
तुम्ही पोस्ट केली आहे तर
तुम्ही पोस्ट केली आहे तर तुम्हीही कन्फर्म करू शकता....
तरीही त्यातील प्रत्येक मुद्द्याची आणि गोदी मिडिया या शब्दाची जबाबदारी मी घ्यावी अशी तुमची अपेक्षा होती.... >>>>
ऋ सरांनी छान फलंदाजी केली आहे
ऋ सरांनी छान फलंदाजी केली आहे ह्या धाग्यात
धन्यवाद
धन्यवाद
आज पेटीशनचे आकडे काय झाले असतील याची उत्सुकता आहे.
जसे आजारात रोज प्लेटलेट काउन्ट रिपोर्टची असते अगदी तशीच.
म्हणून नवीन प्रतिसाद आला की धागा चेक करत आहे
त्या दिवशी मी कोकरोच पार्टी
त्या दिवशी मी कोकरोच पार्टी वेबसाईट वरून त्यांचा जाहिरनामा इथे फक्त कॉपी पेस्ट केला होता तरीही त्यातील प्रत्येक मुद्द्याची आणि गोदी मिडिया या शब्दाची जबाबदारी मी घ्यावी अशी तुमची अपेक्षा होती,
https://supremetoday.ai/madras-hc-upholds-conviction-for-forwarding-dero....
Supreme Court Sides With Madras HC: Person Forwarding Social Media Messages Liable For Contents.
https://eoschambersoflaw.com/index.php/blog/posts/show/supreme-court-sid...
हो मग त्यांच्या वेबसाईटची
हो मग त्यांच्या वेबसाईटची लिंक सोबत दिली होती की मी..
फॉरवर्ड मेसेज आला आणि चिकटवला असे केले नव्हते.
त्यांचा जाहिरनामा कॉपीपेस्ट करताना सोबत लिंक दिल्याने सत्यासत्यतेची पूर्ण जबाबदारी घेतलीच होती!
आता तुम्ही कोर्टाने हे म्हटल्याचे दाखवा -
झुरळां ना बैलाच्या खाली बसवलं दूध काढायला.
कारण ज्या देशात गाईला माता समजले जाते तिथे कोर्ट अशी भाषा वापरत असेल असे मला तरी वाटत नाही.
खरे सर त्या मॅनिफेस्टो मध्ये
खरे सर त्या मॅनिफेस्टो मध्ये लाएबल ठरवण्यासारखं काय आहे हे ही लिहा. उगाच काडी टाकणं नको.
ऋन्मेष, ह्या धाग्यावरील सर्व
ऋन्मेष, ह्या धाग्यावरील सर्व पोस्टसाठी आधीचे सगळे धागे माफ..
ह्या धाग्यावर खरेंची अवस्था करण थापर समोर बसलेल्या मोदीसारखी झालिये
सध्या सोशल मीडियावरून राघव
सध्या सोशल मीडियावरून राघव चड्डावर काढलेले रिल्स हटवायचे काम जोरात चालू आहे. त्यात सरकारने झुरळाचा धसका का घ्यावा हे कळत नाही. तरीपण एक १७ वर्षाचा विद्यार्थी CBSE ने COEMPT ला कसे झुकते माप दिले हे निर्भिडपणे सांगतो आहे. सरकार डरपोक आहे , विद्यार्थी नाही. अंकल लोक आपल्या मुलांचे नुकसान झाले तरी हरकत नाही पण डरपोकांचे तळवे चाटणे थांबवणार नाहीत.
ह्या धाग्यावर खरेंची अवस्था
ह्या धाग्यावर खरेंची अवस्था करण थापर समोर बसलेल्या मोदीसारखी झालिये
हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे.
https://x.com/sidhant_sarthak
https://x.com/sidhant_sarthak/status/2060356865645859314?s=20
ही एक बारावीत असणाऱ्या मुलाने लिहिलेली थ्रेड आहे. त्यात त्याने CBSE ने पेपर तपासण्यासाठी दिलेल्या कंत्राटात त्याला काय त्रुटी आणि संशयित गैरप्रकार आढळले त्यावर लिहिले आहे. आवर्जून वाचा.
क्या मे भविष्य से प्रवास करके
क्या मे भविष्य से प्रवास करके भूतकाळ मे आय हू? किसी ने मेरा टाईम मशीन देखा? गोल गोल फिरने वाला. क्या मे परग्रहवासी हू ? पैरेलल दुनिया से इस दुनिया मे फसा हू. भगवान है कहा रे तू ए खुदा है कहा रे तूं. मुझे मेरा चमकनेवाला गोला वापस करो.
@ऋन्मेष
@ऋन्मेष
दिल्ली उच्च न्यायालयाने झुरळां ना *बैलाच्या खाली* बसवलं दूध काढायला
हे साधं स्वच्छ मराठी आहे ज्याचा अर्थ उच्च न्यायालयाने झुरळांना हातात काहीही न देता वाटी लावलं!
उच्च न्यायालयाने असं कुठे म्हटलं आहे वगैरे काय विचारताय?
साधं मराठी समजेनासे झालंय का?
ओके म्हणजे बैलाच्या खाली..
ओके म्हणजे बैलाच्या खाली.. काढा किती दूध काढायचं ते.. हे तुमचे शब्द प्रयोग होते.
ज्याचा अर्थ - उच्च न्यायालयाने झुरळांना हातात काहीही न देता वाटी लावलं! - असेही तुम्हीच म्हणत आहात.
पण त्यापुढे तुम्ही जी कोर्टाचा आदेशाची पोस्ट केली आहे तिचे मी मराठी भाषांतर केले तर ते असे आले.
------
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकार आणि सोशल मीडिया कंपनीकडून उत्तर मागवले, तसेच संबंधित खाते तात्काळ पुन्हा सुरू करण्यास नकार दिला.
न्यायमूर्ती पी. के. कौरव यांनी आयटी विभागाच्या पुनरावलोकन समितीला (Review Committee) दिपके यांनी ब्लॉकिंग आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आणि उच्च न्यायालयाच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या कामकाजानंतर एका आठवड्याने, म्हणजे ७ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
-------
हे वाचून हातात काहीही न देता वाटी लावलं! असे तर वाटत नाही. पुढची तारीख दिली आहे. तुम्ही आधीच का कोर्टाच्या वतीने निकाल देत आहात? किंवा कोर्ट त्यांना तारीख देऊन फसवत आहे बैलाचे दूध काढायच्या धंद्याला लावत आहे हे तुम्हीच का ठरवत आहात?
माफ करा,
पण
कोर्टाच्या आदेशाचा दिशाभूल करणारा आणि चिथवणारा अर्थ काढणे मला बेजबाबदारपणाचे कृत्य वाटते.
कारण हे वाचून जर उद्या युवा पिढी बिथरली, कोणाचा संयम सुटून काही कमी जास्त केले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
<<<<
<<<<
ही एक बारावीत असणाऱ्या मुलाने लिहिलेली थ्रेड आहे. त्यात त्याने CBSE ने पेपर तपासण्यासाठी दिलेल्या कंत्राटात त्याला काय त्रुटी आणि संशयित गैरप्रकार आढळले त्यावर लिहिले आहे.
>>>>>>
कोकरोच इंस्टाग्राम account वर त्याचाच व्हिडिओ शेअर झाला आहे. हा सुद्धा बघू शकता. मी आताच पाहिला आणि तुमघी पोस्ट आठवली. किती पद्धतशीरपणे नियम बदलून भ्रष्टाचार राबवला जात आहे.
https://www.instagram.com/reel/DY9-B8Gsfnl/?igsh=YmRocnQwc3lvYzBs
ऋन्म्या, स्लो. डाउन इफ यु आर
ऋन्म्या, स्लो डाउन.. इफ यु आर बेटिंग बिग ऑन धिस स्टुपिड रोच मुवमेंट..
मी तुला आताच सांगु शकतो कि रोच पार्टीचा फाउंडर, दिप्के हा वान्नाबी केजरीवाल. आहे. अजुन त्याला वान्नाबी अण्णा सापडलेला नाहि, पण काहि रिकामटेकडे अण्णा शर्यतीत आहेत. पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं कि विरोधी पक्षाची हालत इतकि खराब आहे कि करियर पोलिटिशियन्संचे सगळे पर्याय संपुष्टात आले आहेत. मोदि विरोधकांची तर अशी अवस्था झालेली आहे कि ते एखाद्या गाढवाला (कि झुरळाला?) हि मंचावर चढवायला राजी आहेत, शर्त एकच - गाढवाने बीजेपीवर दुगाण्या झाडायच्या. असो..
बाय्दवे, या रोच पार्टीला बीजेपी अनावश्यक वेटेज का देतंय, हे अनाकलनीय आहे. व्हेन दीज मोरॉन्स आर गोइंग टु लर्न फ्रॉम द हिस्टरी...
शिक्षणात समस्या काय आहेत?
शिक्षणात समस्या काय आहेत? एवढी छान शाळा कॉलेज, उच्च दर्जाचे मन लावून शिकवणारे शिक्षक, परीक्षांचा अभ्यासक्रम तोच शाळेतील अभ्यास क्रम, एवढं सगळं सरकारने केलं असताना विद्यार्थी शाळा कॉलेजात अनुपस्थित का रहातात, कोचिंग क्लासेस का लावतात याचे फार छान विश्लेषण cjp जिला गोदी मीडिया सारखे अपशब्द वापरते त्यातील एका मीडियाने केले आहे. होप सिजेपी समर्थकांचे आता मत बदलेल आणि ते सिजेपीला दोन शब्द सुनावतील यावरून.
राज थोडा आश्चर्य सरकार ला एक
राज थोडा आश्चर्य सरकार ला एक परीक्षा घेता येत नाही याचे पण वाटू द्या!
Pages