Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाऊ द्या हो

तुम्ही किती जळजळ करून घेतली तरी जनतेला ते आवडतात हि वस्तुस्थिती तुम्ही विसरू शकणार नाही.

BJP and its NDA allies govern over 78% of the Indian population and approximately 72% to 76% of India's land area as of the current political landscape in 2026

मग कशाला त्रास करून घेता आहात.

ते परत येणारच आहेत.

झुरळांनी आपला असंतोष जाहीर केल्याने मुद्दा क्रमांक १ सर्वमान्य झाला आहे हे झुरळांचे पहिले आणि बहुधा शेवटचे यश

फक्त मुला बाळा वाले लोकच भ्रष्टाचार करतात हा गणू. सिंगल सगळे धुतलेल्या तांदळासारखे असतात. सत्तेत राहण्याची वैयक्तिक महत्वाकांक्षा त्याना नसते. साधू च्या रूपात व्याभिचार करण्याची पण त्याना इच्छा नसते. सत्तेतून बाहेर पडलो तर झाकली मूठ उघडेल म्हणून येन केन प्रकारेण सत्तेत राहण्यासाठी केलेल्या भ्रष्टाचारांना चाणक्यनीती म्हणतात हा गणू. आणि आपल्या आजूबाजूला भ्रष्टाचारी गोळा करून आपण त्यांच्या हातातले बाहुले झालो तरी काही हरकत नसते. फक्त हे नियम लोक विरोधी पक्षातले असतील तर त्याना लागू होत नाही. तुम्ही सगळे एकदाच हे मान्य करा ना राव. किती वेळा आम्ही तुम्हाला सांगायचं. कंटाळा येतो.

ते परत येणारच आहेत.>>> येऊच देत....जोवर शेवटचा अंधभक्त यासारखा आपल्याचं हाताने आपल्या मुलांची भविष्य उध्वस्त झाली या जाणिवेनं त्याच्या हयातीतच पिचून जात नाही, तोवर हे पुन्हा पुन्हा यायलाच हवेत आता ... Biggrin

tweet.JPG

https://x.com/ConforInd/status/2059210461355323580?s=20

<<<
सामान्य माणसाला कोणीतरी अवतार पुरुष/ मसीहा लागतो.
...
आम्हाला मोदी बाबत हेच वाटलेलं
>>>

हे मात्र खरे आहे. माझे देखील २०१४ मत मोदींना याच कारणास्तव दिले होते. सेना भाजप युती असली तरी त्या पक्षांना न देता मोदींना बघून दिले होते कारण आधीच्या टर्ममध्ये काँग्रेसचे बरेचसे घोटाळे उघड झाले होते.

महाराष्ट्रात सुद्धा फडणवीस अभ्यासू मुख्यमंत्री मिळाले म्हणून कौतुक होते. घरचे शिवसेना समर्थक ज्यांची भाजपाशी युती असल्याने घरचे मत सुद्धा तिथेच जायचे.

पण जेव्हा ते पहाटेचे शपथविधी नाट्य झाले, आमदार पळवापळवी झाली, स्थानिक पक्ष फोडले गेले, कोणाचीही कोणाशीही युती आघाडी होऊ लागली, हे असले प्रकार महाराष्ट्रात आणि देशभरात सगळीकडे घडत गेले. त्यातही आमच्या इथला एक स्थानिक भ्रष्टाचारी नेता सुद्धा इडी लावून फोडला आणि पक्ष बदलताच क्लीन चिट मिळाली. जे अगदी डोळ्यासमोर घडल्यासारखे वाटले. या एकूणच प्रकाराने माझी मतदान करायची इच्छाच मेली होती. कर्तव्य पूर्ण करायला एकदा आईवडिलांना विचारले तुम्ही म्हणाल त्याला मत देतो तर एकदा नोटा दाबून आलो होतो.

कितीही म्हटले की त्यातल्या त्यात चांगले निवडावे तरी आपल्या त्याच मताला किंमत नाही असे वाटल्याने मरू दे च्यायला ही भावना मनात आलीच.
आणि हा राग कुठल्या एका पक्षावर नाही.. तर पूर्ण सिस्टीमवरच आहे आणि ती आपण चालवून कशी घेतो म्हणून पूर्ण जनतेवर सुद्धा आहे.. जिचा आपण सुद्धा एक भाग आहोत असे वाटले आणि निदान आपण तरी आपली आवाज उठवायची जबाबदारी टाळू नये या हेतूनेच आताही लिहित आहे.

जगात दोन प्रकाराचे लोक असतात

१) भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवतात.

२) भ्रष्ट व्यवस्था ताकदवर असेल तर तिला सामील होतात. कायम आतले बनण्याचा प्रयत्न करतात

अश्या केस मध्ये क्रमांक २ संख्येने जास्त असणे आणि आम्हा क्रमांक १ ची संख्या कमी असणे स्वाभाविक आहे आणि हे मी स्वीकारले आहे!

आम्ही भ्रष्ट आहोत पण संख्येने जास्त आहोत याचा कोणाला अभिमान वाटतो.

तर आम्ही संखेने कमी आहोत पण प्रामाणिक आहोत याचा कोणाला अभिमान वाटतो.

आता कोणी कशाचा अभिमान वाटून घ्यायचा हे मी ज्याच्या त्याच्यावर सोडतो!

सुबोध खरे सारख्या अंधभक्तांची अवस्था पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराप्रमाणे झालीये. मोदीच्या भक्तीत पिसारा फुलवून नाचले की मोदीच्याच नाकर्तेपणाचा पार्श्वभाग उघडा पडतो!

भ्रष्टाचार केला नसेल तर ED ची भीती वाटू नये. कोणीतरी बाहेरचा आपल्याला आपला पक्ष सोडून त्याच्या पक्षात आणू पाहत असेल व आपली आपल्या पक्षाच्या विचारधारेवर श्रद्धा असेल तर आपला पक्ष सोडू नये. तसे करणारे washing machine मध्ये गेले असे म्हणू नये. आपल्याकडे तुल्यबळ नेतृत्व नसेल तर ते निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. विरोधक असायलाच हवेत. विरोधकांचा अंकुश असणे आवश्यक आहे. प्रश्न विचारले जायलाच हवेत. झुरळ पार्टी वगैरे मजेशीर नावे घेऊन व आभासी जगातील अनुयायी मिळवून 'एकदाची भारतीय तरुणाईची खदखद समर्थरीत्या व्यक्त झाली' हा क्षीण आनंद त्यागायला हवा. माध्यमांवर सातत्याने प्रयत्नरत राहूनही जनमत हवे तसे का बदलत नाही यावर नक्कीच दहा, बारा वर्षे विचार सुरू असेल. बनियन गॅंगने हसे करून घेतले व ते विस्मरणात गेले. कन्हैयाचे विस्मरण झाले.

मुळात लोकांना या गोष्टी निरर्थक वाटत आहेत हे लक्षात घेतले जात नाही. सध्याची परिस्थिती जागतिक युद्धामुळे आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे लोक महागाई, टंचाई वगैरे सगळे सहन करत आहेत.

(एकूण चर्चा वाचून, जे वाटले ते लिहिले. यात कोणताही व्यक्तिगत रोख नाही).

कितीही म्हटले की त्यातल्या त्यात चांगले निवडावे तरी आपल्या त्याच मताला किंमत नाही असे वाटल्याने मरू दे च्यायला ही भावना मनात आलीच.>>+१००

भ्रष्टाचारी लोकाना इडी ची भीती दाखवून आपल्या पक्षात घ्यायला का लागतेय याचा विचार करावा. लोक महागाई, टंचाई वगैरे सगळे सहन करत आहेत तर मग आंदोलन करतील म्हणून जमावबंदी का करावी लागत आहे याचा विचार करावा. आभासी जगात विरोध झाला म्हणून गल्ली ते दिल्ली का पळापळ करावी लागली ह्याचा पण जाता जाता विचार करावे. पेपरफुटी आणि युद्ध याचा काही संबंध लावता येईल का याचा विचार करावा. असे बरेच काही विचार करण्या सारखे आहे!

भ्रष्टाचार केला नसेल तर ED ची भीती वाटू नये.

+786 बेफिकीर

जे नाही करत त्यांना भिती वाटतच नसावी. तरी काही जण खोट्या आरोपात काही काळ तुरुंगात जात असावेत ते सोडा. पण नंतर आयुष्यात कधीतरी सुटका होतच असावी. काहींची होत नसल्यास ते अपवाद म्हणून सोडूया..

पण,
ज्यांना भ्रष्टाचार तर करायचा आहे त्यांनी मग काय करावे?

तर सर्वांनी मिळून एक अशी पार्टी काढावी किंवा जॉईन करावी जिथे ईडी मागे लागणार नाही.
जिथे भ्रष्टाचारच नाही तर बलात्कार केला तरी अभय मिळावे.

आणि अश्या प्रकारे देशभरातील प्रत्येक पक्षातील भ्रष्टाचारी नेते एका छत्रीखाली जमले आहेत.

मग तिचे नाव भाजपा आहे की काँग्रेस की आणखी काही हे सामान्य जनतेला मॅटर करू नये. सिरीयसली. म्हणजे भ्रष्टाचारी कुठल्याही पक्षाच्या चिन्हाखाली निवडणूक का लढवत असेना आपल्यासाठी तो भ्रष्टाचारीच झाला पाहिजे.

आपण सेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी ही नावे बघून मतदान करायचे की कोण भ्रष्टाचारी, बलात्कारी आहे आणि कोण नाही हे बघून मत द्यायचे हे आपणच ठरवायचे आहे.

अजून सोपे करून सांगायचे झाल्यास समजा आपण एका ठराविक पक्षाला समर्थन देतो आणि दरवेळी त्यांच्याच उमेदवाराला मत देतो.

पण एका निवडणुकीत त्यांनी आपल्या विभागात एक गुंड/मवाली/भ्रष्टाचारी/बलात्कारी उमेदवार उभा केला.

तर आपण काय करावे?

१) आपण आपले मत बदलावे का? (मला हे योग्य वाटते)

२) की आपण तरीही त्याच उमेदवाराला मत देऊन असा उमेदवार उभा केलात तरी आम्ही तो स्वीकारतो असा चुकीचा संदेश सर्वच राजकीय पक्षांना द्यावा?

देशाच्या दुर्दैवाने क्रमांक २ मार्गाने जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे असे वाटते.

खरे सर,
'ईडी ची भिती घालताच गपगुमान शेपूट घालून भाजप मध्ये दाखल होणार्‍यांपेक्षा हे नक्कीच उजवे.' हे वाक्य मी त्या मुलाबद्दल नव्हे तर मनीष सिसोदियांबद्दल लिहिले होते. त्यंना सीबीआय ने विनाकारण एका खोट्या खटल्यात अडकवून दीड वर्षे जेल मध्ये ठेवले होते. ईडी ची स्थापना केव्हा झाली हेही या संदर्भात गैरलागू आहे. ( सीबीआय व ईडी काळू बाळू आहेत)

एखादा माणून 'पूर्वी आप चा सदस्य होता' हे वाक्य तो 'पूर्वी जैश ए मुहम्मद चा सदस्य होता' च्या चालीवर का म्हणले जात आहे ? असेल तो आप चा माजी सदस्य, तो गुन्हा आहे का ? Why are we shooting the messenger ?

एखाद्या राज्याचा गृहमंत्री म्हणाला की आमच्या राज्यात पोलिस फार पैसा खातात हे माहित आहे, पण मी मात्र १००% स्वच्छ आहे, माझावर एकही आरोप नाही. तर ?

भ्रष्टाचार केला नसेल तर ED ची भीती वाटू नये.
हे वाक्य ईडी खरेच स्वतंत्र आणी प्रोफेशनल असती तर खरे असते. नया भारत मध्ये एखाद्या कंपनीवर शेट ची नजर पडते (पुराणात इंद्राची नजर एखाद्या ऋषीपत्नीवर पडत असे तशी) मग त्या प्रमोटर्स ना ईडी काही खुपट काढून आत टाकते, त्यांचे दिवाळे वगैरे निघते, मग शेट ती स्वस्तात विकत घेतात.

भ्रष्टाचार करा पण माझ्या पक्षात येऊन असे मोदींचे धोरण आहे! इतर पक्षात कुणी भ्रष्ट असेल तर त्याला इडी लावून सळो की पळो करायचे नी भाजपाट आल्यावर अभय द्यायचे! वा रे भाजपा नी वारे अंधभक्त!

>>>>>आपली सर्व दुःखे दूर करेल हि भाबडी अशा बाळगून असतात. यामुळेच अनेक माणसे बाबा बुवा यांच्या नादाला लागतात.
नाही!! तसेच नाही काही.
मी एक पॅरा माझ्या खाजगी कलेक्शनमध्ये ठेवलेला आहे त्याचा काही भाग इथे देते. -

Deepak Chopra being named in the Epstein files should make us question why we need spiritual leaders at all.

In light of Deepak Chopra being named in the Epstein files, it should make people uncomfortable, but not simply because one man might be flawed. It should make you question why you believed he was above being flawed in the first place. Why you believed anyone was. Humans have a deep psychological need to elevate certain people above themselves, to see them as more enlightened, more evolved, more pure. We want to believe that someone, somewhere, has figured it all out. Because the alternative, that no one truly knows what this is, is deeply destabilizing.

भ्रष्टाचार केला नसेल तर ED ची भीती वाटू नये.>>>>> वव्व्व्वां! कित्ती छान,हे वाक्य फ्रेम करून भिंतीवर लावा.

<<< भ्रष्टाचार करा पण माझ्या पक्षात येऊन असे मोदींचे धोरण आहे
>>>

पण ते स्वतः करत नाहीत हे महत्वाचे आहे!

त्यामुळे आपण मत देताना मोदींची प्रतिमा स्वच्छ आहे हे बघून द्यावे. जेणेकरून आपले मॉरल सुद्धा हाय राहते.

राजकीय चर्चात हल्ली लोकं लॉजिक का वापरत नाहीत हेच समजत नाही.

म्हणून मी मागेही म्हटलेले, पुन्हा म्हणतो..
जेन झी आपल्यापेक्षा थोडे स्मार्ट आणि हुशार आहेत !

झुरळ पार्टी अपडेट

Petition to Sack the
Education Minister.

The education system is compromised. From the tragic loss of students who died by suicide, to the millions of futures broken by a decade of paper leaks, this failure cannot go ignored. There must be consequences.
Sign below to demand the immediate removal of the Education Minister.

Petitions signed so far
776,056

https://petition.cockroachjantaparty.org/sack/?utm_source=ig&utm_medium=...

पण ते स्वतः करत नाहीत हे महत्वाचे आहे!
त्यामुळे आपण मत देताना मोदींची प्रतिमा स्वच्छ आहे हे बघून द्यावे. जेणेकरून आपले मॉरल सुद्धा हाय राहते. >>>>>
मोदी भ्रष्टाचार करत नाहीत पण करू देतात म्हणजे ते पण भ्रष्टच झाले की!
हे न मानणारे अतिशय दांभिक, निकृष्ट नि मनोरुग्ण मानसिकतेचे लोक असतात!
जेन झी आपल्यापेक्षा थोडे स्मार्ट आणि हुशार आहेत ! >>>>
ह्याबाबत १०० टक्के सहमत.

Humans have a deep psychological need to elevate certain people above themselves, to see them as more enlightened, more evolved, more pure.

हि मूलभूत प्रवृत्ती आहे.

लहान असताना आपले आईवडील आपल्याला आदर्श वाटत असतात. जस जसे आपण मोठे होत जातो तसे आपल्याला आपल्या आईवडिलांच्या त्रुटी आणि कमतरता जाणवू लागतात.

तशीच स्थिती आपली गुरुजनांबद्दल असते. मग ते शाळेचे किंवा कॉलेज मधील शिक्षक असतील किंवा आध्यत्मिक गुरु.

जसा काळ जातो तसे या लोकांचे पाय पण मातीचे आहेत हे जाणवू लागते.

टाटांबद्दल प्रचंड आदर असणारे लोक आहेत पण टाटांनी सुद्धा मुळात चीनला अमली पदार्थ पुरवून प्रचंड संपत्ती गोळा केली आणि आपले साम्राज्य उभारले हे ऐकून त्यांना पण बराच धक्का बसतो.

काही लोकांनी श्री मोदी याना आदर्श मानलेले आहे. अशीच स्थिती एके काळी इंदिरा गांधी किंवा जयललिता किंवा एम जी रामचंद्रन यांची होती. तामिळनाडू मध्ये तर या तिघांच्या मृत्यूनंतर किती तरी तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या.

Following the assassination of Prime Minister Indira Gandhi on October 31, 1984, there were reports of individuals committing suicide out of shock and grief. The sudden, violent loss of the "Iron Lady" of India prompted intense national mourning, with at least eight suicides reported in the city of Madras (now Chennai) alone in the immediate aftermath

आजही महात्मा गांधी किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर याना देव मानणारे लोक आहेत आणि त्यांच्या बद्दल कुणी एक अवाक्षर काढले तर दंगली होतात.

त्यामानाने श्री मोदी भक्ती हि फारच मवाळ आहे. येथेच लोक इतकी धुळवड खेळत आहेत पण काहीही होत नाही.

चालायचंच.

Petition to Sack the Education Minister.

Petitions signed so far
776,056

हॅ

सात लाख हा काय आकडा झाला?

श्री मोदींचा राजीनामा मागा. दोन चार कोटी तर असेच होऊन जातील.

हा का ना का

अनेकदा हे मत वाचनात येतं- भ्रष्टाचार केला नसेल तर ED ची भीती वाटू नये.>> खोट्या आरोपांखाली सडवत ठेवलेले अनेक लोक आहेत. कर नाही तर डर कशाला हे न्यायाच्या राज्यात बरोबर ठरते. सध्या अन्यायाचे राज्य आहे..

तरीही राहुल गांधी, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, खरगे, उद्धव ठाकरे, संजय राऊत अनेक नेते आहेत जे घाबरत नाही आहेत.

घाबरले कोण? ज्योतिरादिथ्य सिंदिया, सचिन पायलट. ह्यांना काॅन्ग्रेसचे नेते बनवावे अशी मागणी संघभाजपावाले अनेक वर्षापासून करत होते, अजूनही "त्यांना बनवायला हवे होते" वगैरे करत असतात. भाजपावाले त्यांची मागणी करत होते म्हणजेच ते compromised होते. काॅन्ग्रेसने त्यांना वर न चढवून योग्य काम केलं.

राहूल गांधी हे ED सोडा , जिवालाही घाबरत नाहीत. पत्रकार, संसदेतील महिला सदस्य , सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा बरोबर असताना मृगजळाला घाबरून पुलावरून पळणारी एकमेव व्यक्ती कोण हे सांगायला हवे का?

IMG_20260528_230230.jpg

इथल्या चर्चेत हे प्रत्येक वेळी आलेलं 'श्री' मोदी ही काय भानगड आहे हे सांगितलं तर बरं होईल. मी मोदी विरोधक आहे, हे इथं सार्‍यांना माहिती असेल कदाचित. पण अनेक कट्टर मोदी समर्थकही प्रत्येकवेळी 'श्री मोदी' असं म्हणत नाहीत. हे 'जय श्रीराम' किंवा 'राधेक्रिष्ण' किंवा 'जय क्रिष्ण' अशासारखं आहे का? असा नवीन काही पॅटर्न दिसत नाही खरं तर. जेन्युइन उत्सुकता आहे म्हणुन विचारलं. कुणाला काही माहीती असेल तर सांगा.

abc.jpg

Pages