Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केकची आयडिया मस्त!
केकची आयडिया मस्त!
हॉस्टेलमध्ये मॅगी बनवायला विजेवर चालणारे एक भांडे मिळायचे ते आठवले. तसेच अंडी सुद्धा आंघोळीच्या बादलीत हिटर सोडून पाणी उकळवायचे त्यात उकडवून घ्यायचो.
@ कोकम सरबत _ रंग मस्त फोटोजनिक आला आहे.
मला सोलकढीचा रंग सुद्धा फार आवडतो आणि त्या रंगाचे शर्ट सुद्धा
बाहेरचे कोकम सरबत मी कधी पित नाही. कधी उन्हात डोके चढले तर गावाचे कोकम पाण्यात उकळवून त्यात हलकीशी साखर टाकून पितो काढ्यासारखे पितो.
सगळे पदार्थ मस्त! सध्या
सगळे पदार्थ मस्त! सध्या सिक्किममध्ये आहे. लोकल

शेल रोटी नेपाळी डीन ही बटाट्याच्या भाजी बरोबर खातात. आम्ही नुसतीच खाल्ली थोडीशी गोडसर चव असते . होम स्टेमधील जेवण
क्रोकरी छान आहे.
क्रोकरी छान आहे.
ताज्या कोकमाची सोलकढी पण छान लागते, रंग पण सुरेख येतो.
हॉस्टेल रेसिपी चा स्वतंत्र धागा काढता येईल.
Innovative recipe असतात हॉस्टेल मध्ये, आमच्या हॉस्टेल मध्ये एक स्टीलची बकेट होती, अंडी खाणारी जनता त्यात हिटर सोडून अंडी उकडवत ठेवायचे, खूप वेळखाऊ प्रकरण
इस्त्रीवर पापड भाजणे, केटल मध्ये तर अनंत प्रकार व्हायचे.
रस घावन, लेकाची फर्माईश
रस घावन, लेकाची फर्माईश

Wow मस्त
Wow मस्त
सिक्किमच्या होमस्टेमधील
सिक्किमच्या होमस्टेमधील घरगुती जेवण
सिक्किमच्या होमस्टे यावर एक
सिक्किमच्या होमस्टे यावर एक लेख येऊ देत आता..
रस घावन गोड असतं का?
रस घावन गोड असतं का?
घावन नेहमी सारखे आणि ते रसात असंच असेल ना?
तर रसाची पाकृ सांगाल का?
सिक्कीम घरगुती जेवण छान. खाल्लंय असं तिथे.
अरे वाह सिक्कीम फूड कल्चर..
अरे वाह सिक्कीम फूड कल्चर.. असे काही वेगळे आले या धाग्यावर तर बरे वाटते
रस घावन आमच्याकडे कधी करत नाहीत.. घरी विचारायला हवे एकदा.. पण घावणे म्हणजे एकेकाळी दर आठवड्याला दोनदा व्हायचेच. बीडाचा तवा आणि खोचलेला कांदा तयारच असायचा.
रस म्हणजे नारळाचं दूध.
रस म्हणजे नारळाचं दूध. निगुतीने काढायला लागतं. त्यात किंचित सुंठ/ आलं (ऐच्छिक आणि फक्त हलक्या स्वादापुरतं), वेलचीपूड आणि गूळ घालायचा. रस-शेवई पण करतात आणि रस घावन पण.
Hi मानवदा
Hi मानवदा
प्रज्ञा ने लिहिले तेच रस घावन करताना, नारळाचं दूध त्यात गुळ जेवढे गोड हवे त्याप्रमाणे, किंचित मीठ आणि वेलची पूड घालायची.
घावन करताना तांदूळ पीठ + पाणी + मीठ किंवा तांदूळ भिजवून वाटून मग करायचे. घावन मऊ झाले पाहिजेत आणि घावन करताना तव्याला तूप लावायचं, तेल वापरायचं नाही.
डिश मध्ये गरम घावन घेऊन त्यावर रस घालून एक दोन मिनिटे मुरू द्यायचं आणि मग खायचे
तुम्हाला आंबोळ्या जमतात म्हणजे घावन नक्कीच येत असतील.
अशीच खापरोळी पण करतात त्यात आंबोळी आणि रस असतो.
धन्यवाद प्रज्ञा, मुग्धा.
धन्यवाद प्रज्ञा, मुग्धा.
हे करून बघेनच.
मंजूताई, काय आहे हा पदार्थ?
मंजूताई, काय आहे हा पदार्थ?
( बाय द वे, मला ते चमचे असे उलटे ठेवलेले अजिबात आवडत नाहीत! उचलून घेताना हात लागतो ना......त्यानेच कसे खायचे?)
कुठल्याच पदार्थांची नावे कळली
कुठल्याच पदार्थांची नावे कळली नाही एकतर कधी न ऐकलेली नावे आणि त्यात त्यांचे अगम्य उच्चार... चमचे डेकोरेशनसाठी उलटे ठेवलेत.
पेल्यात ठेवलेले चमचे म्हणत
पेल्यात ठेवलेले चमचे म्हणत आहेत त्या.
त्या पदार्थाला टिंगमो म्हणतात.
अच्छा ! माझ्या तर लक्षातच
अच्छा ! माझ्या तर लक्षातच नाही आलं. …..जेवायला बसायच्या आधीच चमचे काढून घेतो…. घरी दांडी वर ठेवतो. हातानीच तर जेवतो हात लागला तर त्यात काय मोठं…. प्रत्येकाची आवड प्रत्येकाचा विचार….असो !
मानव, सोपं तर नाव आहे बहिणीला सांगितले होते पण तिला कळलेच नाही. माझं लंघन होतं त्यामुळे नाश्त्याला गेलेच नाही. गृपवर टाकलेला फोटो इथे टाकला.
>>>> उलटे ठेवलेले अजिबात आवडत
>>>> उलटे ठेवलेले अजिबात आवडत नाहीत!
बरे झाले कळले ते. नाहीतर पंचाइत झाली असती.
हो. मी पेल्यात ठेवलेल्या
हो. मी पेल्यात ठेवलेल्या चमच्यांबद्दल म्हणतेय.
आपलाच हात लागला तर ठीक आहे. पण वेटर ने अथवा अजून कुणी, चमचा दिला काढून, तर त्याने खायला कसेसे वाटते!
सामो , लक्षात ठेव हं, मला बोलावशील तेव्हा !
टिंगमो!!!
उकड असते तांदळाची तसे आहे का?
Pages