पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -
१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
२) सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.
३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.
४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.
५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.
६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.
७) परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.
मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यामुळे मोदींनी हे 'काटकसरीचे' आवाहन केले आहे _/\_

^^^^^^^^^
हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे?
पाळले जाईल का?
यात काय समस्या येतील?
तुम्ही यात सहकार्य कराल का?
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?
हे सरकारचे अपयश आहे का?
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे का?
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येईल का?
..
इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.
##########
प्रतिसादात लोकांनी आग्रह केल्यामुळे धागालेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.
हे सरकारचे अपयश आहे किंवा नाही यात न पडता आधी देशावर संकट आले आहे तर आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार डोक्यात पहिला आला.
१) बातमी कानावर येताच मी आज सुट्टी टाकली. पण गेलोच असतो ऑफिसला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते. माझ्याकडे गाडी नाही. मला चालवताच येत नाही.
२) सोन्याची खरेदी उभ्या आयुष्यात एकदाही केली नाही.
३) परदेश असो किंवा देश विदेश कुठल्याच प्रवासाची मुळातच आवड नाही.
४) मी शेतकरी नसल्याने शेतीचा मुद्दा माझ्यासाठी बाद.
५) WFH करायचे आदेश निघाले तर सर्वात जास्त आनंद मला होईल. बेडरूम मध्ये लोळत काम करायचे दिवस मिस करतोय.
मुलांच्या शाळा मात्र चालू राहाव्यात असे वाटते. मुलांचे कसले नुकसान नको. ते देशाचे भविष्य आहेत. तसेही आमची मुले तरी फक्त रॉड क्रॉस करून शाळेत जातात. इंधनाचा वापर शून्य असतो.
६) कुठल्याही भौतिक सुखाच्या वस्तूंची मला फार आवड नाही. त्यामुळे इम्पोर्टेड वस्तू फार विकत घेऊ नका हे पाळणे मला अवघड नाही.
७) खाद्यतेलाचा वापर कमी करणे मात्र तेवढे अवघड आहे. कारण माझ्या आवडीचे तेलकट चमचमीत पदार्थ मी रोज खातो.
धन्यवाद,
ऋन्मेष
जमलं तर डेटा पहावा. शिक्षणाचा
जमलं तर डेटा पहावा. शिक्षणाचा दर्जा आणि रोजगाराच्या संधी ची काय अवस्था आहे लक्षात येईल. पण याच्यावर काम म्हणजे ग्राउंड वर जाऊन काम करणे. त्या पेक्षा भावना भडकवणे जास्त सोपे. व्हॉट्सऍप वर करता येते.
बेरोजगारीचा टक्का बघवत नाही.
बेरोजगारीचा टक्का बघवत नाही. शिकलेले आहेत पण नोकरी नाही...
एक एक्सरसाईज अभ्यासूंसाठी.
एक एक्सरसाईज अभ्यासूंसाठी.
(ए आय कडून माहिती घेण्यासाठी प्रश्न मनात यावा लागतो. तो आला तर एआय किंवा गुगलला विचारता येतो).
२०१४ च्या आधीच्या जीडीपी ठरवण्याच्या पद्धतीने २०१४ च्या आधीचा आणि नंतरचा जीडीपी काढून तुलना करणे
किंवा
नव्या पद्धतीने २०१४ च्या आधीचा आणि नंतरचा जीडीपी काढून तुलना करणे.
तारत म्य - दोन्ही जीडीपींची तुलना करताना एकच पद्धत वापरली गेली पाहीजे.
दुसरा अभ्यास
१६ मे २०१४ च्या आधीची डॉलर रूपया किंमत
आजमितीस असलेली डॉलर रूपया यांची किंमत
मे २०१४ च्या आधीची पेट्रोल डिझेल वर असलेली सबसिडी
मे २०१४ नंतर असलेली सबसिडी
मे २०१४ च्या आधी आंतरराष्ट्रीय खरेदीची (तेलाची) कमाल भाव असताना असलेली देशांतर्गत विक्रीची किंमत
मे २०१४ नंतर किमान भाव असताना असलेली किंमत, आणि सरासरी किंमत.
ही तुलन करा.
त्यासाठी प्रत्यक्ष मंत्रालयात गेलात किंवा गुगलवरून आकडे घेतले किंवा एआयकडून घेतले तरी फरक पडणार नाही.
मिळालेला डेटा आकर्षक शब्दात लिहीला, कॉपी केला, ए आय स्लोप आले तरी फरक पडत नाही. डेटा जमवणे महत्वाचे.
https://epaper.loksatta.com
https://epaper.loksatta.com/4152554/Mumbai/16-05-2026#clip/79880399/6c07...
<मोदी विरोधक नाहीत> सरांची
<मोदी विरोधक नाहीत> सरांची शब्दांची निवड बघा. मोदी विरोधकांना मोदी विरोधक म्हणायचं. काँग्रेस समर्थकांना काँग्रेस समर्थक म्हणायचं. पण मोदी समर्थकांना मोदी विरोधक नाहीत ते असं म्हणायचं.
हा हा.. This guy is
हा हा.. This guy is unbelievable
प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य राजकारणाच्या चष्म्यातून
किमान लिंक चेक करायची तसदी तरी घेतली असती..
ऋन्मेष विरोधक
माझ्यावर स्वतंत्र धागा काढू शकता..... इथे आपण फक्त मोदींच्या आवाहनावर चर्चा करूया.
आता पुढे..
आता पुढे..
आता हे समजलं असेलच कि पूर्वीची जीडीपी उत्पादनावर आणि आताची विक्रीवर आहे. आताच्या जीडीपीत पेट्रोल डिझेल विक्री पण सामील आहे का? असेल तर मग याचा फायदा मोदी काळाला दिसतो का? जर हे खरे असेल तर नव्या पद्धतीतून डिझेल आणि पेट्रोल ( पेट्रोलियम पदार्थ) ची विक्री वजा केली तर दोन्ही जीडीपीची तुलना कशी राहील?
पेट्रोलियम पदार्थ आपण आयात करतो. पूर्वी त्याची विक्री आपण जीडीपीत घेत नव्हतो. म्हणजे सबसिडी देऊनही पूर्वीच्या सरकारची कामगिरी आणि आता सबसिडी न देता बचतीचे आवाहन केलेली कामगिरी दृष्टिने हा डेटा बघावा ही विनंती. डेटा शक्यतो अचूक असावा, काही ठिकाणी हायपोथेटिकल घ्यावा लागेल, कारण सरकारी आकडे असे सहजासहजी मिळत नाहीत.
ज्यांना एआय बदल पोटशूळ आहे त्यांच्याकडे मनात येण्याआधी उत्तरे देणारे एआय टूल्स असल्यास सुचवावे ही नम्र विनंती.
या धाग्यावर काय अपेक्षित आहे
या धाग्यावर काय अपेक्षित आहे हे विचारले होते.
स्टॅण्ड अप कॉमेडी हे उत्तर तेव्हाच देता आले असते.
तुमचा सर्वपक्षसमभावाचा
तुमचा सर्वपक्षसमभावाचा मुखवटा फार झिरझिरीत आहे , सर.
बाकी तुम्हांला या कोणत्याही इश्युबद्दल किंवा देशातल्या परि स्थितीबद्दल काहीही पडलेलं नाही. तुमची वाद घालायची खाज भागवायला तुम्ही हा धागा काढता. मी मांडलेले मुद्दे तुम्ही तुमच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर वापरणार हे तुम्हीच लिहिलं आहे , सर.
मलाच या विषयावर धागा काढायचा होता. पण नीट माहिती घेऊन आणि थोडा इतिहास भूगोलाचा धांडोळा घेऊन लिहायचं तर वेळ मिळत नव्हता. म्हणून तुमची पिच वापरली. त्यामुळे प्रतिसादांची सोय होऊन तुम्ही खुष झालाच आहात. चर्चेत तुम्हांला रस कधीच नसतो. फक्त टी आर पी आणि स्वतःला प्रतिसाद द्यायची सोय व्हायला हवी. वादावादीची खाज भागायला हवी.
आणि माझ्या धाग्यावर विशिष्ट लोक येत नाहीत. त्यांच्याकडे मुद्द्यावर बोलायला काही नसतं. मग अगदीच सहन झालं नाही की माझ्यावर कमेंट करतात किंवा मी काढलेल्या धाग्यांचा राग इथे काढला तसा दुसरीकडे काढतात. हो की नाही हो अ, ब , क आणि क्ष ज्ञ?
आजच्या पेपरांत पी एन जी च्या
आजच्या पेपरांत पी एन जी च्या पहिलं पानभर जाहिराती आहेत.
आपल्याकडे आपल्या हक्काचं सोनं असताना नव्यानं आयात केलेल्या सोन्यावर अवलंबून का राहायचं?
चला, आयात केल्या जा णार्या सोन्याचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्या घरात असलेल्या सोन्याला नवं रूप देऊ या.तुमचं जुनं सोनं एक्स्चेंज करून नव्या दागि न्यांमध्ये रूपांतरिक करा आणि या आधी कधीही न मिळालेल्या फायद्यांचा लाभ घ्या
फ्लॅट ९९९ रुपये प्रति ग्राम जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजवरील घडणावळ १५ ते १८ मे २०२६ पर्यंत.
एकत्र येऊ आणि उजळवू सोन्याचं तेज.
वर जे दोन तीन सराव दिलेत ते
वर जे दोन तीन सराव दिलेत ते झाले असतील तर सांगा.
कमाल भाव असताना स्वस्त पेट्रोल डिझेल विक्री होऊ शकली. आता सबसिडी नसताना तोटा का झाला?
बचतीचे आवाहन का करावे लागते?
टीप - अमेरिकेला होत असलेली निर्यात हा जीडीपीचा छोटुसा अंश आहे. युद्धामुळे वाढलेले भाव हे कारण असेल तर युपीए काळात कमाल भावात आणि यात जास्त फरक नाही. तेव्हां ११० डॉलर प्रती बॅरल भाव असताना पेट्रोल ६० रूपयांच्या आसपास होते.
अक्षयकुमार, अमिताभ बच्चन गाड्या विकायला निघाले होते. अजून ही मंडळी बचतीचे आवाहन करायला आलेली नाहीत. येतील.
वरच्या प्रतिसादात काँग्रेसची
वरच्या प्रतिसादात काँग्रेसची भलावण करण्याचा कुठलाच हेतू नाही. कारण काँग्रेस मला खायला घालत नाही. त्यांच्याकडून एक छदाम मिळत नाही. इथे हेतू आहे तो असे आवाहन करणे हे इतके आवश्य्क का आहे हे शोधण्याचा. मग जी कारणे दिसतात त्या कारणांवर मोदी आणि टोळीने आधी सडकून टीका केली आहे. अशाने आता त्यांच्याकडे असे आवाहन करण्याचे नैतिक बळ उरत नाही.
एक देश म्हणून आवाहनाला पाठिंबा देताना खोटारडेपणा उघड करणे हे देशाचा नागरीक म्हणून कर्तव्यही आहे आणि तो हक्कही आहे. भले मत देत असू किंवा नसू. याच हक्काचा उपयोग करत ज्यांना मत दिलेले नाही त्यांच्यावर टोळीने टीका केली आहे.
खटकणारी गोष्ट ही आहे, टीका असावी, पण पलटीमारू वृत्ती नसावी. राजकारण म्हणून जी भूमिका तुम्हाला सत्तेत असताना घेता येत नाही तीविद्रोधी बाकांवर बसून घेताना आणि सत्तेत असताना घेतलेल्या भूमिकेतल्या विरोधाभासाची लाज वाटेनाशी होते आणि त्यांची तळी सामान्य नागरीक असे लेबल लावलेले लोक उचलून धरतात तेव्हां या गलिच्छपणाची चीड निर्माण होते.
ती व्यक्त झाल्यावर राजकारण हे गरजेचे आहे असा दिशाभूल करणारा उपदेश कामाचा नाही. चांगल्या राजकारणाची तत्त्वनिष्ठ राजकारणाची तिडीक नाही कुणाला. थोडं फार डाव< उजवं चालायचंच. पण सतत पलट्या मारणे, सतत अफवा पसरवणे यात भाग न घेण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे.
तिसरी भूमिका असते. चौथी असते. पाचवी असते. आपली लोकशाही द्विपक्षीय नाही. अबकड लेबल लावून त्यांना खल ठरवणारे ठरवोत बापडे. कधीन कधी उघडे पडणारच. सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही.
आता मोदींच्या सौदी दौर्यावर टीका केली नाही कि प्रो भाजपा असा प्रचार करणारे असतीलच. हा दौरा सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आहे. त्यामुळे या खर्चाचे राजकारण करण्याला नकार असेल. ज्यांना करायचे त्यांनी करावे.
तसेच अमेरिकेचा विरोध कारणांसाठी केला आहे. आता इराणच्या विरोधात सौदीला भारत शस्त्रे देणार आहे तर विरोध करणार का असाही प्रश्न विचारला जाईल. तर आडमुठी भूमिका दोन्ही देशांनी घेतली आहे. होर्मुत्झची खाडी दोन्ही देशांनी बंद केली आहे, भारताचे एक जहाज बुडवले आहे. एक जप्त झाले आहे. अशा परिस्थितीत मैत्री बाजूला ठेवूम नागरिकांसाठी तेल आणले तर स्वागत केले पाहीजे.
जाता जाता - काल पुतीन यांच्या ट्वीटनंतर भारतात गहजब झाला. ते कोणते ट्वीट?
नवीन Submitted by भरत. on 16
नवीन Submitted by भरत. on 16 May, 2026 - 11:47 <<
अगदी अचूक भरत.
आणि ती जी Stand Up Comedy ची Clip आहे ती आधीच या ग्रुपवर दिलेली आहे.
लोकांचे तेच प्रतिसाद वाचायचे ज्याच्या उत्तरावर अजून प्रतिसाद खेचता येतील. बाकी Link वगैरे वाचणं , विषयाचा सखोल अभ्यास करणं हे नाहीच..
तुका म्हणे उरलो आता प्रतिसादापुरता..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या आवाहनानुसार सार्वजनिक वाहनांचा वापर, इंधन बचत, स्वदेशीचा आग्रह, परदेश दौरे आणि जीवनशैलीत बदल याबाबत उच्च शिक्षण संचालनालय यांनी विद्यापीठ, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली आहे.
संबंधितांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. शैक्षणिक संकुलांमध्ये या विषयावर चर्चासत्रे, शैक्षणिक आणि जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व संबंधितांनी आपल्या अधिनस्त महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना या संदर्भात तात्काळ सूचना निर्गमित कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले आहे
विद्यापीठे, महाविद्यालयांचा हा परीक्षांचा, पेपर तपासणीचा किंवा सुट्यांचा काळ. नेमकं त्याच वेळी हे करायचंय.
https://www.facebook.com/share/p/1UnT9MLuFi/
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती. या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. वैयक्तिक आनंद आणि सुट्टीपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
https://x.com/NDTVProfitIndia
https://x.com/NDTVProfitIndia/status/2055577759037169755
"Yeh Modi ki guarantee hai," PM Modi urges Indian's living in Netherlands for more investments in India for good returns.
(statutory disclosure - Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. . The Mutual Fund is not guaranteeing or assuring any dividend under any of the schemes and the same is subject to the availability and adequacy of distributable surplus. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax and financial implications of the investment/participation in the scheme.)
या धाग्यावर असंबद्ध आहे, पण
या धाग्यावर असंबद्ध आहे, पण कुठल्याही धाग्यावर काहीही येऊ शकतं. ट्रंपांना चीनने डोळे वटारले हे आलंच आहे.
बातमी पुतीन यांच्या ट्वीटची आहे. पुतीन यांनी भारतासाठी शोकसंदेश लिहीला आणि भारतात एकच प्रश्न विचारला जाऊ लागला कि शोकसंदेश कशासाठी? ही गोष्ट एकंदरच आपल्या सर्वांच्या संवेदनशीलतेची आहे. आपल्याला कुठल्या प्रकारच्या बातम्यांत रस आहे, कुठल्या नाही. गेल्या वीस वर्षांपासून लोक राजकीय चर्चा, क्रिकेट, बॉलीवूड, स्टँड अप कॉमेडिअन्स, टीव्ही, इन्स्टाग्राम, फेसबुक यात गुंगलेले आहेत.
त्यांना भारतात काय घडतंय याची "खबर" नाही. अशा गुंगलेल्या लोकांना मग "खर्या" बातम्या देण्याची तथाकथित मीडीयाला गरज पडत नाही. सोशल मीडीयावर पक्षाचे समर्थक बसलेत, ते पक्षाकडून आलेल्या मटेरिअल वर लोकांना दिपवून आपसात युद्ध खेळत बसतात. लोकांना आश्चर्य वाटतं कि यांना एव्हढे तपशील कुठून मिळतात? मग सामान्य सुद्धा त्यात गुंगतात.
या गुंगीतून बाहेर पडून जरा आजूबाजूला पहावं यासाठी ही बातमी.
उत्तर प्रदेशात १३० किमी पेक्षा जास्त वेगाने वारं वाहीलं. हे वादळापेक्षा जास्त होतं. एक मनुष्य आकाशात उंच उडाला आणि खाली आपटला. आश्चर्यकारक रित्या तो बचावला. हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. लोक मजा घेत राहिले.
पुतीन यांनी ट्वीट करेपर्यंत कुणालाच गांभीर्य माहीत नव्हतं. १५० पेक्षा जास्त लोक या वादळात ठार झाले. मोठ मोठी झाडं उन्मळून पडली. एक तर भलं मोठं झाड कारवर पडलं.
पुतीन यांच्या ट्वीटनंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली.
त्या आधी शोकसंदेश कशासाठी ही विचारणा रशियन एजन्सीकडे केली गेली. त्यांनी खुलासा केल्यानंतर आपल्याला समजले.
विदारक स्थिती आहे.
वर्षभर तेल खाऊ नका या
वर्षभर तेल खाऊ नका या आवाहनाने विचारात पडला असाल तर आपल्यासाठी प्रेरणादायी उपक्रम.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
@Dev_Fadnavis
PM says global slowdown responsible for mess in Indian economy, then why US dollar is getting strong and Rupee taking dip?
12:15 PM · Aug 15, 2013
Devendra Fadnavis
@Dev_Fadnavis
·
Sep 18, 2013
The austerity measures announced by the govt of India is an indicator that the economy is in total mess.
२०१३ मध्ये यांनी मनमोहन सिंग आणि पी चिदंबरम यांची टिंगल उडवली होती. २०१३ मध्ये रात्रीचे चांदणे कुठे होते? त्यांचं त्या आवाहनाबद्दल काय मत होतं?
https://www.cnbc.com/2026/03
https://www.cnbc.com/2026/03/11/trump-us-oil-refinery-reliance-ambani-te...
President Donald Trump announced Tuesday that the U.S. will get its first oil refinery in 50 years, funded by investments from Indian billionaire Mukesh Ambani’s Reliance Industries
.
“THIS IS A HISTORIC $300 BILLION DOLLAR DEAL — THE BIGGEST IN U.S. HISTORY,” Trump said in a post on Truth Social.
या तीनशे बिलियन डॉलर्सनी भारताची परकीय चलनाची गंगाजळी घटली असेल का? मार्च २०२६ ची बातमी आहे.
त्यासाठी आर बी आयची परवानगी लागते का?
ही अर्थमंत्री निर्मला
ही अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचं ट्विटर हँडल्स. यावर अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती , परकीय चलन, सोनं , इंधन याबद्दल काही लिहिलेलं दिसतंय का?
https://x.com/nsitharaman
https://x.com/nsitharamanoffc
अर्थमंत्रा लयाच्या ट्विटर हँडलवर सुद्धा हेच चित्र आहे.
मोदींच्या सप्तसूत्रीच्या ट्वीटवरच्या प्रतिक्रिया पहा
https://x.com/mygovindia/status/2053546205918228699
२०१३ मध्ये रात्रीचे चांदणे
२०१३ मध्ये रात्रीचे चांदणे कुठे होते? त्यांचं त्या आवाहनाबद्दल काय मत होतं?>>>>>>
२०१३ मध्ये नुकताच पुण्याला आलेलो.
माझ्यासाठी काँग्रेस काय किंवा भाजप काय दोन्ही सारखेच. पडत्या रुपयावरून कोण भाजपावर टीका करत असेल तर योग्यच आहे.
सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर
सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर निव्वळ रडगाणे न गाता या महाशयांनी तोडगा दिला आहे. अशा नेत्यांची आज गरज आहे.

हे असले येडचाप आपले प्रतिनिधी
हे असले येडचाप आपले प्रतिनिधी आहेत, हे दुर्दैव (इथं पक्षांचा संबंध नाही).
या मुर्खाचे इंटर्व्ह्यु बघा / ऐका- कपाळाला हात लावाल. त्या युट्युबर समदीशने त्याला इतका सोलुन खिल्ली उडवली तरी दात काढणं आणि मुर्ख स्टेटमेंटस चालुच- हे आता आठवलं. तो रविकिशनही तसाच. पण हा त्याचा बाप.
बाकी, रुपया भयानक पडला- तरी ते काय फार खास नाही. तर ते तेवढं ते अॅडमिट करून बाकीची बेमुर्वतखोरी पुढे चालुच ठेवायची, ही नवीन गुन्हेगारी मोडस ऑपरेंडी आमच्याही मित्रांत आणि ग्रुपांत आजकाल दिसू लागलीय.
रिंकी के पापा म्हणतात त्यांना
रिंकी के पापा म्हणतात त्यांना.
नीट पेपर लीकचा धागा दिसला नाही. मॉडर्न कॉलेजमधल्या पेपरफोड्या क्वीनचा केंद्रीय मंत्र्यांसोबतचा फोटो पाहिला. अभिमान वाटला. अर्थात नीत वर धागा काढताना बाथरूममधे रेनकोट घालून स्नान करण्याचा अनुभव असलेले कसा काढतील हे चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.
भारतात नीट नावाची एक परीक्षा आहे ( इथे नीटवर एक पांचट कोटी). मी कधीच असल्या बातम्या वाचत नाही. कारण मी असा मी तसा. यात चार ओळी.
पुढे मी फारसं टेण्शन घेत नाही. म्हणून अशा परीक्षांच्या वाटेला जात नाही. मुलांना सांगितलं आहे कि सहजासहजी परीक्षा पास झाला तर ठीक नाहीतर जास्त टेण्शन घेऊ नका. डॉक्टर बनण्यापेक्षा चांगला माणुस बनणे गरजेचे आहे.
आता असे ऐकले आहे कि या परीक्षेचा पेपर फुटला आहे. फुटणे या शद्बावर कोटी.
हे खरे आहे कि नाही याची माहिती नाही. मला राजकारणात रस नाही. त्यामुळे यात राजकारण असेल तर ते मला माहीत नाही. मी लांबच राहतो.
पण पेपर फुटला हे खरे असेल तर त्याचे काय परिणाम होतील?
तुम्ही अभ्यास करून सांगालच.
मी नंतर ते वाचून माझ्या दिव्य प्र
तिसादांचा लाभ सर्वांना देईनच.>>भारताचं फॉरेक्स डेफिसीट
>>भारताचं फॉरेक्स डेफिसीट ड्रॅस्टिकली रेड्युस करण्याची ताकद एकट्या अमेरिकन डाय्स्पोरात आहे. हि अपॉर्च्युनटि टॅप इन करण्या करता भारत सरकारने विन-विन सिचुएशन क्रिएट केली तर अमेरिकन डॉलर्स करता त्यांना इतर ठिकाणी हात पसरण्याची गरज भासणार नाहि.<<
देर इज ए कॅविअॅट, दो. मागे शशी थरुर यांनी (इंडियन) अमेरिकन डायस्पोरा, भारता बाबतच्या इशुज मधे एंगेज होत नाहि, अशी खंत व्यक्त केली होती. त्याचं पार्शल उत्तर या क्लिपमधे आहे. बट माय ओपिनियन गोज बियाँड द फिअर एक्स्प्रेस्ड इन दॅट क्लिप. सध्याच्या अमेरिकेतल्या जवळपास ६ मिलियन भारतीयांपैकि, कमीत कमी हाफ मिलियन देसीज हॅव इनफ डिस्पोजेबल इन्कम टु हेल्प इंडिया गेट ऑफ दि फॉरेक्स क्रायसेस. योरप, मिडल इस्टमधुन फुटकळ मदतीकरता हात पसरण्या ऐवजी भारत सरकारने इंडियन अमेरिकन्सना आवाहन केलं तर मार्ग नक्किच सापडेल. तो इन्फ्लो कशा स्वरुपात स्विकारायचा, याकरता भारत सरकारकडे माझ्यापेक्षा हुशार लोक आहेत..
आता, यावर हि नेहेमीच्या अयशस्वी कूपमंडुक आणि टॅडपोल्सची डरांव-डरांव सुरु होइल, पण त्याला इलाज नाहि. दॅट इज द प्राइस यु पे फॉर लिविंग इन ए डेमक्रॅटिक सोसायटि...
१५० पेक्षा जास्त लोक या
१५० पेक्षा जास्त लोक या वादळात ठार झाले>> मी दोन दिवसांपूर्वी ही बातमी इतरांना सांगितली तर कुणाला काही माहीतच नव्हतं.
150 लोक वादळात मेले आणि या
150 लोक वादळात मेले आणि या वादळाची आपल्या यंत्रणेला ते घडून गेल्यावर सुद्धा कल्पना नाही या आशयाच्या बरेच रीळ मी सुद्धा पाहिल्या. याची राष्ट्रीय लेव्हलवर बातमी पसरली नाही किंवा दाखवली नाही हे एकवेळ समजू शकतो. पण प्रशासनाला याची कल्पनाही नाही, मदतकार्य सुद्धा सुरू झाले नाही हे पचायला जड आहे. असे झाले असल्यास अशक्य आहोत आपण. कारण वादळ काही एखाद्या गल्लीत येऊन गेले नसणार तर एखाद्या गाव शहराला याचा तडाखा बसला असणार.
डरांव डरांव
डरांव डरांव
भारतात आता जी क्रायसिस सिच्युएशन आहे ती कोणामुळे आली? मोदींचा वाटा ७५% असेल तर तातोबांचा २५% आहे.
१. तातोबांनी भारतावर टॅरिफ्स लावल्याने भारताची अमेरिकेला निर्यात कमी झाली.
२. अमेरिकेने भारताने इराण आणि मग रशियाकडून क्रूड ऑइल आयात करण्यावर निर्बंध आणले. या दोन्ही देशांना डॉलरमध्ये पेमेंट करावी लागत नव्हती. इराण रुपयांत पेमेंट घेत होता. रशिया रूबल आणि युआनमध्ये.
३ तातोबांनी अमेरिका फर्स्ट धोरणा अंतर्गत इस्रायल आणि काही आखाती देशांना मदत करायला इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणने हात बांधून शरण यावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण झालं उलट. यात क्रूड ऑइल आणि गॅसचा व्यापार अडकला आणि भारतात फ्युएल क्रायसिस झाला. क्रूड ऑइलच्या किंमती भडकल्याने भारताच्या विदेशी चलन गंगाजळीवर आणखी ताण.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला की अनिवासी भारतीय खुष होतात हे खरं की खोटं?
दुसरीकडे तातोबा जिला डेड इकॉनॉमी म्हणाले त्या भारतातले दोन सगळ्यांत मोठे उद्योगपती अमेरिकेत उद्योग उभारताहेत. तातोबांच्याच शब्दांत अमेरिकेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी डील.
<१५० पेक्षा जास्त लोक या
Due to bad weather on May 13, including storms, rain, hailstorm and lightning, reports of 111 deaths were received from 26 districts. 72 persons were injured, 170 livestock losses and damage to 227 houses have been reported in the state,” read a statement from the Relief Commissioner
<१५० पेक्षा जास्त लोक या वादळात ठार झाले> याबद्दल रशिया - पुतिन यांनी दुखवटा व्यक्त केल्यावर भारतात अनेकांना याबद्दल कळलं.
आपली टीव्ही चॅनेल्स मोदींनी दिलेल्या टास्कस मध्ये - इंधन वाचवायला मंत्री संत्री लोक जे करत होते ते दाखवण्यात आणि २०१३ मध्ये काँग्रेसने काय सांगितलं यात बिझी होती. पेपरांतल्या बातम्या बघाल तर आधी परदेशांत आल्यात, मग आपल्याकडे.
आपले ते हे इकडे तिकडे फिरून आले की याची दखल घेतील.
करोनाकाळातल्या थाली बजाओ,
करोनाकाळातल्या थाली बजाओ, बत्ती बुझाओ सारखाच भाजप नेत्यांनी आताच्या आवाहनांचा इव्हेंट करून टाकला आहे.
फडणवीस एक दिवस धूम मचा ले करत बुलेटवरून फिरले. त्यांंच्यासोबत बुलेट्सचा ताफा होता. यात किती इंधन वाचलं असेल?
मग एक दिवस विमानाच्या इकॉनॉमी क्लासने प्रवास केला. बिझिनेस क्लासला जास्त इंधन लागतं का?
काल पुन्हा ते मोटारींचा ताफा घेऊन हिंडत होते, असे व्हिडियो दिसताहेत.
काल ते बंगळुरूला प पू ट्रिपलश्री रवीशंकर यांच्या आश्रमात त्यांना भेटायला आणि गाईंना चारा भरवायला गेले होते. सोबत अमित साटमही होते.
प.पू ट्रिप ल श्रींना व्हिडियो कॉलवर भेटता आलं असतं. आणि गायी तर मुंबईतही असतात.
याच प पू ट्रिपल श्रींनी मोदी पंतप्रधन झाले की डॉलरची किंमत ४० रुपये होईल असं म्हटलं होतं.
आपले मुख्यमंत्रीच जर इंधन बचतीबद्दल गंभीर नसतील, तर आपण का असावं?
आशिष शेलारांनी तर उद्या आम्हांला चालत यायला लागेल आणि दोन सुरक्षारक्षकांना खांद्यावर बसवून आणावं लागेल अशी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली.
Pages