पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -
१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
२) सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.
३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.
४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.
५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.
६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.
७) परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.
मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यामुळे मोदींनी हे 'काटकसरीचे' आवाहन केले आहे _/\_

^^^^^^^^^
हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे?
पाळले जाईल का?
यात काय समस्या येतील?
तुम्ही यात सहकार्य कराल का?
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?
हे सरकारचे अपयश आहे का?
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे का?
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येईल का?
..
इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.
##########
प्रतिसादात लोकांनी आग्रह केल्यामुळे धागालेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.
हे सरकारचे अपयश आहे किंवा नाही यात न पडता आधी देशावर संकट आले आहे तर आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार डोक्यात पहिला आला.
१) बातमी कानावर येताच मी आज सुट्टी टाकली. पण गेलोच असतो ऑफिसला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते. माझ्याकडे गाडी नाही. मला चालवताच येत नाही.
२) सोन्याची खरेदी उभ्या आयुष्यात एकदाही केली नाही.
३) परदेश असो किंवा देश विदेश कुठल्याच प्रवासाची मुळातच आवड नाही.
४) मी शेतकरी नसल्याने शेतीचा मुद्दा माझ्यासाठी बाद.
५) WFH करायचे आदेश निघाले तर सर्वात जास्त आनंद मला होईल. बेडरूम मध्ये लोळत काम करायचे दिवस मिस करतोय.
मुलांच्या शाळा मात्र चालू राहाव्यात असे वाटते. मुलांचे कसले नुकसान नको. ते देशाचे भविष्य आहेत. तसेही आमची मुले तरी फक्त रॉड क्रॉस करून शाळेत जातात. इंधनाचा वापर शून्य असतो.
६) कुठल्याही भौतिक सुखाच्या वस्तूंची मला फार आवड नाही. त्यामुळे इम्पोर्टेड वस्तू फार विकत घेऊ नका हे पाळणे मला अवघड नाही.
७) खाद्यतेलाचा वापर कमी करणे मात्र तेवढे अवघड आहे. कारण माझ्या आवडीचे तेलकट चमचमीत पदार्थ मी रोज खातो.
धन्यवाद,
ऋन्मेष
धाग्याचा हेतू तर सफल झाला.
धाग्याचा हेतू तर सफल झाला.
मूळ पोस्ट मधे कुठलीही भूमिका घेतली नसल्याने नंतर दोन्ही कडच्यांना झोपण्याचा बेत थोडा बारगळला. कारण युद्ध पेटण्यापूर्वी काडी टाकणाऱ्यालाच व्यवस्थित एक्सपोज केले आहे.
न्युट्रल ही सुद्धा भूमिका असते. त्यात प्रामाणिकपणा असतो. पण भूमिकाच न घेता तात्विक गप्पातली डोळी पडलेली वाक्ये फेकत उसन्या रॅशनॅलिझमवर इतरांचे दानवीकरण करत स्वतःचे गौरवीकरण करून घेत झोडपण्याला लबाडी म्हणतात.
मतं पटोत अथवा न पटोत, स्वतःची अनुभवातून, वाचनातून, जनसंपर्कातून, भूमिकेतून बनलेली मतं छाप पाडत असतात. मिडीअॉकर बनून नेहमी धूळफेक करता येत नाही.
>>भारताचं फॉरेक्स डेफिसीट
>>भारताचं फॉरेक्स डेफिसीट ड्रॅस्टिकली रेड्युस करण्याची ताकद एकट्या अमेरिकन डाय्स्पोरात आहे. >>
रिप येवो वा डेम येवो.
ज्या देशामुळे ही तात्कालिक परिस्थिती ओढवली आहे त्या देशाच्या नागरिकांवर भरवसा ठेवायचा??! अजबच आहे. वरची मुक्ताफळे उधळणार्या इतक्या दर्पयुक्त बेभरवशी अमेरिकेवर आणि तिच्या नागरिकांवर एकाहाती भरवसाठेवण्या इतके मोदी अमेरिकेच्या कच्छपी लागले नसावेत. बरं, अमेरिका काही मदत करायची वेळ आलीच तर पाकिस्तानला करेल ना? भारताला अमेरिका कदापि मदत करणार नाही!!!
फॅक्च्युअल बघितलं तरी २०२३-२४ मध्ये एकूण रेमिटन्सच्या ३८% रेमिटन्स गल्फ देशांतून आलेला, अमेरिकेतून २७%. आजचं टाकोचं चीन मधलं भाषण ऐकलेलं दिसत नाही, शी समोर लुळी पडलेली नांगी बघितलेली दिसत नाही. अमेरिका चीनचे तळवे चाटायला तयार आहे आणि तरीही चीन हाडतुड करतोय आणि अत्यंत मर्यादित डील घेऊन टाकोला तोंड काळे करायची वेळ आलेली आहे. तर फॉरेन डेफिसिट कवर करायला हे बेभरवशी अमेरिकन आजच्या साडेतीन पट रेमिटन्स करतील! बरं साडेतीन पट पर्पेच्युअल रेमिटन्स करत राहिले तरी याने फक्त रेमिटन्स कवर होईल. एफडीआय, एक्सपोर्ट्स, आणि अमेरिकन युद्धखोरीमुळे वाढलेल्या गॅस प्रायसेस हे अमेरिकेतला डाएस्पोरा कव्हर करणार! सर्वात स्वार्थी देश आणि तिचे नागरिक भारताला मदत करणार! विन विन म्हणे!
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश कधीही रेमिटन्स बंद करेल अशी परिस्थिती आहे. शत्रू देशावर आणि त्याच्या नागरिकांवर भरवसा ठेवायचा नसतो. साप कधी चावेल सांगता येत नाही. त्यांना हवं तसं विन विन केलं आणि अमेरिकन डाएस्पोरावर भरवसा ठेवला तर देश लुटतील ते!
गंमत म्हणजे हा इकॉनॉमिक अॅडव्हाईस कोणा कडून घ्यायचा तर ज्यांनी ट्रंप फोन, जो कधीही मिळणार नाहीये त्यात ६७ मिलियन डॉलर टाकले त्यांच्याकडून!
तुम्ही ट्रंप फोन मध्ये भरलेले पैसे कसे परत मिळतील त्याची चिंता करा. उगा भारताच्या समस्या सोडवायला उर्जा खर्च करू नका. नाही जमायचं ते. राहू द्या!
अमेरिकेची पत आता राहिलेली नाही साहेब. टाको फिजिकली अजुन चीन मध्ये असताना शी जिनपिंग म्हणतो अमेरिका डिक्लायनिंग नेशन आहे, आणि टाको ते बेट घेऊन डिक्लायनिंग बायडन काळाबद्दल होतं ते कारण नसताना सांगतो. कुत्रं हाल खात नाही तुमचे ते बघा! उगा आमच्या देशात नाक खुपसू नका. वीआर गुड!
आहा.. काय हाणलंय उसन्या तत्व
आहा.. काय हाणलंय उसन्या तत्व आणि तर्कवाद्यांना..
उबो, जे काय सहकार्य करायचे
उबो, जे काय सहकार्य करायचे आहे ते तर करतोच तेही नक्की काय करता येईल यात खोलात शिरून, आधीही लिहिले आहे मी.

दुटप्पीपणा दाखवायलाच पोस्ट केलाय तो व्हिडीओ.आपलं शिमगा कसा करू नये यासाठी
------
व्यक्तिपूजक नसलेले लोक तुलनेत अधिक योग्य प्रकारे सहकार्य करू शकतात. व्यक्तीपूजक असले की शास्त्रापुरतं दोन दिवस केलेलंही पोचते. आराध्यदैवत मग दुसरी काहीतरी राजकीय प्रेरित हाक मारते मग ते दोन दिवस पाळायचं.. कशासाठी मोर्चा हे माहीत नसताना हाक आली म्हणुन त्यात सामील व्हायचं.. चक्र अव्याहत सुरू रहाते.
अमितव चीन टाको व्हिजिट बद्दल काहीच माहीत नव्हते. दयनीय अवस्था वाटतेय खरंच. बघतो संध्याकाळी शोधुन.
आणि पोस्ट फार आवडली.
जब भी आप आख उठाके मोदीजी की
जब भी आप आख उठाके मोदीजी की तरफ देखोगे आप एक हिंदुस्तानी को खडा पाओगे. सबसे पहले मे खडा रहुंगा. पहले आपको मुझसे लढना होगा.
>>भारतीयांना आवाहन!<<
>>भारतीयांना आवाहन!<<
आधी SIR होऊ दे. त्यात मी भारतीय आहे असे सिद्ध होऊ दे . मग बघू.
<< दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
<< दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश कधीही रेमिटन्स बंद करेल अशी परिस्थिती आहे. >>
----- केवळ $ ४० ट्रिलियनचे कर्ज म्हणून दिवाळखोर म्हटले का?
One Big Beautiful Bill Act मधे काही रिमीटन्स टॅक्स सुचविला होता याची आठवण झाली.
अमितव - सहमत. चीन बद्दल सहमत.
अमितव - सहमत. चीन बद्दल सहमत.
https://www.tv9marathi.com
प्रधानमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून प्रवास केला.
https://www.tv9marathi.com/live-tv?fbclid=IwVERDUARzhgRleHRuA2FlbQIxMQBz...
< मग अशा वेळी काय गोष्टी
< मग अशा वेळी काय गोष्टी सुचवायला पाहिजेत की ज्यामुळे तुम्ही पण हातभार लाऊ शकता?>
उपाशी बोका, पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हांला घेऊन वरुण ग्रोव्हरचा देश बचा लो गाइज हा शो बघायला जाईन. ते शक्य होईल तेव्हा होईल, तोवर ही क्लिप पाहून घ्या . चिडकू यांनी वर दिलीच आहे.
२ आणखी एक सूचना मी याच धाग्यावर दिली होती. ती थोडी आणखी स्पष्ट करतो.
सोनं. मोदीजी काँग्रेसवर ज्या मुद्द्यावरून टीका करतात, ती गोष्ट थोड्याच काळात ते स्वतःच लागू करतत. आधार, जी एस टी, मनरेगा. एक वर्ष सोनं घेऊ नका ही सुद्धा काँग्रेसचीच आयडिया. त्यावर मोदींनी तेव्हा टीका केली आणि आता स्वतःच आणली. ते कोणतीही योजना आधी व्हॉलेंटरी स्वरूपात आणतात आणि मग कम्पल्सरी करतात. सिलिंडरवरची सबसिडी गिव्ह अप करता करता गायब केली. ट्रेन प्रवासातली ज्येष्ठ नागरिकांना असलेली सवलत अशीच आधी स्वतःच घेऊ नका म्हणत बंद केली.
मोदींनी या निवडणुकांत प्रचार केला होता की काँग्रेस आप का मंगलसूत्र छीन लेगा. तर आता वेळ आली आहे, आपल्याकडचं सोनं देशासाठी देण्याची. आमच्या इंदिरेने १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळी आपले दागिने नॅशनल डिफेन्स फंड ला दिले आणि त्याचा फोटो पण काढून घेतला होता. आता मोदींनी आवाहन करायचा अवकाश. मी माझ्याकड च्या फिजिकल सोन्यातलं निम्म देशासाठी देईन. सोनं घ्यायला निर्मलाताईंनी बसावं आणि त्यांच्यासोबत एक फोटो काढून मिळावा एवढी लहानशी अपेक्षा आहे.
माझ्याकडे आईच्या सोन्याच्या चार बांगड्या , बाबांची एक अंगठी आणि माझी एक अंगठी इतकं सोनं आहे. आईचे इतर दागिने भाच्याच्या लग्नाच्या वेळी त्याला व माझ्या बहिणीला दिले. या सहा वस्तू सरकारने अर्ध्या अर्ध्या कापून घ्याव्यात. उरलेल्या अर्ध्या माझ्याकडे आईवडिलांची आठवण म्हणून राहू द्याव्यात.
मोदीजी या व्हॉल्युंटरी योजनेला काही काळातच कंपल्सरी करतीलच.
३. प्रवास - उदाहरण देऊन स्पष्ट करतो. मी दर आठवड्याला मुंमग्रंसं जातो. हे माझ्या घरापासून ३ किमी दूर आहे. पूर्वी मी बसने जात असे व चालत परत येत असे. आता बसेसची संख्या इतकी कमी झाली आहे की रिक्षानेच जावे लागते. आणि चालायचे म्हटले तर सगळे रस्ते खोदलेले. त्यासाठी फूटपाथपण अडवलेले. देशासाठी इंधन वाचवता वाचवता हॉस्पिटलात जायची वेळ आली तर आणखी देशसेवा कशी करता येईल?
त्यामुळे मुंबई मनपाने बसेसची संख्या वाढवली तर मी पुन्हा बसने जाईन. तसंच या कडक उन्हात चालणं कठीण. घामाच्या अंघोळीवर घरी येऊन
पाण्याची अंघोळ करावी तर आजपासून पाणीकपात होते आहे. त्यासाठी मुंबई मनपाने नागपूर सारख्या सावली देणार्या हिरव्या जाळ्या लावाव्यात .
आणखी सुचेल तशी भर घालतो.
पंतप्रधानांची UAE, नेदरलँड,
पंतप्रधानांची UAE, नेदरलँड, स्विडन , नॉर्वे, इटली? असा जंगी भ्रमंतीचा विचार आहे.
https://www.mea.gov.in/press-releases.htm?dtl/41126/Visit_of_Prime_Minis...
या आधी पण अशा अनेक भेटी झाल्या आहेत. पण या भेटी दिलेल्या देशांपैकी एकानेही भारत - पाक संघर्षाच्या वेळी भारताची बाजू घेतली नव्हती. मग भारताची भुमिका स्पष्ट करण्यासाठी सर्वपक्षिय पथक पाठवावे लागले होते. थरुरच बाहेर छान बोलू शकतात म्हणून थरुर यांचा समावेश असलेले सर्वपक्षिय पथक.
आपसातील वाद मिटवून
आपसातील वाद मिटवून देशहितासाठी काही तरी करूयात.
रामदेवबाबा आणि नरेंद्र मोदी यांनी स्विस बॅंकेतील काळं धन आणलं आहे. ते आपण विसरून गेलो आहोत. ही तर बिझी मंडळी आहेत. ते का विसरणार नाहीत?
हे आवाहन सिरीयसली केलं आहे. यात १५ लाखांचा मुद्दा घेतलेला नाही हा त्यांचा पुरावा.
ते धन या संकटसमयी वापरून मंदीचा सामना करावा असा ठराव मंजूर करून मोदीजी आणी रामदेवबाबा यांना पाठवून देऊयात. त्यांना आनंद होईल.
<भारतात तर सध्या अशी
<भारतात तर सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कि भाजपा सत्तेत टिकला तर देश टिकेल. >
मला हे विधान फार आवडलं.
ही परिस्थिती निर्माण केली कोणी तर
भाजपनेमोदींनी. त्यातून बाहेर कोण काढतील ? भाजपतुम्हीने दर्द दिया है तुम्ही दवा देना.
मला आज त्या लेखाजोखा धाग्याची फार आठवण येते आहे. त्या लेखाचा शेवट - व्होट टू एम्पावर इंडिया ! नॉट टू युपिये. ते काहीही करू शकत नाहीत. हे वरील इकॉनॉमी फॅक्टर्स वरून दिसून येत आहे. वि निड चेंज !
हिंदूत्व म्हणून व्होट नका करू, चेंज म्हणून व्होट करा! असा होता.
तोच दुर्दर्म्य आशावाद आता यांच्यात दिसतो आहे, पण पण पण
मोदी सरकारचा कारभार पाहून अॅडमिननी त्या धाग्यालाच टाळं लावलं आणि तो लेख लिहिणारे तर मायबोलीवरून गायबच झाले.
२०१४ मध्ये माझ्यासकट अनेकांनी प्रश्न विचारला होता की मोदींकडे देश चालवायला कोण लोक आहेत? मनोहर पर्रिकर गेल्यावर यावर मी एक लेखही लिहिला होता.
तर आता भारतीय अर्थव्यवस्थेला या स्थितीतून कोण बाहेर काढू शकेल?
निर्मला सीतारामन यांनी काय केलं ते आपण पाहतोच आहोत.
आइन्स्टाइन आणि ग्रॅव्हिटी फेम पियुष गोयल - हे वाणिज्य मंत्री आणि भारत रशियाकडून क्रूड ऑइल घेतो की नाही हे परराष्ट्र मंत्रालयाला विचारा असं त्यांनी सांगितलं.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर - वेल द यु ए वॉज इन द अमेरिका फेम.
हरदीप सिंग पुरी - एप्स्टीन फाइल्स फेम.
पी चिदंबरमनी भाजपमध्ये यावं यासाठी मोदींनी सीबीआय , ईडी अशा संस्थांकरवी दबाव आणला. पण ते बधले नाहीत. इतका हुशार माणूस. फेक करन्सी छापायला पाकिस्तानला त्यांनी मदत केली , याची सगळ्यांना खात्री आहे. पण पुरावाच नाही. मग त्यांच्यावर धुरंधर सिनेमा काढला.
मग आपल्या देवाभाऊंना अर्थमंत्री म्हणून पाठवता येईल. पण ज्यांनी भाजपच वाचवेल असं म्हटलंय त्यांनीच देवाभाऊंनी अर्थसंकल्पावर पुस्तक लिहिलं म्हणून टर उडवली गेल्याचा आनंद लुटला होता. शिवाय देवाभाऊ दिल्लीला गेले तर इकडे तीन चाकी रिक्षा कोण चालवणार?
मग अमृतामामी? त्यांना अॅक्सिस बँकेतला अनुभव आहे.
अगदीच कोणी नाही तर विमानतळावर समोसा महाग का आणि रिचार्ज २८ दिवसांचा का असे मूलगामी प्रश्न विचारणारे राघव छड्डा?
आर्थिक सल्लागार - मोदींनी नेमलेले पहिले दोन अर्थशास्त्रज्ञ अरविंद पंगारिया आणि अरविंद सुब्रमण्यन मोदींची संगत नको रे बाप्पा म्हणून परत अमेरिकेला गेले. मग नोटाबंदीचं कौतुक केलं म्हणून एकाला पद दिलं तर त्याने स्वतः लिहिलेलं पुस्तक खपवायला सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला. आणखी एक अर्थतज्ज्ञ इतिहासाचे हौशी पुनर्लेखक.
पण हे सगळे लोक माँटेक सिंग अहलुवालिया, रघुराम याजन यांच्यापेक्षा मात्र खूप हुशार.
सध्याचे मुख्य आर्थिक सल्लागार , रिझर्व बँकेचे गर्व्हर्नर कोण आहेत, ते शोधावं लागेल.
गीता गोपीनाथ तयार होतील का आव्हान स्वीकारायला? पण मग काही चांगलं झालं तर त्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल.
आणखी दोन नावं आहेत.
१
२
<थरुरच बाहेर छान बोलू शकतात
<थरुरच बाहेर छान बोलू शकतात म्हणून थरुर यांचा समावेश असलेले सर्वपक्षिय पथक.> त्यांनी तिथे जाऊन हिंदी सिनेमांतली गाणी म्हटली. ते आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा . रेखा शर्मा बहुतेक,
<मग अशा वेळी काय गोष्टी
<मग अशा वेळी काय गोष्टी सुचवायला पाहिजेत की ज्यामुळे तुम्ही पण हातभार लाऊ शकता?> याचं आणखी एक उत्तर.
आमचे मनमो हन सिंग म्हणाले होते विदाउट डिस्कसिंग द मेरिट्स ऑफ मिस्टर नरेंद्र मोदी आय सिन्सिअरली बिलीव्ह दॅट इट विल बी अ डिझास्टर फॉर द कंट्री टु हॅव नरेंद्र मोदी अॅज प्राइम मिनिस्टर (मुद्दाम देवनगरीत लिहिलं आहे).
तर आज ते शब्द खरे होत आहेत, हे मोदी समर्थकांनाच पटू लागलं आहे. म्हणूनच मी आणि माझ्यासारखे इतर बरेच जण मोदींच्या आणि भाजपच्या कारभारा वर लिहीत असतो. पण इथे अनेक जण असे आहेत ( नावं लिहू का?
) ज्यांचं देशापेक्षा मोदींवर अधिक प्रेम आहे. ते माझी टर उडवण्याला देशभक्तीचं कार्य समजतात. समजोत बापडे. मैंनु की?
परकीय चलनाची गंगाजळी
परकीय चलनाची गंगाजळी वाचवण्याचा आणखी एक उपाय सुचला आहे.
Foreign education significantly impacts the Indian economy by driving massive foreign exchange outflows—reaching nearly ₹6.3 trillion ($63 billion) for tuition and living expenses, or about 2% of GDP in early 2026.
तर एक वर्षभर मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवणंही थांबवावं. आणि जी मुलं शिक्षणासाठी परदेशी जातील त्यांना त्यांच्यावर खर्च झालेल्या परकीय चलनाच्या किमान दुप्पट परकीय चलन भारतात माघारी पाठवावं लागेल, अशी अट घालावी. त्यासाठी त्यांच्या पालकांच्या संपत्तीवर lien ठेवावा. भाजप नेत्यांनी परदेशी शिकणार्या आपल्या मुलांना एक वर्षासाठी माघारी बोलवावं. ही मुलं मतदानापुरती परत येतात, असं दिसलं आहे.
<< ते माझी टर उडवण्याला
<< ते माझी टर उडवण्याला देशभक्तीचं कार्य समजतात. समजोत बापडे. मैंनु की? >>
------ कार्य देशभक्तीचेच आहे फक्त त्यांचा देश वेगळा आहे.
तुमचा भारत देश १९४७ मधे स्वातंत्र झाला. त्यांचा देश २०१४ मधे...
तुम्हाला foreign trips रद्द
तुम्हाला foreign trips रद्द करायला सांगुन मोदी आमच्या आबुधाबीत आले
यासाठी आले असावेत.
यासाठी आले असावेत.
चांगली बातमी आहे का? की देशाला घाट्यात नेणारा सौदा? जाणकारांनी वाचून विश्लेषण करावे.
As the world faces an energy crisis triggered by the war between Iran and the United States, backed by Israel, India signed a strategic deal with the United Arab Emirates for the supply for Liquified Petroleum Gas (LPG) to help ease the impact of the war.
India, UAE sign pacts on LPG, strategic oil reserves to cushion US-Iran war impact | India News https://www.hindustantimes.com/india-news/india-uae-sign-pact-on-lpg-str...
>>Submitted by अमितव on 14
>>Submitted by अमितव on 14 May, 2026 - 23:07>> पोस्ट आवडली.
आजची बातमी.
आजची बातमी.
he Trump Justice Department is dropping Biden-era charges against Indian billionaire Gautam Adani.
The reversal came after Adani hired a new legal team led by one of Trump's personal lawyers.
That lawyer went to DOJ and made a proposal: If prosecutors dropped the charges, Adani would be willing to invest $10 billion in the American economy and create 15,000 jobs.
यातले १० बिलियन डॉलर वाचून मला आपली परकीय चलन गंगाजळी आणि हा धागा आठवले.
ए आय ला विचारलं
Outward Forex Flow: Firms buy foreign currencies (like USD or EUR) using INR, increasing the supply of Rupee in the foreign exchange market
.Depreciation Pressure: This immediate spike in foreign currency demand puts downward pressure on the value of the INR.
Capital Account Deficit: Outward Direct Investment (ODI) registers as a debit item in the capital account of India's Balance of Payments (BoP).
म्हणजे आपण इथे पेनी पेनी वाचवणार ते डॉलर वापरून गौतम भाई स्वतःची सुटका करून घेणार का?
गौतमभाईंना तुम्ही वर्षभर थांबा असं सांगता आलं नसतं का?
मोदींच्या आवाहनाचा ट्रिकल
मोदींच्या आवाहनाचा ट्रिकल डाउन इफेक्ट होऊ दे. आधी भाजप नेत्यांना त्यावर कृती करू दे. नाहीतर आपण मारे पेट्रोल डिझेल वाचवू आणि हे गाड्या उडवत जातील.
https://www.facebook.com/share/v/1CnJzZCYbY/
मोदींनी पेट्रोल बचतीचं आवाहन केलं, दुसऱ्या दिवशी भाजप नेत्याने शेकडो गाड्यांचा ताफा काढला...
<चांगली बातमी आहे का? >
<चांगली बातमी आहे का? > प्रथमदर्शनी तरी चांगली बातमी.
Following his visit to the
Following his visit to the United Arab Emirates, PM Modi will travel to the Netherlands from May 15 to 17 to focus on semiconductors, green hydrogen, innovation, defence and water management.
Technology & Semiconductors: A anticipated agreement between TATA Electronics and ASML Netherlands to boost a semiconductor fabrication plant in Dholera, Gujarat.
Strategic Partnerships: Strengthening collaboration in water management—evidenced by a visit to the Afsluitdijk Dam—agriculture, and renewable energy.
Trade & Investment Boost: Deepening the economic relationship with the Netherlands, which is India's 3rd largest export destination and 4th largest investor, with bilateral trade reaching USD 27.8 billion in 2024-25.
Healthcare & Innovation: Advancing collaboration in pharmaceuticals, health technologies, and academic partnerships between Indian Institutes of Technology (IITs) and Dutch universities.
PM Modi will then visit Sweden to focus on artificial intelligence, emerging technologies, green transition and resilient supply chains.
A major takeaway is the promotion of "Make in India" initiatives, including the development of Saab's Carl-Gustaf manufacturing plant in Jhajjar, which is India's first 100% FDI-driven defence project.
The Indian Army has used the Swedish-made Carl-Gustaf 8.4 cm recoilless rifle since 1976, making it a cornerstone of its platoon-level firepower. It is a versatile, man-portable weapon effective for anti-tank, counter-insurgency, and urban warfare. The newest M4 variant is now being produced in India.
Also to deepen economic ties within the context of the recently agreed India-EU Free Trade Agreement.
The visit serves to strengthen the Nordic partnership and enhance collaboration in critical mineral supply chains, which are essential for electric vehicles and defense electronics
I n Norway, the Prime Minister will participate in bilateral discussions.
Norway holds approximately (7) billion barrels of proven crude oil reserves, ranking among the top (20) globally. Situated primarily in the North Sea, these vast offshore reserves make Norway Western Europe's largest oil and natural gas producer.
Norway holds approximately 2 trillion cubic meters (about 48 to 72 trillion cubic feet) of proven natural gas reserves, making it the largest holder of natural gas in Europe.
This supply will be independent of strait of hormuz
During the BRICS discussions
Russia assures India on oil supply amid global energy uncertainty
During the BRICS discussions in Delhi, India and Russia also reviewed plans to expand trade cooperation. Both countries aim to increase bilateral trade to nearly Rs 9.57 lakh crore over the next four years, while also promoting transactions in rupees and rubles to reduce dependence on the US dollar.
Russia exported nearly 360 million litres of oil per day to India in March. In April, supplies dropped to around 250 million litres daily, though the decline was linked to technical issues at two major Russian oil facilities rather than geopolitical pressure. In May, exports reportedly returned to earlier levels, with Russia supplying approximately 365 million litres of oil per day to India.
Further highlighting that during the first two weeks of May, nearly 50 percent of India’s total oil consumption came from Russia.
मेरी बाहों को तेरी साँसों की
मेरी बाहों को तेरी साँसों की जो
आदतें लगी है वैसी
जी लेता हु अब मैं थोड़ा और
मेरे दिल की रेत पे आँखों की जो
पड़े जो परछाई तेरी
पी लेता हूँ तब मैं थोड़ा और
जाने कौन है तु मेरी मैं ना जानु ये मगर
जहां जाऊ मैं करूं मैं वहाँ
तेरा ही ज़िक्र
मुझे तु राज़ी लगती है
जीती हुई बाज़ी लगती है
तबियत ताज़ी लगती है
ये तुने क्या किया
हेच खरे कारण असेल तर उद्योग
हेच खरे कारण असेल तर उद्योग किंवा तंत्रज्ञान मंत्री या कामाला जाऊ शकत होती पण खि खि खि आणि गळाभेट कोण करणार?
इटली भेट आहे ? काही तरी जोडा काम.
प्रगत तंत्रज्ञानाची
प्रगत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण अजेंड्यावर आहे का?
https://youtu.be/7JnJuZgLu2A
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DYUeSnBRyKo/?igsh=YjJycGMycWFxMmow
या आवाहनावर स्टँड अप - मोदी विरोधक नाहीत त्यांनीही बघा. पंच भारी आहेत -
देशहिताचं अपील केलं होतं. पण
देशहिताचं अपील केलं होतं. पण बहुतेक देशभक्त कुणीच नसावेत सध्या.
दुसरं देशभक्तीचं अपील आहे.
मित्रांना दिलेलं 16,000,000,000,000 हे जे कर्ज माफ झालेलं आहे ते वसूल व्हावं. ज्यांना माफ करणे हा शब्दप्रयोग पसंत नाही, अशा विद्वानांनी राईट ऑफ म्हणजे काय आणि ते वसूल करायचं असतं कि नाही याची माहिती द्यावी ही नम्र विनंती. राईट ऑफ किती रक्कम केली जाते, किती काळासाठी हे सांगून अज्ञान दूर करावे.
बरीच वर्षे झाली, राईट ऑफ आणि कर्जमाफी यातला फरक कळत नाही आणि गडाबडा लोळणारी स्मायली अशी कमेण्ट पाहून.
हे वसूल केलेले पैसे तसेच कर्ज घेऊन पळालेले जतीन मेहता सहीत अनेक उद्योगपती यांच्याकडून पैसे वसूल केले असतीलच. ते सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत लावावेत.
हे अपील देशद्रोहाचे असेल तर सांगा.
Pages