पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे भारतीयांना आवाहन!

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2026 - 00:54

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.

मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -

१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.

२) सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.

३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.

४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.

५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.

६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.

७) परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.

मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यामुळे मोदींनी हे 'काटकसरीचे' आवाहन केले आहे _/\_

IMG_20260513_100724.jpg

^^^^^^^^^

हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे?
पाळले जाईल का?
यात काय समस्या येतील?
तुम्ही यात सहकार्य कराल का?
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?
हे सरकारचे अपयश आहे का?
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे का?
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येईल का?
..
इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.

##########

प्रतिसादात लोकांनी आग्रह केल्यामुळे धागालेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.

हे सरकारचे अपयश आहे किंवा नाही यात न पडता आधी देशावर संकट आले आहे तर आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार डोक्यात पहिला आला.

१) बातमी कानावर येताच मी आज सुट्टी टाकली. पण गेलोच असतो ऑफिसला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते. माझ्याकडे गाडी नाही. मला चालवताच येत नाही.

२) सोन्याची खरेदी उभ्या आयुष्यात एकदाही केली नाही.

३) परदेश असो किंवा देश विदेश कुठल्याच प्रवासाची मुळातच आवड नाही.

४) मी शेतकरी नसल्याने शेतीचा मुद्दा माझ्यासाठी बाद.

५) WFH करायचे आदेश निघाले तर सर्वात जास्त आनंद मला होईल. बेडरूम मध्ये लोळत काम करायचे दिवस मिस करतोय.

मुलांच्या शाळा मात्र चालू राहाव्यात असे वाटते. मुलांचे कसले नुकसान नको. ते देशाचे भविष्य आहेत. तसेही आमची मुले तरी फक्त रॉड क्रॉस करून शाळेत जातात. इंधनाचा वापर शून्य असतो.

६) कुठल्याही भौतिक सुखाच्या वस्तूंची मला फार आवड नाही. त्यामुळे इम्पोर्टेड वस्तू फार विकत घेऊ नका हे पाळणे मला अवघड नाही.

७) खाद्यतेलाचा वापर कमी करणे मात्र तेवढे अवघड आहे. कारण माझ्या आवडीचे तेलकट चमचमीत पदार्थ मी रोज खातो.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारने भारतभर पेट्रोल पंप मालक व सोनारांवर इडीच्या धाडी टाकाव्या. आपोआप विक्री कमी होईल. किती काळ चौकशी करावी ह्याचा सरकारला चांगला अनुभव आहे आणि त्यात ते तरबेजही आहेत.

केकु हे उत्तरपूजेत गणपती पाण्यात विसर्जन करण्यापूर्वी म्हणतात ना? Wink Lol

बाकी वापर खाली यायचा सोपा उपाय किंमती वाढवणे हा आहे. लोक वापर कमी करतील आणि त्याने किंमती वाढवाव्या लागणार नाहीत हे अशक्य आहे. यावर सोपी आणि लाईकली मोदींना तोंडघशी पाडेल अशी स्ट्रॅटेजी म्हणजे या आवाहनाला जाहिर पाठिंबा देऊन त्याला जराही विरोध न करणे. हे असं झालं तरी चार दिवसांत मोदी भसाभस किंमती वाढवतीलच. तेव्हा बोंब ठोकणे, की आम्ही काटकसर तर तुम्ही म्हणाला तशी चालू केली आता किंमती का वाढवल्या? चिकन आऊट! चिकन आऊट!!! Wink
कारण युद्ध थांबण्याची आणि तेलाच्या किंमती खाली यायची सध्यातरी काहीही चिन्हे नाहीत. टाको एपिल फ्युरीचं नाव बदलून स्लेज हॅमर करतोय की नव्या नावाला काँग्रेसची आणखी ९० दिवस परवानगी नको. हे नियमांत बसत नाही पण जोकरला काही नियम लागत नाहीत हे बॅटमॅन मध्ये माहितच असेल.
बाकी ही वेळ सर्वस्वी अमेरिकेमुळे आलेली आहे. अमेरिकेला अद्दल घडेल असं काही आपण करणार आहोत का? भारत ही इतकी महासत्ता वगैरे आहे तर अमेरिकेला जरब बसेल. निदान त्यांना त्रास होईल असं काही करणार का पाकिस्तान सारखे अजुनही कच्छपीच लागणार ?

ह्या सरकारकडे आर्थिक किंवा खरंतर कुठल्याच बाबी हाताळणारी एकही सक्षम व्यक्ती नाही हे पदोपदी सिद्ध झालेले आहे. त्यामुळे अशा कठीण समयी जनतेवर सगळे ढकलून मोकळे व्हायचे ही 12 वर्षे वापरलेली ट्रिक पुन्हा पोतडीमधून बाहेर काढली आहे. २०२९ साली ONOE होईल किंवा एखादा नवा ज्ञानेश असेल, त्यामुळे निवडणुका जिंकायला काहीच अडचण नाही. तसेही जनता विसरभोळी असते ह्याचा गैरफायदा भारतीय राजकारणी लोकांपेक्षा कुठे घेतला जात असेल असे वाटत नाही. त्यामुळे चालू द्या.

I was missing Bhau Torsekar. Then I saw Shekhar Gupta Wink

१ सरांनी मला काँग्रेसचा कट्टर समर्थक म्हणून मी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलणं टाळलं. पण भाजपचे कट्टर समर्थक असलेल्या सुबोध खरे यांच्या पोस्टला दाद दिली. भाजपचे दुसरे कट्टर समर्थक बेफिकीर यांनी सरांच्या सुरात सूर मिळवला. बेफिकीर यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीत मिळालेला विजय हा भाजपच्या सर्व धोरणां ना पाठिंबा असा अर्थ लावला. वर विरोधकांनी गप बसावे हा नेहमीचा सल्लाही दिला.
सध्या मोदींच्या या आवाहनाचा प्रचार प्रसार करणारेही कट्टर भाजप समर्थकच आहेत.

मुळात राजकीय भूमिका घेणं म्हणजे काहीतरी घाण असा पवित्रा घेणं हीच लबाडी आहे. तुम्ही एखाद्या पक्षाची री ओढा असं मी म्हणत नाही. पण देशात जे चाललं असेल त्यावर विचार करणं आणि भूमिका घेणं हे सजग नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मोदींनी आवाहन केलं - पाळा. पण ते आवाहन करण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली, तोवर काय केलं? याचा विचार का करू नये.

२ मी मोदींना भाजपचा पंतप्रधान समजतो, देशाचा नाही, असं सर म्हणाले. मुळात मोदी स्वतःला देशाचा पंतप्रधान समजतात का? ते देशात असतात तेव्हा सतत विरोधी पक्षांवर टीका करत असतात. आणि परदेशात जातात तेव्हा स्वप्रतिमासंवर्धन करत असतात (त्यात किती इफेक्टिव्ह झालेत ते ....)
तर देशाच्या पंतप्रधानपदाकडे वळू. मोदींनी घटनादुरुस्तीसारख्या गंभीर गोष्टीचा राजकीय खेळी म्हणून उपयोग केला, हे भाजप समर्थकच म्हणत आहेत. घटनादुरुस्ती विधेयक पडल्यावर त्यांनी देश के नाम संबोधन केलं. असं संबोधन करायचा अधिकार फक्त पंतप्रधानाचा. पण त्यांनी त्या भाषणात फक्त आणि फक्त विरोधी पक्षावर टीका केली. निवडणुकीचा प्रचार केला. का त्यांना देशाचा पंतप्रधान समजावं?

लबाड सरांनी युद्ध कधी सुरू झालं ते सांगणं टाळलं. अमेरिकेने इराणवर हल्ला केला २८ फेब्रुवारीला. मार्च महिन्यातच देशात गॅस सिलिंडर्सचा तुटवडा निर्माण झाला होता. व्यावसायिक वापराच्या सिलिंडर्सची कमतरता अधिक होती आणि त्याची किंमतही वाढवली गेली. यावर भाजपचा कोअर मतदार काय म्हणतो? व्यावसायिक सिलिंडर हॉटेलवाले वापरताहेत. काही दिवस हॉटेला त खाऊ नका. घरचं जेवाल तर तब्येतीसाठीही चांगलं. रस्त्यावरचे वडापावचे ठेलेही बंद पडले. क्लाउड किचनवाल्यांना कोळशाच्या शेगडीसारखे पर्याय शोधावे लागले किंवा ब्लॅकने सिलिंडर घ्यावे लागले. क्लाउड किचनचा ग्राहक हा प्रामुख्याने शहरांत एकटा राहणारा कामकरी वर्ग असतो वा ज्यांना घरी स्वैपाक करणे शक्य होत नाही, असे लोक.
मार्च महिन्यातच गॅसच्या तुटवड्यामुळे उउद्योग बंद पडत होते. तसंच एल पी जी मिळत नसल्याने कष्टकरी वर्ग शहरे सोडून आपल्या राज्यांत परत जाऊ लागला होता. याबद्दल धागा काढावा असे कोणाला वाटले नाही. भाजप समर्थक गॅस चटकन मिळतोय अशा फेक पोस्ट्स टाकत होते. भाजप नेते विरोधी पक्ष अफवा पसरवतोय असा आरोप करत होते.

तसंच अमेरिकेच्या दबावाखाली भारताने रशियन तेल आयात करणं बंद केलं (असं राम माधव यांनी अमेरिकेत जाऊन सांगितलं आहे. नंतर काहीही सारवासारव करू देत). त्या तेलाची किंमत आपण रुबल आणि युआन मध्ये देत होतो. तेही थांबलं. ब्रिक्सची वेगळी करन्सी होऊ शक्ते. त्यालाही मोदी तयार नाहीत.

सर म्हणतात हा धागा सामान्य जनतेसाठी आहे. आता या सप्तसूत्रीकडे वळू - वर्क फ्रॉम होम कोणाला शक्य आहे? सोने अधिक प्रमाणात खरेदी कोण करतो? खाजगी वाहनातून प्रवास कोण करतो? इम्पोर्टेड वस्तू कोण वापरतो? परदेश प्रवास कोण करतो? हा वर्ग देशाच्या लोकसंख्येच्या टॉप ५ किंवा १० % मध्ये मोडेल. ही सरांची सामान्य जनता.

म्हणजे मोदींचा हा संदेश त्यांच्यासाठी. युद्धाच्या झळा या लोकांना लागल्या तरी किती लागतील? ज्यांना लागतात त्यांच्याबद्दल मोदी काय म्हणालेत? किंवा तुम्ही काय विचार केलात? ज्यांना या युद्धाच्या झळा लागणार आहेत तो कष्टकरी वर्ग. उद्या त्यांचीही मते मोदी सामदामदंड भेद या मार्गाने मिळवतील वा एस आय आर च्या नावाखाली त्यांना मतदार यादीतूनच वगळतील.

आता सोनार म्हणताहेत - सोन्याची खरेदी प्राप्त परिस्थितीत करू नये हे योग्य आहे. पण त्यामुळे आमचे व्यवसाय बसतील. विक्रेत, कारागीर यांचा रोजगार बंद पडेल. त्यांचा विचार कोण करेल? त्याचे रिपल इफेक्ट होतील त्याचा विचार?

या सप्तसूत्रीत ल्या फार थोड्या गोष्टी मला लागू होतात. गुंतवणुकीतला एक ठरावीक हिस्सा सोन्यात असावा म्हणून मी गोल्ड इटीएफ घेतले. ते लक्ष्य गेल्या आर्थिक वर्षातच गाठले आहे.
माझ्याकडे स्वतःचे वाहन नाही. प्रवास फार नाही. होतो तो त्या त्या वेळच्या गरजेनुसार आणि सोयीने बस, ट्रेन, मेट्रो, रिक्षा, उबर.
निवृत्त असल्याने ऑफिसला जायचा प्रश्न नाही.
परदेश प्रवास नाही.
स्वयंपाकात तेलाचा वापर फोडणीपुरता. तळण वर्षातून चारपाच वेळा. विकतचे तळलेले पदार्थ तोंडात टाकण्यापुरते घेतो.
शेती करत नाही.
इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना स्वदेशी किंवा विदेशीपेक्षा दर्जा, किंमत, टिकाऊपणा यांचा विचार करतो. इम्पोर्टेड पाहिजे असा सोस नाही.

वर विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले तर लोक बोलतील असे तारे दिसले. विकासाच्या नावाखाली सगळीकडे वृक्षतोड होते आहे. त्यावर धागा काढतो. ती वृक्षतोड कशी योग्य आहे हे केसवाइज आणि स्पेसिफिक उत्तरे लिहिण्यासाठी जागा तयार करतो. बघू तिथे किती जण येतात.

शेवटी मी इथे जे मुद्दे मांडलेत ते पक्षीय भूमिका घेतली नाही, तरी चूक आहेत का? त्यावर काय उत्तरे मिळाली? शिमगा शिमगा शिमगा. कट्टर काँग्रेस समर्थक. भाजप निवडणूक जिंकतो. इथे लिहून वेळ वाया का घालवता वा तत्सम.

नोटाबंदीनंतर काळा पैसा संपवण्यासाठी बेनामी संपत्ती कडे लक्ष देणार अशा पुड्या सोडण्यात आल्या होत्या. मोदींनी जनगणनेत प्रत्येकाने आपल्याकडच्या सोन्याचांदी हिर्‍या मोत्यची आकडेवारी द्यावी . जाहीर केलेल्यापेक्षा जास्त संपत्ती निघाली तर जप्त करू असा उपाय करावा. मज्जा येईल.

भारताची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे आणि त्याला हे युद्ध हे एकमेव कारण नाही. युद्धाचं निमित्त केलं जाईल हा माझा अंदाज.

हे युद्ध किती काळ चालेल याचा अंदाज मोदींना आला नाही असा एक तर्क आला आहे. हेही आपल्या परराष्ट्रनीतीचे आणि ज्ञानाचे अपयश. त्यातून नेत्यानाहूच्या कच्छपि लागल्याने आणि ट्रंपच्या दबावाखाली असल्याने पुतिनला जसं This is not the time for war असं सांगितलं, तेही सांगायची सोय नाही.

आमच्या कोकणात शिमगा करतात तेंव्हा यथेच्छ शिव्या दिल्या जातात.

पण त्याचा अर्थ असा असतो कि जुने सर्व आता होळीत जळून जाऊ द्या

ज्याच्याबद्दल राग आहे त्याला शिव्या दूषणे देऊन तुमच्या नकारत्मक भावनांचा निचरा करा आणि खुल्या मनाने नवीन वर्षाला सुरुवात करा.

येथे मात्र काही लोक बारा महिने बत्तीस काळ कायम भाजप/ मोदींना शिव्या देत राह्तात आणि अनेक धाग्यांवरील चर्चेचा विचका करतात.

या लोकांचा वर्षात एकदा नव्हे तर दर महिन्यात दोन चार वेळेस शिमगा चालू असतो.

कोणताही माणूस १०० % बरोबर किंवा चूक नसतो यात आपले आईवडील किंवा मित्र मैत्रिणी सुद्धा येतात. एखादा माणूस कायम आपल्या मित्रांच्या चुकाच दाखवत राहिला तर त्याचा लोकांना कंटाळा येतो आणि ते संवाद बंद करतात. येथे अनेक धाग्यांवर असे होताना स्पष्ट दिसते आहे.

दुर्दैवाने सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत एखादा सदस्य जसा सकारत्मक चर्चेत कायम खोडा घालून त्याचा विचका करत असतो आणि त्यावर इतर सभासदां कडे कोणताही उपाय नसतो तशीच स्थितीत येथे मायबोलीवर पण आहे.

बऱ्याच सदस्यांना चर्चेचा विचका झालेला पटत नाही पण त्याला उपाय नाही लोकशाहीत असं च चालायचं

भरत छान मुद्देसूद पोस्ट!
उगाच वेडेवाकडे प्रश्न न विचारता आधीच हे लिहिले असते तर छान झाले असते.

तुमच्या पोस्टमधील काही मुद्दे मला माझ्या शाळेच्या ग्रुपवरील भाजप समर्थकांचे एकांगी विचार खोडायला मदत करतील.

बाकी तुम्ही माझ्यावर केलेली टीका मला नवीन नाही. ती रोजची आहे मला.
सरकारविरोधात म्हटले की भाजप समर्थक मागे लागतात. समर्थनार्थ म्हटले तर विरोधक मागे लागतात. सोशल मीडियावर लिहिणाऱ्यात तटस्थ नेहमी अल्पसंख्याकात असतात Happy

Submitted by भरत. on 14 May, 2026 - 10:08>> पोस्ट अगदी चपखल आहे भरत.
देशाचे पंतप्रधान वाटावे असं पंतप्रधान वागत नाहीत, प्रत्येक व्यासपीठ, प्रत्येक औचित्य हे आपल्या पक्षाच्या प्रचाराची, स्वतःची आरती ओवळण्याची, विरोधकांवर तुटून पडण्याची पर्वणी समजतात, २४ x ७ प्रचारमंत्री असतात. हैद्राबादला एका वेगळ्याच भाषणात लोकांनी काय करावं हे सांगतात आणि त्यातच विरोधकांवर आगपाखड करून घेतात. हे यांचे गांभिर्य आहे एवढे महत्त्वाचे आवाहन असेल तर! देशाला संबोधून दूरदर्शनवर व सगळ्या वाहिन्यांवर प्रसारित करत कारकीर्दीतली फक्त दहा पंधरा मिनिटे फक्त मुद्यावर बोलून, विरोधकांना शिव्या न घालता बोलता येत नाही?
तरीही विरोधकांनी टिका केलीच असती (मी पण) पण हे काय कारण झाले का योग्य ते व्यासपीठ, गांभीर्य बाळगून देशाच्या पंतप्रधानाला शोभेल अशा प्रकारे आवाहन न करण्याला?

माझ्यासाठी देशाचे पंतप्रधान आहेत अशी रुबिकागिरी करण्यापूर्वी डोळे उघडून जरा बघावं. किंवा नसेल वेळ तर जे बघत असतील त्यांना नावं तरी ठेऊ नयेत.

तरीही हे आवाहन योग्य त्या प्रकारे केले आहे अशी कल्पना करून माझ्यापुरते खाण्याच्या तेलासकट सगळं एव्हरेज पेक्षा बरंच कमी वापरतो.
वर्क फ्रॉम होमच सुरू आहे. कार व दुचाकीचाही वापर खूप कमी झालाय. कारचा वापर बहुतकरून सुपर ज्येना मंडळींसाठी होतो, आठवड्यातून एकदा त्यात बरेचदा मशीन आहे, बॅटरी डाऊन व्हायला नको म्हणून असतो.
दागिने आवाहन केले नसते तरी खरेदी केले नसते. परदेश प्रवास अनावश्यक आधीही क्वचितच केला, आणि सध्या तरी आवश्यक प्रवासी दृष्टीक्षेपात नाही. याउपर काही लक्षात आले व शक्य असले तर करेन पण ते केवळ आवाहन केले म्हणून नाही तर त्यात खरंच काही तथ्य आहे का हे पाहुन. विशेषतः या पंतप्रधानांनी सांगितलं तर नीट विचार करूनच सांगितलं असेल यावर विश्वास नाही. अशा प्रसंगी काय करावे याची अधिक ऑथेंटिक माहिती सहज काढता येते. गॅसचा कमी वापर युद्ध सुरू झाल्यानंतर गॅस टंचाईची बातमी आल्यापासून सुरू केला आहे अजूनही सुरू आहे. आपला गॅस पटकन बूक करून घ्या, असे केले नाही.
ज्या लोकांना दोन सिलिंडर ठेवणे परवडत नाही त्यांना एक संपला की लगेच जाऊन दुसरा आणावा लागतो. आपल्याला तसे करावे लागत नाही. त्या लोकांनी रांगा लावल्या, त्याच्या बातम्या आल्या होत्या त्याला सरकारला बदनाम करण्याचे धंदे म्हणत नावे ठेवली नाहीत.

काही काही गोष्टी कायमस्वरूपी क्लिअर करूयात. म्हणजे प्रत्येक वेळी पुनरावृत्ती नको. तो आनंद हवाच असेल तर बंदी नाही.

1. मोदींच्या नावे शिमगा - आपल्या लाडक्या नेत्याबद्दल नकारात्मक बोलू नये असे वाटणे साहजिक आहे. पण आपल्या नेत्याने इतरांना यापूर्वी कसे संबोधले होते याचा विस्मरणचकवा झालाय का?

2. सत्तेत असलेल्या पक्षाबद्दल अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, दीनदयाळ उपाध्याय, शामाप्साद मुखर्जी, गुरूजी अर्थात माधवराव गोळविलकर मोहन भागवत, बाळासाहेब देवरस आदी महानुभाव जे बोलत त्याला स्तुतीसुमने म्हणायचं का? गुंगी गुडिया म्हणणे हे हुकुमशाहीत जीवन कंठत असल्यानचे निदर्शक म्हणायचे का?
पचास लाख कि गर्लफ्रेंड, रेनकोट पहनकर बाथरूम मै नहाते है, सबसे कमजोर प्रधानमंत्री, accidental प्राईम मिनिस्टर ही सभ्य भाषा आहे का?
अशा भाषेचा प्रयोग विरोधकांनी केला तर मग शिमगा वाटणार नाही का?

आता विरोधक

1. पूर्वी सत्तेत असताना आपण जे केले नाही त्याबद्दल गळे काढणे आणि त्याची आठवण करून दिली कि त्या व्यक्तीला सरळ संघी ठरवणे घातक आहे.

2. कॉंग्रेस पक्ष कमजोर झाला तरी काही राज्यांत अस्तित्व टिकवून आहे. पण म्हणून सातत्याने इतर पक्षांनी निवडणूक लढवली तर भाजपचा फायदा होतो असा अपप्रचार करून त्यांच्या निवडणूक लढविण्याचा हक्क मारतो. पण हाच पक्ष जिथे अस्तित्व नाही तिथे युतीसाठी अव्वाच्या सव्वा जागा मागतो. बिहार विधानसभेच्या ५४ जागा असताना कॉंग्रेसने २६ जागा मागितल्या. लालूंनी ४ जागांची तयारी दर्शविली होती. पण कॉंग्रेस २२ वर अडून बसली. यामुळे युती झाली नाही. परिणामी भाजप नीतीश युतीने घवघवीत यश संपादन केले. इथे कॉंग्रेस भाजपाची बी टी का नाही?

पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने आता किती जागा मिळवल्या? त्यांनी निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहून ममतांना मदत का केली नाही?

२०२४ ला कॉंग्रेसने दहा राज्यात शून्य जागा घेतल्या. या राज्यात कॉंग्रेसने स्थानिक पक्षांशी आघाडी केली नाही. शून्य जागा घेण्यापेक्षा लवचिक भूमिका घेतली असती तर भाजपची सत्ता आली नसती.

या प्रत्येक राज्यात कॉंग्रेस बोलणी करताना एक जागेपासून सुरू करते आणि बाहेर त्यांच्या पाळीव पत्रकारांकडून स्थानिक पक्षांनी अव्वाच्या सव्वा जागा मागितल्या असा कांगावा करते. खरी गोष्ट अशी आहे की कॉंग्रेस ला स्थानिक पक्ष डोकं वर काढतात हे सहन होत नाही. आम्हाला नाही तर भाजप आली तरी चालेल पण प्रादेशिक पक्ष सबळ नकोत हे त्यांचे धोरण आहे.

सोशल मीडियावर पण ज्या चर्चा होतात त्या याच अंडरस्टेंडिंग मधे होतात. इतर मतं ऐकू येत नाहीत अशी बतावणी करत या चर्चा सुरू राहतात. त्यामुळे इतरांचा त्यातला इंटरेस्ट संपतो.

थांबा. मोबाईलवरून टाईपत असल्याने टप्प्याटप्प्यात पूर्ण करतोय. कळ काढा.

तुम्ही जुनंपानं काढून भाजप ला शिव्या द्यायच्या.

भाजपावाल्यानी जुनंपानं काढून विरोधकांना शिव्या द्यायच्या.

हेच कायम चालू ठेवण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक लिहा.

हि धुळवड चालू ठेवल्यामुळे नक्की काय निष्पन्न होणार आहे?

ना भाजपचे समर्थक आपले विचार बदलणार आहेत

ना विरोधक

मग नुसता शिमगा आणि धुळवड करून सार्वजनिक न्यासाच्या विचका कशासाठी?

आपल्या धाग्यातून लोकशिक्षण होतंय का मनोरंजन?

पेरिले ते उगवते

बोलण्यासारिखे उत्तर येते

मग कर्कश्य बोलावे

काय निमित्य?

यावरून एक आठवलं. खाण्याच्या तेलाचा वापर कमी करायचा असेल त्यांच्यासाठी माझा एक शून्य तेलातील झणझणीत रस्साभाजीचा धागा आहे. आपण नारळ आयात करत असू तर ते कमी करण्यास त्यात खोबरे नाही घातले तरी चालते. तेलात करतो त्याच चवीच्या , हव्या तेवढ्या झणझणीत भाज्या शून्य तेलात करता येतात. शरीराला आवश्यक तेवढे फॅट इतर सोर्सेसने मिळवता येते किंवा हवे तर आवश्यक तेवढे तेल भाजीत घालता येईल. देशहितासाठी कुणीतरी तो धागा शोधुन वर काढू शकता.

अनेक पदार्थ एअर फ्रायर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये केल्यास जवळजवळ तळणीच्या १५ ते २० % इतक्या कमी तेलात करता येतात. विशेषतः सामिष पदार्थ

याचे कारण कोणत्या ही सामिष पदार्थात अंगचेच तेल असते.

त्यात गॅसची सुद्धा बचत होते

<< कोणताही माणूस १०० % बरोबर किंवा चूक नसतो यात आपले आईवडील किंवा मित्र मैत्रिणी सुद्धा येतात. एखादा माणूस कायम आपल्या मित्रांच्या चुकाच दाखवत राहिला तर त्याचा लोकांना कंटाळा येतो आणि ते संवाद बंद करतात. येथे अनेक धाग्यांवर असे होताना स्पष्ट दिसते आहे. >>

----- नेहरु जाऊन आता सहा दशके झाली आहेत तरी त्यांच्या नावाने सतत रडणार्‍या रडतराऊत मोदी हे या नियमाला अपवाद आहेत. आपल्या प्रत्येक अपयशाचे खापर ते नेहरु/ गांधी परिवारावर फो डू शकतात आणि त्याचा खर्‍या भक्तांना कधीच कंटाळा येत नाही.

कधीतरी जबाबदारी घेण्याचे धाडस दाखवा. देशापुढील प्रत्येक प्रश्न हिंसाचार, दंगा अणि आणि मिडिआ मॅनेज करुन सोडविता येत नाही. अन्न शिजविण्यासाठी गटारचा गॅस किती दिवस पुरणार?

भारतासारख्या मुबलक सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या देशात प्रत्येक बिल्डिंगवर सौरपॅनेल लावली जावीत. अर्थात मला यामागचे टेक्निकल इश्शूज काही असतील तर माहीत नाहीत.

मोदी काय बोलतात, केजरीवाल काय बोलतात किंवा राहुल गांधी किती भंपक बोलतात ते सारं प्रत्येक धाग्यावर आणून धाग्याचा विचका करणे आवश्यक आहे का?

ते सर्व राजकारणी आहेत. कोणताही राजकारणी धुतल्या तांदुळाचा नसतो.

म्हणून मायबोलीसारख्या उत्तम सार्वजनिक स्थळावर जिथे तिथे राजकारण आणून प्रत्येक चांगल्या धाग्यच विचकच केला पाहिजे का?

आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये असे श्री व्यंकटेश माडगूळकर यांनी सिनेमा तमाशाच्या धंद्या बद्दल लिहिलेलं आहे

ते राजकारणाला सुद्धा लागू होतं.

सकारात्मक लिहा म्हणजे जे काही चुकीचं चाललं आहे त्याबद्दल बोलू नका.

इतर कोणी हा मुद्दा काढायच्या आधी मीच लिहितो. इंदिरा गांधींनी सुवर्ण नियंत्रण कायदा आणला होता. कोरियन युद्धाची झळ बसून महागाई वाढली असे नेहरूंनाही सांगावे लागले होते. पण याबद्दल संसदेत चर्चा झाली होती. त्या युद्धात नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताने मध्यस्थी केली होती. २०१३ मध्ये सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी चालू खात्यातील घट वाढली होती. यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत भाषण करताना सोने , इंधन यांची आयात कमी करायची गरज अधोरेखित केली होती. याशिवाय निर्यात वाढवायची गरजही सांगितली होती.
या तिघांपैकी कोणी खाद्यतेलाचा कमी वापर करणे म्हणजे देशभक्ती असे सांगितले होते का ते माहीत नाही.

येत्या रविवारपासून अधिक मास सुरू होतो आहे. काही लोकांमध्ये अधिक मासात जावयाला सोन्याचांदीच्या वस्तू दिल्या जातात. जावयासाठी अनारसे तळले जातात. आता मोदींचं ऐकायचं तर दशमग्रहाला नाराज करावं लागेल.

High Initial Investment: Despite subsidies, the high upfront cost of installation is the biggest barrier for homeowners and commercial businesses.

Regulatory & Approval Delays: Navigating DISCOM (distribution company) approvals, net metering regulations, and complex subsidy processes leads to long delays.

Quality & Installation Issues: Lack of experienced, skilled, or certified technicians leads to poor installations, improper wiring, and low-quality equipment, causing system underperformance or failure.

Grid Stability & Regulatory Bottlenecks: Discoms are reluctant to promote rooftop solar because it takes away high-paying commercial consumers, often leading to slow net-metering approvals.

Space & Structural Constraints: Limited space, improper roof orientation, heavy shading in urban areas, and insufficient structural strength of older roofs restrict installation capacity.

Supply Chain & Component Shortages: Mandatory requirements to use domestically produced panels (DCR) have caused shortages, as production lags behind demand, making them 30-40% costlier and harder to find.

Maintenance & Technical Issues: Dust, pollution, and lack of regular maintenance reduce efficiency. High voltage installations require strict safety measures, which are often neglected by local vendors.

Uncertainty in Policies: Sudden changes in taxes, import duties on components, and state-level policy variations discourage long-term investment

These challenges have led to only 13% of the PM Surya Ghar Yojana targets being met as of October 2025, according to IEEFA reports

सुबोध खरे, तुमच्याकडचे मुद्दे कधीच संपलेत. मी मांडलेल्या मुद्द्यांना तुमच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे राजकारण नको म्हणून गळा काढून काही साध्य होणार नाही.

यात धाग्याचा विचका कसा होणार? मोदींच्या सप्तकलमी प्रवचनाला फक्त मान डोलवून वा वा म्हणणे किंवा प्रत्येकाने तशी शपथ घेणे यासाठी हा धागा होता का? तसाही तो तीन दिवस उशिरा आला आहे. तोवर हे सगळं टीव्हीवर , पेपरात व्हॉट्स अ‍ॅपवर येऊन गेलं होतं.

राजकारणाशी संबंधित विषय चालू घडामोडीत आला आहे की या धाग्यावर राजकारण आणणं अयोग्य आहे, हे बघायला अ‍ॅडमिन समर्थ आहेत.

https://www.loksatta.com/sampadkiya/columns/ulta-chashma-the-hindu-fake-...
विश्वगुरूंनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला बळ मिळावे म्हणून केलेला ‘द हिंदू’चा प्रयोग सपशेल फसल्यामुळे पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या मुख्यालयात स्मशानशांतता पसरली होती. प्रमुखासह सारेच डोके गच्च धरून बसले होते. शिव्याशाप देणारे भक्तांचे संदेश वाचणे अशक्य झाल्याने सर्वांनी फोन बंद करून ठेवले होते. आता काय करायचे हे कुणालाच सुचेना! तंत्रज्ञानाच्या युगात बेमालूमपणे केलेली चोरीही पकडली जाऊ शकते याची जाणीव ‘पुन्हा एकदा’ सर्वांना झाली. तेवढ्यात एकाच्या संगणकावर मेल झळकला. यातही नक्कीच शिव्या असणार असे म्हणत त्याने वाचायला सुरुवात केली. जसजसा तो पुढे जाऊ लागला तसे त्याच्या चेहर्‍यावरचे रंग बदलू लागले.

बसल्याजागीच ओरडला, ‘या मेलमधला मजकूर सर्वांनी वाचायलाच हवा. थांबा, मी वाचतो तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐका’ असे म्हणत त्याने सुरुवात केली. ‘नमस्कार, मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता असून गेल्या ११ वर्षांपासून विविध समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या नावाने भक्त म्हणून सेवा देत आहे. इतरांपेक्षा माझे म्हणणे जरा वेगळे. काल ‘द हिंदू’च्या कथित पानावरून जे घडले त्यावर माझा काहीही आक्षेप नाही. गेल्या एक दशकात आपण अशा कितीतरी ‘फेकन्यूज’ पसरवल्या. अनेकदा त्यातून होणारा लाभही मिळवला तर कधी विरोधकांच्या शिव्याही खाल्ल्या. खोट्याला खरे करून सांगणे ही आपली पार्श्वभूमीच असल्याने या माध्यमी युद्धात त्याचा आपण खुबीने वापर केला यात शंका नाही. माझा आक्षेप आहे तो आपल्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाला वा घोषणेला बळ मिळावे म्हणून नेहरू, इंदिरा, मनमोहन सिंग यांच्या आधीच्या वक्तव्यांचा आधार घेण्यावर. या तिघांवर आपण आजवर सडकून टीका केली. प्रत्येक बाबतीत त्यांनाच दोषी ठरवले. त्यांचे जाणीवपूर्वक चारित्र्यहनन केले. उद्देश हाच की जनतेच्या मनातली त्यांची प्रतिमा मलीन व्हावी, किंबहुना पुसली जावी. मग आपल्या घोषणेसाठी त्यांचा आधार घ्यायचा तरी कशासाठी? यातून त्यांची प्रतिमा अप्रत्यक्षपणे उजळली जाते हे लक्षात येत नाही काय? ११ वर्षांत नेहरूंचे नाव आपण इतक्यांदा घेतले की ते हयात असतानाही एवढ्यांदा घेतले गेले नसेल असे विरोधक म्हणतात. त्याला अप्रत्यक्षपणे बळ देण्याचा हा प्रकार नाही का? सोने खरेदीच्या मुद्द्यावर आपण इंदिरांचे वक्तव्य समोर करताच त्यांनी चीन युद्धाच्यावेळी स्वत:चे सोने कसे दान केले याची छायाचित्रेच प्रसारित झाली. यातून त्यांची प्रतिमा पुन्हा उजळेल हे तुम्हाला कळत नाही का? एकीकडे त्यांच्या चुकांमुळे देश खड्ड्यात गेला असे सांगायचे व दुसरीकडे निर्णयाच्या बचावासाठी त्यांचाच आधार घ्यायचा हा विरोधाभास तुमच्या टीमच्या ध्यानात कधी येणार? सततच्या विजयामुळे आता आपले नेते म्हणतील तेच भरतवाक्य अशीच भूमिका असायला हवी. पूर्वसुरीच्या विरोधकांची गरज आपल्याला पडायलाच नको. तरीही आधार घ्यायचाच असेल तर चाणक्य, पुराणातले राज्यकर्ते यांचा घ्यावा. तसेही ते आपले आदर्श आहेतच शिवाय आधार घेताना काही चूक झाली तरी दंतकथा म्हणून ते खपवून नेता येते. यातून तोंडघशी पडण्याचा धोका टळतो. कृपया यावर तातडीने विचार करावा ही विनंती.’
ऐकल्यावर उपस्थित सार्‍यांच्याच मनाला थोडी उभारी आली, केवळ सेलप्रमुख सोडून. थोडा विचार केल्यावर त्यांनी आदेश दिला. ‘या पत्रलेखकाला भक्तांच्या यादीतून तातडीने काढून टाका. भक्ताने कधीही चिकित्सक वृत्ती जोपासता कामा नये या धोरणाच्या विरुद्ध याचे वर्तन आहे’ हे ऐकून सर्वांनी माना डोलावल्या.

म्हणे फॉरेन ट्रॅव्हल करू नका,.... कोण बोलतय बघा. स्वतःच्या पायाला कायम भिंगरी लागलेली असते वर्षानु वर्ष , ते पण विमानाने ज्यात जास्त इंधन जळतं.
हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!

भरत, तुम्ही म्हणता तस मोदींनी लाख चुका केल्या असं समजू. पणं त्यांनी अत्ता काटकसरीच आवाहन केलं आहे. त्याबद्दल तुम्हच मत कांय आहे?

>>> त्याबद्दल तुम्हच मत कांय आहे?

मुळात येथे चर्चा करून मोदींमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार नाही. आता अकरा, बारा वर्षे झाली. काय बदल केला मोदींनी स्वतःमध्ये? पण चर्चा इथेच करायची आणि वर्षानुवर्षे करायची. एखादे चांगले सरकार निवडून आणायला हवे, पण ते होत नाही.

सरकारने सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली. सरकार आता निर्यातीतून मिळणाऱ्या डॉलरवर पाणी सोडणार. मग लोकांनी पेट्रोल कमी का वापरावे? कशाशी कशाला ताळमेळ नाही.

मोदी प्रत्येक गोष्टीत चमकोगिरी करतात, आपला राजकीय फायदा बघतात हे काही आता लपले नाही.

पण त्याचवेळी भले मार्केटिंग करून का असेना त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे हे देखील मान्य करावे लागेल.

त्यामुळे एखादे आवाहन त्यांनी केले तर जास्तीत जास्त लोकांनी ते पाळायची शक्यता वाढते. याआधी देखील आपण हे पाहिले आहे.

आता लोकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला तर देशाचा थोडाफार का होईना फायदाच होईल. पण त्याचवेळी मोदी त्यातून आपला राजकीय लाभ सुद्धा करून घेतील. जे त्यांच्या विरोधकांना नको आहे.

या सगळ्यात एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी भूमिका काय असावी आणि मी माझ्यापरीने काय करू शकतो जे देशहिताचे ठरेल हा विचार मी आता करत आहे.

बाकी सरकार ज्या उपाययोजना करेल ते करेल. पण येत्या काळात लोकांचे मनोधैर्य टिकून राहणे फार गरजेचे आहे असे मला वाटते.

Pages