पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -
१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
२) सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.
३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.
४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.
५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.
६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.
७) परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.
मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यामुळे मोदींनी हे 'काटकसरीचे' आवाहन केले आहे _/\_

^^^^^^^^^
हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे?
पाळले जाईल का?
यात काय समस्या येतील?
तुम्ही यात सहकार्य कराल का?
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?
हे सरकारचे अपयश आहे का?
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे का?
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येईल का?
..
इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.
##########
प्रतिसादात लोकांनी आग्रह केल्यामुळे धागालेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.
हे सरकारचे अपयश आहे किंवा नाही यात न पडता आधी देशावर संकट आले आहे तर आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार डोक्यात पहिला आला.
१) बातमी कानावर येताच मी आज सुट्टी टाकली. पण गेलोच असतो ऑफिसला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते. माझ्याकडे गाडी नाही. मला चालवताच येत नाही.
२) सोन्याची खरेदी उभ्या आयुष्यात एकदाही केली नाही.
३) परदेश असो किंवा देश विदेश कुठल्याच प्रवासाची मुळातच आवड नाही.
४) मी शेतकरी नसल्याने शेतीचा मुद्दा माझ्यासाठी बाद.
५) WFH करायचे आदेश निघाले तर सर्वात जास्त आनंद मला होईल. बेडरूम मध्ये लोळत काम करायचे दिवस मिस करतोय.
मुलांच्या शाळा मात्र चालू राहाव्यात असे वाटते. मुलांचे कसले नुकसान नको. ते देशाचे भविष्य आहेत. तसेही आमची मुले तरी फक्त रॉड क्रॉस करून शाळेत जातात. इंधनाचा वापर शून्य असतो.
६) कुठल्याही भौतिक सुखाच्या वस्तूंची मला फार आवड नाही. त्यामुळे इम्पोर्टेड वस्तू फार विकत घेऊ नका हे पाळणे मला अवघड नाही.
७) खाद्यतेलाचा वापर कमी करणे मात्र तेवढे अवघड आहे. कारण माझ्या आवडीचे तेलकट चमचमीत पदार्थ मी रोज खातो.
धन्यवाद,
ऋन्मेष
नाही, मी जनरल माझे अनुभव
नाही, मी जनरल माझे अनुभव लिहीलेत. प्रत्येकाचा चष्मा वेगळा.
पेट्रोल बचत सुरू
पेट्रोल बचत सुरू
रिसोर्स टॅप केला पाहिजे, गाजर
रिसोर्स टॅप केला पाहिजे, गाजर दाखवलं पाहिजे याबद्दल अजिबात दुमत नाही. अमेरिकन एक हाती यव आणि त्यव आणि फॉरेन डेफिसिट पॉझिटिव्ह करतील बाकी ठिकाणी कटोरा घेऊन नको आमच्याकडे ऐरावत घेऊन या.... इतकं वाचून त्याच्याच अमेरिकेचे ट्रेड डेफिसिटचेच बारा वाजलेत म्हणून राजाने टेरीफ लावले ते बाराच्या भावात गेले त्याचे शेकडो ट्रिलियन परत करायची वेळ आली आहे हे आपलं उगाच आठवलं.
तर त्या अमेरिकेला त्या गर्तेतून बाहेर यायला हातभार लावा. मेक इट ग्रेट अगेन. त्यांची अमेरिका डुबली तर आमच्या भारतात २७% रेमिटन्स यायचा तो ही बंद व्हायचा. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहेत हे एन आर आय, असं पोट फाडून चालायचं नाही. आधी अमेरिकेला गाळातून बाहेर काढा मग आमच्या भारताला एकहाती हे करू ते करू वल्गना करा. थोडक्यात अंथरूण पाहून पाय पसरा! मोदीनी काही योजना आणली तर मॅड किंग चूड लावेल. त्यापेक्षा चाललंय ते बरं चाललंय!
>>असे आवाहन केल्याने काही
>>असे आवाहन केल्याने काही लक्षणिय फरक पडेल अशी पुसटशी आशा असती तरी तसे आवाहन केले गेले असते.<<
थोडि प्रतिक्षा करा. या महिन्या पर्यंत फॉरेक्स रिझर्व साधारण ५%ने कमी झालेलं आहे, विच इज नॉट कंस्ट्रुड अॅज क्राय्सेस. यामागचा मेन ड्रायवर ऑइल सप्प्लाय असल्याने सध्याच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाहि तर इंन्फ्लेशन, रुपयाचं अवमुल्यन टाळण्याकरता आर्बिआयला उपाययोजना कराविच लागेल; इट्स इनएविटेबल. बाय्दवे, धिस इज नॉट अबौट रिइंन्वेटिंग ए व्हिल. भारत सरकारने यापुर्विहि अशी स्टेप घेत्लेली आहे. लेटेस्ट उदाहरण म्हणजे रघुरामन राजन यांनी २०१३ मधे स्पेशल एफसिएनआर-बी स्किम आणली होती, विच वाज आउटलँडिशलि सक्सेस्फुल, ब्रिन्गिंग इन इन्फ्लो ऑफ अराउंड $३४ बिल्यन इन ए वेरि शॉर्ट पिरियड ऑफ टाइम..
सो इट डझ वर्क. काहि अपवाद वगळता भारतीय जात्याच फिस्कली एजुकेटेड असतात, मार्केट कंडिशन्स, एक्स्टर्नल फोर्सेस इ. चा विचार करता नो रिस्क, गॅरंटिड रिटर्न्स देणारे इंन्स्ट्रुमेंटस आर ऑल्वेज फेवर्ड बाय देम. इट्स ए नो ब्रेनर, अँड आर्बिआय इज वेल अवेर ऑफ दॅट...
माणूस स्वार्थी असतो (माणूसच
माणूस स्वार्थी असतो (माणूसच काय प्रत्येक प्राणी स्वार्थी असतो). हे नैसर्गिक आहे.
अमेरिकेत जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. आणि भारतात जे चांगलं आहे ते ही चांगलंच आहे.
कुणी अमेरिकेत गेला म्हणून स्वार्थी झाला आणि भारतात राहिला म्हणून निस्वार्थी आहे हे म्हणणं दांभिकपणा आहे. माझा मुलगा अमेरिकेत गेला कि अमेरिका चांगली असते आणि माझ्या मुलाला अमेरिकेत व्हिसा मिळाला नाही कि अमेरिका वाईट होते. चालायचंच.
जे लोक चांगल्या नोकरी /संधीसाठी अमेरिकेत गेले त्यात काहीही वावगं नाही असे मी समजतो. जर त्यांच्या शिक्षणावर झालेल्या खर्चाइतका पैसा त्यांनी परत पाठवला पाहिजे हे मान्य पण त्यांनी बाहेर जाणे हा देशद्रोह आहे हे म्हणणे चूक आहे.
कारण उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन त्यांना येथे कारकुनी करत राहायला लागलं तर हे आपल्या देशाचं करंटेपण आहे.
माझ्या मुलाला GRE आणि TOFEL मधेय अतिशय उच्च गुण मिळाले होते ज्यावर अमेरिकेतील सर्वात उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला असता. तेथला खर्चसुद्धा मला झेपेल इतके पैसे मला मिळतात.
त्याने तिथे जायचे नाही असे ठरवले. पण तो येथेच चांगली नोकरी करत राहिला म्हणून तो जास्त देशभक्त किंवा निस्वार्थी आहे असे मी समजत नाही.
उगाच अमेरिकेत गेलेल्या लोकांना दूषणे देण्यात काय हशील आहे?
त्यांनी तेथून पैसे भारतात पाठवले तरच ते चांगले नाही तर स्वार्थी हा दांभिकपणा आहे.
त्यांनी आपले पैसे भारतात गुंतवावे अशी स्थिती निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण असे करायचे नाही आणि त्यांना दूषणे देणे हे चूक आहे.
त्यांनी कष्टाने मिळवलेले पैसे त्यांनी जास्त नफ्यासाठी गुंतवले तर त्यात काय चूक आहे?
अर्धा टक्का जास्त मिळतो म्हणून सुरक्षित नसलेल्या पतपेढ्यात पैसे गुंतवून पैसे बुडाले असे वरिष्ठ नागरिक आपल्याकडे हि पैशाला पासरी मिळतील.
डराव डराव
डराव डराव
https://ofac.treasury.gov/recent-actions/20260518
Adani Enterprises Limited Settles with US Treasury Department's OFAC for $275,000,000 Related to Apparent Violations of Iran-related Sanctions
आणखी डॉलर चालले.
भारतात इंधनाचा आणि परकी चलनाचा तुटवडा केल्याबद्दल थँक्यू अमेरिका.
अमेरिकेचा विकास कसा झालाय,
अमेरिकेचा विकास कसा झालाय, Foundation Building मधे कोणकोणत्या गटांचे योगदान होते, भारतात तेव्हा काय परिस्थिती होती? दोन्ही देशांची तुलना आणि भारतात त्या वेळी विकास का शक्य नव्हता? यावर स्वतंत्र धागा काढा कुणी तरी. सबगोलंकारी नसावा. स्पष्ट मतं असावीत.
अमेरिकेने ज्या मार्गाने विकास केला तो मार्ग आदर्श आहे का? Foundation Building आणि Superpower या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. जपान जर्मनी हे superpower नाहीत पण विकसित देश आहेत. जर्मन तंत्रज्ञान हिटलरच्या काळात अमेरिकेला मिळाले त्याचा महासत्ता बनण्यात प्रमुख वाटा आहे. पण जर्मन शास्त्रज्ञांधा आकर्षित करण्यासाठी जे इन्फ्रा लागतं ते अमेरिकेने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उभारले होते.
एकदा या लेव्हल ला एखादा देश आला कि इतर क्षेत्रांची भरभराट होऊ लागते. त्यासाठी कमी पडणार मनुष्यबळ जगाने पुरवले.
या पार्श्वभूमीवर आपल्याच देशातून पळ काढून आपल्या देशातल्या अव्यवस्थेबद्दल हिणवणे, जाब विचारणे हा दुटप्पीपणा इतर कुठल्याही देशाचा नागरिक करत नसणार. आपल्या देशाची अव्यवस्था आपणच दूर करू शकतो. ते न करता हिणवणे झेपत नाही.
फक्त अशाच लोकांसाठी आहे हे.
अमेरिका ग्रेट कशी बनली तसे आपण बनण्यासाठी झटले तर होईल ते. अमेरिकेला तीन शतके लागली. आपण सत्तर वर्षे दम धरत नाही.
शिवाय गुलामगिरीची व्यवस्था आणून श्रीमंत बनणे मान्य नाही.
Adani Enterprises Limited
Adani Enterprises Limited Settles with US Treasury Department's OFAC for $275,000,000 Related to Apparent Violations of Iran-related Sanctions >> त्यानंतरच ' आम्ही रशिया कडून तेल घेऊ ' असे भारताने 'ठणकावून' सांगितले. आता ह्याच पद्धतीने नीरव मोदी आणि बाकीचे सगळे बगळे बनून परत आले तर नवल नाही
<फा यांचा सर्वोत्तम प्रतिसाद
<फा यांचा सर्वोत्तम प्रतिसाद आहे. प्रत्येक वाक्यावाक्याला - 'अगदी अगदी' झाले.>
फा यांनी या धाग्यावर पहिला प्रतिसाद दिला. तो धाग्याच्या घोषित विषयाबद्दल म्हणजे मोदींच्या आवाहनाबद्दल होता का? - नाही?
माझ्यासारख्या काही कूपमंडुक लोकांनी धागा राजकारणाकडे वळवला. अशी स्थिती आज का निर्माण झाली याची चर्चा केली. फा यांचा प्रतिसाद त्याबद्दल होता का? -नाही
मग कोणीतरी येऊन अमेरिकेतले भारतीय भारताची ही समस्या चुटकी सरशी सोडवू शकतील असं म्हटलं. फा यांचा प्रतिसाद त्याबद्दल होता का? - नाही.
यावर मी म्हटलं की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला की अनिवासी भारतीय खुष होतात हे खरं की खोटं?
उदय यांनी म्हटलं -अमेरिकन NRI हे स्वार्थी / व्यावहारी आहेत, जिथे फायदा असेल तिथेच आपली गुंतवणूक करतील. जर तशीच वेळ आली तर सर्वात आधी पैसे काढणारा NRI वर्ग असेल.
फांनी या दोन प्रतिसादांना उत्तर दिलं. तो या धाग्यावरचा सर्वोत्तम प्रतिसाद. हे म्हणजे पिच्चरमध्ये मॉब सीनमध्ये पाठमोर्या माणसाचा खांदा दिसला, त्याला बेस्ट अॅक्टर अवॉर्ड देण्यासारखं आहे.
आणि यातून अनिवासी / अमेरिकानिवासी भारतीयांची मानसिकता / विचारपद्धती दिसून आली. त्यात काही वावगं आहे असं मी म्हणत नाही.
पैशाचा प्रश्न येतो तिथे स्वार्थी / व्यवहारी असलंच पाहिजे. मोदींनी जसं भारतातल्या भारतीयांना खाद्यतेल कमी वापरण्यात देशभक्ती आहे, असं सांगितलं तसं काही नेदरलंडन्समधल्या भारतीयांना सांगितलेलं नाही. तुम्हांला चांगले रिटर्न्स मिळतील अशी मोदीची गॅरंटी दिली आहे. ते लोक या गॅरंटीवर विश्वास ठेवून भारतात गुंतवणूक करतात का ते कळेलच.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला की अनिवासी भारतीयांचा फायदा होतो, असंच भारतातल्या सोशल मिडियात बोललं जातं. आत्ता तर यावर मीम्स बनताहेत. इतकंच नाही, तर इकॉनॉमी करन्सी बद्दल जिथे लिहिलं छापलं जातं तिथेही आधी असंच म्हटलं आहे. पुढे मग त्यातले धोके सांगितले आहेत.
तर फांना सर्वोत्तम प्रतिसादाचा अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.
धाग्यातल्या मुख्य मुद्द्यांबद्दल त्यांनी काही मत मांडलेलं नाही, हेही त्यांचं एक मतच आहे, असं समजायला आवडेल. भूमिका = स्टँड न घेणं हीही एक भूमिकाच असते.
पण माझ्या मते सर्वोत्तम प्रतिसाद "भारतात तर सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कि भाजपा सत्तेत टिकला तर देश टिकेल." हा आहे.
फा.. फा.. फा..
फा.. फा.. फा..

जे इंस्टावर रीळ बघत असतील त्यांना ठाऊक असेल की अश्या आवाजाचा एक ट्रेंड आहे
आमच्या घरी सुद्धा मुले सतत फा.. फा.. फा.. करत असतात. मलाही सवय लागली आहे
बाई दवे,
मला वाटते फा चा प्रतिसाद या धाग्यावरील सर्वोत्तम असे म्हणायचे नसून त्या प्रश्नाला ते सर्वोत्तम उत्तर होते या आशयाने म्हटले असावे.
बाई दवे क्रमांक २…
धाग्यावर ज्याचा प्रतिसाद सर्वोत्तम असतो त्याला पुरस्कार मिळतो अश्या अफवा प्लीज कोणी पसरवू नका. मागे मी एकदा गमतीने म्हटलेले की १०० प्रतिसाद झाले की माझ्या अकाउंटला पैसे जमा होतात त्याचे परिणाम आजवर भोगत आहे.
भाजपचे कट्टर समर्थक आणि
भाजपचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसच्या धोरणांचे विरोधक , पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे माजी सदस्य , Executive Director for India at the International Monetary Fund सुरजीत भल्ला Surjit Bhalla also spoke about the negative investment environment in the country, saying not just foreigners, even Indians weren't investing in India
The investment climate in India is very bad, and that is what has gone wrong," said Bhalla.
Six months ago or so, I gave a talk, a keynote speech, as to why the Vikshit Bharat slogan should now be changed, just like I think the slogan that we are the fastest growing economy, major economy in the world, should be changed. We are not."
Bhalla said he believed the government was "in a great comfort zone" due to the electoral victories.
"So, I think what is happening is that the government is in a great comfort zone, because it's winning all the elections. So it doesn't see any urgency or need to do reforms, especially on the growth side,
मोदी निवडणुका जिंकतात , विरोधक जिंकत नाहीत, असं उत्तर माझ्यासारख्या बेडकाच्या तोंडावर फेकणार्यांसाठी
महागाई?https://www.youtube
महागाई?
https://www.youtube.com/watch?v=cA3SRccatBk
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DYhmrlYyjRc/
नवीन पार्टी. कॉक्रोच जनता पार्टी. जेन जी विरूद्ध बूमरच आता काहीतरी बदल घडवून आणू शकतात.
<< या महिन्या पर्यंत फॉरेक्स
<< या महिन्या पर्यंत फॉरेक्स रिझर्व साधारण ५%ने कमी झालेलं आहे, विच इज नॉट कंस्ट्रुड अॅज क्राय्सेस. >>
----- राज, या वरिल प्रतिसादाशी सहमत आहे. फॉरेक्स रिझर्व २० ते ३५ अब्ज डॉलर्स नी कमी झाल्याने मोठा फरक पडणार नाही. २०१३ मधे राजन यांच्या काळांत आणलेली FCNR योजना अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाली होती. पण राजन त्या योजनेचे क्रेडिट स्व त: ला देत नाहीत.
https://www.business-standard.com/article/finance/raising-fcnr-deposits-...
इराण मधे सुरु केलेले युद्ध किती काळ रेंगाळते यावर बरेच काही अवलंबून आहे. येणार्या कुठल्याही योजनेवर ट्रम्पसाहेबांची वक्रदृष्टिस पडायला नको. ३.५ % टॅक्स ( on inward remittances to india) लावला नसला तरी डोक्यात तसे विचार होते. खोडा घालायला अमेरिकेकडे जगाचे कार्डस आहेत.
<< मोदी निवडणुका जिंकतात ,
<< मोदी निवडणुका जिंकतात , विरोधक जिंकत नाहीत, >>
------ They were all TEAM efforts.
संघातील खेळाडू - ED, CBI, IT (आयकर विभाग), Election commission, State Governors, ( अंशकालिन - part time ) न्यायव्यावस्था, पक्ष यंत्रणा , पक्षाचीए आय टी सेल....
प्रत्येक निवडणूक लबाडी करुन पक्ष जिंकतो तेव्हा भारत हरतो.
भांडू नका. आपापसात भांडत
भांडू नका. आपापसात भांडत राहिलात तर अखंड भारत कसा बनणार.
अखंड भारत कसा बनणार. >> तो
अखंड भारत कसा बनणार. >> तो कधीच नव्हता !
(No subject)
द कपिल शर्मा शो गाशा गुंडाळणार.

कोण म्हणतय अखंड भारत कधी
कोण म्हणतय अखंड भारत कधी बनणार कोण म्हणतय अखंड भारत कधीच नव्हता ...... या विधानांना पुष्टी देणारे काही आहे का?
उगाचच म्हणु नका, खरे व्हायचे.
इथे पनवेलवरून कोकणात जाणाऱ्या
इथे पनवेलवरून कोकणात जाणाऱ्या स्पेशल ट्रेन सोडल्या तरी लोकं बोंब मारतायत उत्तरेच्या ट्रेन CST, LTT वरून सोडता आणि आम्हा कोकणवासीयांना पनवेलला तंगडतोड करायला लावता. कशाला हवा मग अखंड भारत?
डराव डराव
डराव डराव
India loses all spots in world’s top 100 companies as equity crash bites
हे म्हत्वाचं न्हाई. अखंड भारत व्हता की न्हाई, व्हईल की न्हाई हे म्हत्वाचं हाये. अम्रिकन लोकांसाठी.
मोदीजींच्या अधिकृत पेजवरून
मोदीजींच्या अधिकृत पेजवरून परदेशी न जाण्याच्या आवाहनाचा घेतलेला हा आंतरराष्ट्रीय आढावा.
https://www.facebook.com/narendramodi/posts/pfbid028p7p3Aq9iJme7fCbPQPUw...
मेलोनी यांना गुजराती येतं का?
मेलोनी यांना गुजराती येतं का?
तुम्ही सगळे दुःखी आहात कारण
तुम्ही सगळे दुःखी आहात कारण तुमच्या हृदयात खोल कुठेतरी अखंड भरताचं स्वप्न दडलेलं आहे.
माजं चुकलं आमाके खोमा कोरो
माजं चुकलं
आमाके खोमा कोरो
कुणीतरी मोदीजींच्या पी आर टीम
कुणीतरी मोदीजींच्या पी आर टीम ला सांगा प्लीज की जगभर सर्व देशात जाऊन तिथल्या एन आर आय महिलांकडून आरती करून घेणे आता फार cringe आणी कंटाळवाणे होत आहे. काही लो बजेट सिनेमात एका सीन मध्ये गुंडांच्या टोळीचा सभासद म्हणून मारामारी करणारा नंतर काही सीन मध्ये पोलिस कॉंस्टेबल बनतो तसे एकाच महिलेने दोन वेगवेगळ्या देशात मोदीजींचे गुणगान केले ! निदान ज्युनिअर आर्टिस्ट तरी बदला रे ! इथेही काटकसर ?
होम फ्रॉम वर्क इज व्हेरी
होम फ्रॉम वर्क इज व्हेरी इंपोर्टंट.
डराव डराव
डराव डराव
हे
आपलेआमचे वाणिज्य मंत्री. हुशार लोकांपैकी एकएके काळी मोदी भक्त असलेले आता
एके काळी मोदी भक्त असलेले आता प्रश्न विचारू लागले आहेत. हा पॉडकास्ट नाही पाहिला तर नक्कीच बरंच काही मिस केलंत.
https://www.youtube.com/watch?v=qc0s9xEgQy8
जी हां करून युपीएससीच्या विद्यार्थ्यांचं समाधान करता येत नाही हे यांना मागेच समजलं आहे. असे आणखीही काही अशा पद्धतीने मोदींच्या धोरणांवर अभ्यासू टीका करताना दिसत आहेत. असे का होत असेल? हा पॉडकास्ट त्यातल्या कंटेट साठी शेअर नाही केलेला. मतपरिवर्तन पहायचेच असेल तर शोधाशोध करून देता येईल.
Meloni + Modi = MeloDi
Meloni + Modi = MeloDi
Pages