पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचे भारतीयांना आवाहन!

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2026 - 00:54

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.

मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -

१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.

२) सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.

३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.

४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.

५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.

६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.

७) परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.

मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यामुळे मोदींनी हे 'काटकसरीचे' आवाहन केले आहे _/\_

IMG_20260513_100724.jpg

^^^^^^^^^

हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे?
पाळले जाईल का?
यात काय समस्या येतील?
तुम्ही यात सहकार्य कराल का?
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?
हे सरकारचे अपयश आहे का?
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे का?
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येईल का?
..
इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.

##########

प्रतिसादात लोकांनी आग्रह केल्यामुळे धागालेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.

हे सरकारचे अपयश आहे किंवा नाही यात न पडता आधी देशावर संकट आले आहे तर आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार डोक्यात पहिला आला.

१) बातमी कानावर येताच मी आज सुट्टी टाकली. पण गेलोच असतो ऑफिसला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते. माझ्याकडे गाडी नाही. मला चालवताच येत नाही.

२) सोन्याची खरेदी उभ्या आयुष्यात एकदाही केली नाही.

३) परदेश असो किंवा देश विदेश कुठल्याच प्रवासाची मुळातच आवड नाही.

४) मी शेतकरी नसल्याने शेतीचा मुद्दा माझ्यासाठी बाद.

५) WFH करायचे आदेश निघाले तर सर्वात जास्त आनंद मला होईल. बेडरूम मध्ये लोळत काम करायचे दिवस मिस करतोय.

मुलांच्या शाळा मात्र चालू राहाव्यात असे वाटते. मुलांचे कसले नुकसान नको. ते देशाचे भविष्य आहेत. तसेही आमची मुले तरी फक्त रॉड क्रॉस करून शाळेत जातात. इंधनाचा वापर शून्य असतो.

६) कुठल्याही भौतिक सुखाच्या वस्तूंची मला फार आवड नाही. त्यामुळे इम्पोर्टेड वस्तू फार विकत घेऊ नका हे पाळणे मला अवघड नाही.

७) खाद्यतेलाचा वापर कमी करणे मात्र तेवढे अवघड आहे. कारण माझ्या आवडीचे तेलकट चमचमीत पदार्थ मी रोज खातो.

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते की आपली उत्तमोत्तम धोरणे अंमलात यावीत यासाठी सर्वात सोपा उपाय जनतेतून निवडून येणे हा आहे.

इथे वर्षानुवर्षे चर्चा करून दोन्हीकडच्यांपैकी कोणाचेच मतपरिवर्तन झाल्याचे दिसलेले नाही. या संकेतस्थळावरील मते किती मतदार व राजकीय नेते वाचत असतील याची काही कल्पना नाही.

देशात सत्तापालट घडवून आणण्यासाठी नेमके कोणत्या प्लॅटफॉर्मवर लिहावे हे आता विरोधकांना बघावे लागेल बहुधा.

नाबाद ९९ असलेल्या राहुलजी गांधी यांच्या अपेक्षा त्यांच्या कोटी कोटी अनुयायांपैकी काही अनुयायी फक्त येथेच लिहून व बाकी काही न करून फोल ठरवत आहेत.

तमिळनाडू व केरळम येथे balet पेपर वर निवडणुका घेतल्या तश्या इतरत्रही घ्यायला हव्या होत्या.

नाबाद ९९ यांनी आज देशाच्या थोर संस्कृतीनुसार 'अरे तुरे' केले. शतकाच्या दिशेने दमदार वाटचाल!

म्हणजे भारतीय जनता पक्ष जोवर निवडून येत नव्हता तोपर्यंत त्यांनी कोणतेही मत मांडले नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मौनव्रत घेऊन वावरत होता का? तसं असेल तर निवडून आल्याशिवाय बोलू नये असे म्हणाय;आ नैतिक पाठबळ आहे असे वाटेल.

नाबाद ९९ यांनी आज देशाच्या थोर संस्कृतीनुसार 'अरे तुरे' केले.>>>
देशाची थोर संस्कृती तर भाजपेयी नेते, मुख्यमंत्री यांनी अती उच्च पातळीवर नेली आहे, "उनकी माँ का भो x डा" अशी गाणी रामनवमीच्या उत्सवात वाजवून. हे उत्तरप्रदेशात होत, हे महाराष्ट्रातही होत.
ही गाणी ऐकून रामालाही वाटलं असेल की वानरसेने ऐवजी दोन चार भाजपेयी घेऊन जायला हवे होते.
हीच संस्कृती भाजप च्या समर्थकांना भारतात रुजवायची आहे.

नाबाद ९९

राहुल गांधी यांच्यासाठी गर्भित इशाराच आहे?

स्क्रिन शॉट चा उपयोग नाही. पण घ्या.

इथल्या चर्चेला वैयक्तिक चिखलफेकीचा रंग सुरु झाला आहे त्यामुळे असे प्रतिसाद आणि त्यावरचे प्रतिसाद अप्रकाशीत केले आहेत.
दुसर्‍या धाग्यांवरची भडास किंवा जुने मतभेद इथे काढून आपण काय मिळवणार आहोत? विषयाला धरून बोला . प्रतिसाद देणारा कोण कसा आहे याबद्दल नको.

मोदींना ठरवून महागाई आणावी लागणार? | Dr. Manasi Phadke | Indian Economy | Think Bank
ही मुलाखत ऐकतोय. राजकारण वगळून फक्त आर्थिक मुद्द्यांवर चर्चा आहे. मानसी फडके चांगलं बोलल्या आहेत.

आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये सुरजीत भल्ला यांचा लेख आहे. युपीए सरकारच्या काळापासून त्यांचे लेख या पेपरात येत. तेव्हा कायम युपीए वर टीका असे. मोदी सरकार आल्यावर कायम त्यांची भलामण असे. ते मोदींच्या आर्थिक सल्लागार मंडळातही होते. आताही एका कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पहिल्यांदाच मोदी सरकारवर टीका केलेली मी पाहतो आहे.

लेखाचं शीर्षक https://indianexpress.com/article/opinion/columns/the-bjp-is-winning-ele...
BJP is winning elections but losing the economy भाजप निवडणुका जिंकतो आहे, पण अर्थव्यवस्था बुडवतो आहे
लेखातले मुद्दे
प.बंगाल मध्ये भाजपला मिळालेला विजय हे त्यांच्या राजकीय कामगिरीतले एक शिखर. यापेक्षा उंच शिखर २०२९ च्या निवडणुकांत खणखणीत विजय मिळवणे हेच असू शकते. त्याच वेळी भाजप भारताच्या अर्थव्यवस्थेला गर्तेत घेऊन जात आहे आणि यापेक्षा अधिक खोल नेणार नाही याची खात्री नाही.
हे दोन्ही योगायोग आहेत की एकाच वेळी ठरलेल्या गोष्टी आहेत? त्यांच्या मते एकाच वेळी ठरलेले आहे.
अर्थव्यवस्था गर्तेत जाण्याची चार कारणं १ सरकार. त्यांना समस्या कळते. पण ते त्या समस्यांसाठी इतरांना जबाबदार धरतात.
कोणाला तर २ मोठ्या उद्योगांना.
३. काँग्रेस गांधी घराण्याला चिकटून असल्याने भारत एकपक्षीय लोकशाही येऊ घातली आहे.
४. हे तिघेही कोणा च्या हातची बाहुली आहेत - deep state

आता ते भाजप फेकत असलेल्या काही मुद्द्यांचा समाचार घेतात
मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा वृद्धीदर सर्वाधिक आहे fastest growing major economy. यात मोठी हा शब्द चलाखीने वापरला आहे.
भाजपच्या २०१४ पासून च्या शासनात भारताचा वृद्धीदरा वर आधारित क्रमांक नववा आहे. दरडोई उत्पन्नातील वाढीच्या बाबत आठवा आहे. पण हे डॉलरमध्ये मोजलं तर सोळावा आहे. इथे बांग्लादेश ८.३% पहिल्या क्रमांकावर , इथिओपिया ७.२% दुसर्‍या स्थानी आणि भारताचा वृद्धीदर ४.७%.
२०१४ मध्ये भारत सर्वाधिक तकलादू ५ अर्थव्यवस्थांमध्ये एक होता. सध्या अशा तकलादू अर्थव्यवस्था दोनच आहेत. भारत आणि तुर्किए. fragile two
रुपयाची किंमत सलग सात वर्षे घसरते आहे आणि आशियाई देशांत २०२५ साली रुपयाची घसरण सर्वाधिक होती.
आणि हे सगळं भाववाढ नियंत्रणात असताना, वृद्धीदर स्थिर असताना, चालू खात्यातील घट आवाक्यात असताना आणि राज कीय स्थैर्य असताना.
भारतीयांनी आणि परदेशी लोकांनी भारतात गुंतवणूक करावी यासाठी शल्य क्रिया करायची गरज असताना सरकार केवळ मलमपट्टी करते आहे. भारतात गुंतवणूक करा असं आवाहन करणं हा असाच एक उपाय. नैतिक किंवा देशहिताचा विचार करून कोणी गुंतवणूक करणार नाही. त्यासाठी तसंच आर्थिक प्रलोभन incentive हवं ( चांगला परतावा?) सध्या गुंतवणुकीसाठी प्रलोभन हे भारतातून बाहेर पडावं किंवा भारतात येऊ नये यासाठी आहे.
सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, निर्यातीत वाढ आणि उत्पादन क्षेत्रात वाढ हे तिन्ही प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीशी FDI जोडलेले असतात.
२०१५ पासून भारताने आम्ही सांगू त्या अटी आणि शर्तींवर विदेशी गुंतवणूक असा पवित्रा घेतला. द्विक्षीय गुंतवणूक करारानुसार विदेशी गुंतवणूकदाराला आपण सहभागी असलेल्या उद्योगातून बाहेर पडण्यासाठी लवादाकडे जाण्या आधी किमान पाच वर्षे थांबावे लागेल आणि हा लवाद भारतीयच असेल. आंतरराष्ट्रीय लवादाकडे जाण्याआधी भारतातले सगळे उपाय करून पाहावे लागतील.
निवडणुकींतील देदीप्यमान यशामुळे आपली सगळी धोरणे योग्यच आहेत, असा समज होऊ शकतो.
Elections can deliver power. Only policy can deliver prosperity.

लेखातल्या सगळ्याच मुद्द्यांशी मी सहमत आहे असे नाही. पण जे सतत निवडणुकीतल्या यशा चं तुणतुणं वाजवत असतात, त्यांनी या भाजप समर्थक अर्थशास्त्रज्ञाच्या म्हणण्याचा विचार करावा.

भाजप समर्थकांकडे निवडणुकीतील यशापलीकडे बोलण्यासारखं काही नसतं. भाजप सरकारांच्या कारभारावर बोलायची वेळ आली की दातखीळ बसते. मग गांधीनेहरू घराणे आणि गाडलेले मुडदे उकरणं ही नेहमीची पानं टाकली जातात.

भल्ला यांनी लेखात मोदींचं नाव एकदाच घेतलं आहे, तेही २०२९ च्या निवडणुकांच्या संदर्भात. निर्मला सीतारमन यांचं नाव एकदा घेतलं आहे.

लोकसत्तेचा आजचा अग्रलेखही यावरच आहे.

युद्धाने केली सुटका
ज्याप्रमाणे भारताच्या २०१६ पासून सुरू झालेल्या अर्थघसरणीस ‘करोना’ने बहाणा दिला त्याचप्रमाणे आधीच मंदावलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेची गती विद्यमान इराणयुद्ध अधिक मंद करत आहे असे म्हटल्यास ते अजिबात वावगे ठरणारे नाही.
मेक इन इंडिया’च्या एका तपानंतरही आपली निर्यात वाढत नसेल, परिणामी रुपयाही लंगडत असेल तर त्याचे खापर केवळ लोकांच्या सोने- इंधन तेल वापरावर कसे फोडणार?

ठळक मुद्दे - रुपयाच्या घसरणुकीचे कारण - विदेशी गुंतवणुकीने काढता पाय घेणे
मोदींचे जवळचे मित्र ट्रंप यांनी लावलेला टॅरिफ आणि नरसंहारी नेतान्याहूंनी सुरू केलेले युद्ध यामुळे रुपयाच्या घसरणीचा वेग वाढला.
चल नावर विश्वास राहत नाही, तेव्हा सोन्यातली गुंतवणूक वाढते.

त्याचे उत्तर डॉलर कमाईसाठी सरकारने स्वत: काय काय उपाय योजले याच्या तपशिलात आहे. पण ते दिले जाणार नाही कारण तेथे दाखवण्यासारखे भरीव फारसे काही नाही. तसे ते असते तर जगातील चौथ्या (आणि आता सहाव्या) इत्यादी अर्थव्यवस्थेवर भलत्याच्याच युद्धांमुळे असे फाफलण्याची वेळ अवघ्या दोन-अडीच महिन्यांत येती ना. ‘मेक इन इंडिया’ आदी चकचकीत कार्यक्रमाच्या एका तपानंतरही आपली निर्यात वाढत नसेल आणि परिणामी रुपयाही लंगडत असेल तर त्याचे खापर लोकांच्या सोने-इंधन तेल वापरावर फोडता येणार नाही. युद्ध झाले नसते तरी कमीअधिक प्रमाणात आपणास या आर्थिक वास्तवाचे चटके बसलेच असते हे त्रिवार सत्य. काही नाही तर अमेरिकेबरोबरचा लटकलेला व्यापार करार हा मुद्दा होता. आणि अजूनही आहे. खरी कारणे सांगण्यापासून सरकारची ‘युद्धाने केली सुटका’ हे जरी खरे असले तरी ‘‘अर्था’ने छळले होते’ हे वास्तव बदलणारे नाही.

माझ्या हाउसहेल्पचा सिलिंडर संपलाय. दहा बारा दिवस झाले. त्याला नवा सिलिंडर मिळेपर्यंत बाहेर जेवायला खायला लागतंय. कमर्शियल सिलिंडरचे रेट वाढल्याने तिथेही दर वाढलेत. तो एकटाच आहे , त्यामुळे त्याची समस्या मॅनेजेबल आहे. कुटुंब असतं तर अशा लोकांसारखं त्याला आपल्या मूळ गावी, जिथे त्यांचं विस्तारित कुटुंब असतं, तिथे जावं लागलं असतं.

अशा लोकांसाठी मोदींनी काय संदेश दिला आहे?

मानसी फडके यांचं बोलणं ऐकतोय. दीड तासाचं असलं तरी कंटाळवाणं अजिबात नाही. ऐकता ऐकता जे मुद्दे सुचताहेत ते लिहून टाकतो.

इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्सची आयात चीनमधून होत असणार. चीनने डंपिंग करून इतर देशांतली ही इंडस्ट्री मारून टाकली आहे ; कोरियन कंपन्या सुद्धा चीनी कंपोनंट्स वापरतात, असं ऐकून आहे.

दुसरं खाद्यतेलाचा वाढलेला वापर - हा वापर घरगुती नसून आपण जे स्नॅक्स विकत घेतो त्यात होत असणार. विकत घेतलेले सगळे पदार्थ पाम ऑइलमध्ये तळलेले असतात. हे आयात असतं. हल्ली मी विकतच्या स्नॅक्सचे घटक बघतो. एकटे चितळे पाम ऑइल वापरत नाहीत.

सोने विकत घेणार्‍यांत गोल्ड ईटीएफ त्यांनी सांगितलं नाही. पुढे सांगितलं. अर्थात हे अप्रत्यक्षपणे हाउसहोल्ड , एच एन आय विकत घेतात.

त्यांनी सोव्हेरिन गोल्ड बाँड बद्दल काही सांगितलं नाही. These bonds are not backed by physical gold. आणि हे बाँड्स मॅच्युअर होऊ लागलेत. त्याचे पैसे आताच्या सोन्याच्या भावाने द्यायचे आहेत. हा ऑइल बाँडपेक्षा कित्येक पट मोठा बाँब आहे.

सरकारनेही गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम आणली होती https://dea.gov.in/gms

त्यांनी सोन्यातल्या भावनिक गुंतवणुकीबद्दल सांगितलं. मोदींनी काँग्रेस तुमचं मंगळसूत्र हिरावेल असं म्हणताना हाच अँगल वापरला होता. आता त्याच तोंडाने मोदी सोनं खरेदी करू नका असं सांगत आहेत. भारतीयांची मानसिकता अशी चटकन कशी बदलेल?

माझं आतापर्यंतच झालेलं मत - खराच क्रायसिस आहे तर फक्त individual consumers ना सांगून किती फरक पडणार? गुंतवणूक आणि इंडस्ट्री बाबत ते काय करणार आहेत? त्यांच्याशी बोलताहेत का? म्हणून अजूनही मोदी इव्हेंट मोडमध्येच आहेत. हा खरा क्रायसिस आहे.

परदेश प्रवास - यातला सगळा प्रवास मौजेसाठीच असेल असं नाही. दुसरीकडे आपल्याकडे येणार्‍या फॉरेन टुरिस्ट्सचं काय? शेवटचे आकडे २०२४ चे आहेत. तो आकडा २०१९ च्या आकड्यापेक्षा कमी आहे. म्हणजे करोनाचा फटका इथे जो बसलाय त्यातून आपण अजूनही बाहेर पडलो नाही आहोत.
गोव्यातल्या परदेशी पर्यटकांचं प्रमाण कमी झालं अशी आकडेवारी पाहिल्याचं आठवतं.

इंधनाचे दर- मनमोहन सिंग यांच्या काळातही क्रूडचे चढे दर, जियो पोलिटिकल क्रायसिस अशा गोष्टींमुळे इंधन दर वाढले. त्याची पूर्ण झळ ग्राहकांना बसू नये म्हणून त्यांनी ऑइल बाँड्स आणले. त्यावेळी भाजपने इंधनाच्या वाढत्या दरांविरोधात निदर्शने केली होती. स्मृती इराणी सिलिंडर घेऊन बसल्या होत्या. आता तीच सिच्युएशन त्यांना चावायला आली आहे.

त्यांनी अंतिम उपभो क्त्यासाठी इंधनाचे दर वाढवणं चांगलं आहे, असं म्हटलं. पण मालवाहतुकीसाठी इंधन वापरलं जातं. इंधनाचे दर वाढले की सगळ्या वस्तूंचे भाव वाढतील. दुधाचे भाव वाढू लागले आहेत.

माझ्या डोक्यात आलेला आणखी एक मुद्दा - गेल्या काही वर्षांत HNIs भारत सोडून जात आहेत. टक्केवारीचा विचार केला तर कमी असेल. पण तरीही ते आपले असेट्स परदेशात हलवतील. त्याचाही परकीय चलनाच्या गंगाजळीवर आणि एक्स्चेंज रेट्स वर परिणाम होईलच.

FPI जाण्याबद्दल हे वाचलं होतं Foreign Portfolio Investors (FPIs) are pulling billions from India to reallocate capital into semiconductor and chip-heavy Asian economies (like Taiwan and South Korea) that power the global Artificial Intelligence (AI) infrastructure. This structural flow rotation is primarily driven by India's lack of an investable AI ecosystem and a perceived reliance on tech services rather than AI infrastructure.
यातही मोदींनी एक इव्हेंट केला. बिल गेट्सशी बोलताना नवजात बालक आई म्हणतं असं काहीतरी सांगितलं. यासंबंधी त्यांच्या सवयीप्रमाणे काहीतरी अ‍ॅक्रोनिम्स तयार केली. पण ग्राउंड लेव्हलला काय केलं?

त्यांनी सोव्हेरिन गोल्ड बाँड बद्दल काही सांगितलं नाही. These bonds are not backed by physical gold. आणि हे बाँड्स मॅच्युअर होऊ लागलेत. त्याचे पैसे आताच्या सोन्याच्या भावाने द्यायचे आहेत. हा ऑइल बाँडपेक्षा कित्येक पट मोठा बाँब आहे. >> वॉव!!! पायाखालची जमिन सरकेल इतकं मोठं नाही का हे!!!? हे गोल्ड बॅक्ड नाहीत?? हे कसं काय चालून गेलं? कोण आणि कुठुन हे पैसे आणणार आहेत?

आत्ता वाड्यात लिहिलेल्या पोस्ट इथे पेस्ट करतो.

एक जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या रेमिटन्स बद्दल एक अक्षर काढत नाहीत. मध्यंतरी आकडे शोधत होतो तेव्हा रेमिटन्स चा बऱ्यापैकी टक्का आहे असा माझा समज झालेला. परत आकडे तपासले पाहिजेत. एफ डी आय आऊट फ्लो का होतोय? आणि पूर्वी का होत नव्हता ते ही स्पेल आऊट झालं नाही असं आता वाटतंय...
----
भारताचा रेमिटन्स जगात सगळ्यात जास्त आहे, आणि २ आणि ३ टक्के खाद्यतेले आणि खतांवर त्या बोलल्या आणि रेमिटन्स कसा राहिला असं वाटलं.
FDI आणि FPI हे कॅपिटल्स अकाउंट्सवरचे मोठे मेंबर, तो अकाऊंट कायम सरप्लस मध्ये असतो आणि एकुन डेफिसिट पॉझिटिव्ह करतो, त्यात गेल्या वर्षी ५ आणि आता २५ .. इतकी प्रचंड चढती भाजणी इअर ओव्हर इअर गळती आहे आणि ते चिंताजनक आहे म्हणाल्या. पोर्टफोलिओ इनव्हेस्टमेंट व्होलेटाईल असते म्हणाल्या. असं सगळं सांगताना कनव्होल्युटेड FDI ही बाहेर जाते आहे असं मी ताडलं. पण ती का? गुंतवणीयोग्य वातावरण का वाटत नाही, जीडीपीच्या आकड्यांचे काही परिणाम इ. वर मला ऐकायला आवडलं असतं.
---
मला सगळ्यात जास्त वाईट कशाचं वाटतंय ते भारताने एआयची पण बस मिस केली त्याचे. त्याचे प्रचंड परिणाम दिसणार आहेत. सेमिकंडक्टर बस चुकलीच होती तशी आता ही पण गेलेली आहे. आपल्याकडे रिसोर्सेस नाहीतच पण इनोव्हेशनही होतच नाही Sad
---
ताकः आता आठवलं तर त्या एकदोन वाक्य बोलल्या पण कदाचित एलॅबोरेट झालं नाही. आपण फार पारंपारिक उद्योगात अडकलेलो आहोत. स्टॉक मार्केट मध्ये फक्त पारंपारिक कंपन्याच आहेत. एआय, चिप ज्यात एक्स्पोनेंशिअल ग्रोथ गेल्या सहा महिने ते वर्षांत झाली आहे असे स्टॉकच नसतील तर लोक का पैसे ठेवतील असं माझ्यामते कारण असावं.
फक्त एआय कंपन्या नाही त्याला अनेबलर्स सगळ्याच कंपन्यांचे स्टॉक अतीप्रचंड वाढले आहेत. एक उदाहरण म्हणून सॅनडिस्क गेल्या वर्षी ३०-४० ला होता तो आज १५०० ला आहे. मेमरी इज गोल्ड!

अवांतर , डॉ फडकेंचा लुक आणि बोलणं जितकं प्रसन्न आणि एनर्जेटिक होतं, त्याच्या अगदी उलट विनायक पाचलग. ते फार बोलले नाहीत, हे बरं झालं.

अवांतर, मला तो आवडतो. त्याचा डिमिनर, प्रश्नांचा रोख, एक न्युट्रल प्रसन्नपणा, जाणून घेण्याची, समजुन घेण्याची भाषा आवडते. त्याचे सगळेच पॉडकास्ट आवडलेले आहेत. पण त्याने जरा दाढीकरुन जरा बरे कपडे घालून आलं पाहिजे असं उगाच वाटलेलं आहे. अर्थात माझी काही हरकत नाही, कंटेट उत्तम आहे तोवर मी बघेनच.

US Ambassador to India, Sergio Gor says, "... Investment flows are reaching new heights. Indian companies continue to expand in the United States, particularly in pharmaceuticals, manufacturing, and technology, while US firms are increasing their footprint in India’s fast‑growing market. I was thrilled to see Indian companies committing more than $20 billion in investments in the United States at the annual Select Investment Summit. Not only is $20 billion a significant figure, but all embassies compete to bring investment into the US — and we were proud that our embassy, working with partners in India, ranked first in the world, an incredible achievement."

परभणी मधे डिझेल हवे असेल तर 7/12 दाखवावा लागतोय. बाकी राज्यात शेतकरी रात्रभर जागून पेट्रोल पंपावर रांगा लावून उभे आहेत. आणि मुख्यमंत्री संगत फिरतात की काही घाबरू नका , मुबलक पेट्रोल -डिझेल आहे. नवनाथ बनने ' कॉँग्रेसचे नेते साठेबाजी करून ठेवत आहेत' असा हास्यास्पद आरोप केलाय .

चला , मेलोडी खाऊया आणि मोदी गुण गाऊया

इटलीने इस्रायलला मिलिटरी ग्रेड स्टील घेऊन जाणाऱ्या चार जहाजांना ताब्यात घेतले आहे. यातली तीन भारतीय आहेत. ती सोडविण्यासाठी अमेरिकेने भारताला मध्यस्थी करायला सांगितले अस वृत्त आहे.

सामो - प्रतिसाद आवडल्याचे लिहील्याबद्दल आभार Happy

सामोंनी सर्वोत्तम प्रतिसाद म्हंटले याचा अर्थ त्त्यांना तो प्रतिसाद आवडला व त्यांच्या मतांशी मॅच झाला, इतकेच आहे (आणि त्याचा मला आनंद आहेच). बाकी माबोवर काय धाग्यांवरील प्रतिसादांचे वस्तुनिष्ठ रेटिंग वगैरे नसते.

मूळ धाग्यावर मत लिहीलेले नाही कारण त्यावर लिहीण्यासारखे काही सुचले नाही. लिहीले नाही म्हणजे काही भूमिका नाही असे थोडेच आहे? या लॉजिक ने ऋन्मेषने हा धागा काढायच्या आधी ज्यांनी इथे लिहीले नाही त्यांच्याबद्दलही तेच म्हणता येईल. असे प्रत्येक धागे म्हणजे जकात नाके किंवा टोल बूथ थोडीच आहेत की जेथे काहीतरी केल्याशिवाय पुढे जाता येत नाही? जनरली बहुतेक धागे वाचले जातातच आणि प्रतिसादांत काही खटकले तर आधी त्यावर लिहीले जाते. कारण हे चर्चांचे धागे आहेत. जेथे क्रिएटिव्ह धागा आहे तेथे मूळ लेखाचा अनुल्लेख करून थेट प्रतिसादांवर मी कधीच लिहीत नाही.

आता झुरळ पार्टीबद्दल काही लिहेलेले नाही कारण काही माहितीच नाही हे आधीच सांगून ठेवतो. एक बातमी आणि पन्नास मीमच पाहिल्या आहेत.

गेले ३-४ दिवस माबोवर नव्हतो. त्यामुळे आज वाचल्यावर याबद्दल लिहीले.

आतापर्यंत फा यांनी जे काही प्रतिसाद दिले ते मला आवडलेच पण हा मला सर्वाधिक आवडला कारण मला कंप्लीटली आयडेंटिफाय करता आले. आपल्याला डॉलर मिळावे म्हणुन आपल्या जवळच्या व्यक्तीचे अहीत चिंतणे ही चिंधीगिरी मी करत नाही. आणि हेच फा यांनी लिहीलेले आहे. बाकी भरत, गेट वेल सुन.

>>>>>दुसरे म्हणजे आपल्याला दहा रूपये जास्त मिळावेत याकरता जेथे आपले जवळचे लोक राहतात तेथील व्यवस्था डबघाईला यावी असे कोणाच्या डोक्यात नसते.
हे वाक्य इतके मुद्देसूद आणि ऑब्जेक्टिव्ह मला सुचले नसते. मी माझीच माहीती देत बसले असते की माझे अमके टमके भारतात आहेत म्हणुन मी भारताचे अपयश चिंतीत नाही वगैरे. आणि मग सगळा पंचच गेला असता त्या वाक्यातला.

>>>>जरी काहीच नुरले आव तरीही देशप्रेमाचा
व्हिजा घेऊन पळण्याचेच मांडे रांधतो आम्ही

हे असे मांडुन परवापासून तुम्हीच निवासी-अनिवासी भारतिय या वादाला खतपाणी घालताय. दुफळी माजवुन तुम्हाला काय मिळतं ते तुम्हीच जाणो.
मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही पण माझ्या वाक्याचं शेपूट पकडुन तुम्ही फांना उगाचच वादात खेचताय म्हणुन नाईलाजाने परत चिंतते - गेट वे-ल सुन!!

सामो, तुम्ही लिहिले होते -फा यांचा सर्वोत्तम प्रतिसाद आहे. प्रत्येक वाक्यावाक्याला - 'अगदी अगदी' झाले.

याचा अर्थ मी या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांतील सर्वोत्तम असा लावला. फाच्या मायबोलीवरच्या सगळ्या प्रतिसादांतला सर्वोत्तम असा अर्थ असेल असे वाटले नव्हते. माझा गैरसमज झाला. त्याबद्दल क्षमस्व.

Pages