पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -
१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
२) सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.
३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.
४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.
५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.
६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.
७) परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.
मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यामुळे मोदींनी हे 'काटकसरीचे' आवाहन केले आहे _/\_

^^^^^^^^^
हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे?
पाळले जाईल का?
यात काय समस्या येतील?
तुम्ही यात सहकार्य कराल का?
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?
हे सरकारचे अपयश आहे का?
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे का?
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येईल का?
..
इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.
##########
प्रतिसादात लोकांनी आग्रह केल्यामुळे धागालेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.
हे सरकारचे अपयश आहे किंवा नाही यात न पडता आधी देशावर संकट आले आहे तर आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार डोक्यात पहिला आला.
१) बातमी कानावर येताच मी आज सुट्टी टाकली. पण गेलोच असतो ऑफिसला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते. माझ्याकडे गाडी नाही. मला चालवताच येत नाही.
२) सोन्याची खरेदी उभ्या आयुष्यात एकदाही केली नाही.
३) परदेश असो किंवा देश विदेश कुठल्याच प्रवासाची मुळातच आवड नाही.
४) मी शेतकरी नसल्याने शेतीचा मुद्दा माझ्यासाठी बाद.
५) WFH करायचे आदेश निघाले तर सर्वात जास्त आनंद मला होईल. बेडरूम मध्ये लोळत काम करायचे दिवस मिस करतोय.
मुलांच्या शाळा मात्र चालू राहाव्यात असे वाटते. मुलांचे कसले नुकसान नको. ते देशाचे भविष्य आहेत. तसेही आमची मुले तरी फक्त रॉड क्रॉस करून शाळेत जातात. इंधनाचा वापर शून्य असतो.
६) कुठल्याही भौतिक सुखाच्या वस्तूंची मला फार आवड नाही. त्यामुळे इम्पोर्टेड वस्तू फार विकत घेऊ नका हे पाळणे मला अवघड नाही.
७) खाद्यतेलाचा वापर कमी करणे मात्र तेवढे अवघड आहे. कारण माझ्या आवडीचे तेलकट चमचमीत पदार्थ मी रोज खातो.
धन्यवाद,
ऋन्मेष
सुबोध खरे, तुमच्याकडचे मुद्दे
"सुबोध खरे, तुमच्याकडचे मुद्दे कधीच संपलेत".
माझ्याकडे अनंत मुद्दे आहेत.
पण त्यामुळे तुमची विचारसरणी बदलणार नाही.
मग मी उगाच पालथ्या घड्यावर पाणी टाकुन कालापव्यय कशाला करू?
तुम्हाला प्रत्येक धाग्यावर धुळवडच खेळायची तर खेळा.
त्याने श्री मोदींना ही काही फरक पडत नाही!
चालू द्या!
ये ग्यान आप फोकटमे देते है.
ये ग्यान आप फोकटमे देते है. या इसको भी कोई चार्ज करते है. क्यू कि मेरे पास छुट्टा नाही है.
<<<< आय पी एल केव्हा बंद
<<<< आय पी एल केव्हा बंद करणार? खूप पाणी आणि वीज वाचेल.>>>>
काल कोहलीचे शतक झाल्यावर माझ्या मनात हाच विचार आला अजून मायबोलीच्या या धाग्यावर आयपीएल कशी आली नाही
आयपीएलमध्ये लागणारे वीज पाणी आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि उत्पन्न यांचा हिशोब मला ठाऊक नाही. पण या खेळामुळे देशभरात कोट्यवधी लोकांना मनोरंजनाचे एक फार मोठे साधन मिळते हे मात्र नक्की.
तरी या सर्वांची बेरीज वजाबाकी करून सुद्धा आयपीएल बंद करण्यात देशाचे हित असेल तर ती बंद व्हायला हवी.
काय कौशल्य आहे प्रतिसादांची
काय कौशल्य आहे प्रतिसादांची सोय करण्याचं..
कबड्डीच्या खेळात जसं रेषेच्या
कबड्डीच्या खेळात जसं रेषेच्या अलिकडे पलिकडे आक्रमक आणि बचाव अशा दोन संघात बाजी पालटत राहते तसेच बिझी आणि रिकामटेकडे असे दोन संघ आहेत. २०१४ ही त्यांच्या मधली रेषा आहे.
ण या खेळामुळे देशभरात
ण या खेळामुळे देशभरात कोट्यवधी लोकांना मनोरंजनाचे एक फार मोठे साधन मिळते हे मात्र नक्की. >> त्यासाठी आयपीएल कशासाठी ? एकटॅ मोदी समर्थ आहेत
भरत आणि मानव सर्व पोस्ट
भरत आणि मानव सर्व पोस्ट आवडल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या निवासस्थानापासून विधिमंडळापर्यंत मोटारींऐवजी बुलेटचा ताफा घेऊन गेले. त्याचं रीतसर शूटिंगही केलं. मोदीजींनी कार ऐवजी बुलेट वापरा असं म्हटलेलं का?
फडणवीसांचेही भक्त आहेत. ते रडू लागले. त्यांचं म्हणणं पहा
@narendramodi
Modiji, you and other leaders of our party, you guys are making me cry...
We, the small Karyakartas, can lower lifestyle and consumption, but you all have to have proper security..!!
None of us Karyakartas are refusing to lower our consumption, you all don't have to lead by doing this.... We need you Modiji, we need
@Dev_Fadnavis
and every good party leader who thinks about other's welfare instead of own...
Please urge
@narendramodi
to reinstate his security and please get yours reinstated as well
@Dev_Fadnavis
ji.
I'm feeling helpless.
पुढचे सहा महिने शासनाच्या वतीने कोणतेही मोठे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असंही फड णवीसांनी सांगितलेलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जिथे जिथे मिरवायचं असतं तिथे तिथे एक मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत एक किंवा दोन उपमुख्यमंत्री दिसतात. शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला फडणवीस, शिंदे , अजित पवार आणि आशिष शेलार असे चौघे जण नॉयडाला गेले होते. या लोकांना काही प्रशासकीय कामं नसतात का? त्यांच्यासोबत त्यांचा त्यांचा लवाजमाही जात असेल. या सगळ्या प्रकारावर जून २०२२ पासून किती खर्च झाला असेल?
१ लाडकी बहिण/ दाजी / नणंद
१ लाडकी बहिण/ दाजी / नणंद लाभार्थ्यांची कठोर फेरपासणी.
२ वेतन आयोगाला ब्रेक.
३ गृहमंत्री जिथे जातात तिथे शंभरेक पोलिस दिवसभर ताटकळत ठेवून त्यांना सलामी देणे बंद करणे.
खतांचा वापर कमी करण्याचे आवाहन मात्र पटले नाही. एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न अचानक घटले तर ते रोजच्या जेवणाचा व थियेटर मध्ये जाऊन सिनेमा बघण्याच्या बजेट मध्ये सेम कपात करत नाहीत. तूर्त जेवणाचा खर्च आहे तसाच ठेवू व सिनेमा पहाणे बंद करू असे म्हणतात.
१००
१००
मोदीजी डोंट फूल अस वी नो हू
मोदीजी डोंट फूल अस वी नो हू यू आर, रिमूव्ह यूर फेस मास्क यू आर देवमाणूस. उद्या सगळा जग मोदींच्या विरोधात गेला तर मी एकटा मोदींच्या बाजूने उभा असेल. आणि जिथे बोकलत तिथे पराभव अशक्य. लावा ताकद.
आशिष शेलार काय म्हणताहेत
आशिष शेलार काय म्हणताहेत पहा
https://www.youtube.com/shorts/ZDXUQ6JuWUo
मी इथेच लिहिलं होतं
मी इथेच लिहिलं होतं परकीय चलनाची गंगाजळी आटण्यामागे आणि रुपयाच्या घसरणीमागे इराण - इस्रायल अमेरिका युद्ध आणि वाढत्या आयाती सोबतच आणखीही कारणं असावीत.
परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून काढता पाय घेणं हे त्याचं कारण आहे. आणि हे या वर्षातच होत नाहीए.
https://www.fpi.nsdl.co.in/Reports/Yearwise.aspx?RptType=5
या दशकातले FPI Net Investment Details चे आकडे - कोटी रुपयांत
२०२० -२१ २७४०३२
२०२१-२२ -१४००१० (उणे म्हणजे आउटफ्लो)
२०२२-२३ -३७६३२ (उणे)
२०२३-२४ २०८२१२
२०२४-२५ -१२७०४१ (उणे)
२०२५-२६ -१८०८३२ (उणे)
२०२६-२७ (आजपर्यंत) -८९००७ (उणे)
परदेशी गुंतवणुकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घ्यायचं कारण काय असेल?
FPI at 16-Year Low: FPI ownership has dropped significantly, reaching a 16-year low of roughly 14.7% to 16% in early 2026.
याच वेळी भारतीय गुंतवणुकदारांनी पैसा गुंतवल्याने Indian investors (Domestic Institutional Investors and retail investors) have surpassed Foreign Portfolio Investors (FPIs) in ownership of Indian equities
त्यामुळे स्टॉक मार्केट चढं राहिलं तर परकीय चलनाची गंगाजळी घटली.
याशिवाय अनिवासी भारतीयांकडून भारतात पाठवला जाणारा पैसा हाही परकीय चलनाचा एक महत्त्वाचा स्रोत होता. पश्चिम आशियातील युद्धामुळे यावरही परिणाम झाला आहे.
या युद्धामुळे भारतावर जो परि
या युद्धामुळे भारतावर जो परि णाम होईल त्याबद्दल इथल्या एका सदस्याच्या मते भंपक बोलणार्याराहुल गांधीने ३१ मार्च रोजी आर्थिक भूकंप असे शब्द वापरून धोक्याचा इशारा दिला होता.
https://www.instagram.com/reels/DYRr8WvJGKz/
काटकसर हे एक झालं.
काटकसर हे एक झालं.
धरणात पुरेसं पाणी नसेल तर गळती रोखणे हे लॉजिकल आहेच आहे, पण त्याने धरण भरत नाही. कमी व्हायचा वेग कदाचित आणि काही सीमित काळ मंदावण्याची शक्यता निर्माण होते ठिगळं लावून.
देशांतर्गत उत्पादन वाढवणे, निर्यात वाढवणे, रेमिटन्स वाढवणे, एफडीआय वाढवणे यासाठी काय करत आहेत? किमान हे घसरू नये म्हणून काय करत आहेत? या सगळ्याला कॉन्फिडन्स लागतो. स्वतःचा स्वतःवर आणि इतरांचा देशावर, बाजारपेठेवर. पत लागते. आणि हे सगळं जर होत नाही आहे म्हणजे पत राहिलेली नाही हे मान्य केलं असेल तर पुढचे उपाय शक्य आहेत. याला फक्त ६० दिवसांपूर्वी चालू झालेलं युद्ध हे कारण शक्य नाही. हे सिस्टेमिक प्रॉब्लेम्स आहेत. पांघरुण उसवुन आता हात पाय उघडे पडत आहेत त्याला तात्कालिक कारण युद्ध असेल पण मुळात सगळं धोरण, डोलाराच विशविशीत कारभारावर आधारलेला आहे. तो पडायचा होताच, तो पडणार आहे हे मान्य केले हे काही कमी नाही. निमित्त काही का असेना!
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/sampadkiya/features/pm-narendra-modi-fakir-life...
लोकसत्ता विचारमंच..
माझ्या मते भारताचे मोठ्या
माझ्या मते भारताचे मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि वायू वर अवलंबून असणे आणि त्यातून येणारे दुबळेपण हे काही नवे दुखणे नाही. फक्त इराण युद्धामुळे ते अजुनच अधोरेखीत झाले इतकेच. भारत अनेक बाजूंनी दुबळा आहे आणि वाढता सो कॉल्ड उच्च मध्यमवर्ग देखील तितकाच दुबळा आहे. मी दुबळा म्हणत आहे कारण वरवर पहाता ग्रोथ दिसत असली तरी ट्रेड डिफिसिटही प्रचंड आहे. जेवढी आयात जास्त तितके रुपयावर ताण येणे वाढणार. त्या शिवाय वरवर राहणीमान वाढलेले दिसत असले तरी ते राखण्यासाठी कर्जावर अवलंबून असणे मोठ्या प्रमाणात आहे. साहाजिकच त्याचाही रुपयावर अप्रत्यक्ष ताण येतो. कोविडसाथीपासून रुपयाचे अवमुल्यन ज्या प्रकारे होते गेले, ज्या वेगाने परदेशी भांडवल बाहेर जात होते ते बघता खरे तर या प्रश्नावर या आधीच विचार व्हायला हवा होता. पण तसे झाले नाही. ओळखीत-नात्यात खाजगीत जेव्हा जेव्हा बोलणे झाले तेव्हा भक्त मंडळी महासत्तेच्याच बाता करत. असो.
इराण युद्धामुळे बर्याच मोठ्या प्रमाणात सप्लाय चेन्सचा प्रश्न उभा राहीलाय. हे किती काळ चालेल ते अनिश्चित आहे. याची झळ सगळ्यांनाच बसणार आहे आणि तगुन जाण्यासाठी उपाय योजनाही कराव्या लागणार आहेत.
जपानमधे खाद्य पदार्थांसाठी रंगीत पॅकेजिंग ऐवजी तात्पुरते काळे-पांढरे पॅकेजिंग वापरले जाणार आहे या वरुन परीस्थितीची कल्पना यावी आणि गाजावाजा न करता परीस्थितीला तोंड देणे म्हणजे काय हे देखील शिकावे.
आमच्याकडे तर काय सगळाच उजेड आहे. अमेरीकन जनतेच्या वाट्याला येणार्या आर्थिक ताण-तणावांशी मला देणे घेणे नाही असे राष्ट्राध्यक्षानेच सांगितल्यावर बोलणेच खुंटले.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=OxEMHsCKTWo
विरोधकांनी अशा वेळी कसे
विरोधकांनी अशा वेळी कसे सहकार्य करावे याचे हे उत्तम उदाहरण.
उगाच नाही म्हणत बरं लोक शिमगा करता म्हणुन.
ओ! राजकारण आहे ते!! सत्संग
ओ! राजकारण आहे ते!! सत्संग थोडी आहे!!!
हे वरचे दोन व्हिडिओ बघुन आता सगळे शेंड्या लपवून राजरोस बिळात व्यांख्याविंखीविक्कु करत बसणार!
<भरत, तुम्ही म्हणता तस
<भरत, तुम्ही म्हणता तस मोदींनी लाख चुका केल्या असं समजू. पणं त्यांनी अत्ता काटकसरीच आवाहन केलं आहे. त्याबद्दल तुम्हच मत कांय आहे?
Submitted by रात्रीचे चांदणे on 14 May, 2026 - 12:51 >
रात्रीचे चांदणे याबद्दल मी आज सकाळ च्या प्रतिसादातच लिहिलं आहे. तुमच्यासाठी पुन्हा लिहितो.
या सप्तसूत्रीकडे वळू - वर्क फ्रॉम होम कोणाला शक्य आहे? सोने अधिक प्रमाणात खरेदी कोण करतो? खाजगी वाहनातून प्रवास कोण करतो? इम्पोर्टेड वस्तू कोण वापरतो? परदेश प्रवास कोण करतो? हा वर्ग देशाच्या लोकसंख्येच्या टॉप ५ किंवा १० % मध्ये मोडेल.
म्हणजे मोदींचा हा संदेश त्यांच्यासाठी. युद्धाच्या झळा या लोकांना लागल्या तरी किती लागतील? ज्यांना लागतात त्यांच्याबद्दल मोदी काय म्हणालेत? किंवा तुम्ही काय विचार केलात? ज्यांना या युद्धाच्या झळा लागणार आहेत तो कष्टकरी वर्ग.
या सप्तसूत्रीत ल्या फार थोड्या गोष्टी मला लागू होतात. गुंतवणुकीतला एक ठरावीक हिस्सा सोन्यात असावा म्हणून मी गोल्ड इटीएफ घेतले. ते लक्ष्य गेल्या आर्थिक वर्षातच गाठले आहे.
माझ्याकडे स्वतःचे वाहन नाही. प्रवास फार नाही. होतो तो त्या त्या वेळच्या गरजेनुसार आणि सोयीने बस, ट्रेन, मेट्रो, रिक्षा, उबर.
निवृत्त असल्याने ऑफिसला जायचा प्रश्न नाही.
परदेश प्रवास नाही.
स्वयंपाकात तेलाचा वापर फोडणीपुरता. तळण वर्षातून चारपाच वेळा. विकतचे तळलेले पदार्थ तोंडात टाकण्यापुरते घेतो.
शेती करत नाही.
इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना स्वदेशी किंवा विदेशीपेक्षा दर्जा, किंमत, टिकाऊपणा यांचा विचार करतो. इम्पोर्टेड पाहिजे असा सोस नाही.
सकारत्मक विचार करायला हवा या
सकारत्मक विचार करायला हवा या विचाराचा जन्मच २०१४ नन्तर झाला आहे.
(वरिल व्हिडिओ बघितल्यावर - )
मुख्यमंत्री मोदी हे पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे टीकाकार आहेत हे अनेकदा यापुर्वी दिसले आहे.
<त्यामुळे एखादे आवाहन त्यांनी
<त्यामुळे एखादे आवाहन त्यांनी केले तर जास्तीत जास्त लोकांनी ते पाळायची शक्यता वाढते. याआधी देखील आपण हे पाहिले आहे.
आता लोकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला तर देशाचा थोडाफार का होईना फायदाच होईल. >
भाजप नेत्यांनी प्रतिसाद देत त्याचं शूटिंग करून फेसबुक ट्विटरवर शेअर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माझ्यासारख्या रिकामटेकड्या माणसाच्या मनोरंजनाची छान सोय झाली आहे. इथल्या मोदी समर्थक मायबोलीकरांनी सुद्धा तसं केलं तर त्यात भरच पडेल.
सर, मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तुम्ही काय केलं असा आणखी एक धागा काढा.
https://www.facebook.com
विरोधकांनी अशा वेळी कसे
विरोधकांनी अशा वेळी कसे सहकार्य करावे याचे हे उत्तम उदाहरण. >> या व्हिडिओशी सहमत आहे. दुटप्पीपणा दिसून येत आहे. पण परकीय चलन वाचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत, हा मुद्दा मात्र बरोबर आहे. मला तरी या आवाहनात काही चुकीचे वाटले नाही. क्रमांक ५ (अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर) बद्दल मात्र शंका आहे.
<< या सप्तसूत्रीतल्या फार थोड्या गोष्टी मला लागू होतात. >> मग अशा वेळी काय गोष्टी सुचवायला पाहिजेत की ज्यामुळे तुम्ही पण हातभार लाऊ शकता?
परकीय चलन मिळवायला जास्त
परकीय चलन मिळवायला जास्त प्रयत्न करावे म्हणजे दात कोरुन पोट भरा सांगायची वेळ येत नाही.
वाचवायचे प्रयत्न हे कायमस्वरुपी जीवनशैलीचा भाग असावे. महासत्तेला दाती तृण हाती कटोरे शोभत नाही.
>>मग अशा वेळी काय गोष्टी
>>मग अशा वेळी काय गोष्टी सुचवायला पाहिजेत की ज्यामुळे तुम्ही पण हातभार लाऊ शकता?<<
अॅस्क नॉट व्हॉट यु कॅन डु फॉर योर कंट्री, अॅस्क व्हॉट यु कॅन डु फॉर योर कंट्री.. पण हा संदेश पक्षीय राजकारणात आय्बॉल पर्यंत बुडालेल्यांना सांगुन उपयोग नाहि, अटर वेस्ट ऑफ टाइम...
भारताचं फॉरेक्स डेफिसीट ड्रॅस्टिकली रेड्युस करण्याची ताकद एकट्या अमेरिकन डाय्स्पोरात आहे. हि अपॉर्च्युनटि टॅप इन करण्या करता भारत सरकारने विन-विन सिचुएशन क्रिएट केली तर अमेरिकन डॉलर्स करता त्यांना इतर ठिकाणी हात पसरण्याची गरज भासणार नाहि...
विन विन कशाला ? देशभक्त आहात
विन विन कशाला ? देशभक्त आहात तर देशासाठी झळ सोसायला हसत हसत तयार व्हायला हवं.
अमेरिकेत बरेच इंडिया स्पेसिफिक फंड्स आहेत्, त्यात इन्व्हेस्ट करा.
आणि एवढे देशभक्त आहात तर परिस्थिती चिघळायला कारणीभूत झालेल्या इराणवर हल्ला करणाऱ्या तातोबांच्या धवलप्रासादात जाऊन त्यांना चार खडे बोल सुनवा. त्यांनी भारतावर रशियन तेलाबाबत घातलेले निर्बंध उठवायला सांगा.
आणि पासपोर्ट त्याच्या तोंडावर फेकून बायकोपोरांसह परत या.
शेवटी अॅस्क नॉट व्हॉट यु कॅन डु फॉर योर कंट्री, अॅस्क व्हॉट यु कॅन डु फॉर योर कंट्री..
हे केनेडी तेच ना, ज्यांच्या नावे बांधलेल्या सेंटरला तातोबांनी आपलं नाव जोडलं?
>>मोदी प्रत्येक गोष्टीत
>>मोदी प्रत्येक गोष्टीत चमकोगिरी करतात, आपला राजकीय फायदा बघतात हे काही आता लपले नाही.<< +१
अगदिच सहमत. २०१४ पासुन अशी परिस्थिती असुनहि काहिंना तोच तराणा बेसुरात गायचा असेल तर, यु आर बिटींग ए डेड हॉर्स..
शिवाय आता राजकारणाची समीकरणं बदलली आहेत, हे भारतात रहाणार्यांना समजु नये याचं आश्चर्य वाटतं. कुठल्याहि राजकिय पक्षाकडे सत्ता नसेल तर त्यापक्षाची काय अवस्था होते ते राज ठाकरें आणि राहुल गांधींना विचारा. ऑब्वियस्ली सत्तेत असतानाच ती सस्टेन किंवा तिचा विस्तार करण्याकडे कल असणे यात काहिहि गैर नाहि. अॅट टाइम्स, बाय हुक ऑर क्रुक. समाजवाद्यांचा "बोले तैसा चाले" हा काळ पार मागे पडलेला आहे. केवळ भूतकाळात रमणारेच तशी अपेक्षा राजकिय नेत्यांकडुन ठेवु शकतात. असो..
भारतात तर सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कि भाजपा सत्तेत टिकला तर देश टिकेल. सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने विरोधी पक्षात हि स्थिती बदल्ण्याची क्षमता अजिबात नाहि. लेट दॅट सिंक इन...
अरेरे! भाजपने देशाची अशी
<मोदी प्रत्येक गोष्टीत चमकोगिरी करतात, आपला राजकीय फायदा बघतात हे काही आता लपले नाही.> पण तसं करताना ते देशहिताचा किमान विचार तरी करतात का? विचारा स्वतःला
अरेरे! भाजपने देशाची अशी अवस्था केली आहे की तो ( म्हणजे देश) टिकेल की नाही याबद्दल लोकांना शंका वाटायला लागली आहे. जे काँग्रेसला ६०+ वर्षांत जमलं नाही, ते मोदींनी १२ वर्षांत करून दाखवलं.
Pages