कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज डोंबिवलीतल्या एका नातेवाईकांनी (आते नणंद) दारचे थोडे रायवळ खाऊ म्हणून दिले, आम्ही गावचे थोडे हापूस खाऊ म्हणून नेलेले.

अंजू, प्रामाणिकपणे सांगू? मला आलेल्या पेटीतील आंबे मी कोणालाही दिले नसते. हां वेगळे विकत किंवा वेगळी पेटी दिली असती. आंब्याच्या बाबतीत बिग नो नो .
तुझे मन विशाल आहे.

शेजारून केरळचा खाऊ येतो. एक शेजारी तिच्या माहेरचे मंडणगड रत्नागिरी हापूस देतात, एक दोनजण घरी केलेल्या पुरणपोळ्या देतात. मी काय देणार, घरी निगुतीने फार काही करत नाही, मग घरचे आंबे देते.

विशाल वगैरे नाही. घरी आईचं बघून द्यावं असं वाटत राहते आणि वरचे कारण.

गंमत म्हणजे इथे प्रॉपर देवगडचं कोणी नाही, त्यामुळे वेगळे आंबे दिले जातात.

अन्जू ताई, तुमच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट मिळेल का भाड्याने?
आंबा शिरा, लाडू..... जबरदस्त आहेत.
बघून करावेसे वाटतात पण रिस्की आहेत माझ्यासाठी.
गावावरून येताना दोन कैऱ्या आणल्या होत्या. त्याची चटणी केली किसून.
Screenshot_20260507_072129_Gallery.jpg

काल बाजारातून पिकलेले तोतापुरी आणि जुनागड केसर आणले.
तोतापुरी मला चिरून खायला आवडतात.

मँगो चटणी फोटू = 🤤

@ ऋतुराज, तोतापुरी सर्वात जास्त खपणारा आंबा आहे भारतात. आंबट-गोड, कापून खायला बेस्ट. मला याचे कैरी रूप जास्त आवडते, सालीसकट खायला. या सीझनला तर तोतापुरी कैरीचा रतीबच लावलाय, दररोज.

… मराठीत आंब्याचा रस म्हणायचं अशी सूचना आली आहे… 😀

हिरवीकंच कैरी आणि पिवळीधमक चटणी शेजारी शेजारी मस्त दिसतायत.
चटणीची रेस्पी कुठे आहे?

माझे केसर हळूहळू पिकतायत - पण गंध आणि स्वाद!!! अवर्णनीय!!

>>> मराठीत आंब्याचा रस म्हणायचं अशी सूचना आली आहे
हुकुमावरून! सो स्वीट! Happy

बरोबरच आहे ओमचं, अनुमोदन. Happy

मी लहानपणी एकदा खलबत्त्यात कैरी कांद्याची चटणी कुटत बसले होते. वाड्यातल्या स्वयंपाकघराच्या शेजारी असणाऱ्या अंधाऱ्या खोलीत खलबत्ता असायचा. वाड्यात राहिलेल्यांना लक्षात येईल की काही खोल्यांमधे प्रकाशच येत नाही आणि आमच्या ह्या खोलीत खिडकीही नव्हती. लाईट गेले की अजिबातच दिसायचे नाही. मी सोबत मसाल्याचा डबा घेऊन अंधारात तिखट समजून हळद घालत बसले पण चटणी काही तिखट होईना. शेवटी चटणी खरडून टोपात काढून बाहेर ओसरीवर आल्यावर दिसले तर पिवळीधम्मक चटणी झाली होती. Happy ऋतुराजच्या चटणीमुळे आठवले. मस्त दिसतेय.

Lol अस्मिता

ऋतुराज फोटो मस्त कलरफुल, सकाळी लिहायचं राहिलं.

कैरी कांदा किसायचा, चटणी कम कोशिंबीर, एवढे कुटायचे कष्ट कशाला घेतलेस अस्मिता.

चटणीची रेस्पी कुठे आहे?
साधी सोपी
कैरी किसून घेतली. त्यात चवीनुसार गूळ आणि मग मोहरी, हळद, हिंग, किंचित लाल तिखट घालून फोडणी.

^^भयानक विनोदी किस्सा. अमृतांजन म्हणुन कोणीतरी काजळ लावत बसलेले तो किस्सा आठवला मला.
Submitted by सामो o^°^

वाचतांना जाणवले की उलटे झाले असते तर खरेच फारच भयानक किस्सा झाला असता...

आज एका छोट्या celebration साठी मागवलेले आंबा ड्राइफ्रूट रोल्स. 👇

3c6b5b76-3595-4562-8bed-330873247455.jpeg

# Mango Delights
# Mango Dry fruit Rolls

सध्या १००% ऑफ शुगर असल्याने स्वत: खाल्ले नाहीत, पण आंबा + सुका मेवा काय वाइट लागणार आहे ?

“It’s good, kinda nuts wrapped in mango papad…but has no repeat value’ असे जेन झी पब्लिकचे तर “खूप छान चव, पुन्हा मागव हां ही मिठाई” असे चाळिशीपारच्या मेब्रांचे मत पडले 😄

सध्या १००% ऑफ शुगर असल्याने स्वत: खाल्ले नाहीत..... धन्य तो संयम!

but has no repeat value’ .... रोल्स न खाताही सहमती.

काल सोसायटीच्या आंब्याचे आंबे उतरवले. Ji manase बोलावली होती, त्यांना आंबे उतरवायची माहिती नसावी. अक्षरशः झोडून आंबे काढले. तेही सूर्यास्तानंतर. जीव कळवळला.माझ्या आणि आईच्या म्हणून 12 टणक कैऱ्या मिळाल्या. पिकलेले आंबे कुठे गेले माहित नाही. कदाचित आम्ही सारे भाऊ भाऊ, सारे मिळून वाटून खाऊ मोड मधे गायब झाले. आता त्या कैऱ्या परत काय म्हणून निस्तरायच्या हा मोठा प्रश्न आहे. फ्रीजमध्ये ढकलल्या. अजून मागचे लोणचे संपले नाही तोच परत करायच्या विचाराने अंगावर काटा आला.

अरेरे फारच विचित्रपणे हँडल केलं तुमच्याकडे आंबे प्रकरण.

आमच्याकडे कैऱ्या कधी उतरवतात, कुठे जातात, कोणाला मिळतात काही समजत नाही, सेम नारळ.

फणस उतरवतात तेव्हा हल्ली दोन वर्षे कोणीतरी सांगायला येतं, दोन वर्षांपूर्वी आम्ही नकोच म्हणालो, पण नंतर शेजाऱ्यांनी एक मोठा फणस घेतलेला, त्यांचा मुलगा गावी गेलेला म्हणून आमच्याकडच्या कोयत्याने नवऱ्यालाच, तो फणस कापायला बोलावलं, त्यातला थोडा दिला त्यांनी. मागच्यावर्षी वरच्यांनी सांगितलं तेव्हा मी एक लहान फणस घेऊन ये, फार मोठा नको म्हणाले, तसा आणला नवऱ्याने. कापा प्रकार असतो, जरा अगोड आहे पण मला असाच आवडतो, बरका आवडत नाही.

आमच्या वरती रहातात त्या कधी कधी लिंब, केळी आम्हाला देतात, मी सोसायटीत फिरत नाही खाली त्यामुळे मला माहितीच नसतं फार.

अनिन्द्य
हेच ते
मी पण मागवले होते
फारच tasty आहेत Happy

… धन्य तो संयम!…

🙏

हा संयम फक्त पदार्थांमधे वरून टाकलेल्या white sugar / मध / गूळ / सिरप्स / सॉसेस / tinned fruits / ज्यूसेस / लस्सी वगैरे साठी आहे. It is helping, shed a good 4 kg just in 20 odd days without doing anything extra.

आंबे आणि इतर फळे प्रमाणात चाखणे मात्र व्यवस्थित चाललेय …(वरून साखर न टाकलेला) आमरस सुद्धा अधून मधून 😀

अरे व्वा
मस्तच.
आंबे खाऊन वजन कमी करताय. Happy

वीकेन्डला एका एक्स्पोमध्ये बंगनपल्ली आंबा मिळाला. आंबा कसला, आंबेश्वर आहे!
हेऽ मोठ्ठं फळ, बारीक कोय, पातळ साल आणि मधुर चव!!

55238AC5-8370-4211-864D-A1CFD405A17C.jpeg

हा शेजारी केसर बघा कसा इवलाला दिसतो आहे!

B3E5C809-C5BC-44AE-B814-F4E6E22149CB.jpeg

हे घ्या गावचे रायवळ आंबे.
इटुकले मिटुकले....
वरून हिरवे दिसत असले तरी सुंदर केशरी रंग आहे आतून.
Screenshot_20260511_191445_Gallery.jpg

बंपर साइज बंगनपल्ली = 👌

आमच्याकडे याला बैगनपल्ली म्हणतात. बैगन काय संबंध कोण जाणे

गावचे रायवळ आंबे…. यावर्षी खूप कमी दिसत आहेत हे. लकी यू !

Pages