
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
थँक्स सर्वांना.
थँक्स सर्वांना.
फोटो काढता येत नाहीत, मोबाईलही जुना झालाय, मांडणी वगैरे थोडीफार इथल्या काहीजणांकडून प्रेरणा घेऊन केलेला प्रयत्न.
नाव गाव फळ फुल झालंय आज माझ्याकडून
ओह गणपती केलायस अन्जू आत्ता
ओह गणपती केलायस अन्जू आत्ता कळलं.
नाही असं काहीच ठरवून केलं
नाही असं काहीच ठरवून केलं नाही, पण गणपतीबाप्पा वाटला असेल तर थँक्स, मलाही नव्हतं माहिती. दोन तीन प्रकारे मांडले त्यात हे बरं दिसलं, आधी फुल बाहेर स्टुलावर adjust करत होते, होत नव्हतं त्यामुळे असं ठेवलं, नवराही म्हणाला मधे ठेऊन बघ. तसं ठेवलं.
आता तू म्हणालीस म्हणून परत बघितलं तर मलाही गणपतीबाप्पाचा भास झाला, थँक्स परत एकदा.
>>>>> मलाही गणपतीबाप्पाचा भास
>>>>> मलाही गणपतीबाप्पाचा भास झाला,

यु आर वेलकम.
देखणे आंबे.
देखणे आंबे.
अंजू, तू वरती लिहिले
अंजू, तू वरती लिहिले आहेस
बिल्डिंग म्हणजे आमच्या विंग मध्ये काहीजणांना वाटते, तसे वाटले, माहेरी पाठवले, मग
हे वाचून मला वाटले की.. तुमच्या बिल्डिंग मधील काही लोकांना असे ( कायमच !) वाटते, की तू माहेरी आंबे पाठवतेस!!

वाचून मला वाटले की.. तुमच्या
वाचून मला वाटले की.. तुमच्या बिल्डिंग मधील काही लोकांना असे ( कायमच !) वाटते, की तू माहेरी आंबे पाठवतेस!!..... मलाही.
दुसऱ्यांदा वाचले त्यावेळी कळले.
अंजू , आंबे मस्तच दिसतायत.
अंजू , आंबे मस्तच दिसतायत. खरंच गणपती वाटतोय. लिली शोभून दिसतेय आंब्यावर.
कोकणात आंब्याला देव च मानतात , सगळ अर्थ कारण त्यावर अवलंबून म्हणून. त्या दृष्टीने ही फुल ठेवणं समर्पकच.
वा !
वा !
घरच्या आंब्यांचे वैपुल्य, घरच्या फुलाचे सौंदर्य दोन्हीं मनोरम … ❤. चवीत माधुर्य असेलच. You are blessed by Mother Nature @ अन्जू.
त्या फुलाचे नाव काय तर “आम”रिसी लिली ! म्हणजे इधर भी आम है 👍
आता ऊन जोरात पडू लागल्याने हापूस आंबे चांगले पिकलेले आणि गोड येऊ लागलेत. Seasonal Delights
हापूसचे भाव चढेच आहेत मात्र.
केसर अजून आले नाहीत माझ्याकडे.
हापूसचे भाव चढेच आहेत मात्र..
हापूसचे भाव चढेच आहेत मात्र...... हो. त्याही पेक्षा पायरी महाग मिळाला. पायरी फारच कमी मिळते हल्ली.
FB वरुन एकीशी 2020(बहुतेक) साली संपर्क साधून पायरी मागवली होती. अफलातून गोड आणि एकदम मोठ्या आकाराचे पायरी आंबे त्यावेळी खाल्ले.नंतर तीच पार्टी माझी पायरी supplier aahe. विजयदुर्ग हापूसवाला वेगळा.
आजही एकाची FB वर add पहिली. बरेच कमी दराने हापूस आहेत. पण आता अनोळखी माणसाशी व्यवहार करायला नको वाटते. 5-६ वर्षांनी मीही म्हातारी झाले.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना. हेमाताई हो कोकणात आंबा, नारळ देवासारखेच.
अनिंद्य परफेक्ट, फुलातही आम आहे.
सगळे confused झाले,त्या दोन वाक्यांमध्ये स्वल्पविराम आहे
बहुतेक पूर्णविराम देऊन माहेरचं लिहायला हवं होतं.
आम्ही स्वतः हापूस देवाला नैवेद्य दाखवून अजून एकच खाल्लाय, फार गोड होता. दोन पायरी आलेले ते लगेच झाले म्हणून काल रस काढून आमरस पोळी बेत केला. आंबे पिकतायेत.
दोन केशर आंबेही पिकतायेत, दोन माहेरी पाठवले. पायरी दोन होते म्हणून फक्त आम्हाला ठेवले.
पुण्यात आमचे नातेवाईक जास्त आहेत. केसर आणि पायरी एकेकच झाड आहे, पुण्यातही प्रत्येकी दोन दोन पाठवले दिरांनी. त्यांचं कौतुक. बाकी आता होत नाही, माझ्या मुलामुळे नवरा मदतीला जाऊ शकत नाही म्हणून एकच हापूसची बाग ठेवली आहे घरी करायला, बाकी दुसऱ्यांना दिल्यात करायला.
सुरेख दिसतय ताट.>>> १००+
सुरेख दिसतय ताट.>>> १००+
अन्जुताई मस्त दिसतायत आन्बे
अन्जुताई मस्त दिसतायत आन्बे आणी लिलीच फुल...काहीही आणलस आणी विषेश केलस की नेहमी सगळ्याना देवुन खातेस हे तुझ जेस्चर मला फार भावत.
थँक्स, त्याचं क्रेडिट आईला,
थँक्स. त्याचं क्रेडिट आईला, आईचं बघून हे शिकले. अर्थात इथले काहीजणही देतात काहीना काही.
आंब्याचा शिरा -
आहाहा एकदम.
आहाहा एकदम.
माझी दिवसाची सुरुवात एकदम गोड
माझी दिवसाची सुरुवात एकदम गोड झाली, हा देखणा शिरा बघून....
कोकोनटने खाल्ला का ग?
नोट - ते काही लोकांना प्रत्येक धाग्यावर शा खा आणल्याशिवाय चैन पडत नाही तसे मला अस्मिताच्या पोस्टला रिप्लाय देताना कोकोनटला आणल्याशिवाय चैन पडत नाही...
कोकोनटला नैवेद्य असतोच. फारच
मस्त दिसतोय शिरा
मस्त दिसतोय शिरा
शिरा मस्त!!!
शिरा मस्त!!!
शबरी नक्की कोण? तू की कोकोनट?
शबरी नक्की कोण? तू की कोकोनट?
शबरी नक्की कोण? तू की कोकोनट?......
बिचारा कोकोनट!
शिरा अप्रतिम दिसतोयअस्मिता.
शिरा अप्रतिम दिसतोय अस्मिता.

शबरी कोण ?
मी पण काल आंबा घालून रवा लाडू केले. रंग आणि स्वाद छान वाटतोय.

ममो, लाडू सुरेख...... , रंग
ममो, लाडू सुरेख...... , रंग एकदम मस्त आलाय !!!
आंब्याचे प्रमाण काय घेतले १ वाटी रव्याला ?
अस्मिताचा आंबा शिरा ही मस्त !!
ममो, सुंदर लाडू.
ममो, सुंदर लाडू.
^^पूर्ण ममव झाला आहे. Happy
^^पूर्ण ममव झाला आहे. Happy
नवीन Submitted by अस्मिता. ^^
चांगले संस्कार केलेस हो..
आपली मराठी अस्मिता जागृत ठेवलीस..
नाही तर हल्लीची चार पायाची लेकरे... डॉग फूड आणि कॅट फूड शिवाय तोंड लावत नाहीत कशाला...
असो . ...
हा धागा आंब्याचा आहे ना, सॉरी सॉरी.. लईच अवांतर झालं...
ममोंचे लाडू आणि अस्मिताचा
ममोंचे लाडू आणि अस्मिताचा शिरा भारी!!!
धनवन्ती , माझेमन
धनवन्ती , माझेमन

ममोंचे लाडू पाहूनच प्रेरणा घेतली. लाडूचा घाट घालण्यापेक्षा शिरा सोपा वाटला.
आंब्याचा केशरी शिरा काय,
आंब्याचा केशरी शिरा काय, सोनपिवळे पिस्तायुक्त लाडू काय…
😍
राजस चित्रे !
लाडू मस्तच, देखणे.
लाडू मस्तच, देखणे.
लाडवांसाठी धन्यवाद सर्वांना.
लाडवांसाठी धन्यवाद सर्वांना.
चार वाट्या रवा होता त्याला एक आंब्याचा रस गाळून घातला अश्विनी.
Pages