क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आज मुंबईची छान रिकव्हरी ! तिलक वर्मा वेळेवर फॉर्मात!!
रोहितला कर्णधार न करणे मलाही रुचलं नाही. पण आयपीएल मध्ये खरंच ' आपली ' वाटणारी ' मुंबई ' च असल्याने, " रोहितला बसवला परत आता हारू दे मुंबई " असं नाही म्हणवत !

जबरदस्त शतक तिलक वर्मा..
शेवटच्या २३ बॉल ८२ मारले

पोरगी खेळून आली आणि तो मारायला लागला.. त्यामुळे सोबत बघायला धमाल आली.

स्पेशली लास्ट ओव्हर त्याचेच शतक कसे होईल हे बघत होतो.
एकही चान्स न सोडता दोन फोर दोन सिक्स मारून केले.
इंडिया मॅच जिंकल्यासारखा आनंद झाला.

जस्ट फॉर रेकॉर्ड. तिलक वर्माला आयपीएल मध्ये अजून एकही सामनावीर मिळाले नव्हते. आज पहिले येतेय Happy

*इंडिया मॅच जिंकल्यासारखा आनंद झाला.* होय, कांहींसा !
*जाऊ दे जिंकू दे आज.* - धन्यवाद ! Wink
*तिलक वर्माला आयपीएल मध्ये अजून एकही सामनावीर मिळाले नव्हते. आज पहिले येतेय * - कदाचित, हे कारण असावं - Wink

सचिनच्या संघाच्या वर्मावर बोट ठेवायची अजून हिंमतच होत नसणार कोणाची !!20190124_233403_2.jpg

आजचा राजस्थानचा विजय केवळ समोर लखनौ असल्यामुळे होता असं लिहावसं वाटत होतं. पण त्यांनी बॉलिंग आणि फिल्डिंग (विशेषतः कॅचेस) चांगली केली. आर्चर-बर्गरला पॉवरप्ले मधे ६ ओव्हर्स देण्याचा निर्णय पण योग्य ठरला. जडेजा साठी अनुकूल परिस्थिती होती आणि त्याने त्याला पुरेपूर न्याय दिला.

*...केवळ समोर लखनौ असल्यामुळे होता असं लिहावसं वाटत होतं.* - पण लखनौचा संघ कालच्या सामन्यात तरी अभ्यासपूर्वक नियोजन करून मैदानात उतरला होता, असं त्यांच्या गोलंदाजी व क्षेत्ररक्षणावरून तरी जाणवलं. जयस्वाल, वैभव इ यांना सापळा रचूनच बाद केल्याचं दिसलं. फलंदाजीने मात्र काल लखनौला साथ दिली नाही, असं म्हणणंही फारसं चुकीचं ठरणार नाही. लखनौची कामगिरी यापुढे लक्ष ठेवायला लावेल, अशी अपेक्षा.

Hitman vs Thala
दोघे उतरणे गरजेचे TRP साठी

"लखनौचा संघ कालच्या सामन्यात तरी अभ्यासपूर्वक नियोजन करून मैदानात उतरला होता, असं त्यांच्या गोलंदाजी व क्षेत्ररक्षणावरून तरी जाणवलं." - शामीच्या बॉलिंगच्या तर मी पहिल्यापासून प्रेमात आहे. सीम पोझिशन, मूव्हमेंट, लाईन आणि लेंथवरचा कंट्रोल - कमाल आहे. त्याला काल यादव, मोहसिन ने पण छान साथ दिली. पण लखनौ ची बॅटिंग बरीच आऊट ऑफ फॉर्म आहे.

आज संजू अप्रतिम खेळला आणि मुंबई खेळायला आलीच नाही.

मुंबईला नव्या रक्ताला आधिक वाव देऊन लाँङ टर्म संघ उभारणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. चेन्नई जसे धोनीला लोकप्रियतेसाठी वापरते तसे सूर्‍या, रोहित ला वापरून नव्या दमाचा संघ बांधायची गरज आहे. हा सीझन तसाही गेलाच आहे असे वाटते तेंव्हा बुमराला बाहेर बसवून फ्रेश ठेवावे.

गोएंका चुम्माला वर्षाअखेरीस नारळ देईल अशी चिन्हे दिसत आहेत.

गुड फॉर चुम्मा.. तो गोयंका आजवरचा रेकॉर्ड पाहता एक फालतू संघमालक वाटतो. तिथल्या वाईब पासून चूम्माची सुटका होणे गरजेचे आहे. तो तिथे गेला तेव्हाच माझा मूड ऑफ झालेला.

कालची संजूची इनिंग भारी मच्युअर्ड होती. इरफान पठाण की कोणीतरी मध्यंतरी त्याच्या खेळीचे टेम्प्लेट आणि शॉट सिलेक्शन चे विश्लेषण केले होते. लेग साइड बॉल उचलून मारा, ऑफ साईड along the ग्राउंड shot आणि स्टंप वर असलेल्या चांगल्या बॉल ना इज्जत द्या.. येत्या काळात वनडे संघात सुद्धा तो आपली दावेदारी सांगू शकतो.

काल पांड्याने गोलंदाजीत लास्ट ओव्हर स्वतः टाकायला हवी होती ती त्या नवीन पोराला दिली.
तेच टारगेट डिफेंड करताना लास्ट ओव्हर दिली असती तर तो हिरो बनायला एक चान्स दिला गेला असता. पण काल मात्र संजूच्या तोंडी दिले.

मागचा सामना जिंकल्यावर त्याची फार ओवर अक्टिंग चालू होती. नवीन पोरांना उगाच मिठ्या मारणे वगैरे बघितले पण समोरून मिळणारा रिस्पॉन्स पाहिला तर तो या संघात कर्णधार म्हणून फार कोणाला नको आहे असे वाटते.

त्याने स्वतःहून कर्णधारपद सोडावे. मग भले पुन्हा रोहितने कर्णधारपद स्वीकारले नाही तर विश्वचषक विजेता कर्णधार सूर्याचा पर्याय आहेच.

याने संघातील वातावरण बदलून संघाला फायदा होईल ते आहेच. पण हे पांड्याच्या स्वतःच्या भल्यासाठी सुद्धा आहे. त्याचे मनस्वास्थ्य चांगले राहील. स्वतःच्या परफॉर्मन्सवर फोकस करून तो सुधारेल. आजही तो भारतासाठी खेळताना व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे.

बाकी गेले दोन दिवस हवा होती की रोहित आणि धोनी दोघे खेळणार..
जेव्हा टॉस ला समजले दोघेही नाही आहेत तेव्हाच सामना बघायचा मूड गेला.

पुन्हा रोहितने कर्णधारपद स्वीकारले नाही तर विश्वचषक विजेता कर्णधार सूर्याचा पर्याय आहेच.
>>
करत फॉर्म बघता सूर्या भारतीय संघात राहील का याचीच शंका वाटतेय. त्यामुळे तो नको.
लाँग टर्म बघायचं असेल तर पांड्या कॅप्टन म्हणून चालत नाहीये तर तिलकला आजमावून बघता येईल...

मी मुंबई कर्णधारपदाबद्दल बोलत आहे.
त्यासाठी सूर्या भारतीय संघात नाही राहिला तरी चालते. मुंबई संघातली त्याची जागा पक्की असले की झाले.

धन्यवाद _/\_ >> सिरीयसली ह्यातून नक्की काय मिळाले असेल बोकलतला ह्याचा विचार केल्यावर आयडी कोणाचा आहे ते आठवले नि सगळे कोडे सुटले.

अहो आसामीजी मी सचिन तेंडुलकर यांना ओळखतो आणि ते पण मला ओळखतात. मी सचिन सरांना बोललो मायबोलीवर तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहे तर ते बोलले धन्यवाद बोल त्यांना. म्हणून मी प्रतिसाद दिला.

सहज मराठी कॉमेन्ट्री लावली.
Jansen चा एक बॉल स्विंग होत बाहेर गेला आणि बॅट्समन त्यावर चकला..
कॉमेन्ट्री करणारा बोलला,
ओहो, शृंगारिक Lol Lol Lol

Pages