कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>आंब्याचे एक नाव "सहकार" असेच आहे.Juice
ऋतुराज, आंब्याचेच समानार्थी संबोधन/नाव आहे की 'सहकार' ही आंब्याची जात आहे?

… सुक्या भेळीपेक्षा आता झालमुरीची हवा…. 😂

Brilliant!

कैरीयुक्त भेळ माझीही फेव्ह. मागच्या सीझनला फोटो दिले होते धाग्यावर.

… बरणी कलंडली….. बरणी को नशा हो गया होगा स्पाइस का 😀

… आंब्याचे एक नाव "सहकार" आहे….

बरोबर. म्हणून कैरी-आंबे खायला एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित… सॉरी, माबोभाषेत अद्याह्रत आहे.

@ केरी + कैरी + ट्रूडो दादा = 👌

Screenshot_20260423-204242~2.png
पन्हे
हे ग्लास मी चहा कॉफी पन्हे सरबत ह्यासाठी आणलेत
उदघाटन झालं
Ignore टेबलावरची धूळ आणि wires

देवकी आहेत आमच्या सोसायटीत सेम लोकं. भावाच्या सोसायटीत चांगली शिस्त आहे.

झालमूरी इफेक्ट Lol

किल्ली फोटो आहाहा.

@ किल्ली, पन्हे सर्विंग ग्लास 👌

यात आईस टी / आईस कॉफी सुद्धा खूप छान दिसेल

मागच्या स्क्रीनवरचे “dare to innovate” पाळणारा फोटू 👍

पन्हे सर्विंग ग्लास मस्त

ते पन्हे न वाटता काही तामसिक पेय वाटते आहे मुली....अर्थात आपली पहिली पसंती पन्ह्यालाच.

ऋतुराज, आंब्याचेच समानार्थी संबोधन/नाव आहे की 'सहकार' ही आंब्याची जात आहे?>>>>>>>>>>
कालिदासाने त्याच्या काव्यात विविध ठिकाणी आंब्याच्या वेगवेगळ्या नावांचा उल्लेख केला आहे.
असे असले तरी त्याच्या अर्थात थोडा जातिवाचक भेद जाणवतो.
सहकारोऽतिसौरभः
या आंब्याच्या प्रकारात 'सहकारा'ला घमघमणारा सुवास असतो असे म्हटले आहे.
कालिदास आहे तो. शब्द निवडूनच वापरणार.

धन्यवाद ऋतुराज. मला समानार्थीच वाटतोय. उदा - आम्ही कालच हापूस सहकार आणले.

भेळ आवडली सर्वांना थँक्यु...
भेळ करताना कुरमुरे प्लेन पांढऱ्यापेक्षा हलके पिवळे असतील तर इतर रंग अधिक खुलतात म्हणून त्यांना थोडी हळद चोळून घ्यायची म्हणजे रंग छान येतो .

भेळ आणि आंबा डाळ, भारी!
आंबा डाळ म्हणजे कैरीची वाटली डाळच ना, चैत्रागौर स्पेशल? Happy
देवकी तै आणि अंजुताईच्या गप्पा आवडल्या. Happy

अस्मिता वाटली डाळ करताना फोडणीवर परततात. आंब्याची किंवा कैरीची करताना डाळ वाटून कच्चीच ठेवतात आणि वरून फोडणी देतात. चैत्रगौर स्पेशल हे बरोबर पण वाटली डाळ म्हटलं की दुसरी डाळ आठवते, पुण्यात गणपती विसर्जनाला करतात बरेच जण तशी.

ममो ताई..तुमच्या रेसिपी ने कैरी खोबरे कांदा salad केले..फारच मस्त झालं होत..आणि अजिबात साखर घालायला लागली नाही..माझ्याकडे थोडेसे उकडलेले छोले होते ते पण मी घातले..
thnak you चविष्ट रेसिपी साठी

<<<भेळ करताना कुरमुरे प्लेन पांढऱ्यापेक्षा हलके पिवळे असतील तर इतर रंग अधिक खुलतात म्हणून त्यांना थोडी हळद चोळून घ्यायची म्हणजे रंग छान येतो .>>>

तुम्ही नेहमी रंगाचा किती मस्त विचार करता. मागे पण पुरणपोळी च्या कणकेत चिमुटभर हळद घालण्याची टिप तुम्ही दिली होती. त्याने खुप सुंदर रंग येतो पोळीला.

पायरी आणि हापूस दोन्ही घरी आलेत. पण अजून तयार व्हायचे आहेत. एकदा आंबे आणले की खंड न पाडता खायचे असे शास्त्र असते.
IMG_20260426_123554.jpg

Trolley मध्ये पहुडलेली पायरी.

ममो, भेळ एकदम टॉक!

केया देवकी धन्यवाद. छोले छानच लागले असतील.
नुसत्या उकडलेल्या छोल्याचं सॅलड ही छान होतं. थोडा शेपू घालायचा मस्त लागत.
तुम्ही नेहमी रंगाचा किती मस्त विचार करता >> थँक्यु पर्णिका.
लोणच्याला रंग जबरदस्त आलाय.
रविवार लंच आमरस.. आंबे एवढे छान होते की एक कण ही साखर घातली नाही.
20260426_133727.jpg

रस न खाणाऱ्यांसाठी हे कापून. परफेक्ट पिकलेले, पातळ सालीचे, रंग स्वाद चव सगळंच अप्रतिम
20260426_133141.jpg

वा देवकी, spice is always nice !

…ममो तुम्ही नेहमी रंगाचा किती मस्त विचार करता….

+ १

Food aesthetics कडे त्यांचं लक्ष असतं, मीसुद्धा नोटिस करतो नेहेमी. लिहायचं राहून जातं.

आज आमच्याकडे कैरी पन्ह्याचे पॉपसिकल्स करण्याचा कार्यक्रम चाललाय आणि मला नेमकी वार्षिक उन्हाळी सर्दी-पडश्याची बाधा झाली आहे. उद्या-परवा पर्यंत कुणी माझ्यासाठी एखादेही उरवेल याची शक्यता खूप कमी आहे

मनीमोहोर, आमरस आणि फोडी दोन्ही फोटो = 👌

Pages