
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
कांदा कैरी चटणी, कैरी candy,
कांदा कैरी चटणी, कैरी candy, मेथ्याबा झाला.
आज पहिला आमरस पोळी
अक्षय तृतीया special
चितळे बंधू कडून आंबा dryfruit रोल्स मागवले होते.
आवडले
आंबा dryfruit रोल्स, पहिला
आंबा dryfruit रोल्स, पहिला आमरस …
वा वा मजा करा.
फोटो कुठेत ?
Alphonso Arrivals
Alphonso Arrivals 😍
आंबा सीझनची ऑफिशियल सुरुवात - पहिलेवहिले हापूस आंबे घरात आले.
थोडे पिकले की मग रसमंथन
आवळे जावळे गोंडस आंबे आवडले.
आवळे जावळे गोंडस आंबे आवडले.
मस्त मस्त, एन्जॉय.
मस्त मस्त, एन्जॉय.
पांढरे कांदे उभे पातळ चिरून
पांढरे कांदे उभे पातळ चिरून आणि पाकळ्या मोकळ्या करून, ओला नारळ , किसलेली कैरी आणि मीठ एवढ्या लिमिटेड साहित्यात मस्त सॅलड तयार होतं.>>>>>>> करून बघण्यात येईल. जबरी दिसतंय
काय सुरेख फोटो आहे !
काय सुरेख फोटो आहे !
आहाहा, मस्त फोटो.
आहाहा, मस्त फोटो.
वाह झाडाला लगडलेल्या कैर्या
वाह झाडाला लगडलेल्या कैर्या
काल आमच्या सोसायटीतील
काल आमच्या सोसायटीतील आंब्याच्या झाडाची फांदी फळभाराने तुटून पडली. सोसायटीमध्ये वातावरण असहकारचे असल्यामुळे अशा फांदीला आधार द्यायला टेकण लावलं जातं ते लावलं गेलं नाही. जवळ जवळ दीडशेच्या वर कैऱ्या खाली पडल्या. बाबत वाटत नाही पण फांदी कटकन फांदी तुटली,त्याचं फार वाईट वाटलं.
वर ऋतुराजनी दिलेल्या फोटोप्रमाणे कैऱ्यांनी लगडलेली फांदी होती.
देवकी, जीव हळहळला हे वाचून.
देवकी, जीव हळहळला हे वाचून.

आणि
सोसायटीमध्ये वातावरण असहकारचे असल्यामुळे.. हे वाक्य तर अगदीच रिलेट झाले.
अरेरे. मग सगळ्यांनी वाटून
अरेरे. मग सगळ्यांनी वाटून घेतलया की नाही कैऱ्या. असहकार असला तरी अशावेळी सहकार हवा.
फोटो @ झाडाला लगडलेल्या कैर्
फोटो @ झाडाला लगडलेल्या कैर्या = 👌
… असहकार असला तरी अशावेळी सहकार हवा… + १
काल आमच्या सोसायटीतील
.
कैर्या भारी आहेत वरच्या
कैर्या भारी आहेत वरच्या फोटोत!
असहकार असला तरी अशावेळी सहकार हवा.>> हो ना.
काल हंगामातला पहिलाच मेथांबा केला. खरं म्हणजे एव्हाना २ बॅचेस तरी झालेल्या असतात, पण यंदा मलाही वेळ नाही आणि कैर्याही फार आणल्या नाहीत. अगदीच एका कैरीचा झालाय. पन्हं करायला तर जमलेलंच नाही अजून. यंदा माझा उत्साहपण कमीच आहे.
तेही सासरे आणतात आंबे कुठून कुठून म्हणून!
रोज आमरस मात्र मिळतोय थोडासा का होईना
काल बघत होते खोक्यात, की ४ आंबे तरी निघतील का रस काढायला, तर खरं म्हणजे आज-उद्यात होतील असेच होत; कारण वरून थोडे तयार वाटले तरी मुरावे लागतात तसे नव्हते. पण खोक्यात आंबे आहेत नि जेवायला रस नाही हे बघून मंडळी मलाच खातील
म्हणून मी अहो आईंनी विनंती केली की द्या मला शोधून त्यातल्यात्यात तयार आंबे, माझ्याऐवजी आंब्यांचा बळी देऊ आपण
आंबा मात्र चवीला गोडच होता. आज अजून छान होईल रस. हौशी मंडळी करतील ती उस्तवार. (मी आले कामावर)
लगेचच मोठी पोस्ट लिहिली होती,
लगेचच मोठी पोस्ट लिहिली होती, डिलिट झाली.
असहकार असला तरी अशावेळी सहकार हवा… तो सहकार दिला ना. सर्वांना 5 कैऱ्या मिळाल्या. एक अतिउत्साही महिला धावली, तिने मोठी पिशवी भरून कैऱ्या नेल्या. आईची केअरटेकर पण आपणहून गेली. तिने 9 कैऱ्या आणल्या. म्हटलं आता खिडकीबाहेर पाहू नकोस. तिला कोणी हटकायला नको म्हणून. ती खात नाही.मलाच आणून देते.
आमचा वॉचमन तर बघायलाच नको. कैऱ्या लागल्यापासून तो आंब्याच्या झाडाखालीच असतो माकडे आली की हा आपला उगाचच हाकल्यासारखे करतो आणि त्यांनी टाकलेल्या कैऱ्या गोळा करत बसतो.त्याच्या इतक्यात बऱ्याच गोष्टी करून झाल्या.गोडे /तिखट लोणचे, कैरीच्या सुकवलेल्या फोडी वगैरे.
काल छुंdya साठी कैऱ्या किसल्या. काही लोणच्यासाठी चिरल्या. पण त्या आतून फिक्या पिवळ्या असल्याने लोणचे नीट व्हायचे नाही. बघू. कसे काय ते.
हा धागा आणि सगळ्यांचे मस्त
हा धागा आणि सगळ्यांचे मस्त मस्त फोटो बघून मला FOMO feeling येतंय
मी अजूनपर्यंत मेथांबा, टक्कू, आमरस (रोजच almost) आणि एकदा लेक म्हणाला म्हणून त्याच्यापुरता mango मिल्कशेक केला
ऑफिस कलिग ने दोन वेळा पन्ह आणलं होत, त्यामुळे ते पण घरी केलं नाही
उद्या मैत्रीण किलोभर कैऱ्या देईल, काहीतरी पदार्थ घडावा
(No subject)
इथे सगळेजण कैरी-आंब्याचे इतके
इथे सगळेजण कैरी-आंब्याचे इतके धो-धो पदार्थ करत आहेत, चाखत आहेत, कुणी एक फोटो दाखवेल तर शपथ 🙂
@ किल्लेदार, पेरीला कैरी पाठवायची का ? 😁
पेरीला जस्ट-इन पाठवा!
पेरीला जस्ट-इन पाठवा!

मला पण इंग्रोत गेलं पाहिजे. लोणचं आणि मेथांबा खावा वाटतो हा धागा उघडला की. ममोंचा फोटो बघुन ते सॅलेडही करावं वाटलं. पण इतकी करकरीत कैरी इथे फार क्वचित मिळते.
देवकी दोन्ही बाबतीत मला
देवकी दोन्ही बाबतीत मला म्हणायचं होतं, झाडाला आधार देण्यात सहकार हवा आणि वाटून घेण्यातही. Watchman आता ठिय्या देतोय तिथे पण दोन चार जणांना बोलाऊन टेकू देण्यात पुढाकार घेतला असता तर बरं झालं असतं.
आमच्याकडेही सावळा गोंधळ पण आमच्या वरच्या आहेत त्या मला त्यांच्यातली म्हणजे खाली मिळालेली चार केळी, लिंब आणून देतात, मी जात नाही खाली अजिबात हल्ली. फणस लगडलेले असतात उतरवायच्या वेळी सांगायला येतात, हवा असला तर या.
मी लावलेला आंबा, जाम्ब अजून लहान आहेत पण येउदेत, कोणीही घेऊदेत. मालकी सोसायटीची. मी काढल्या तर नीट वाटेन सर्वांना.
भावाच्या सोसायटीत चांगलं आहे. नारळ, कैऱ्या उतरवून पर फ्लॅट वाटणी करतात.
मी सांगून ठेवते संबंधित लोकांना की काढायची मजुरीही वाटून घेऊया, विशेषतः नारळ, फणस.
(No subject)
देवकी दोन्ही बाबतीत मला
देवकी दोन्ही बाबतीत मला म्हणायचं होतं, झाडाला आधार देण्यात सहकार हवा आणि वाटून ..... खरंय अंजू तुझे. फांदी तुटल्यावर लक्षात आले की अरेरे त्याला आधार दिला पाहिजे होता. आता दुसऱ्या बाजूचीही कदाचित फांदी तुटेल. आजच आजच पाहिली. गेल्या पंचवीस वर्षात ह्या वर्षी खाल्ल्या तेवढ्या कैऱ्या प्रथम खातेय . नाही म्हणायला 2 वर्षांपूर्वी 2 आंबे मिळाले होते. सोसायटीतील 1 माणूस कोणाला तरी बोलावून ते आंबे उतरुवून घेऊन स्वतःच्या घरी न्यायचा. आमचा माळी फक्त पाट्या टाकतो. आधी एकजण होता तो फार झाडांवर जीव लावायचा.
असो फारच अवांतर होतं आहे.
रोजच आंब्याचा रस म्हणजे झालं
रोजच आंब्याचा रस म्हणजे झालं की
स्वर्ग सुख हेच
असहकार असला तरी अशावेळी सहकार
असहकार असला तरी अशावेळी सहकार हवा.>>
नक्कीच. आंब्याचे एक नाव "सहकार" असेच आहे.
आंबा आवडत असला तरी त्याचा रस करून खाणे मला आवडत नाही. खरी मजा तो चोखून खाण्यातच आहे.
घरी रस केला की माझ्या वाटणीचे एक दोन आंबे मी तसेच ठेवायला सांगतो आणि नंतर मस्त चोखून खातो.
किल्लेदार, मस्त जमलंय.
आंबा आवडत असला तरी त्याचा रस
आंबा आवडत असला तरी त्याचा रस करून खाणे मला आवडत नाही. .... +१. कापून खायला आवडतो. अगदी पायरीही
रस केलाच तर त्यात दूध, साखर, वेलची काहीही नाही. फक्त पिळलेला आंबा, त्याच्याही गुठळ्या न मोडता.
अनिंद्य , तुमच्यासाठी. पण बरणी कलंडली.
(No subject)
.
ऋतुराज , तुझं आणि माझं सेम
ऋतुराज , तुझं आणि माझं सेम आहे, पुऱ्या वगैरे असतील तर खाते रस पण रोज पोळी बरोबर रस या पेक्षा आंबे चोखून खायला जास्त आवडतात. तंद्री लावून कोय पांढरी करण्यात जी मजा आहे ती चमच्याने रस खाण्यात नाही.
देवकी, लोणचं फारच अप्रतिम दिसतय.
लोणचं, आंबेडाळ, पन्हं , मेथांबा तर होतोच पण कैऱ्या यायला लागल्या की सुकी भेळ ही होतेच होते. कैरी मुळे अप्रतिम लागते. करत नसलात तर करून बघा. पटकन होते. कांदा टोमॅटो, मिरच्या (तिखट आवडत असेल तर एकदम बारीक चिरायची) कोथिंबीर चिरायला आणि कैरी किसायला काय वेळ लागेल तोच. बाकी फक्त मिक्स करायचं आणि लगेच खायचं.
म मो, सुक्या भेळीपेक्षा आता
म मो, सुक्या भेळीपेक्षा आता झालमुरीची हवा आहे!

बरोबर ... पटलं...
बरोबर ... पटलं...
Pages