Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्दांच्या वाटेवर>>>>>
शब्दांच्या वाटेवर>>>>>
धन्यवाद, पाहतो.
तर तो / ती कोणतं गाणं
अमुकअमुक हा शब्द एखाद्या ( विशिष्ट ) वस्तूबद्दल बोलताना वापरतात पण तेच केवळ एक अक्षर बदलून अमुकतमुक म्हटलं की फोकस नाहीसा होऊन इकडचं तिकडचं काहीही अश्या अर्थी वापरतात.
काहीही कळलं नाही मामी. ही
काहीही कळलं नाही मामी. ही हिंट आहे का?
हिंटला मराठीत काय म्हणतात?
हिंटला मराठीत काय म्हणतात?>>>
हिंटला मराठीत काय म्हणतात?>>>>> सुगावा?
काहीही कळलं नाही मामी. ही
काहीही कळलं नाही मामी. ही हिंट आहे का? >>> केवळ एक नोंद केली. बरोबर आहे का?
हिंट देणे - पुडी सोडुन देणे
हिंट देणे - पुडी सोडुन देणे(चांगल्या अर्थाने)धनश्री हाहाहाहा
धनश्री हाहाहाहा
मामी, काहीतरी उदाहरण दिलंत तर लक्षात येईल
हर्पा ,
हर्पा ,
कोर्टात ऍडव्होकेट अमुकअमुक यांच्या बिनतोड युक्तिवादानंतर सर्वजण गप्प झाले.
रस्त्यावरच्या विक्रेत्याने सांगितलेली गालिच्याची अमुकतमुक किंमत ऐकूनच तिने घासाघीस करायला सुरुवात केली!
अमुक एक Vs अमुक तमुक?
अमुक एक Vs अमुक तमुक?
* अमुक एक Vs अमुक तमुक?
* अमुक एक Vs अमुक तमुक?
>>> बहुतेक असेच असावे.
बृहदकोशात अमुक तमुक याची दोन स्वतंत्र शब्द म्हणून वेगळी नोंद आहे. परंतु अमुकअमुक अशी स्वतंत्र नोंद काही नाही.
* हिंटला मराठीत काय म्हणतात?
* हिंटला मराठीत काय म्हणतात?
>>>> सूचकता / सुचवणी ?
@ अमुक तमुक
@ अमुक तमुक
मग अमुक ढमुक चे काय?
अमकं न ढमकं.
अमकं न ढमकं.
>>> हिंटला मराठीत काय म्हणतात
>>> हिंटला मराठीत काय म्हणतात?
संकेत किंवा इशारत म्हणता येईल.
आभार. चपखल शब्द नसावा. “कोडे
आभार. चपखल शब्द नसावा. “कोडे सुटत नाहीये, काहीतरी संकेत द्या किंवा सूचक बाब सुचवा“. ठीक
जेव्हा मराठीत चपखल शब्द नसतो,
जेव्हा मराठीत चपखल शब्द नसतो, तेव्हा आपण तो तयार करु शकत नाही का ? इथे तर हर्पां सारखे कितीतरी गुणीजन आहेत !
या संबंधी काय नियम आहेत?
मी कसला हो गुणीजन! मी सरळ
मी कसला हो गुणीजन! मी सरळ हिंट द्या म्हणतो.
हर्पा
चटक्यांचा मांडव असा एक
चटक्यांचा मांडव असा एक वाक्प्रयोग वाचला आणि अर्थ न समजल्याने कासावीस झालो.
नंतर योग्य शोध घेतल्यानंतर समजलेला अर्थ :
चटक्यांचा मांडव = पोकळ डौलाचे, दिमाखाचे, बडेजावाचे शब्द - भाषण.
वाचलेला प्रयोग असा होता :
चटक्यांचे मांडव घालून राजकीय यश मिळेल काय? त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात.
* चटक्यांचा मांडव >>> रोचक
* चटक्यांचा मांडव >>> रोचक आहे !
विक्षोभ
विक्षोभ
= उद्विग्नता, आवेग.
हा हिंदी शब्द आहे. मराठी कोशात नाही.
कालच्या ऑनलाइन लोकसत्तामध्ये सध्याच्या पावसासंदर्भात बातमी देताना त्यांनी
"एक पश्चिमी विक्षोभ महाराष्ट्रावर येऊन आदळत आहे"
असे विधान केलेले आहे.
आज चंद्राचे एक छान नाव
आज चंद्राचे एक छान नाव वाचनात आले - शीतमयूख
मयूख म्हणजे किरणे
* शीतमयूख >>>
* शीतमयूख >>>
वा ! सुंदरच . . .
शीतमयूख …
शीतमयूख …
नाद छान आहे या शब्दा चा. कवी लोक वापरू शकतील.
धन्यवाद डॉक्टर आणि अनिंद्य
धन्यवाद डॉक्टर आणि अनिंद्य
विष्णोर्वक्षसि लसिता शीतमयूखस्य सोदरी कमला ।
कमलायतनयना नः पातु सदा पापराशिभ्यः ॥
मला शीतमयूख शब्द तितकासा
मला शीतमयूख शब्द तितकासा आवडला नाही.
लोकांना असे वाटू शकते की मयूर शब्द चुकून मयूख लिहिला गेला आहे !
शिवाय...नादात तो मुरख च्या जवळ जातो!
इंग्रजीत Thesaurus समानार्थी
इंग्रजीत Thesaurus समानार्थी शब्द सुचवतो. चपखल किंवा अर्थपूर्ण शब्द नसला तरी इतर शब्द कामाला येतात. तर तसा शब्दकोश मराठीत असावा. [ एका डॉक्टरनेच फावल्या वेळात Thesaurus निर्माण केला. ]
महिषासुरमर्दिनी स्तोत्रात पण
महिषासुरमर्दिनी स्तोत्रात पण आहे मयूख.
ओह रिअली? लंपन परत वाचते
ओह रिअली? लंपन परत वाचते महिषासुरमर्दिनी स्तोत्र.
हो सामो, कटितटपीत
हो सामो, कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत.. 16 वा श्लोक.
Pages