दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वानंदी, केमिकल्स सप्लाय करणाऱ्या दुकानात मिळते. १५० ते २०० ₹ / लिटर.
सॅनिटाइझर वापरायला हरकत नाही, पण त्यात ग्लिसरीन असते हात कोरडे पडु नयेत म्हणून, मग त्याने साफ केले की ग्लिसरीन पुसले जायला कोरड्या फडक्याने परत पुसायचे.

किल्लीने लिहिलंय ते क्लिवो क्लिनर वापरून बघा आधी.

---
डाग काढण्याचा विषय निघालाच आहे तर:
काचेची, चिनीमातीची, स्टेनलेस स्टीलची, टप्परविअरची भांडी (ज्यांच्यावर आम्लाची प्रक्रिया होत नाही) यांवर पाण्यातील क्षारांचे पांढरे, दूधाळ डाग पडले असतील तर एक ग्लास पाण्यात पाव चमचा सायट्रिक ऍसिड पावडर घालुन ती त्या भांड्यात घालुन सगळीकडे ते पाणी लागेल अशा रीतीने भांडे हलवायचे फिरवायचे. एका भांड्याचे डाग निघाले की तेच पाणी दूसऱ्या भांड्यास वापरायचे. त्या पाण्याने डाग निघणे थांबले की नविन द्रावण करायचे. काचेचा ती पॉय, डायनिंग टेबल यावरील क्षारांचे पांढरे डागही काढता येतील. इतर प्रकारचे डाग याने जाणार नाहीत.

धुळी बद्दल अगदी अगदी
रस्त्यावरचं घर हा फायदा आणि त्यासोबत धूळ फ्री येते हा तोटा, बांधकाम तर सुरूच आहेत आजूबाजूला

मानव, हो Jopasu duster कारसाठी मी वापरतो अजूनही. पण धुवून त्याचे वॅक्स जाते. कंपनीच्या सूचनेनुसार मी फक्त पाण्याने धुतो. तरीही वॅक्स जाते. मग नवीन ब्रश घेणे हाच पर्याय राहतो. आणि कारवर सतत धूळ इतकी बसत असते कि किती वेळा नवीन विकत घ्यायचा असे झाले आहे. वॅक्स स्प्रे करणे हा पर्याय माहिती नव्हता. हा स्प्रे मिळतो का?

माझी कार जास्त वापरली जात नाही. त्यामुळे सदोदित धुळीने माखलेली असते. कव्हरने झाकून ठेवावी तर काहींनी सांगितले कि कार झाकून ठेवल्याने तिचे जास्त नुकसान होते. (आर्द्रता कोंडून राहते, वाऱ्यामुळे कव्हर सतत गाडीला घासले गेल्याने कालांतराने असंख्य मायक्रो-ओरखडे पडतात वगैरे वगैरे कारणे) म्हणून ती झाकूनही ठेवता येत नाही.

दुसरे म्हणजे घरी वापरण्यासाठी त्या कारसाठी बनवलेल्या मोठ्या डस्टर पेक्षा (मी तो कधी घरी नाही वापरला) टेबल, फर्निचर, लॅपटॉप इत्यादींच्या कानाकोपऱ्यातली धूळ पाहता हे डस्टर जास्त व्यावहारिक वाटताहेत. (हे आता सहज शोधले असता दिसले). वॅक्स स्प्रे करणे हा पर्याय असेल तर हे पाचसहा मागवावे म्हणतो.

>> Isopropyl alcohol ने (surgical spirit / hand sanitizer) कापड ओले करून

हि आयडिया आवडली. नक्की मागवतो हे. मायक्रोफायबर कापड सुद्धा.

>> सगळ्यात बेस्ट म्हणजे हेपाफिल्टर्स लावून त्यावर ब्लोअर लावुन डक्टिंग सगळ्या खोलीत फिरवायचे आणि घरात जरा पॉझिटिव्ह व्हाईब्स आपलं प्रेशर मेन्टेन करायचे.

याविषयी जरा अधिक सांगाल का? काय नक्की आहे हे? मी शोधले असता एसी ला लावायचे फिल्टर दाखवले मला ऍमेझॉन.

>> Cleevo चे किचन cleaner मस्त आहे ओट्याजवळचे टाईल्स वरचे तेलकट जिद्दी डाग सहज गेले ते detergent आणि scrubber ने घासूनही जात नव्हते काळी काढई सुद्धा स्वच्छ होते असा दावा आहे त्यांचा ते काही अजून करून पाहिलं नाही

किल्ले थँक्स. पण हा विभाग माझ्याकडे नसल्याने मी हे गृहखात्याकडे पाठवले आहे Happy

धनवन्ती, होय आसपास बांधकाम असेल तर धुळीचा प्रचंड त्रास असतो हे मी पूर्वी अनुभवले आहे. परंतु माझ्या इथे तळजाईला काहीही असे बांधकाम वगैरे नाही तरीही कुठून इतकी धूळ येते कळत नाही.

अतुल, मी तो कार डस्टर कारसाठी वापरत नाही. फक्त घरातच वापरतो.
टेबल, फर्निचर टीव्ही (स्क्रीन वगळून) , लॅपटॉप की बोर्ड, प्रिंटर, लगेज सगळ्या साठी. लांब strands मुळे कोपऱ्यातले पण साफ करता येते.
धूळ खूपच साचली असेल परगावी जाऊन आले असता वगैरे तर त्यासाठी हा लगेच वापरत नाही मी. व्हॅक्युम क्लिन करून मग हा वापरतो.
हा पाण्याने तेव्हाच धुवायचा जेव्हा त्याने धूळ पकडणे बंद केलेय. याच्या बदलत्या रंगाकडे लक्ष द्यायचं नाही. कुत्र पाणी झटकायला तोंड फिरवतं (हा दोन शब्दांचा वाक्प्रचार नाहीय Wink ) तसा हा ब्रश दांडा धरून फिरवायचा आणि तेव्हा धूळ बाहेर सोडतोय का बघायचं. सोडत असेल म्हणजे वॅक्स संपृक्त झालाय. तेव्हा हा धुवायचा असतो पण पहिला ब्रश १ वर्ष+ गेला आणि सुरवातीला प्रयोग म्हणुन तो पुष्कळच धूळ साचलेल्या ठिकाणीही वापरला होता. धुतला की रिवॅक्सिंग करावं लागतं. मी तर केलं नाही, नविन ब्रश घेतला. दीड वर्ष होत आली अजुन चालतोय, पण लौकरच बदलावा लागेल असे दिसतेय.
रिवॅक्सिंग करायला हे रिज्युव्हिनेटर मिळते.
तुम्ही लिंक दिलीय ते पंजा खुपसून साफ करायचे डस्टर सुद्धा चांगले आहेत छोट्या जागांसाठी.

आपल्याकडे घरात पॉझिटिव्ह प्रेशर डिफरन्स मेन्टेन करणारी सिस्टीम मिळत नाही, बनवून घ्यावी लागेल, म्हणुन तो ऑप्शन इथे मी लिहिला नव्हता. आधीच्या कंपनीत क्लिनरूम (विशेष नॉर्म्स नसलेली) साठी बनवून घेतला होता मी, एका सेंट्रल एअर कूलर सिस्टीम बनवणाऱ्या कडुन. (तो एरिया तसा मोठा ~४००० sft होता.)

धूळ आणि त्यापासून बचाव हा प्रश्न किरकोळ नाहीय, अख्खा धागा बनू शकतो. किती वेळ, पैसे आणि रिसोर्सेस वाया जातात.

ती sellotape ची कल्पना आवडली. नवऱ्याच्या घरी माझ्या साड्या ठेवलेलं कपाट आहे तिथे धूळ जायची म्हणून फटीत sponge च्या पट्ट्या लावलेल्या, त्यातूनही धूळ जाते म्हणून वैतागून ते कपाट उघडतच नाही तिकडे गेले की. पुढच्या वेळेस ही चिकटपट्टी लावेन किंवा मोहमाया सोडून साड्याchi विल्हेवाट लावेन. खरतर जितके कमी समान घरात तितक धूळ साफ करण्याचा त्रास कमी हे फार उशिरा उमजलेय मला

स्वस्त उपाय:
लिटरभर पाण्यात ट्राई सोडियम फॉस्फेट असणारी पावडर ( उदाहरणार्थ विम) दोन चमचेभर घाला. चांगले ढवळून पाणी एक दिवस झाकून ठेवा. दुसरे दिवशी वरचेच निवळलेले पाणी एका बाटलीत भरून ठेवा. ( खालचा गाळही फरशीसाठी वापरता येईल) याने अगदी मोबाइलची स्क्रीन सुद्धा स्वच्छ होते. आरसाही स्वच्छ होतो. चिकटपणा जातो. कापड याने ओले करून पुसायचे.
[ विमची जाहिरात नाही ही.]

जिथून धूळ येते तिथे म्हणजे दारं, खिडक्या यांच्या वर बाहेरच्या बाजूने ठिबक सिंचनाचे पाईप लावावेत. त्याला एक लवचिक ऩळी जोडून ती पाण्याच्या टाकीला जोडावी. म्हणजे द्दिवसभर पाणी टपकून धूळ त्यात शोषली जाईल आणि घर सुद्धा थंड राहील.

किंवा मग वेळोवेळी जास्तीचं फर्निचर, कपडे घराबाहेर काढून त्याला आग लावावी.

मध्ये कुणीतरी फळांसंदर्भात एक पोस्ट टाकली होती
कुठल्या धाग्यावर नक्की आठवत नाही.
" द्राक्ष महाशिवरात्रीनंतर खावीत , कलिंगडाचा सीझन आला की द्राक्ष खाऊ नयेत. .... " असच काहीतरी.
म्हणजे कुठल्यावेळी कुठली फळं खावीत आणि कधी खाणं बंद करावी.
आठवतयं का कुणाला ?

मी पाण्याचे ओलसर ( damp ) फडके घेतो आणि प्रत्येक वस्तूचा पृष्ठभाग स्वच्छ करतो. दोन चार मोठे भाग पुसल्यावर फडके पाण्याने स्वच्छ करुन पुन्हा वापरतो.
मायक्रोवेव्ह, रेफ्रिजरेटर लागलीच कोरड्या टॉवेलने पुसायचे म्हणजे पाण्याचे डाग रहात नाही.

मायक्रोफायबर टॉवेल - पुन्हा पुन्हा वापरता येते.
https://www.uline.ca/BL_6985/Uline-Microfiber-Towels

>>>>>मायक्रोवेव्ह, रेफ्रिजरेटर लागलीच कोरड्या टॉवेलने पुसायचे म्हणजे पाण्याचे डाग रहात नाही.
होय चांगली युक्ती आहे. नाहीतर मग क्षारांचे डाग रहातात.

^^^किंवा मग वेळोवेळी जास्तीचं फर्निचर, कपडे घराबाहेर काढून त्याला आग लावावी^^^°
त्याने जास्त धूर आणि राख तयार होईल, म्हणजे अजून जास्त धूळ.
त्यापेक्षा ते कोणाला दिले तर पर्यावरण पण जपले जाईल.

पेण
कडवे वाल आणि ज्यू कम्युनिटी. मराठी गीतांना संगीत देणारे यशवंत देव?

मिडवेस्ट मध्ये माझ्या भाचीला भेटायला जाणार आहे. भाचीची मुलगी नुकतीच टीनएजर झाली आहे आणि जेन झी असल्याने सेन्सिटिव्ह वगैरेही आहे. उत्तम चित्रे काढते ,पुस्तके, डूडलिंग, गाणे, व्हायोलिन वगैरे आवडीनिवडी. अशा मुलीला अशी काय गिफ्ट देता येईल की तिला ती आवडेल? कपडे वगैरे नको वाटते कारण साइझ, आवडनिवड खूप पर्सनल असते , पण तरीही इंडियन ट्रॅडिशनल काही दिले तर आवडेल का ? जेन झीशी माझा काहीच संपर्क नसल्याने डायलॉग नाही.
अमेरिकेतील टीनएजर मुलींच्या आयांनो काही तरी सुचवा .. भारतातून किंवा अमेरिकेत कुठेही घेऊ शकते अशी गिफ्ट सुचवा.

ज्युलरी, stuffed animals आजकाल स्विशमेलो ट्रेंडी आहेत. व्हिडिओ गेम्स खेळत असेल तर पन्नास, साठ डॉलरचे गिफ्ट कार्ड, आर्ट्स अँड क्राफ्ट मेकिंग किट - मायकेल्समधे भरपूर मिळतात. इंडियन ट्रेडिशनल सहसा भरपूर असते आणि तितके वापरले जात नाही.

चित्र काढण्यामधे सिरियस इंटरेस्ट असेल तर Blick Gift Cards पण घेऊ शकता. किंवा तिलाच तिथे घेउन जाऊ शकता.
आमच्याकडच्या मुलांना भारतातल्या स्टेशनरी दुकाना मिळणारे Staedtler चे खोडरबर, शार्पनर आणि मेकॅनिकल पेंसिली आवडत असत त्या वयात

इंडियन ट्रेडीशनल आईबापाना आवडतं. अपवाद असतील पण मुलांना अजिबात आवडत नाही.
मुलगी आहे तर कूल काही तरी मेकप किट, फेक नेल्स जे आई बाप मुलगी लहान लहान करुन घेऊ देणार नाहीत ते द्या. तुम्ही एक कूल आत्या/ मामी काय असाल ते बनाल. किंवा गेमिंग कन्सोल असेल तर पीएसफाय, एक्सबॉक्स गेम्स द्या. किंवा स्टॅनली स्टाईल टंबलर द्या. हा गर्ल्सना का आवडतो कोण जाणे. कितीही घेतले तरी हायड्रेशन पुरतच नाही.

किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे आवडत्या स्पोर्टिंग टीमची टूक (अमेरिकेत बीनी म्हणतात, थंडीत डोक्यावर घालायची पॉम पॉम असलेली टोपी) द्या. मिडवेस्टात आहे म्हणजे टूक कामाची पण आहे, आणि ट्रेंडी कूल टीमची असेल तर बेस्टच! कोलोरॅडोला असेल तर अ‍ॅव्हलांचची द्या. मला पण एक द्या! Lol अ‍ॅव्हलांच असेल तर मकिननची जर्सी द्या! शी वुड लव्ह!! जर्सी फार महाग असतात पण. शिकागो असेल तर ब्लॅक हॉक्सची द्या.

Pages