Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हल्ली online साड्या विकण्याचा
हल्ली online साड्या विकण्याचा बिझनेस जोरात आहे. अनेक वेळा साड्या अगदी रीतसर नेसून व्हिडिओ करतात. अश्या नेसलेल्या साड्यांच पुढे काय केलं जात असेल ? म्हणजे इस्त्री करून तो पीस विकतात की त्या मॉडेल ला तो देऊन टाकतात ? एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रथा सारीज अनेक वेळा व्हिडिओ मध्ये अंगावर घेऊन दाखवते पण सायली राजाध्यक्ष बरेच वेळा नेसून दाखवते तेव्हा हा प्रश्न नेहमी मनात येतो.
मैत्रिणीकडे गाजर चालायचं>>
मैत्रिणीकडे गाजर चालायचं>>
आमच्या कड़े पण चालत आम्ही गाजर चा हलवा करतो उपासाला
भारीच, गाजरका हलवा.
भारीच, गाजरका हलवा.
आमच्या कड़े पण चालत आम्ही गाजर
आमच्या कड़े पण चालत आम्ही गाजर चा हलवा करतो उपासाला >> काही हरकत नाही. शेवटी श्रद्धा महत्त्वाची.
;D
ममो, तो पीस विकतात कोणी ऑर्डर
ममो, तो पीस विकतात कोणी ऑर्डर दिली तर. ड्रायक्लिन , इस्त्री वगैरे करतात.
आमच्या मूळ गावी उपासाला गरा
आमच्या मूळ गावी उपासाला गरा चालतो.
गरा म्हणजे शिराच. फक्त तो साखरसम्राट शिरा असतो.
उस आणि साखर कारखाने बक्कळ असल्याने.
एकतर शनिवारी दिवस पाळतात.
म्हणजे त्या दिवशी शेतात कोणीही कामाला जायचे नाही
सुट्टी घ्यायची.
गावात स्वयंभू हनुमान मंदिर त्यामुळे कळत्या वयापासून मुलं शनिवारी उपवास करतात.
शिरा खातात. मला कळालं तेव्हा odd वाटलेलं.
कारण आम्ही शहरात राहायचो तेव्हा साबुदाणा खिचडी अथवा वरई खाताना पाहिलेले फक्त. अर्थात शेतातल्या प्रचंड अंगमेहनत कामानंतर आठवड्यातली एक सुट्टी आणि तो शिरा ह्याने फार काय डायट।प्रमाण मोडलं नसेलच.
पुण्यात आलो तेव्हा काकडी उपासाला चालते म्हणाल्यावर जरा शंकाच आलेली.
कारण।कोपु मध्ये कोणाला खाताना पाहिले नव्हते.
खाल्ली पाहिजे।पोटात फायबर जाईल।नुसत्या साबुदाणा स्टार्च सोबत.
आता देश तसा वेष म्हणून जिथे जाईल तिथलेच बरोबर असे मान्य करतो.
कारण मुळातच बटाटा , मिरची आणि साबुदाणा बाहेरून आलेला असावा.
त्यांना आपले म्हणालो आहे आपण तर बाकी भेदभाव कशाला.
खरे आहे, झकासराव.
खरे आहे, झकासराव.
शेवटी आपल्या कुटुंबात काय चालते तेव्हढे पाहावे आणि तसे पाळावे! उगीच नवीन पदार्थ ॲड करायला जाऊ नये, आणि जुन्या चालत आलेल्या पदार्थाला क्रॉसही करू नये!!
मुळात म्हणजे, उपासाला खाणे ही कन्सेप्टच मुळात , सेल्फ कॉन्ट्रेडिक्टरी आणि फक्त भारतीय आहे!!
झकासराव उत्तम सुजाण पोस्ट.
झकासराव उत्तम सुजाण पोस्ट.
खरे आहे झकासराव
खरे आहे झकासराव
आम्ही एकादशी दुप्पट खाशी
आम्ही एकादशी दुप्पट खाशी गटातले असल्याने, जेव्हा दोन्ही वेळा उपास असतो तेव्हा एक वेळ हल्ली सात्विक बेत करते. विविध कंदमुळे मीठ घालून शिजवते. सुरण, लाल भोपळा, बटाटा, अळकुडी, रताळे यांची तूप जिरे फोडणी देऊन उपासाची भाजी करते. फळं असतात.
एकदा सा खि, लापशी किंवा उपासाचे थालीपीठ लापशी असा बेत करते. रेडिमेड चिवडा, शिंगाडा लाडू, राजगिरा लाडू वगैरे.
सायली राजाध्यक्ष बरेच वेळा
सायली राजाध्यक्ष बरेच वेळा नेसून दाखवते तेव्हा हा प्रश्न नेहमी मनात येतो
>>>>> मलाही हाच प्रश्न पडला होता.
मला नाही आवडणार कितीही ड्रायक्लीन केली तरी अशी साडी. दुकानात अंगावर घडी टाकून बघणे वेगळे.
ड्राय क्लिन करुन किंचित रया
ड्राय क्लिन करुन किंचित रया घालवुन विकतात? कै च्या कै.
साडीविषयी माहीत नाही मात्र
साडीविषयी माहीत नाही मात्र टेक रिव्ह्यू चॅनेल वाले अश्या विकत घेतलेले मोबाइल आणि टॅब कमी किमतीत विकायचे असे उल्लेख ऐकलेत.
मला एक प्रश्न नेहमी पडतो की
मला एक प्रश्न नेहमी पडतो की इसवीसन पूर्व १०५० वगैरे असे लिहिलेले असते.
इसवीसनाच्या पूर्वीची कालगणना कशी काय करतात?
मुळात कालगणना सुरूच झाली ०० पासून, तर आधीची वर्षे कशी मोजतात?
अंदाजे जिझस जन्माला तेव्हा AD
अंदाजे जिझस जन्माला तेव्हा AD आणि त्याच्या आधी BC म्हणतात. त्याला हल्ली CE म्हणतात. कॉमन एरा.
आता तुम्ही चक्रम ख्रिस्ती नसाल, रादर देवाने सात दिवसात जग निर्माण केलं वाटत नसेल तर त्याआधीही जग होतंच ना? कालगणना आज पासून चालू करायची ठरवली तर आता वर्षं #एक असेल. गेलं वर्ष वजा एक असणार ना? वजा म्हणण्यापेक्षा बिफोर म्हणणे सोपे.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापासून नवी कालगणना चालू केली म्हणजे त्या पूर्वी बिफोर राभि म्हणतील तसंच.
मी शाळेत होते तेव्हा इ स वी
मी शाळेत होते तेव्हा इ स वी पुर्व ५०० लहान आणि इ स वी पुर्व ४०० मोठे ही भानगड कळायची नाही.
जगभर वेगवेगळ्या कालगणना आहेत. भारतातच शालीवाहन आणि विक्रम संहत ह्या दोन ठळक कालगणना आहेत ज्यावर कॅलेंडरे छापलीत.
त्यामुळे एक साधारण अंदाज यावा यासाठी
ख्रिस्तजन्म बेस मानुन एक जागतीक कालगणना स्विकारली गेली. आपापली त्या अनुसार ठरवायची. मग रामायण १५०० वर्षे आधी म्हटले की ते ३५०० वर्षे जुने आहे हे लक्षात येते.
उपासाला काय चालते हे ठरवायला काही जागतीक मापदंड आहे का??
ख्रिस्त जन्म हा फक्त एक
ख्रिस्त जन्म हा फक्त एक संदर्भबिंदू reference point म्हणून घेतला आहे. त्यावेळी कुणी कालगणना करायला सुरुवात नाही केली.
जसं सेल्सिअस चा संदर्भबिंदू बर्फाचे तापमान आहे, त्याखाली तापमानच नसते असे होत नाही. फॅरनहाईट चा संदर्भबिंदू वेगळा आहे. आपण ठरवलेल्या संदर्भबिंदूच्या मानाने नंतर की आधी यावर +ve -ve ठरते.
ठरवला जागतिक मापदंड तरी आपण
ठरवला जागतिक मापदंड तरी आपण पाळणार आहोत का?
अमेरिका घोळ घालते सगळीकडे. ते
अमेरिका घोळ घालते सगळीकडे. ते ख्रिस्ती कॅलेंडर तरी का पळतात कळत नाही. बाकीच्यांपेक्षा वेगळे काहीतरी टिळक आगरकर पंचांग वगैरे पाळायला पाहिजे त्यांनी.
आता लक्षात आलं की सेल्सिअस
आता लक्षात आलं की सेल्सिअस सारखी Fahrenheit स्केल कशी तयार झाली? त्याचे रेफ्रन्स पॉईंट काय आहेत ते मला माहितच नाही आहे. म्हणून शोधले. बऱ्याचदा रिव्हिजन झालेली अगदीच क्रूड स्केल आहे ती. तरीही काही देश ( यू नो कोण!) ती का कवटाळून बसलेत!
हर्पा, एकदम परफेक्ट उदाहरण.
हर्पा, एकदम परफेक्ट उदाहरण.


पण तरीही, ख्रिस्त जन्माच्या आधीच्या गोष्टी, वर्षानुसार ठरविणे हे किती अवघड काम आहे!!!
साधना ताई ,
जागतिक मापदंड !
उपासाला खाणे ही कन्सेप्टच
उपासाला खाणे ही कन्सेप्टच मुळात , सेल्फ कॉन्ट्रेडिक्टरी आणि फक्त भारतीय आहे!!>>>
ठरवला जागतिक मापदंड तरी आपण पाळणार आहोत का?>>>>
पण तरीही, ख्रिस्त जन्माच्या
पण तरीही, ख्रिस्त जन्माच्या आधीच्या गोष्टी, वर्षानुसार ठरविणे हे किती अवघड काम >>>>
का अवघड वाटते? आपला पहिल्या शतकापासुनचा आणि त्या आधीपासुनचा ज्ञात इतिहास माहित आहे ज्याची ज्ञात कालगणनाही आहे. ह्यातला बहुतांश इतिहास ग्रीक व रोमन इतिहासात नोंद झालीय म्हणुन आहे. आपल्याकडे लिखित काही असण्याची पद्धत नाहीय त्यामुळे भांडायचे भरपुर स्कोप्स निर्माण होतात आणि कित्येकांना खाद्य मिळते. (म्हणुन महाराजांचे बड्डे दोनदा साजरे करावे लागतात).
ठरवला जागतिक मापदंड तरी आपण
ठरवला जागतिक मापदंड तरी आपण पाळणार आहोत का?>>>> सगळे भारतीय एकमतावर येतील असे काही आहे का??
धर्मेंद्रचे काय सुरु आहे?
धुळीची खूप समस्या आहे. कार,
धुळीची खूप समस्या आहे. कार, बाईक, लॅपटॉप, कीबोर्ड, फ्रीज, किचन, टेबल, खुर्च्या, पंखे, कपाट, बॅग्स, कपडे, फर्निचर... नाव घ्या आणि तिथे धूळ आहे! बरं नियमितपणे आठवड्याला वगैरे साफ करावं तर त्यालाही मर्यादा येतात. प्रत्येक आठवड्यास सर्वत्र साफसफाई प्रॅक्टिकल सुद्धा नाही. मग धूळ जिंकते आपण हरतो. धुळीचे थर साचत राहतात. आणि मग एखादी चांगली चकचकीत वस्तू केवळ धुळीने रया जाऊन डल्ल दिसू लागते.
पूर्वी व्हॅक्युम क्लिनर होता, पण तो अजिबात प्रभावी नव्हता. नुसताच आवाज आणि चिकट धूळ मात्र तशीच. त्यामुळे व्हॅक्युम क्लिनर स्वतःच धूळ खात पडून होता किती वर्षे. आणि एकदिवस टाकला देऊन कुणालातरी.
धुळीच्या समस्येवर कोणकोण माबोकर आपापल्या घरी कोणत्या प्रभावी उपाययोजना करतात जाणून घ्यायला आवडेल. हल्ली विविध नवनवीन प्रॉडक्ट्स येतात (ब्रश, क्लिनर वगैरेवगैरे) पण आपल्याला माहिती नसते. तोही यानिमित्ताने माहिती करून घेण्याचा उद्देश आहे.
बहुतेक तुम्हीच कार
बहुतेक तुम्हीच कार क्लिंनिंगच्या एका ब्रशबद्दल मागे पोस्ट केले होते ना?
वॅक्स कोटिंग असलेला cotton strand ब्रश. Jopasu duster.
मी तो वापरतो आणि एक दिवसाआड एक खोली आणि रविवारी हॉल असे साफ करतो. त्यावरचे वॅक्स गेले की तो धुवून त्यावर वॅक्स स्प्रे करायचा, पण वर्षभर सहज जातो त्या शिवायही. मग सरळ रिप्लेस करायचा ब्रश.
शोकेस आणि वरच्या माळ्याची दारं यात दोन दारांच्या फटीतून धूळ जात राहते पण आपण ते कधीतरी उघडतो. त्यावर ट्रान्स्परंट टेप लावून ठेवतो, अगदी बारकाईने बघितली तरच दिसते. कधी उघडले की टेप रिप्लेस करायची. आधीची पूर्ण काढायची.
70% किंवा त्याहून कमी प्रमाणातल्या Isopropyl alcohol ने (surgical spirit / hand sanitizer) कापड ओले करून पुसले तर चिकटपणा/धुळीचा चिकटलेले थर काढता येतो. पंख्याची पातीही छान स्वच्छ होतात.
स्वयंपाकघरातील कपाटांवरील गॅस मुळे होणारा चिकटपणाही काढता येतो, स्विचबोर्ड छान साफ होतो.
(Safety information: पण हे जरा जपून वापरायचे - हातात ग्लोव्ह्ज आणि नाकाला मास्क, नाकात त्याच्या फ्युम्स जातील एवढ्या प्रमाणात वापरायचेच नाही, तरीही दारं खिडक्या उघड्या ठेवून आणि पंखा सुरू ठेवून वापरायचे, आणि दहा मिनिटांच्यावर कधी वापरायचे नाही. महिन्या दोन महिन्यातून एकदा वापर करावा.)
याहून चांगल्या टिप्स असतील तर मी पण त्यांच्या प्रतीक्षेत.
मानव, हे कुठे मिळते?
मानव, हे कुठे मिळते?
नेहमीचेच सॅनिटायझर घ्यायचे का? कोरोनाच्या वेळेस जे वापरायचो ते?
Cleevo चे किचन cleaner मस्त
Cleevo चे किचन cleaner मस्त आहे
ओट्याजवळचे टाईल्स वरचे तेलकट जिद्दी डाग सहज गेले
ते detergent आणि scrubber ने घासूनही जात नव्हते
काळी काढई सुद्धा स्वच्छ होते असा दावा आहे त्यांचा ते काही अजून करून पाहिलं नाही
किल्ली, करून बघ आणि लिही इथे.
किल्ली, करून बघ आणि लिही इथे.
अतुल, तुम्ही माझाच प्रश्न लिहिला आहे असे वाटतेय.
माझ्या घराजवळ सुमारे ४० मजली इमारतींचे ( अनेकवचन नोट प्लीज) बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मी आधी आटोकाट पर्यंत केले धूळमुक्त घरासाठी... शेवटी......
.
.
.
.
अती जास्त धूळ ही माझ्या घरचा अविभाज्य भाग आहे हे मान्य करून स्वतःची मनशांती टिकवली आहे.
Pages