दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरपा Lol

तसं तर बटाटा कंदमूळ आहे म्हणजे आपण भाजीत घालतो, तो चालतो उपासाला. (बटाटा ही भारतीय नाही Happy )
खरंतर उपासाची लिस्ट सर्वांची सेम नसते जसं की काहींकडे जिरं कोथींबीर उपासाला चालते आमच्या कडे नाही.मिरची भाजी असून चालते.घरच्या मोठयांना (विचारा)विचारले तरी अँव्हाकाडो बद्दल माहित असण्याची शक्यता कमी.पण अँव्हाकाडो चालत असावा कारण फॅट जास्त असणारे असले तरी ते फळ आहे,उपासाला फळं सगळी चालतात.ते सँडविच वगैरे बनवून त्याची भाजी केलीय लोकांनी त्याची फारशी चव नसल्यामुळे. त्यामुळे असंच खायला किंवा बदाम दूध किंवा साधं दूध वाली स्मूदी चालेल अर्थात ब्रेड मसाले घातलेले सँडविच नाही चालणार.

अव्हकाडो खाताना सात्विक वाटते का? मला वाटते. त्याचा गर असा तोंडांत विरघळतो की सात्विक समाधीच लागते. डोळे मिटून एक फोड खाल्लीत तर ब्रम्हानंदी टाळी लागते. हे बघता तो उपवासाला चालावा. शेंगदाणे, बदाम पण तसेच. खाताना सत्व गुण उफाळून आल्यासारखे वाटतात. जनरली हाय डेंडिंटी फॅट असलेले पदार्थ उपवासाला चालतात. त्यामुळे अव्हकाडो त्याकाळी असता तर उपवासाला चालणाऱ्या गटात त्याला पूर्वजांनी टाकले असते अशी मला खात्री आहे.

अव्हकाडो/अव"काडो" >> हा आपल्यातले "अव"गुण काढण्याची शिकवण देतो, त्यामुळे उपासाला उत्तम आहे.

हपा Lol
अव गुण काढती: स: अवकाडो. अशी ती फोड आहे . जी तोंडांत टाकली की सात्विक वाटते.
आपल्याला ठरवायचे असेल तर तो चालणाऱ्या गटात टाकावा. तो बहुगुणी आहे. एक खाल्ला तरी बराच वेळ पोट भरल्याची भावना देते. तुपाळ तडस प्रकारे नाही तर सात्विक लीन प्रकारे.

Lol
बरं....उद्या चतुर्थीला खाईन मग अव काडो !!

उपासाला पनीर - चीज चालते ( म्हणजे असे मी तरी गृहीत धरले आहे!)
Happy

दही दूध तूप चालते तर पनीर,कलाकंद तरी नक्कीच चालायला हवे. आणि उपवास करायचाय बरेच ऑप्शन्स आहेत तर अवोकाडोचा का अट्टाहास? Proud की स्टार्च, गोड पदार्थ टाळायचे आहेत म्हणुन?

मानव, खरे कारण हे, की ते महागमोलाचे एव्होकॅडो फळ घरी आणून तसेच पडले आहे!
त्याचे काही करायला मुहूर्त लागला नाही!
आणि स्टार्च/ गोड टाळायचे तर आहेच, नेहमीप्रमाणे !
Happy

अव्होकाडो उपासाला चालत नाही. खरंतर कधीच चालत नाही. पाय कुठे असतात त्याला चालायला?!

शेंगदाण्याचं तेल चालत नाही याचं कारण बहुधा ते घाण्यावरून काढून आणावं लागतं, त्यात भेसळ होऊ शकते हे असावं. तुपाची सगळी प्रोसेस घरी होते त्यामुळे खात्रीशीर.
पण मग साबुदाणे कुठे घरी करतात? पाणी कुठे घरी करतात? - असले प्रश्न विचारू नयेत. उपासाचं पुण्य कॅन्सल होतं प्रश्न विचारले तर.

उपास (उप+वास) याचा खरा अर्थ ईशचिंतनात दिवस कंठावा असा आहे. त्यामुळे हलका, पचायला सोपा, कमी आहार घ्यावा. ज्याने पित्त/अ‍ॅसिडीटी/गॅसेस/अपचन वगैरे मूळ उद्देशापासून डिस्ट्रॅक्ट करणार्‍या भानगडी होऊ शकतात ते खाऊ नये.

उपवासाचे खाणे काय चालते आणि काय न चालते हा अतिशय विनोदी प्रकार वाटतो मला. एकाच्या घरी जे चालते ते दुसऱ्याकडे नाही... त्यामुळे फार विचार न करता जे पटेल ते खावे... त्यात फार लॉजिक शोधू नये..

मानव Proud

उपवासाचे खाणे काय चालते आणि काय न चालते हा अतिशय विनोदी प्रकार

+ १

आपापले ठरवा काय खायचे.

एका घरी भाजलेले गहू उपासाला चालतात असे बघून-ऐकून गंमत वाटली होती.

>>अव्हकाडो खाताना सात्विक वाटते का? मला वाटते. त्याचा गर असा तोंडांत विरघळतो की सात्विक समाधीच लागते. डोळे मिटून एक फोड खाल्लीत तर ब्रम्हानंदी टाळी लागते. हे बघता तो उपवासाला चालावा

सहमत Rofl

कर्नाटकात बर्‍याच भागात उपवासाच्या दिवशी कांदा लसूण नसलेल्या शाकाहारी भाज्या चटण्या आणि पोळी , किंवा ज्वारी/बाजरी/नाचणीची भाकरी चालते. तांदळाचे पदार्थ चालत नाहीत . माझ्या माहेरच्या बर्‍याच मंडळींना हिरवी मिरची चालते/ सुकी चालत नाही, कोथिंबीर चालत नाही, काकडी कधि चालते कधी नाही असे रुल्स फार विनोदी वाटतात

का नांकडे बरेचदा दुपारचे नेहमीचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाऐवजी 'टिफिन' असा उपवास असतो - त्यात इडली, डोसे, उपमा, पोळी / पराठे /पुर्‍या आणि भाजी हे सर्व चालतंय.

उपवास करायचाय बरेच ऑप्शन्स आहेत >> हे जिंकलेलं वाक्य आहे Lol
उपवास म्हणजे काहीच ऑप्शन नाही पासून स्थित्यंतर होत आपण इथपर्यंत आलो आहोत. असो, उपवास न करणारे पण काही केवळ उत्कृष्ट अन्न खातात अशातला भाग नाही. ज्याला जे पाहिजे ते त्याने खावं किंवा न खावं.

पनीर चालतं (म्हणे), चीझ चालत नसावं (गुजरातेत तेही चालेल बहुतेक), आईस्क्रीम चालतं, फ्रूट सलाड चालवून घेतात बाया बापड्या, कुट्टू (बकव्हीट) चालतं, खेड चिपळूण साईडला शेतकरी कुटुंबांत शिरा चालतो (अर्थात शेतीत कष्ट घेतल्यावर उपासाची गरज पडत नसेल), माणगाव गोरेगाव भागात साळीच्या लाह्या, दूध पोहे/भात चालतो.
मग त्या अव्हाकाडोने काय घोडं मारलंय?

आम्ही चिरंजिवांकडे अमेरीकेत गेलो होतो, तेव्हा त्याच्या अमेरीकन मित्राला साबुदाणा खिचडी खायला दिली. वर ' we eat this when we fast' असं सांगितल्यावर तो ' do you eat or do you fast?' असं म्हणाला. तेव्हा मला माझ्याच वाक्यातली गंमत दिसली!

फळं म्हणजे, आता टोमॅटो, वांगी, भेंडी हीदेखील फळेच आहेत, पण उपासाला नाही चालत!
>>आमच्याकडे टोमॅटो वापरतात उपवासाला..

अनया Lol

कोकणात काही ठिकाणी मूग चालतात उपासाला, आमच्याकडे सासरी माहेरी नाही चालत. कोथिंबीर चालते, धने नाही चालत.

अनया Happy
काही ठिकाणी रवा ही चालतो बघितलं आहे, उपासाच्या दिवशी मुद्दाम रव्याची खीर करतात आपण साबुदाण्याची किंवा आरारुट ची करतो तशी.

माझ्या एका कानडी मैत्रिणीकडे गाजर चालायचं, शाळेत असताना तिने उपासाच्या दिवशी दिलेली गाजरवडी मी खाल्ली, आई म्हणाली आपल्याकडे नाही चालत गाजर.

Pages