दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतरंगी, अमेरिकेला बजेट ट्रिप करणार असेल तरः
राहण्यासाठी airbnb : $100-$120. नॅशनल पार्क मध्ये airbnb नाही मिळणार पण हॉस्टेल , बंक बेड ह्याच दरात होती. नॅशनल पार्क मध्ये कमिक कमी ६ महिने तरी आधी बुकींग करावे लागेल
एकवेळचे जेवण रेस्टॉरंट मध्ये १००/१२०, फास्ट फुड (चिपोटले, टॅको बेल) , कॅश ऑन्ली रेस्टॉरंट मध्ये $५० च्या आत. आणि जर airbnb मध्ये घरी बनवले तर त्यापेक्षा कमी.
गाडी kayak , kloog सारख्या वेबसाईट वरुन भारतातच बुक करणे. अमेरिकेत भाडे जास्त लागेल भारतात $२०० ( १५००० ते १६००० रुपयात) मध्ये आठवडा मिळेल.
चांगले प्लॅन केले तर पेट्रोल $१०० आठवडा खुप झाले. कॅलिफोर्निया मध्ये ५०% जास्त. कोस्ट टु कोस्ट ड्राईव्ह केले तर थोडे जास्त लागेल.
नॅशनल पार्क प्रवेश फी : साधरणतः $३५ सगळ्यासाठी प्रत्येक पार्क साठी सगळ्याना मिळुन.
बहुतेक चांगली म्युझियम्स फुकट आहेत. जी नाहित त्याची तिकिटे groupon वेबसाईट वर ५० ते ६० % सवलती मध्ये मिळु शकतिल.
त्यामुळे मुख्य शहराच्या बाहेरच्या ठिकाणी, बजेट मध्ये आजच्या घडीला दिवसा $३०० -$३५० भरपुर झाले

महाग गोष्टी:
मोठ्या सिटी ( न्युयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को सारख्या) मध्ये हॉटेल , सिटी पब्लिक ट्रान्सपोर्ट खुप महाग आहे. ह्या शहरात दिवसा $१०० - $२०० जास्त खर्च येउ शकतो. मोठ्या शहरात मध्ये आपल्या सुरक्षेसाठी थोड्या चांगल्या हॉटेल रहावे लागते.
डिसनी थिम पार्क मध्ये जर दोन दिवस जायचे असल्यास ४ जणासाठी कमित कमी $१००० लागतिल.
कॅनडी स्पेस सेंटर , युनिवर्सल स्टुडियो, सी वर्ड सारखी थिम पार्क सारखी ठिकाणे पण खुप महाग आहेत. ($८० ते $१५० प्रती व्यक्ती )
आधी प्लॅन नाही केले तर विमानाचे तिकिट सुध्धा महाग होउ शकते.

एक उत्सुकतेने भरलेला प्रश्न - ८५$ हे अमेरिकन माणसाला महाग की भारतीय/कुठल्याही परदेशी माणसाला महाग जो त्याची करंसी $ मध्ये रुपांतरीत करणार? आणि हे रेट अमे. नागरिक व नॉन अमेरिकन टुरिस्ट दोघांनाही सारखे आहेत?

जसे ताजमहल फी भारतीय नागरिकांना ₹50 तर परदेशीना ₹1100 आहे. मला ₹50 महाग वाटत नाहीत पण सरसकट सगळ्यांनाच ₹1100 असती तर खुपच महाग वाटली असती.

मी जसे ₹50 ठिक आहे म्हणते तसे अमेरिकन नागरिक $८५ ठिक आहे म्हणेल का? इथे रेट/सल्ले लिहिणारे अमेरिकन नागरिक आहेत/अमेरिकेत स्थायीक आहेत व $मध्ये इन्कम आहे असे मी गृहित धरलेय व त्या अनुषंगाने विचारतेय.

अमेरिकेत सगळी फी सर्वांसाठी समान असते. अपवाद स्टेट/ काउंटी पार्क/ रिक्रीएशन चा असू शकतो तिकडे त्या ठिकाणाचे ( त्या राज्याचे/ काउंटीचे ) तुम्ही रहिवासी असाल तर कधीकधी सूट असते कारण तुमच्या टॅक्स डॉलर्स मधून तो खर्च केलेला असतो.
बाकी तुम्ही अमेरिकेतील का बाहेरचे काही कोणाला देणंघेणं नाही.

>>>>>>>>>८५$ हे अमेरिकन माणसाला महाग की भारतीय/कुठल्याही परदेशी माणसाला महाग जो त्याची करंसी $ मध्ये रुपांतरीत करणार?
ते $८५ मध्ये काय विकत घ्यायचे त्यावर अवलंबुन नाही का? मला प्रश्न कळला नाही.

सानपाडा, नवी मुंबईमध्ये एका माणसापुरता घरगुती जेवणाचा डबा घरी पोहोचवणरं कुणी माहिती आहे का? प्लीज सांगा.

मी जसे ₹50 ठिक आहे म्हणते तसे अमेरिकन नागरिक $८५ ठिक आहे म्हणेल का?>>>नाहि म्हणणार! $ ८५ मधे इथे एका व्यक्तिला पुरेल एवढा किराणा जस तादुळ, बिन्स, मिट्,दुध,चिझ येवु शकत...८५ मधे पुर्ण आठवडा चालेल इतका गॅस्/पेट्रोल भरल जावु शकत..(रोजचा ठराविक कम्युट धरला आहे.)..$८५ मधे डिसेन्ट हॉटेल मधे २-३ लोक जेवण करु शकतात...इथे बहुतेक म्युझियम्,पार्कची तिकिट यापेक्षा खुप कमी आहेत जस कुठलही नॅशनल पार्क बघायला पुर्ण फॅमिलीला फक्त $३५ लागतिल ...
५० रुपयात काय येवु शकेल भारतात?

@आर्च,
तुझा प्रश्न माझ्या एका व्हॉअ‍ॅ ग्रुपवर टाकते आहे. काही कळलं तर सांगते.

सानपाडा, नवी मुंबईमध्ये एका माणसापुरता घरगुती जेवणाचा डबा घरी पोहोचवणरं कुणी माहिती आहे का? प्लीज सांगा.

>>>> आमच्या ऑफ़िसमध्ये काहिजण डबा मागवतात, या नंबर वर सम्पर्क करुन बघा
9004271390
7772834711

प्राजक्ता मनापासुन धन्यवाद. मला हीच माहिती हवी होती. भारतात ५० रुत अर्धा किलो भाजीही येत नाही. डॉलरची पर्चेसिंग पॉवर जबरदस्त आहे. रुपयाची तितकी नाही.

Foot alignment socks कोणी वापरून बघितले आहेत का?
काही रिव्यूज फार ग्रेट असं म्हणतात, काहींच्या मते एकदम ॲवरेज. अर्थात गरज कशी आहे त्याप्रमाणेच अपेक्षा असणार आणि तसेच रिव्यूज कमीजास्त असणार. पण टाचदुखीसाठी कसे आहेत हे मी बघतेय. जास्त वेळ उभं राहणं, टाचदुखी वगैरेसाठी. काही अनुभव असतील तर प्लीज सांगा.

https://amzn.in/d/hY7D0ux

मलाही टाचदुखी चा त्रास आहे, फक्त डाव्या पायालाच. कारण कळत नाही. ईथे अस> काही म्हटलं की एक्स रे सांगतात. त्यात काही निघालं नाही की पेन किलर देतात.. वैताग.

टाचदुखीची साथ आलीय की काय????
माझी पण डावी टाच खूप दुखतेय गेले दोन महिने. घरी मी मऊ स्लीपर वापरते तरच एक एक पाऊल टाकता येतेय. ऑफिस मध्ये काही पावले लंगडत चालते, मग नीट चालता येते.
उजवी पण दुखतेय पण कमी.

सहेली, इथे लिहा ना तुमचे अनुभव आणि उपाय.

टाचदुखीचं कारण प्लँटर फॅशियाटिस आहे का? ते असेल तर कोल्ड कंप्रेस करुन जरा आराम मिळतो. फ्रिझरम्ध्ये ठेवलेली बाटली किंवा झिपलॉक घेऊन दुखर्‍या भागावर थोडा वेळ दाबायची.

टाचदुखीसाठी किंवा भेगांसाठी घरगुती मलम ( आपण केलेले)वापरावे. स्वस्त आणि मस्त.
_________________
एक च.चमचा मोहरीचे तेल+एक च.चमचा तिळाचे तेल( खाण्याचे, दिव्याचे नाही)+ दोन च.चमचे पेट्रोलिअम जेली (आइपीग्रेडच पाहिजे असं नाही.) एका वाटीत थोडे गरम (तव्यावर)केल्यावर सर्व मिसळून एक होते. गार झाल्यावर मलम झाले तयार. चेहऱ्यावर ही लावता येते.
कणभर कापूर मिसळणे ऐच्छीक.

टाचदुखी साठी
टेनिस बॉल खाली ठेवून त्यावर पाय फिरवायचा
खूप जोर न लावता मागे पुढे
तिथे मसाज होतो छान
आइसपॅक ने शेकून देखील फरक पडतो
खूप त्रास असेल तर डॉ ला दाखवून फिजिओथेरपी घेता येईल
फिजिओथेरपी मध्ये waves मसाज आणि कपिंग करतात.

करून बघते वरचे उपाय. गेल्याच वर्षी एका पायाची टाच पंचकर्म करून 5 दिवसांत बरी झाली. या वेळी दुसरी टाच दुखतेय, सेम उपाय केला पण उपयोग होत नाहिये.

प्रज्ञा९, काही वर्षांपूर्वी मला एका वैद्यांनी टाचदुखी संबंधित उपाय देताना आधी विचारले होते की रात्री झोपताना पाणी पिता का? ते बंद करायला सांगितले. शिवाय पालेभाज्या कमी करायला सांगितल्या. शिवाय औषध दिलंच. त्यामुळे एकूण परिणाम म्हणजे त्रास बंद झाला.

>>>>>टेनिस बॉल खाली ठेवून त्यावर पाय फिरवायचा
खूप जोर न लावता मागे पुढे
तिथे मसाज होतो छान
करेक्ट. बॉल हवा बरोबर.

https://www.maayboli.com/node/86847
मायबोली वर्षाविहार २०२५ मुख्य नावनोंदणीचा धागा आला आहे. पटापट नावनोंदणी करा, लोकहो.

मायबोली वर कुणीतरी ॲनिमल communicator ahe असे वाचलेले मी एका धाग्यावर आता ते आठवत नाहीये.. असे कोणी असेल तर मला हेल्प करेल का?

काही वर्षांपूर्वी मला एका वैद्यांनी टाचदुखी संबंधित उपाय देताना आधी विचारले होते की रात्री झोपताना पाणी पिता का? ते बंद करायला सांगितले.>>> झोपण्यापूर्वी किती वेळ आधी पर्यंत पाणी पिऊ शकतो??

फ्रिझरम्ध्ये ठेवलेली बाटली किंवा झिपलॉक घेऊन दुखर्‍या भागावर थोडा वेळ दाबायची.>>> हे मी केलेय उपयोग होतो, पण हा क्युअर नाही.
बरेचसे उपाय आलेत, धन्यवाद खूप खूप लोकांनो Happy

टाच दुखी उपाय... वर्तमानपत्राच्या कागदावर उभे राहून पायाच्या बोटानी कागद १० मिनिटे कुस्करणे

Pages