Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेनझी>>>
जेनझी>>>
काळ्या रंगाचे काहीही घेऊन जा. नक्की आवडेल.
जोक्स अपार्ट, कलमकारी किंवा ब्लॉक प्रिंटिंगचे स्टोल्स, एखादी छानशी टोट बॅग वगैरे देता येईल,
तिच्या आवडी प्रमाणे पेपर
तिच्या आवडी प्रमाणे पेपर क्विलींग, क्रोशे, वारली पेंट आर्ट सेट असे काही आवडते का आई ला विचारून घ्या. माझी लेक क्रोशे ची मॅड पंखी आहे आणि ते कुणी दिले तर तबडतोब ती मावशी/काकी तिची फेव्हरेट बनुन जाते.
पनवेल जवळ असणाऱ्या, आपटा या
पनवेल जवळ असणाऱ्या, आपटा या गावातील चुलीवरचे पेढे खूप प्रसिद्ध आहेत. तेथील तेलवणे कुटुंब, आजही पारंपरिक पद्धतीने चुलीवरती खवा भाजून पेढे बनवतात ..
आर्ट, डूडलिंग आवडते तर मेधा
आर्ट, डूडलिंग आवडते तर मेधा यांनी सुचविल्याप्रमाणे ब्लिक आर्ट मटेरिअल्स स्टोअरचे गिफ्ट कार्ड नक्की आवडेल तिला.
खूप छान छान सजेशन्स मिळाल्या
खूप छान छान सजेशन्स मिळाल्या आहेत. सर्वांना धन्यवाद. मुलगी आर्टिस्टिक असल्याने तिच्या आईशी बोलून काहीतरी तत्समच घ्यायचा विचार आहे.
किंवा स्टॅनली स्टाईल टंबलर द्या. हा गर्ल्सना का आवडतो कोण जाणे. कितीही घेतले तरी हायड्रेशन पुरतच नाही.>> मुलीच नाही तर मोठया बायकाही स्टॅनली टम्बलरच्या प्रेमात वेड्या आहेत .
^^जेनझी>>>
^^जेनझी>>>
काळ्या रंगाचे काहीही घेऊन जा. नक्की आवडेल.^^^
आणि मला वाटत होते की फक्त माझ्याच घरात हे खुळ आहे,
सगळे काही ब्लॅक घेण्याचे...
ग्रॅनाईट किंवा मार्बलचे
ग्रॅनाईट किंवा मार्बलचे पोळपाट कुणी वापरलं आहे का? माझं लाकडाचं खराब झालंय आणि ते गुळगुळीत दगडाचे पोळपाट बघून घ्यावेसे वाटतायत. चपाती/भाकरी चिकटून बसत नाही ना? की परत लाकडीच घ्यावं?
मी इथे मेम्ब्र झालो शिवाय ऐसी
मी इथे मेम्ब्र झालो शिवाय ऐसी अक्शरे आणि मिसलपाव येथे पण मेम्ब्र झालो. पण मला पण मला ऐसीअक्शरे आणि मिसल्पाव वरून काही उत्तर मिळत नाही. मिसल्पावचा रजिस्टर केल्यावर एमेल आले. ऐसीअक्शरे ने ते पण पाठवले नाही. तेथे कुठेच कोन्टकट करायची सोय नाहि. इथले मेम्ब्र तिथेही मेम्ब्र असले तर त्यान्ना माझी अडचण कलवा. किवा काय करू ते मला सान्गा.
आभार.
उत्सुक
मी चिन्मयी, खूप वर्षांपूर्वी
मी चिन्मयी, खूप वर्षांपूर्वी आईने मार्बल पोळपाट (पोलपाट) राजस्थानमधून आणलेला, खूप वर्ष वापरला, जरा लहान होता साईझने म्हणजे अगदी मोठ्या पोळ्या करता येत नसत पण चांगल्या व्हायच्या, फार जड होता मात्र. मी ही करायचे त्यावर कधी आईकडे गेले की, चिकटून बसत नाहीत, पीठ लावावे लागतंच. स्वच्छता करताना मात्र फार जड वाटायचा, जपून उचलावा लागायचा. माहेरी अजून आहे की नाही माहिती नाही.
मी गेले २४ वर्षे मार्बल
मी गेले २४ वर्षे मार्बल पोळपाट वापरते. आधीचे फुटल्यावर पण मार्बलचेच घेतले. पोळ्या छान लाटल्या जातात. वापरून झाल्यावर नीट घासून साफपण करता येते.
मार्बल पोलपाटाला पोळ्या चिकटत
मार्बल पोलपाटाला पोळ्या चिकटत नाहीत, मी इथुन मार्शल मधुन आणलय पण त्याचा एक पायच निघुन आलाय..तो बसवावा लागेल..फक्त जड असतो त्यामुळे धुवायला जरा त्रास होतो.
लाकडी नको असेल तर स्टिलचे किवा अॅल्युमिनियम चे पोलपाट मिळतात...हलके असतात.
ऐसी अक्षरेचा रिस्पॉन्स एकदम
ऐसी अक्षरेचा रिस्पॉन्स एकदम बेकार आहे.
कुणीच काही उत्तर देत नाही.
फक्त मायबोलीवरच मला छान उत्तरं मिळतात.
मायबोली बेस्ट संकेतस्थळ आहे. इथले सर्वजण छान मित्रत्वाने बोलतात.
. पण मला पण मला ऐसीअक्शरे आणि
. पण मला पण मला ऐसीअक्शरे आणि मिसल्पाव वरून काही उत्तर मिळत नाही.>>>
कसली उत्तरे शोधताहात?? प्रश्न मांडले नाहीत तर उत्तरे कशी मिळणार? इथेही प्रश्न मांडा आणि बघा उत्तरे मिळतात का.
स्वयंपाकघरातील उपकरणे असा
स्वयंपाकघरातील उपकरणे असा काहीतरी धागा होता का?
व्हायोलिन, गाणे आवडत असलं तर
व्हायोलिन, गाणे आवडत असलं तर म्युझिकल नोट लेपल पिन/ब्रोच/कीचेन द्या. एकेका स्कूल बॅगला ४-४ कीचेन, लेपल पिन लावून फिरण्याचे दिवस आहेत सध्या.
बाकी फेक नेल्स आवडतीलच कारण आया घेऊ देत नाहीत.
स्टॅन्ली टम्बलरची पण फार क्रेझ आहे.
इंडीयन ट्रॅडीशनल ऐवजी सिल्कचा मस्त स्कार्फ द्या. भारतात ॲमझॉनवर मिळ
उत्तरे शोधायला वेल आहे. मी
उत्तरे शोधायला वेल आहे. मी मेम्ब्र झालो आहे. त्याच्या पुढे मला पासवर्द यायला पाहिजे, तो येत नाही आहे. हा प्राब्लेम आहे. मिसल्पाव म्हणाले आम्ही पाठवतो.पन्ण त्यापुढे काही नाही. ऐसी अक्शरे काही रिस्पान्स नाही. दोन्ही ठिकाणि मी मेम्बर आहेअसेस्च सांगतात. आणिकोन्ताक्ट एमेल ही दिलेला नाही. रजिस्त्र झाल्याच्य एमेल ला रिप्लाय केले त्यालाही उत्तर नाही.
मनोगत वरमार्त्र काल मेम्ब्र नीट झालो.प्क्रुपया ऐसी अक्शरे आणि मिसलपाव ला माझा प्रओब्लेम कलवा. ठन्क्स
इतके अशुद्ध मराठी टायपिंग
इतके अशुद्ध मराठी टायपिंग केलेत तर तिथे काय, इथे पण नंतर कोणी प्रतिसाद देणार नाही याची खात्री बाळगा.
मुलाच्या सायकलसाठी जीपीएस
मुलाच्या सायकलसाठी जीपीएस ट्रॅकर घेण्याचा विचार आहे. Amazon वर हा दिसला. कुणाला हा किंवा इतर कोणताही जीपीएस ट्रॅकर वापरण्याचा अनुभव आहे का?
@उत्सुक
@उत्सुक
तुम्ही नवीन मेंबरशिप घेतली की तुम्हाला एक इमेल येईल, त्यात जी लिंक असते, त्याच्यावर क्लिक केले की तुमचे अकाऊंट ॲक्टिव्ह होते. ते तुम्ही केले नसेल तर स्पॅम फोल्डरमध्ये शोधून बघा, कदाचित इमेल तिथे गेली असेल. जर ईमेल आली नाही तर परत रजिस्ट्रेशन करून बघा. जर अकाउंट बंद असेल तर पासवर्ड रिसेट हा पर्याय वापरून बघा.
काहीच जमले नाही तर नवीन इमेल वापरून नवीन अकाउंट काढा आणि लगेच इमेल शोधून त्यावरील लिंक वर क्लिक करून अकाउंट activate करा कारण थोड्या वेळाने ती लिंक expire होते.
misalpav.com वरून password
misalpav.com वरून password reset e-mail येण १ वर्षाहून जास्त वेळ बंद आहे. Admin ला हा प्रॉब्लेम माहित नाही असं दिसतंय.
इतके अशुद्ध मराठी टायपिंग
इतके अशुद्ध मराठी टायपिंग केलेत तर तिथे काय, इथे पण नंतर कोणी प्रतिसाद देणार नाही याची खात्री बाळगा.
misalpav.com वरून password
misalpav.com वरून password reset e-mail येण १ वर्षाहून जास्त वेळ बंद आहे. Admin ला हा प्रॉब्लेम माहित नाही असं दिसतंय. +123
@ अंजू, प्राची, प्राजक्ता -
@ अंजू, प्राची, प्राजक्ता - घेतेच मग मार्बल पोळपाट. लाकडाचा हलकाफुलका आहे पण धुवून नीट सुकत नाही. आमच्याकडे जास्त ऊन येत नाही.
@ भरत -स्वयंपाकघरातील उपकरणे असा काहीतरी धागा होता का?>>> आहे पण योग्य वेळी आठवत नाही. आणि मग मिळत नाही.
उपाशी बोका,
उपाशी बोका,
हे सगळे मला ठाऊक आहे. म्हणून येथे विचारले शेवटचा उपाय म्हनुन. Thanks.
धनवन्ती आणि भाग्यश्री देशमुख
धनवन्ती आणि भाग्यश्री देशमुख
आता कळायला लागले. पुन्हा Thanks.
मला मराठी लिहण्याची माहिती आहे. Thanks. इथली प्रक्टिस नव्हती. इथे backspace केले की मागच्या सगळ्या लिहल्याची वाट लागते.
Pages