Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोडसाईड ठेलेवाले चायनीज राईस
रोडसाईड ठेलेवाले चायनीज राईस करण्यासाठी सेला बासमती वापरतात असं एका फेसबुक चर्चेत कळलं. त्यानै restaurant मधे बनतो तसा एक-एक दाणा मोकळा भात शिजतो व ह्या तांदळाला सुवास नसतो आख्खा बासमती सारखा.
दुकानात चौकशी केल्यावर तो 80₹ कीलो आहे असं कळलं.
एवढा महाग तांदूळ वापरतात ठेलेवाले?
परवडण्याच्या दृष्टीने विचारतीये.
आपण घरी आणतानाही दोनदा विचार करून आणू.
मराठी text to speech साठी
मराठी text to speech साठी कुठले चांगले ॲप आहे का?
सावळ्या गोंधळाची उत्पत्ती
सावळ्या गोंधळाची उत्पत्ती शोधताना सवाळा गोंधळ घातला गेला असे दिसतेय
हडपसर मधे पालं टाकून गोंधळी
हडपसर मधे पालं टाकून गोंधळी राहतात. यातल्या एकाने (बाळू शिंदे) टिंग्या सिनेमात गाणं म्हटलेलं आहे.
ज्या गोंधळात संबळ हे वाद्य वाजवतात त्याला संबळा , संबळी गोंधळ म्हणतात. त्याचंच नाव सावळा गोंधळ झालं असावं.
सावळा हे कृष्णाचं नाव आहे.
शिरूर येथे रेंटचे अग्रीमेंट
शिरूर येथे रेंटचे अग्रीमेंट करायचे आहे. हे करून देणारा कोणी तिथे आहे का?
मालक पुण्यात आणि भाडेकरू शिरूरमध्ये आणि हे दोघेही एका ठिकाणी येऊ शकत नाहीत. त्यामुळे एकाची सही शिरूरमध्ये आणि दुसऱ्याची पुण्यात घ्यायची आहे.
कोणी माहितीचे असेल तर कळवा.
शिरूर येथे रेंटचे अग्रीमेंट
शिरूर येथे रेंटचे अग्रीमेंट करायचे आहे. हे करून देणारा कोणी तिथे आहे का?
मालक पुण्यात आणि भाडेकरू शिरूरमध्ये आणि हे दोघेही एका ठिकाणी येऊ शकत नाहीत. त्यामुळे एकाची सही शिरूरमध्ये आणि दुसऱ्याची पुण्यात घ्यायची आहे.
कोणी माहितीचे असेल तर कळवा.
डोक्यु साइन वापरुन दोन्ही
डोक्यु साइन वापरुन दोन्ही पार्टिज ओनलाइन सही करु शकतात..किवा भाडेकरुला अॅग्रिमेन्ट इमेलने पाठवा ते प्रिन्ट करुन सही करायला सान्गा, स्कॅन-पिडिएफ..सेन्ट बॅक..प्रिन्ट-सही-स्कॅन-पिडिएफ..सेन्ट तू ऑल पार्टिज..डन!
कुरियर किंवा स्पीड पोस्ट
कुरियर किंवा स्पीड पोस्ट वापरुन दोन्ही सह्या करता येणार नाहीत का?
आम्ही मुंबईतल्या घराच rental
आम्ही मुंबईतल्या घराच rental agreement भारताबाहेरून online केलं एका पुण्यातल्या एजन्सी मार्फत. त्यासाठी बायोमेट्रिक device ते घरी पाठवतात, त्याचे अधिक पैसे घेतात , renterakt.com website आहे त्यावर बघा. संपर्क क्रमांक हवा असेल तर देते
११ महिन्या पेक्षा जास्त
११ महिन्या पेक्षा जास्त रेंटचे अग्रीमेंट कायद्याने करायचे असल्यास सरकारी वेबसाईट वर करावे लागेल. दोन्ही ठिकाणी दोन वकिल हे काम करु शकतात.. मालक आणि भाडेकरु एकाच ठिकाणी यायची गरज नाही. जो अॅग्रीमंट करतो तो वकिल ८०० रुपये आणि दुसरा वकिल ५०० रुपये घेतो. ( जर घराच्या जवळ असेल तर, नाहीतर थोडे जास्त) सरकारला १००० रुपये रजिस्त्रेशन आणि ०.२५% स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. मालक आणि भाडेकरुचे आधार असणे बंधन्कारक आहे. हाताचे ठसे घ्यायचे मशीन असेल तर वकिलाची पण गरज नाही.
हल्लीच असे एक अग्रीमेंट केले ज्यात मालक आणि भाडेकरु एकाच ठिकाणी आले न्हवते.
सरकारी अग्रीमेंट करायचे आहे,
सरकारी अग्रीमेंट करायचे आहे, म्हणजे आधार कार्ड आणि बोटांचे ठसे घेऊन.
अग्रीमेंट करणारे पुण्यातले लोक शिरूरला जायला तयार नाहीत किंवा त्यांच्या ओळखीचा वकील तिथे नाहीत. आमच्या ओळखीचे लोक आता तिथे कोणीच राहिले नाहीत, त्यामुळे मार्ग सापडत नव्हता.
renterakt.com इथे विचारून बघेन की शिरूरला जाल का किंवा ठशांचं मशीन पाठवाल का ते.
सरकारी अग्रीमेंट करायचे आहे,
सरकारी अग्रीमेंट करायचे आहे, म्हणजे आधार कार्ड आणि बोटांचे ठसे घेऊन.
अग्रीमेंट करणारे पुण्यातले लोक शिरूरला जायला तयार नाहीत किंवा त्यांच्या ओळखीचा वकील तिथे नाहीत. आमच्या ओळखीचे लोक आता तिथे कोणीच राहिले नाहीत, त्यामुळे मार्ग सापडत नव्हता.
renterakt.com इथे विचारून बघेन की शिरूरला जाल का किंवा ठशांचं मशीन पाठवाल का ते.
सरकारी अग्रीमेंट करायचे आहे,
सरकारी अग्रीमेंट करायचे आहे, म्हणजे आधार कार्ड आणि बोटांचे ठसे घेऊन.
अग्रीमेंट करणारे पुण्यातले लोक शिरूरला जायला तयार नाहीत किंवा त्यांच्या ओळखीचा वकील तिथे नाहीत. आमच्या ओळखीचे लोक आता तिथे कोणीच राहिले नाहीत, त्यामुळे मार्ग सापडत नव्हता.
renterakt.com इथे विचारून बघेन की शिरूरला जाल का किंवा ठशांचं मशीन पाठवाल का ते.
भरत आणि मानव पृथ्वीकर खूप खूप
भरत आणि मानव पृथ्वीकर खूप खूप धन्यवाद गाण्याच्या लिंकसाठी.
मी यु ट्युबवर बरंच शोधलं पण वेगळीच गाणी यायची.
काजवा महोत्सव सुरू झाला आहे.
काजवा महोत्सव सुरू झाला आहे. पूर्वी म्हणजे चाळीसेक वर्षांपूर्वी अंगणात काजवे लुकलुकताना दिसायचे. गेल्या चाळीस वर्षात एकही काजवा दिसलेला नाही. या महोत्सवात ॲड मध्ये दाखवतात तसे खात्रीने काजव्यानी भरलेल झाड दिसते का? की वनसफारी करताना नशीब असेल तर प्राणी दिसतात नाहीतर सांबर, हरिण , ससे एवढेच दिसतात तसे दहा वीस काजवे फक्त दिसतात. आपल्यापैकी कोणी जाऊन आले आहे का ? खात्रीशीर ठिकाण माहित असल्यास माहिती मिळावी.
मला या महोत्सवाबद्दल माहिती
मला या महोत्सवाबद्दल माहिती नाही.
पण २०२३ मध्ये पुण्यापासून १५० किमी आसपास वनराईत रात्री असंख्य काजवे पाहिले आहेत. हाताच्या मुठीत पकडुन सोडले काही.
तेव्हा एवढे काजवे आता असु शकतात का? तर हो.
नोबिता मी गेले नाहीये पण एक
नोबिता मी गेले नाहीये पण एक दोन ओळखीचे लोक जाऊन आलेत .. काजवे खूप दिसतात म्हणे... भंडारदरा भागात जास्त दिसतात असे ऐकले
न्यु जर्सी च्या पार्क मध्ये
न्यु जर्सी च्या पार्क मध्ये व डेलावेअरला काजवे पाहील आहेत.
कमलिनीकुटीर नावाचे एक
कमलिनीकुटीर नावाचे एक फार्महाउस आहे वेल्हयाला, तिथे ७/८ वर्षांपूर्वी भरपुर काजवे दिसले होते. फार्महाऊस वर थोडे फार होते. पण त्यांनी जंगलातसुद्धा नेले होते. तिथे मात्र खूप दिसले होते. तिथले जेवण आणि एकंदर व्यवस्था पण खूप छान होती.
भंडारदरा, हरिश्चंद्रगड,
भंडारदरा, हरिश्चंद्रगड, पुरुषवाडी, दाजीपूर अभयारण्य.
या ठिकाणी दिसतात काजवे.
मला या दोन चार वर्षात अमेरिका
मला या दोन चार वर्षात अमेरिका वारी करायची आहे.
सगळा देश एकाच ट्रिप मधे बघावा की दोन तीन वेगवेगळ्या ट्रिप कराव्या? सगळा देश बघायला किती दिवस लागतील?
पूर्ण देश बघायला चार माणसांचा जायचा यायचा, फिरायचा, रहायचा, खायचा साधारण खर्च किती होईल?
धागा विषयावर आणल्याबद्दल
धागा विषयावर आणल्याबद्दल धन्यवाद अतरंगी.
असे दैनंदिनी जीवनातले किरकोळ प्रश्न विचारण्यासाठीच धागा आहे हा.
(दिवा घ्यालच, पण तरीही देऊन ठेवतो)
माहितीबद्दल धन्यवाद मानव,
माहितीबद्दल धन्यवाद मानव, केया, आभा.
सामो >> खास काजवे पहायला भारतातून न्यू जर्सीला जावे का हा विचार करूनच डोळ्यापुढे काजवे चमकायचे.
फार रील्सबघून एक प्रश्न
फार रील्सबघून एक प्रश्न कधीपासून विचारेन म्हणतेय , Gender reveal Party मध्ये बाळाच्या gender बद्दल माहिती नक्की कोणाला असते. I mean event manager / baker यांनाच direct कळवलं जातं का ??
नाही. आई बाबांना माहिती असतं.
मानव
अमेरिकेत काय बघायची इच्छा आहे? कुठल्या ठिकाणांत रस आहे? संग्रहालये, नॅशनल पार्क्स, अन्युझमेंट पार्क्स, गुज्जू फोटो प्लेसेस इ. इ. किती दिवस हाताशी आहेत? लगेहात कॅनडात काही बघायचं आहे का? रेंटल कार घेऊन ड्राईव्ह करशील का? कुठल्या महिन्यांत सहल करायची आहे? व्हिसा वगैरे झालं आहे का? इ वर बरंच काही ठरेल.
कॅनडात ये आणि मला भेट. सकुसप नायग्रा टोरोंटो इ. यात्रा घडवून आणेन.
आई बाबांना माहिती असतं.
आई बाबांना माहिती असतं. किमान आईला माहीत असतंच>>>>>
सगळ्या रिल्स्मध्ये आई अशी नाचते जणु तिला आत्ताच कळलेय. एका रिलमधली आई तिचे भलेमोठे पोट घेऊन टाळ्या पिटत अशा वरखाली उड्या मारायला लागली की मला वाटले जेण्डर रिविलचे रुपाअम्तर बर्थ पार्टीत होणार.
भारतात जेंडर रिव्हिल करायला कायद्याने बंदी असल्याने ही एक पार्टी हुकते. अन्यथा आता डोहाळेजेवण हा शब्द मागे पडुन बेबी शॉवरची पार्टी लोकप्रिय होतेय.
साधना
साधना
अतरंगी, सगळा देश एका ट्रिपमध्ये बघायचा झाल्यास तुमच्या हातात काही महिने नक्कीच हवेत.
सगळ्या रिल्स्मध्ये आई अशी
सगळ्या रिल्स्मध्ये आई अशी नाचते जणु तिला आत्ताच कळलेय >> म्हणूनच तर प्रश्न पडला
अमित, सायो,
अमित, सायो,
मी दोन ते तीन महिने सलग रहायचा विचार करत आहे.
कुठल्या ठिकाणांत रस आहे?>>>>
तू लिहिलेल्या सगळ्या. फोटो प्लेसेस मोस्टली जाणार नाही. टिक मार्क टूरिजम करायचे नाहीये.
रेंटल कार चालवू शकेन left hand driving ची सवय आहे. गल्फ मधले लायसन्स आहे.
कॅनडा व अमेरिका एका ट्रिप मधे होणार नाही. वेगवेगळं करेन.
व्हिसा अप्लाय केला नाही.
कॅनडात ये आणि मला भेट. सकुसप नायग्रा टोरोंटो इ. यात्रा घडवून आणेन.>>>
कॅनडाला आलो की तुझ्याकडे दोन दिवस रहायलाच येणार आहे. ते पण हक्काने.
मला वाटतं किंवा माझ्या
मला वाटतं किंवा माझ्या तोकड्या अनुभवाने सांगायचं तर दोन तीन महिनेही पुरेसे नाहीत. देश खूप मोठा आहे. दोन स्टेट्सम्ध्ये अंतरही बरंच आहे. कदाचित एक दोन साईड्स कव्हर करु शकाल.
Pages