Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोनारांचा आणि लोहारांचा ब्लो
सोनारांचा आणि लोहारांचा ब्लो पाईप (आकार सोडला तर) सेमच काम करत असेल ना ?
मग व्हाय प्रिफर सोनार ? द नेशन वॉंट्स टू नो
BTW, सोनारावरून आठवले ;
BTW, सोनारावरून आठवले :
शिवकालात आणि पुढे पेशवाईत सोनारकाम करणाऱ्यां साठी टंकसाळ्या (नाणी पाडणारे , त्यासंबंधी कामे करणारे सोनार) आणि अंगसाळ्या (दागिने घडवणारे, नाणे पाडण्याचे काम सोडून इतर कामे करणारे अन्य सोनार) असे दोन प्रकारचे nomenclature आणि स्टेट लायसंस होते.
लोक वर्णिती विविध शास्त्रें ।
लोक वर्णिती विविध शास्त्रें । मनरंजनकारक विचित्रें ।
परी भवच्छेदक पवित्रें । कदाकाळीं न होती ॥२॥
हरिगुणलीला न वर्णितां । व्यर्थ काय ते अलवण कविता ।
जैसा वाळूचा घाणा गाळितां । तेल न पडे कांहींच ॥३॥
नळी फुंकिली सोनारें । इकडून तिकडे जाय वारें ।
तैसी तीं व्यर्थ शास्त्रें । हरिलीला न वर्णितां ॥४॥
न वर्णितां हरिचरित्र । व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ ।
जैसीं अर्कफळें क्षुधार्थ । रुचि उडे भक्षितां ॥५॥
धन्य धन्य तेचि जन । जे श्रीहरिध्यानपरायण ।
जे श्रीहरिलीला करिती श्रवण । धन्य तेचि संसारीं ॥६॥
स्रोत
अच्छा! हा आध्यात्मिक संदर्भ
अच्छा! हा आध्यात्मिक संदर्भ माहीत नव्हता. सोनारच का हा प्रश्न बरोबर आहे आणि त्याचा अजूनही उलगडा होत नाही.
* अंगसाळ्या >> छान शब्द !
* अंगसाळ्या >> छान शब्द !
चांगली चर्चा.
सोनारच का हा प्रश्न बरोबर आहे
सोनारच का हा प्रश्न बरोबर आहे>>
सोनारच असण्याचे विशेष कारण असल्यास माहिती नाही. त्या श्लोकांत अर्थ स्पष्ट होतो असे वाटले.
मला वाटते गृहिणी (चुलीत नळीने वारं फुंकते) घेतले असते तर यमक जुळले नसते. सोनारे आणि वारे यमक जुळते म्हणुन घेतले असावे का? मग लोहारे का नाही? हा प्रश्न लोहारे घेतले असते तर , सोनारे का नाही एवढाच लागु. (पण लोहाराची भट्टी मोठी, भाता लागतो मग 'भाता फुंकला लोहारे ...' अशी म्हण झाली असती. एका कानातून दुसऱ्या कानात या साठी नळीशी तुलना ठीक वाटते.)
रच्याकने: आचारी या शब्दाला तृतीयेचा ए प्रत्यय लावुन आचारे करतात की संधी नियमाने आचाऱ्ये? (मुळात एकारांत वगळता इतर स्वरांत शब्दांना ए प्रत्यय वापरायचे का पूर्वी? तसे उदाहरण वाचले असेल तर आठवेना.)
@ मा न व,
@ मा न व,
तुम्ही वर दिलेल्या काव्यात “अर्कफळे” वाचले. सुमारे दोन दशकांनंतर हा शब्द वाचला. धमाल !
भूक लागली म्हणून खायला जावे तर ती कडू / काटेरी/ विषारी असतात. बाधतात.
उदा. रुईच्या, मंदारवृक्षाच्या फळांना भक्षणयोग्य समजत नाहीत, तीच ही अर्कफळे
तुम्ही आचारी बोलावले धाग्यावर, भूक लागली 😀
ही अर्कफळे म्हणजेच 'कुचलिया
ही अर्कफळे म्हणजेच 'कुचलिया वृक्षांची फळे' का? (Nux Vomica - होमिओपॅथीवाले वापरतात.)
अर्कफळे म्हणजेच 'कुचलिया
…अर्कफळे म्हणजेच 'कुचलिया वृक्षांची फळे' का?…
ठाऊक नाही. ऋतुराज सांगू शकतील बहुतेक.
ओव्हर टू ऋतुराज.
कचुलिया वॄक्ष हे ही काय ते
कचुलिया वॄक्ष हे ही काय ते सांग ऋतुराज.
) हे पोटात गॅसेस झाले, पोट दब्ब झालं की लहानपणी कायम घेतलेले आहे. 
नक्सवॉमिका (आम्हाला नक्स स्वॉमिका ऐकू येत असल्याने तसेच म्हणत असू
कुचला/ कुंचला म्हणजे
कुचला/ कुंचला म्हणजे Strychnos nux vomica
काजऱ्याचे झाड.
याच्या बिया महाभयानक विषारी असतात, पण औषधात वापरतात.
रुईच्या, मंदारवृक्षाच्या फळांना भक्षणयोग्य समजत नाहीत, तीच ही अर्कफळे>>>>>>> रुई, मंदार वृक्षालाच अर्क म्हणतात. ही देखील विषारी असतात. म्हणजे त्याचा चिक.
परंतु ती काटेरी नसतात. काटेरी असतात ती धत्तुरफले - धोत्र्याची फळे. तीही विषारी.
Caricature ला अर्कचित्र असे का म्हणत असावेत?
थँक्यू. शंका दूर केल्याबद्दल.
थँक्यू. शंका दूर केल्याबद्दल.
हाय कॉन्संट्रेटेड एक्स्टॅक्ट
हाय कॉन्संट्रेटेड एक्स्टॅक्ट म्हणजे ही अर्क (क चा पूर्ण उच्चार) ना. आयुर्वदात अर्क करतात म्हणतात ना. त्यामुळे कमीत कमी शब्दांत/ रेघांत जास्तित जास्त आशय दाखवणारी चित्रे ती अर्कचित्रे.
कोणी व्यक्ती ही शेलकी असेल तर अर्क आहे म्हणतात.
रुई, मंदार वृक्षालाच अर्क
रुई, मंदार वृक्षालाच अर्क म्हणतात.>> अच्छा.
अर्क >> सूर्याचं पण एक नाव
अर्क >> सूर्याचं पण एक नाव आहे.
सूर्यफूल असतं आणि अर्कफळ असतं होय!
इतिहासकार वि. का. राजवाडे
इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी 'Culture' या इंग्रजी शब्दासाठी 'संस्कृती' हा शब्द रूढ केला. विशेष म्हणजे, रवींद्रनाथ टागोर यांनीही हा शब्द स्वीकारला होता. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राजवाड्यांच्या या महान देणगीचा घेतलेला आढावा
आजकाल बऱ्याच वेळी सभ्यता
आजकाल बऱ्याच वेळी सभ्यता वाचायला भेटते.
* संस्कृतीबद्दलचा वरचा
* संस्कृतीबद्दलचा वरचा मजकूर वाचायला मुक्त नाही.
पूर्वी यासंबंधी एक लेख अंतर्नाद मासिकात वाचला होता.
संस्कृतीवरचा लेख मला अजूनही
संस्कृतीवरचा लेख मला अजूनही दिसतोय. बहुतेक cache असल्यामुळे.
त्यात अंतर्नाद मधल्या लेखाचा उल्लेख आहेच.
मानवी प्रगतीची सर्वोच्च संभाव्य उत्तुंगता गाठता यावी म्हणून आत्म्याची मशागत करायला हवी’, असे शेतीक्षेत्रातले रूढ रूपक त्याने आपल्या लेखनात वापरले होते. त्या शब्दाच्या मुळाशी colere हा लॅटिन शब्द होता आणि त्याचा आशय काळजी घेणे किंवा जबाबदारी स्वीकारणे असा होता.
‘हे लक्षात घेऊन बंगाली भाषकांनी तयार केलेला प्रतिशब्द होता – ‘कृष्टि’. शेतीच्या मशागतीची लक्षणा कायम राखण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता.
‘कल्चर’ या शब्दाचे सरधोपट भाषांतर न करता राजवाड्यांच्या प्रतिभेने त्याच्या अर्थातील एक धागा उचलून त्यासाठी आपल्याकडील संस्कार ही परंपरेतील सर्वज्ञात संकल्पना योजली. संस्कारांनी सिद्ध होते ती संस्कृती. मग ते संस्कार बरे असतील किंवा वाईट असतील, जाणिवेतील असतील किंवा नेणिवेतील असतील, स्वकीय असतील किंवा परकीय असतील.
संस्कार म्हणजे व्यक्तीला जो परिसराचा, विशेषत: मानवी परिसराचा अनुभव येतो, त्या अनुभवाचे व्यक्तीवर उमटलेले ठसे. असे हे संस्काराचे ठसे कधी संचित रूपात टिकतात, कधी लोप पावतात, तर कधी कालांतराने स्थितिस्थापित होतात, असे भारतीय परंपरा मानते. संस्कृती म्हणजे अशा संस्कारांचे भांडार. राजवाड्यांच्या योजकतेमुळे कल्चर या शब्दापेक्षा अधिक अर्थघन असा ‘संस्कृती’ हा शब्द आपल्या हाती आला. ‘कल्चर’साठी ‘संस्कृती’ या शब्दाचा वापर हे सर्जनशील भाषांतराचे सुंदर उदाहरण आहे!’
-
हिंदीच्या पाठ्यपुस्तकात सभ्यता और संस्कृती या शीर्षकाचा एक पाठ होता. यात सभ्यता म्हणजे civilization . संस्कृती आत्मा, गाभा तर सभ्यता हे शरीर, दृश्य - बाह्य रूप.
सभ्यता म्हणजे civilization .
सभ्यता म्हणजे civilization . संस्कृती आत्मा, गाभा तर सभ्यता हे शरीर, दृश्य - बाह्य रूप….
वा, सुंदर मिमांसा.
राजवाड्यांच्या योजकतेमुळे ‘कल्चर’साठी ‘संस्कृती’ आला. सर्जनशील भाषांतराचे सुंदर उदाहरण..
+ ११११११
BTW, राजवाडे वाचतांना फार सुंदर, अर्थवाही मराठी शब्द वाचनात येतात, तो आनंद निराळाच.
छान चर्चा.
छान चर्चा.
संस्कृती शब्दाबद्दल सुंदर माहिती "ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी" या पुस्तकात पहायला मिळते.
त्या म्हणतात, संस्कृती हा शब्द संस्कृत वाङ्मयात सापडत नाही. राजवाडे यांनी तो इंग्रजी Culture वरून बनवला आणि वापरला. त्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी तो वापरला. त्याआधी बंगालीत त्याअर्थी "कृष्टी" शब्द वापरत. याचा एक अर्थ शेती असाही होतो.
त्या म्हणतात संस्कृत मधे संस्कृ असा शब्द आहे पण "संस्कृत" असा शब्द नाही. म्हणजे संस्कृत भाषेला गीर्वाण असा शब्द आहे. संस्कृती शब्द नसला तरी संस्कार हा शब्द मात्र संस्कृत मध्ये आहे. त्यामुळे त्यांनी "पूर्वीच्या संस्कारांचे अभिसरण म्हणजे संस्कृती" अशी व्याख्या केली आहे.
संस्कृ ह्या शब्दाचा पाली भाषेत अर्थ स्वयंपाक करणे असा आहे त्यामुळे संस्कृतीचा स्वयंपाकाशी काहीतरी संबंध असावा.
अर्क >> सूर्याचं पण एक नाव
अर्क >> सूर्याचं पण एक नाव आहे. हो, रुईचे झाड हे सूर्यापासून उत्पन्न झाले आहे असे संदर्भ पुराणात आहेत. त्यामुळे रुई सूर्याचे प्रतिक मानतात. गणेश चतुर्थीला गणपतीला वाहतात त्या २१ पत्रीत रुईची पाने असतात.
"कपिलाय नम:, अर्कपत्रं समर्पयामि"
मारुतीने लहानपणी सूर्य हवा म्हणून त्याकडे झेप घेतली पण तो त्याला प्राप्त झाला नाही म्हणून रुईची म्हणजेच अर्कपत्रे त्याला वाहतात अशीही एक कथा वाचली आहे.
अरे वा, अर्क, अर्कफल आणि आता
अरे वा, अर्क, अर्कफल आणि आता अर्कपत्र !
रुई सूर्याचे प्रतिक ?
विशेष दिवशी या रुईच्या फिकट जांभळ्या+ पांढऱ्या फुलांचा गजरा शिवलिंगावर वाहणे हा उज्जैन महाकालेश्वराचा मोठा शृंगार मानतात.
संस्कृत मधे संस्कृ असा शब्द
संस्कृत मधे संस्कृ असा शब्द आहे पण "संस्कृत" असा शब्द नाही. >>
गोंधळ झाला माझा जरा.
कृ (करणे) धातूला सम् हा उपसर्ग लागुन संस्कृ असा धातु होईल.
(सम् उपसर्ग परि पूर्णता, शुद्धता दर्शवण्यास सहसा वापरतात.)
त्यावरून मग संस्कृत असा शब्द साहजिक आहे. संस्कृ आहे पण संस्कृत शब्द नाही हे त्यामुळे कळले नाही. संस्कार सुद्धा संस्कृ पासुनच बनलेला दिसतोय. भाषेला संस्कृत म्हणत नव्हते ती गोष्ट वेगळी.
आणि कल्चर वरून संस्कृती बनवला तर स्वयंपाकाशी संबंध कसा हे पण कळले नाही. (संस्कृतीत खाद्य संस्कृतीही मोडते मात्र)
अर्काबद्दल पुढची माहिती छान आहे. आमच्याकडे मारुतीला रुईच्या फुलांचा व पानांचा हार घालत.
उत्तम सांस्कृतिक चर्चा !
उत्तम सांस्कृतिक चर्चा !
१० “कोटी” रुपये
१० “कोटी” रुपये
परा”कोटी”चा द्वेष
शाब्दिक “कोटी”
“कोटी” शब्दाचे वरील अर्थ व प्रयोग माहिती होते.
परंतु इतक्यात समजलेले “कोटी” चे दोन निराळे अर्थ
१} धनुष्याचे टोक
२} चंद्रकलेचे टोक
आम्ही स्वेटरच्या एक प्रकाराला
आम्ही स्वेटरच्या एक प्रकाराला ही कोटी म्हणायचो. ( स्त्रियांचा लांब बाह्याचा, एम्ब्रायडरी असलेला वुलन कोट!)
ते ३३ कोटी देवता म्हणजे ३३
ते ३३ कोटी देवता म्हणजे ३३ प्रकारच्या देवता म्हणे. त्यांची नावं गुगलून सापडतील. बरीच चर्चा झाली आहे.
*कोटी” चे दोन निराळे अर्थ
*कोटी” चे दोन निराळे अर्थ
छान. आवडले
दिनांक 14 मार्च 2021पासून सलग
दिनांक 14 मार्च 2021पासून सलग चालू असलेल्या शब्दवेध या प्रस्तुत सदराला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या धाग्याचे सर्व वाचक, आस्थेने लेखन करणारे प्रतिसादक आणि प्रशासक या सर्वांना धन्यवाद !
येथील ज्ञानरंजनातून निर्माण झालेला आपल्या सर्वांचा शब्दस्नेह असाच वृद्धिंगत होवो.
. . .
सध्या सह्याद्री वाहिनीवर ‘शब्दांच्या वाटेवर’ ही मराठी भाषेसंबंधीची सुरेख मालिका सुरू आहे.
एक भाग अर्ध्या तासाचा असतो. भाषाप्रेमींनी जरूर बघावी. आतापर्यंतचे भाग युट्युबवर आले असावेत.
Pages