खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वामन राव, मस्त मेनू!
दोन दोन वरणं!
आणि ते भांडं खूप छान आहे. नका देऊन टाकू कुणाला!

आज घरी बनवले... तो ब्ल्यू सिरप पण घरीच बनवला युट्यूब वर बघून... फ्लेवर थोडा स्ट्राँग झाला पण छान झालेलं
Screenshot_2026-02-10-18-04-57-31_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

ऋणमेष यांच्या आईंच्या पाककृतीने आज टोमॅटो सार बनवले. खूपच टेस्टी झाले होते. मी पहिल्यांदाच बनवले. खातू मालवणी फिश करी मसाला वापरला. माझ्या non maharashtrian सासरी सगळ्यांना आवडले सार. ऋणमेष तुमच्या आईंना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही धन्यवाद IMG_20260213_212312.jpg

मस्त दिसतेय उपवास थाळी , काय काय पदार्थ आणि कशाचं बनवलाय तेही सांगा ना!

बेसन बर्फी
IMG_20260216_143723.jpg
आणि डिंक पीठ लाडू फ्रॉम अमृतसर,
IMG_20260216_143803.jpg

महाशिवरात्र स्पेशल उपवास थाळी
पाहून उपवास मोडतो आहे!
Wink

बाकी या धाग्यावर एक एक मस्त मस्त मस्त रेसिपीज चे फोटो दिसत आहेत आणि मी बिचारा इकडे डाएटवर आहे!

वामन राव , मी पण आहे तुमच्या बोटीत (म्हणजे डायट वर) मला फक्त फोटो टाकण्याची परवानगी आहे खाण्याची नाही ऑफ शुगर असल्याने . आता उद्यापासूम डायट रेसिपी टाकायचा विचार आहे तो पर्यंत रवा ढोकळा घ्या. चौकोनी प्लेट पण तुमचीच ढापलीय Happy

IMG_20260217_085705.jpg

शुकशुक..
इकडे या.
शाकशुका घ्या.

पांढऱ्याशुभ्र रवा ढोकळ्याकडे पाहतो न पाहतो तोच तांबड्याजर्द शाकशुकाची शुक शुक ऐकू येतेय...

डाएटवाल्यांनो, आपण या धाग्यावर यायलाच नको बरं! आपल्यासाठी वजनाचे काटेच खरे म्हणायचे!
Wink

malvan1.jpgmalvan2.jpg

# आजोळच्या गावाहून माझ्यासाठी आलेला खाऊ # मालवणी मेवा

खाली खटखटे लाडू , खाजं, घीवर
वर सालासकट काजू, कुत्रे बिस्किटं (हो, असंच नाव आहे) आणि मुगाचे लाडू.

यातले बरेच पदार्थ इथे मिळतात. पण आपल्यासाठी कोणी इतकं ओझं घेऊन येतं तेव्हा त्यांची गोडी आगळी असते.

वाह !
खडखडे लाडू आणि मालवणी खाजा मी कधीच मुंबईत विकत घेऊन खाल्ला नाही. तो गावावरून आल्याशिवाय खायची मजाच येत नाही. यामागे काहीतरी इमोशनल सायकॉलॉजिकल वगैरे रिजन असेल ते असेल पण हे असेच आहे.

बरोबर ऋन्मेष. खाजे गावाकडचेच.
माझ्यासाठी अजूनही मावशी सासरी गेली की मालवणी खाजे आणते. कधी विकत घेतलेच नाहीत.

तो पिवळा घीवर आहे का? हा पदार्थ मी कधी कोकणात पाहिला नाही. मला तो राजस्थानी वाटायचा. पण हा वेगळाच दिसतो.

अरे वाह,मालवणी भेट मस्तच. ती कुत्रे बिस्कीट अजून मिळतात? मला त्याचा वास कधीच आवडला नाही आणि माणसं कशी काय ही कुत्र्याची बिस्कीट खातात असा लहानपणी वाटायचं.
घीवर मस्तच. मी मालवणातच पहिल्यांदा आणि नेहमीच खाल्ला आहे. मला ते जिलेबी चे नातलग वाटायचं . पुढे यूट्यूब कृपेने ते राजस्थानी पदार्थच मालवणी version असल्याचं समजल.
खाज्याबद्दल काय बोलायचे? अहाहा. ऋन्मेष म्हणतो तसे मुंबईत कधी विकत घेतले नाहीत.
मुगाचे लाडू छान छान. माझ्या बहिणी ची सासू घरी जात्यावर दळून, घरच्या गायीच्या तुपात मूग लाडू बनवत असे. त्याची आठवण आली. ते शेवेचे आणि कडक बुंदीचे लाडू मात्र कधी आवडले नाही पण आता उगीच गदगदून येतंय .
कोकम / आगळ/ सरबत नाही आले का?

मेघा, मायबोलीवर मालवणी घेवर माहीत असलेलं आणखी कोणीतरी आहे , हे पाहून बरं वाटलं.
हे पदार्थ माझ्या आवडीचे आहेत , हे आणणार्‍यांना माहीत होतं.
कोकम आहेत माझ्याकडे.
त्यांनी घरचे नारळ आणि फणसही आणले होते, कोणाकोणाला द्यायला.

खाजे जाम आवडता प्रकार आहे. शेवेचे लाडू कधीच आवडले नाहीत.
सावंतवाडी की कुठचेसे बटर सुद्धा भारी असायचे असं आठवतंय. आणि तो कॉकटेल नामक मिल्कशेकसदृश प्रकार.

तुला झब्बू जुई
आमच्याकडेही कुयरी आली आहे. उद्या आई करेल भाजी.

jui.k साधं ताट मेन्यू आवडला. फणसाची खोबरं घालून सुकी भाजी खाल्ली नाही कधी.
फणस माझा आवडता. रस्सा भाजी होते नेहमी.

Pages