हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त !
तुम्ही खूप हुशार आहात, अनिंद्य!

…तुम्ही खूप हुशार आहात, अनिंद्य!….

I wish !

मास्तराचं पोरगं असून असून किती dumb असणार ? म्हणून, thanks 😀

आज जुम्मे का छोटा सा हैदराबादी किस्सा पेश करताऊं जो ये नाचीज़ खुद लिखा.

दो सहेली लोगां भौत दिनां बाद मिले तो बातां कर रई.

- फरजाना, तेरी शादी हो गई क्या रे?

- हौ

- वा! क्या करता रे तेरा घरवाला?

*

*

*

*

- पछतावा, हौर क्या ?

😀 😀 😀

@ देवकी ] अनया ] स्वानंदी ] मृणाली ] ऋतुराज ]

आप पाँच जने क़िस्सा पढे, शाबाशी दिए, येवास्ते शुक्रान.

वर “पछतावा” ऐवजी आधी “कफ्फारा करता मेरा घरवाला” असे लिहिले होते. पश्चाताप + प्रायश्चित यांचे करेक्ट मिश्रण असलेला खास हैदराबादी शब्द आहे तो.

पण मग जोक समजवून सांगावा लागेल असे वाटले. No bigger shame than having to explain a joke 🙈

इसलिये फरजाना के घरवालेकू “पछतावा”च करना पड़ा देखो 😀

आज का किस्सा लिखताउं थोड़े वखत में

आपल्या माबो - हैदराबादी युनिवर्समधे “मलिकपेट के रहमान वकील” आणि “ईस्कूल के होशियार मास्टर” यांची एन्ट्री मागच्या महिन्यात झालेली आहे ये तो तुम कू मालूमीच है.

आता पुढचे काही किस्से या दोघांवर लिहीन. अर्थात आपले जुम्मन, शब्बो, फरजाना, फजलू, बड़ी अम्मी हे नेहेमीचे यशस्वी कलाकार असतीलच सोबतीला.

हा आजचा :

मास्टरसाब फजलू से पुच्छे

- फजलू, अगरचे धरती के अंदर लावा है, धरती के बाहर कू क्या रैता फिर ?

- बाहरकू ओप्पो रैता, एप्पल रैता, वीवो रैता.📲 भौत है ना मास्टरसाब. 😀

जेन झी फजलू…

अरे वा, नवीन थीम/ अँगल सुचवला @ अनया तुम्ही. 👍

यावरून काही मजेदार किस्से सुचलेत. वो आते दिनों में लिखताउं.

मी एकेकाळी विदर्भात एक जिल्ह्याच्या गावी काही काळ हॉस्टेलवर होतो. तिथे काही बिहारी मुले इंजिनीअरिंग शिकायला असायची. संध्याकाळी मेसवर जेवायला गेल्यावर आपापल्या मित्रांसाठी जागा पकडून ठेवायची सर्वांची धांदल असायची.

एकाने आपल्या मित्रासाठी बाजूला रुमाल टाकून ठेवला होता. ते पाहून एक विद्यार्थी आपल्या टिपिकल बिहारी टोनमध्ये म्हणाला, "अरेऽ, ई का बात हुई? तू कल ताऽज महल पर रुमाल डालेगा, कहेगा ताज महल मेऽरा है, चलेगा? नही चलेगा। चल हटा रुमाल, मुझे बैठना है।"

त्या बोलण्याची हैदराबादी स्वॅग वर्जन करण्याचा हा प्रयत्न (यात मायबोलीकर सुधारणा करू शकतात!) -

"क्या है भइ ये? कल कू तू चानमिनार पे दस्ती दाल के बोलता, चानमिनार मेरा होता। ऐसा होता? नइं होता। पैले दस्ती हटा, मंइ बैठतूं।"

मस्त रूपांतर केलेत , वामन राव …
+ १

रुमालासाठी “दस्ती” शब्द कितीतरी दिवसांनी ऐकला ! आता टिशूपेपरच्या जमान्यात रुमालाचा वापर कमीच.

रुमालासाठी “दस्ती” शब्द कितीतरी दिवसांनी ऐकला ! >> +१ विस्मरणात गेला होता हा शब्द.
रूपांतर छान जमलंय.

सोऽब का शुकरिया ।

मी अकोल्याची आहे !

>>>
अइसा? भोत दिनों से शेगांव जाना सोंचरूं। आया तो मिलतुं आपकु।

वैसे आपा, पऽच्चीस साल पैले मइं गोंदिया में रैता था। उप्पर बोलेवे बातां व्हांकेइच ऐं।‌

फजलू >>> Rofl अचानक आलेल्या ओप्पोची लिंक लागली नाही, मला वाटले की काहीतरी हैदराबादी शब्द असेल. पुढे वाचल्यावर फुटलोच. (मेंदूत interpreter आणि compiler दोन्ही असावेत. तो आधी एक एक शब्द interprete करतो आणि मग पूर्ण वाक्य compile)

वामन स्पेस राव, हैदराबादी तडका भारीच.

माधव,

खूप दिवसांनी दिसलात धाग्यावर. Hope all is well with you.

…मेंदूत interpreter आणि compiler दोन्ही… 👍

(मेंदूत interpreter आणि compiler दोन्ही असावेत. तो आधी एक एक शब्द interprete करतो आणि मग पूर्ण वाक्य compile)
>>>
ये पडके इत्ता पसंद आया मेरे कु, पूचो नक्को।

@अनिंद्य, मी मजेत. मध्यंतरी मायबोलीवर जास्त येणे जमत नव्हते त्यामुळे हा धागाही नजरेतून सुटत होता. नाही तर असा स्ट्रेसबस्टर धागा मायबोलीवर विरळाच.

बाकी,

हैद्राबादी दख्खनी बोलीत काही शब्दांचे अनेकवचन करतात.

बोर मार्रा भई, चायां पिइंगे चलो।
मल्लेश अन्ना की शादियों में जारें, आते दोफेर तक।
ह्यांपे टिफिनां खातूँ करके बोलके आये घरों कु?

मराठवाड्यातील मराठीतही काही शब्दांचे अनेकवचन करतात.

ए पोरीव्हा, धिंगाणे करू नका, अभ्यासं करा.
चला वन्सं, खिचडी टाकुत, सगळ्यान्ला भुका लागल्यात.
परवा तिरुपतीला गेल्तोत, गाडीत सगळ्या लोकान्ला खूपच झोपा येऊ लागल्या.

Pages