हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाय कोण ते ही वाक्य टाका मी ते हैद्राबादीत भाषांटर करेन. चौमोहल्ला प्यालेस चे फोटो पण आहेत. तिथे मी हौसेने बेगम चा ड्रेस व नबाबाची टोपी घालुन फोटो घेतलेला तो ही टाकेन. पब्लिक घबर तो नै जाएंगी.

@ vijaykulkarni

नया नै जी ये फ़क़ीर पुरानाच है Happy

विकु, उनक्की इज्जता काय को बैगन मे मिलाते मिया?
(अंग्रेजा, नवाब इ. ची पारायणे आणि भरपूर हैद्राबादी मित्र एवढंच कनेक्शन)

मस्त धागा.

"...बातां नही करते, हम हैदराबादी, हाथांमे तेरे जो मेहंदी ना लगादी
तो नाम नही लेंगे कभी अपने वतन का
कभी अपने वतन का..."

मला इतकेच माहीत आहे. बाकी असेच ऐकून वगैरे.

एक समजत नाही - बैगन शब्द हैदराबादी लोकं असा derogatory किंवा negative अर्थी का वापरतात?

वैसे बैगन पसंद नै मेरे को, थाली में नक्को, निवाले में नक्को Happy

क्या तो बी धागा निकाले मामा एकदम किराक, पोट्टे लोगा खुश होते नई तो बोलो यारों.

धुलपेट के पोरो कु जलन होरी केते इधर कायकी मस्ती चल री बोल के, मै बोलू हल्लू बोल रे भाडखाऊ इने हैद्राबादी प्यार की बाता रेती, नई मानता तो कादिर पैलवान के पोरो कु ले जाते, पाच फायटा में पुरी धुलपेट थंडी कर डालते मामा अपन, निझाम के खानदान से रेते अपन

कुवारा बाप.
आणि
मै मोहन नाही सोहन हू. कुठला पिच्चर?

केकू,

अंग्रेझ, हैद्राबादी नवाब्ज, बेरोजगार हे प्राथमिक सिनेमे आहेत ह्या नादाच्या मागे

परसूंकीच बात है.....

"क्यों मियां, कब देते टीवी? भोत दिनां हो गये ना..."
"परसूं आजाव साब, तबतलक पक्का रेडी करके रैता."
"ऐसा घुमाव नक्को मियां, ये तुम्हारे परसूं का एक कौनसातोबी तारीख बताव"
"पक्का परसूं, साब. परेशान नै हुनाजी"
-किंवा -
"ये परसूंकीच बात है, हिंया सामनेईच ठैरा था जॉर्ज बुश!"
"कुछ तो बी बोलते क्या? उन्हें आके भोत सालां हो गये ना"
"हौला है क्या रे? परसूं बोलेतो अपना हैदराबाद का परसूं रे. नया आया क्यारे हैदराबादमें?"

@ Sanjeev.B

झकास,
फिलिमी गीतो में हैदराबाद अमर हैं, हैदराबादी जुबान भी Happy

बाबा एका हैदराबादी महिलेचा किस्सा सांगतात, ती आपल्या मुलाचा 'रिश्ता' घेऊन मुलीकडच्यांकडे गेल्यावर उपवर मुलाची खूप तारीफ करते :-

दुल्हा नवाब बहुत खूबसूरत है बी, फकत चेहरे पे थोडे चेचक के दागां हैं, जैसे सडा हुआ सीताफल हो Happy Happy Happy

अनिंद्य मामा धागा भोतइच जबरदस्त निकाले पैलवान तुम, तुमारकू उस्मान्या (हैद्राबादीत उस्मानिया असं पूर्ण नसतंच) बिस्किटा, लुकम्या, हलीम, इरानी चाया पुराच दे डालता बावा मै, तुमारकू व्हेज होना केते बोलेंगे तू तुमकू राम की बंडी ले जाता सु अब्बीच हाऊ.

@ जेम्स,

सकाळीच बहीण आणि मी समोसे आणि लुकमे यातील बारकाव्यांची चविष्ट चर्चा करत होतो, इट इज मच मोअर द्यान द शेप डिफरन्स !

क्या तो बी याद निकाली यारो...

वैसे सही बोले तुम, हैदराबाद में व्हेज होना गुनाह हैच. इव्हन बीरियानी (हो, हेच बरोबर) कुणी चिकन बीरियानी मागवली तर दयाद्र भावे बघतात स्थानिक लोकं.

बीरियानी बोलतो मीट बोलतो बकरा बोलतो गोश्त कीच होना इधर. चिकेन कौन नामुराद खायेंगा Happy

अण्णा डॉलरा डॉलरा डॉलरा डॉलरा,

हैद्राबादी बिर्यानी हे स्वर्गीय अन्न असून पानात पडलेल्या भाताचे एकही शीत उष्टे टाकू नये.

कांद्याच्या लुकम्या ह्या पट्टी समोश्याजवळ पोचतील पण समोसा म्हणजे तो पिरॅमिड अन लुकमी ह्यांची बरोबरी होऊ शकत नाही, प्रत्येकाची एक मूर्त बिर्याणी श्रद्धा असते कोणी पिस्ता हाऊसच्या चरणी लीन तर कोणी, पॅराडाईसच्या, कोणी युनिव्हर्सलचा मुरीद तर कोणी एक बावरचीचा!

हैदराबाद मध्ये व्हेज खायचे असेल तर भंडाऱ्यात असतो तो कद्दू का दालचा और बगारा खाना, लुकमी

सगळं तुडुंब हाणलं की आपलं आहेच मग खुबानी का मिठा किंवा शाही तुकडा

बग़ारा ख़ाना + कद्दू का दालचा

बरोबर.

बोनालू, बतुकम्मा प्रसंगीचा खास सार्वजनिक भोज व्हेज मेन्यू. कभी कभी मिरची का सालन साथ में !

हैदराबादी कुटुंबांमध्ये नुसता साधा पांढरा भात हा फक्त सांबर-रसम सोबत, नायतर बगाराच ! नुसता पांढरा भात पाहुण्याला म्हणजे फारच गरिबी आल्याचे फिलिंग येते म्हणे त्यांना.

हे आज आलेले ढकलपत्र Happy :-

हैदराबादी कस्टमर :- मेरकू चेक डालना है कब तक क्लियर करते ?

बैंकर :- 2 या 3 दिन में क्लियर हो जाता ।

हैदराबादी :- दोनो बैंक तो आमने - सामने ईच है फिर इत्ती देर काईकू ?

बैंकर :- सर, प्रोसेजर फ़ालो करना पड़ता, अगर अभी आप कब्रिस्तान के बाहर एक्सिडेंट में मर गये, तो आपकू पहले घर कू लेके जाते, गुसल देते, कफ़न पेनाते, जनाज़ै की नमाज पढते, या फिर मरते ईच सामने के कब्रिस्तान में दफन करते ?

हैदराबादी :- ए मै 3 दिन बाद आता ना, ऐसे खतरनाक एग्जापंला नक्को दे रे बावा, समझ गया मैं.. !!!

Pages