मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळीच नाही. मला त्या चेतन भगतची पुस्तके वाचण्याची मुळीच इच्छा नाही. साला एक तर इन्ग्रजीत लिहितो ... >> रॉबिनहूड तुम्हाला अनुमोदन... Sad ५.समवन वाचताना किव कराविशी वाटली. किती तो
मसाला होता त्यात... Sad

मनमोहन सिंग , अडवाणी अन रसूल पुकुट्टी या तिघांनीच फक्त इंग्लिशेतर भाषांमधलं पुस्तक वाचल्याचं सांगितलंय. डझनावारी भाषा असलेल्या देशात फक्त तीननिवडक पुस्तकं Sad

इंग्लिश वर्तमानपत्राने विचारल्यावर इंग्लिशेतर पुस्तकं वाचल्याची कबुली द्यायला लाज वाटते, का खरोखर निवडक, लक्षात राहण्याजोगी पुस्तकं नाहीच्चेत भारतीय भाषांमधून ? ज्ञानपीठ अन साहित्य अकादेमी ची पारितोषिकं बंद करावीत मग !

पुण्यभुमि भारत - (सुधा मुर्ति /लिना सोहोनि) हे पुस्तक खुप छान आहे.

योगमहेच्या क्रुपेने Chetan Bhagat - 2 States The Story of My Marriage वाचले. खर तर आधीची पुस्तके वाचून का हात घातला असे मलाच वाटत होते बहुधा, कदाचित curiosity factor चा परीणाम असेल. मला तरी आवडले. एकदम फिल्मी आहे पण सगळा मसाला नीट बेतलाय. हलकि फुलकी शैली पण नीट जमलीये. inter state marriage चा एक प्रसंग जवळून पाहिल्यामूळेही असेल कि "ऐसा भी होता है" हे पटते Happy Feel Good factor फिट बसलाय.

मायबोलिवर पहिली पोस्ट! नमस्कार!

Sorry Marathi typing azun niiT jamat naahiye.

Gauri Deshpande yaanchii "niragaaThii" vaachtiye. masta aahe.

मी तरी आजवर ग्लॉसी इंग्रजी मासिकांमध्ये/वृत्तपत्रांमध्ये 'मी सध्या काय वाचतेय्/वाचतोय', 'कुठला चित्रपट कायम स्मरणात राहिला?' 'कुठल्या अभिनेत्याने/नेत्रीने केलेला रोल परत करायला आवडेल' वगैरे प्रश्नांवर तथाकथित सेलेब्रिटीजनी दिलेल्या उत्तरांमध्ये कुठेही भारतीय लेखक/चित्रपट्/अभिनेते/नेत्री वगैरे पाहिले नाहीत. आणि हे सगळे लोक इतके भारी काहीतरी वाचतात/पाहतात की अगदी आदर वाटतो ते त्यांची यादी पाहुन.. ... Uhoh

बहुतेक भारतीय भाषांतील पुस्तके वाचणे, भारतीय चित्रपट आवडत्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट करणे, भारतीय अभिनेते/अभिनेत्री खुप आवडत असल्याचे सांगणे (अपवाद जे ४० वर्षांपुर्वीच वरती गेलेत त्यांचा करुन) हे सगळे डाऊनमार्केट आहे.

हेच कशाला अगदी मराठी चित्रपटातले दळभद्री सेलेब्रेटीजदेखील काहीतरी इंग्रजी (च) वाचत आणि ऐकत असतात.कोणतेही सेलेब्रेतीज नेहमी वेस्टर्न म्युझिक ऐकत असतात बरं का ! कोणत्या सिलेब्रेतीने कधी इन्डोनेशियन अथवा म्यानमारचे संगीत ऐकत असल्याचे पाहिले आहे काय? त्याना हिन्दी आणि मराठी संगीत ऐकायला 'कशशंच' वाटतं....

त्या यादीतील बहुतेक वाचकांची नावे मला नवीन आहेत. ईग्रजी पुस्तकांची नावे दिली असेल कारण कदाचित ही यादी इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली म्हणून तसे असावे.

असामी, योगमहेच्या कृपेने म्हणजे नक्की कसे/कुणी?

अवांतर -- नाव या शब्दाचे अनेकवचन नावे की नावं?

साला एक तर इन्ग्रजीत लिहितो ... > मग? म्हणून वाचायच नाही? ( मग वाचाल कसे? Wink ) आवडल नाही तर ठीक आहे...

रारंगढांगावर शिनेमा कधी आला???

साला एक तर इन्ग्रजीत लिहितो ... > मग? म्हणून वाचायच नाही? ( मग वाचाल कसे? )
मले इंग्रजी येत नाही सायेब म्हणून मी रागावलो

मले इंग्रजी येत नाही सायेब म्हणून मी रागावलो>> ठीके मग ऑडियो कॅसेट आली की ऐका Proud नाहीतर अ नु वाद वाचा.

रारंगढांगावर शिनेमा कधी आला???

आधी पेंढारकरांनी डॉकुमेंटरी बनवली फिल्म्स डिविजन साठी आणि मग जवळजवळ १०
वर्षानी रारंगढांग लिहिले. त्यानंतर त्यावर चित्रपट बनवण्याची कल्पना आली कोणाच्यातरी डोक्यात पण ती प्रत्यक्षात उतरली नाही.

अर्थात वरच्या पोस्टमध्ये रारंगढांग चित्रपटाचा उल्लेख नाहीय तर 'निशाणी डावा अंगठा' वरील त्याच नावाच्या चित्रपटाचा उल्लेख आहे. मुळ कादंबरीत जे काही आहे ते चित्रपटात निटपणे उतरले नाही.

निळू दामले यांचं 'धर्मवादळ' आणि फिरोझ रानडे यांचं 'मुंबईचा महिमा' ही दोन पुस्तकं गेल्या आठवड्यात वाचली. दोन्ही छान आहेत.

नाही. 'धर्मवादळ'चा विषय धर्म, धार्मिक दहशतवाद, धर्माचा समाजावरील पगडा हा आहे. लेखक अनेक देशांत हिंडले, तिथल्या धार्मिक चळवळींचा अभ्यास केला, आणि त्यावर हे पुस्तक आधारलेलं आहे. अक्षरवार्तेत महिन्याभरात हे पुस्तक येईल. मायबोलीवर हे पुस्तक विकत घेता येईल.

मुंबईचा महिमा या पुस्तकात मुंबईतील सर्व प्रार्थनास्थळांचा सचित्र इतिहास आहे.

कित्येक वर्ष स्मृतीचित्रे आपलं वाचायच्या यादित असं चालु होतं. शेवटी एकदाचा योग आला आणि खुळ लागल्यासारखं झालय. कमाल पुस्तक आहे खरोखर. वाचा आणि संग्रही ठेवा.
मलाही मिळाली ती आवृत्ती संक्षिप्तच आहे. वर हूड, शोनु , चिनूक्स वगैरेंनी चर्चा केली आहे त्यावर.

रैना, माझ्या बाबतीत म्हणशील तर मला पाठ्यपुस्तकात त्यातील वेचे होते त्यामुळे बालपणाचा एक नोस्टाल्जिया होताच. शिवाय टिळकांच्या वावरण्याच्या दोन्ही जागा म्हणजे नाशिक आणि नगर आणि तेथील इमारती वगैरे सर्व परिचयाचं असल्यानं पुस्तक एकदम 'थ्री डी' वाटलं Proud

स्मृतिचित्रेचा इंग्रजी अनुवाद पण सुरेख आहे. आम्हांला शाळेत त्यातील वेचे होते. पण नंतर कुठेच हा अनुवाद दिसला नाही.

हम्म,ते सांगणं अवघड आहे कारण मी संक्षिप्त आवृत्ती पाहिलेली नाही.मुळात हे पुस्तक संक्षिप्त का आणि कसं केलं असेल हेच मला कळत नाहीए.

गोनिदां च, 'माचिवरला बुधा' वाचल. पुस्तक गोनिदांचे आहे म्हंटल्यावर अधिक काही सांगायला नकोच. पण ज्यांना राना-वनाची, फुला-पानांची आवड आहे त्यांना अधिक आवडेल.

रेणु गावस्कर चे "गोष्टी जन्मांतरीच्या" वाचले. लहानपणा पासुन ऐकलेल्या आणि विस्मरणात गेलेल्या गोष्टी पुन्हा वाचायला मजा आली आणि त्या गोष्टींच्या बरोबरीने लिहिलेले लेखिकेचे अनुभव/मुलांच्या मानसिकतेच्या द्रुष्टीने केलेल्या टिप्पणी मुळे गोष्टी नव्याने कळल्या. एकंदरीत पुस्तकाच्या मांडणी हे पुस्तकाचे वेगळेपण ठरावे. शेवट मात्र अजुन रंजक चालला असता. घरात गोष्टी ऐकणारी मुले असतील तर हे पुस्तक अवश्य संग्रही असावे.

ह्या लेखिकेचे "आमचा काय गुन्हा?" हे पुस्तक नुसते बघितले आहे. त्या पुस्तकाबद्दल किंवा लेखिकेबद्दल अजुन माहीती करुन घ्यायला आवडेल.

१) अ‍ॅरियल शेरॉन-लेखक उरी डॅन
एका जेष्ठ अन श्रेष्ठ नेत्या ची आत्मकथा... अतिसुंदर!

२) रिडिस्कव्हरिंग महात्मा गांधी- लेखक योगेश चड्डा
'महात्मा' त्या पदापर्यंत कसा पोहचला त्याची कथा.

३) ओडॅसिटी ऑफ होप- लेखक बराक ओबामा
शुन्यातुन 'राजकीय जग' कसे जिंकले! (पन मला तरी बराक हा, शेरॉन अन पॉवेल पेक्षा खुप छोटा नेता वाटला)

४) मिशेली ओबामा-
प्रामाणिक अनुभव दिलेत!

५) कॉलीन पॉवेल- मॅकमिलन प्रेस
हा माणुस अजुन मोठ्या पदावर जायला हवा होता असे वाटले!

रसिक मायबोलीकर हो! मला लिओनार्दो दा विंन्सी वरची पुस्तके हवीयेत. तुमच्यापैकी कु़णी एखादं नाव सुचवु शकाल का?

Pages