मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> पंडित भीमसेनांची भैरवी ऐकली की मैफिलीत पुढे काही ऐकावंसं वाटत नाही.
- हतबुद्ध झालो वाचून :). बाकी मौजेच्या पुस्तकातही इतक्या चुका म्हणजे बालेकिल्ला ढासळल्यासारखंच की. असो.

डॅन ब्राउनचे नवीन पुस्तक चांगले आहे, हे कळाल्याने आत्ता विकत घ्यायला हरकत नाही.

मी हल्लीच गंगाधर गाडगीळ यांचे 'गंधर्वयुग' हे पुस्तक वाचले. यात बालगंधर्वांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. त्या काळातील लोकांचे संगीत नाटकावर असणारे प्रेम, लोकमान्य व शाहू यांसारखी मान्यवर मंडळींचा नाटक, नाटकातील कलाकार व नाटक कंपनी वर असणारा लोभ यांचा छान उल्लेख आहे.

मुळात बालगंधर्व व त्यांचे गाणे हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय नीट मांडला आहे. त्यांची शेवटच्या काळातील झालेली अवस्था वाचून वाईट वाटते.

जर बालगंधर्वांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हे पुस्तक एकदा वाचायला हरकत नाही.

अवांतर : बालगंधर्वांच्या गाण्याच्या CDs कुठे मिळतील पुण्यात? मी अलूरकरांकडे अजून चौकशी केली नाही.

रन्गासेठ , अलूरकरांकडे चौकशी करायला तुला आता 'वर'च जायला लागेल. अलूरकरांचा खून झाल्याचे माहीत नाही का तुला? दुकान बन्द आहे.

>>>अलूरकरांचा खून झाल्याचे माहीत नाही का तुला? दुकान बन्द आहे>>>
ही दुखःद घटना माहिती होती , पण दुकान अजून बंद आहे हे माहिती नव्हते.

दुकान बन्द आहे.
>>> nalstopवाले दुकान मला तरी उघडे दिसले परवा.

व पु काळे.

१) पार्टनर २) वपुईआ
३) वलय ४) एक सखी

अजुन आहेत पण वाचली नाहित पण हि वाचलेली खुप छान

अजुन
सुधा मूर्तींची
१) वाइज अँड अदरवाइज २) डॉलर बहू

क्षण एक पुरे प्रेमाचा - उर्मिला देशपांडे
अबोली - वि. स खांडेकर

अजुन आहेत पण वाचली नाहित>> एक आगाउ सल्ला, वाचली नसतील तर अजिबात वाचू नका,वपुंची एवढी पुरेशी आहेत कारण त्यांच्या इतर सर्व पुस्तकात हीच कथानके,कल्पना,विचार इ.इ. रिसायकल करुन वापरली आहेत.

नुकतीच वाचलेली पुस्तके:
पर्वः भैरप्पा. कुछ जम्या नाही. महाभारतातल्या व्यक्तिरेखांना दैवत्व/चमत्कार वगैरेंपासून विलग करुन एक मानवी गोष्ट म्हणुन सादर करण्याच्या नादात लैच गोंधळ झालाय. त्यांनी म्हटल्याप्रमाणे बरेच संशोधन करुन हे पुस्तक लिहिलेले आहे. पण एक कादंबरी म्हणुन संशोधन हे न जाणवणे अधिक योग्य असते, ते सहजी यायला हवे. इथे नेमके उलटे होते. आणि ८०-९० वर्षे जगणारे तेव्हाचे लोक, ते करत असलेले प्रवास (द्वारका ते कुरुक्षेत्र रिटर्न जर्नी) हे थोडे पटत नाही. माझा अभ्यास नाही त्यामुळे मी ह्यावर मत प्रदर्शन करणे अयोग्य, तेव्हा थांबतो. एक मात्र जाणवले की जर तुम्ही महाभारतासारख्या पौराणिक (मायथॉलॉजी ह्या अर्थाने) कथांना पहिल्यापासूनच जर केवळ ऐतिहासिक कथा (चमत्कारांना ओरबाडून) बघत असाल तर अशी पुस्तके धक्का देत नाहीत आणि तो धक्का न बसल्याने पुस्तकाकडे तिर्‍हाइत नजरेने बघता येते. जाता जाता कालच वाचनात आलेले एक वाक्यः
The religion of one age is the literary entertainment of the next - Ralph Waldo Emerson

कळः श्याम मनोहर - सिंबली ग्रेट! हे पुस्तक वाचल्यानंतर खरेतर ह्या पुस्तकाबद्दल एखादा शब्ददेखील लिहिताना स्वतःचेच हसू येते. आपल्या रोजच्या जगण्यातील अतिशय क्षूद्र गोष्टी महान फोनी पद्धतीने (फोनी शब्दाला खरेतर दांभिक असा शब्द आहे. पण कॅचर इन द राय वाचल्यापासून ह्या फोनीच्या जवळपास जाणारा शब्दच सापडला नाही कधी) मांडण्याचा आटापीटा ते एकूणच जगण्याची भंकस आणि तिला दिलेले अवास्तव महत्त्व ह्यांना नारळाच्या फोकाने बडवल्यासारखे हे पुस्तक आपल्यावरच आसूड ओढते. आणि तेसुद्धा कुठेही आक्रस्ताळी/हिंसक भाषा न वापरता. पुस्तकाची संरचना (फॉर्म) मी आजवर वाचलेल्या कुठल्याही पुस्तकापेक्षा प्रचंड निराळा. एखादा लेखक अशी संरचना निवडू शकतो ह्याचेच कौतुक वाटते खरेतर. एकुणच कलाकृती केवळ महान!!

रिचर्ड डॉकिन्सची 'द सेल्फिश जीन' आणि 'द गॉड डिल्युजन' अशी दोन पुस्तके नुकतीच www.flipkart.com ह्या आंतरजालावरील भारतीय पुस्तक दुकानातून विकत घेतली. मला ह्या दुकानाचा अतिशय चांगला अनुभव आहे. भारतातले अ‍ॅमॅझॉनच आहे हे. इंग्रजी पुस्तके विकत घेण्यासाठी चांगली सोय आहे.

>>आपल्या रोजच्या जगण्यातील अतिशय क्षूद्र गोष्टी महान फोनी पद्धतीने मांडण्याचा आटापीटा ते एकूणच जगण्याची भंकस आणि तिला दिलेले अवास्तव महत्त्व ह्यांना नारळाच्या फोकाने बडवल्यासारखे हे पुस्तक Proud
वाचायला पाहिजे.

एखादा लेखक अशी संरचना निवडू शकतो ह्याचेच कौतुक वाटते खरेतर. एकुणच कलाकृती केवळ महान!!>> तूफान अनुमोदन. Proud

कळः श्याम मनोहर - सिंबली ग्रेट! हे पुस्तक वाचल्यानंतर खरेतर ह्या पुस्तकाबद्दल एखादा शब्ददेखील लिहिताना स्वतःचेच हसू येते.>> ज्जोर्र्द्दार्र अनुमोदन, हे वाचलेस तर आता 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचच वाच!!
आणि ट्ण्या, तू डॉकिन्सचे 'द सेल्फिश जीन' वाचण्याची मीच आतुरतेने वाट पहात आहे! त्यावर इथे लिहिण्याचा माझा बेत सतत बारगळला,आता ह्या निमित्ताने काही चर्चा होउ शकेल,त्याचेच 'द ब्लाईंड वॉचमेकर' ही सॉलीड आहे.
आगाऊ,तुला पण माझ्यासारखीच 'आ बैल मुझे मार' ची सवय लागलीये का?>>
नाही नीधप,बैल तर मीच आहे आणि वपुंचा उल्लेख म्हणजे माझ्यापुढे लाल कपडा नाचवणे Lol

सर्व अ‍ॅन्टीवपुकरांना - तुम्हाला एकही आवडले नाही का त्यांचे? मला सगळी नाही आवडत पण काही नक्कीच आवडली - निदान काही लेख्/व्यक्तिचित्रणे तरी. आठवली की येथे नावे देतो.

<सर्व अ‍ॅन्टीवपुकरांना - तुम्हाला एकही आवडले नाही का त्यांचे<>

एकच आवडलं. 'सांगे वडिलांची कीर्ती'. नेपथ्यकार पु. श्री. काळे यांच्याबद्दल लिहिलेलं हे पुस्तक.

"स्मृतीचित्रे" (लक्ष्मीबाई टिळक) मराठीच्या धड्यात यातला काही भाग होता. आत्ता वाचायला मिळालं. अगदी साधं सरळ मस्त पुस्तक आहे. नवर्‍याची मतं पटली नाही तरी समजुन घेतांना, नातेवाईकांच्या नाराजीला तोंड देतांना होणारी लक्ष्मीबाईंची तगमग, ओढाताण, ती मतं पटल्यावर आचरणात आणतांनाची जिद्द सगळच मनाला भिडुन गेलं. त्यातला त्रयस्थपणाही जाणवुन गेला.

"रमलखुणा" (जी.ए.) मला जबरदस्त आवडलं. वाचुन झाल्यावर दोन-तीन दिवस त्या दोन कथांशिवाय दुसरं काही सुचेच नां! गारुड केल्यासारखं सतत कुठलातरी प्रसंग, एखाद वाक्य आठवत होतं. त्या भाषेची (घुट्क्या घुटक्यानं चहाची घेतो तशी) मजा घेत परत वाचायलाच हवय.

"तुका आकाशाएवढा" (गो.नी.दांडेकर) तुकाराम महाराजांच्या एका बालमित्राच्या दृष्टिकोनातून 'तुका आंबिले' या 'माणसा'ची ही कथा. चार चौघांसारखं आयुष्य जगणार्‍या तुक्याचा संत तुकाराम महाराज होण्यापर्यंतचा प्रवास दांडेकरांनी अत्यंत रसाळ भाषेत सगळ्या चमत्कारांना फाटा देत समोर मांडलाय. एकदा तरी वाचायला काहीच हरकत नाही.

"द विनर" (डेव्हीड बाल्डाच्ची) दुसरं काहीच चांगलं नसेल वाचायला, टी.व्ही वर बघण्यासारखं काही नसेल तर वाचायला ठीक आहे.

"प्रकाशवाटा" वाचतेय. "चार शब्द" पु.लं. च असुनही वाचलं नव्हतं. ते आणलय.

स्मृतीचित्रे मराठीतील सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र समजले जाते. पाठ्यक्रमातील फुटकळ धडे वगळता मीही ते सलग वाचले नव्हते. मध्यन्तरी वाचले. गम्मत म्हणजे यातील दोन्ही ठिकाणे म्हणजे जिथे हे सगळे प्रामुख्याने घडते ते, नाशिक आणि अहमदनगर येथील त्यांच्या राहण्याच्या जागाजवळच मी रहात असे.त्यामुळे एक वेगळाच थ्री डायमेन्शनल फील आला. (याला मराठी म्हणावे का? :फिदी:) . टिळक सुरुवातीस खूप बेजबाबदार आणि अ‍ॅडामन्ट वाटतात . इतके की त्यांचीही आणि त्याना साम्भाळून घेणार्‍या लक्श्मीबाईंचीही चीड यावी. पण उत्तरार्धात त्यांची आयुष्ये एवढी बदलून जातात की बस. एक ब्राम्हण खुशीने ख्रिश्चन होतो हे विलक्षण आणि अगदी बाय स्पिरिट सेवाभावी ख्रिश्चन होतो हे तर फारच विलक्षण आहे. नगरचे वातावरण तर माझ्या राहण्याच्या आसपासच घडले. मी स्वतः ख्रिश्चन कॉलेजात शिकलो.(मी ख्रिश्चन नाही. ) टिळकांबरोबर काम केलेले लोक त्यात बरेच होते. पण हे सगळे गरिबीतून उपजिवीकेसाठी धर्मान्तरीत झालेले गरीब पूर्वाश्रमीचे महार. टिळक तेवढे ब्राम्हण.
या पुस्तकातून नगरच्या 'पहिल्या काँग्रीगेशनल मन्डळी' ने स्थापन केलेल्या चर्चचा इतिहासही मुळातून कळाला. खूप सुन्दर आणि भव्य चर्च आहे आणि अक्षरशः हजारो वेळा त्याच्यासमोरून गेलो आहे. आता एका वेगळ्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहतो.

मूळ 'स्मृतिचित्रे' हल्ली मिळतं का कुठे? सर्वत्र संक्षिप्त आवृत्तीच असते. ग्रंथालयांमध्येही कुठे मिळाली नाही. Sad

चिनूक्स, अमेरिकेत आलास तर माझ्याकडे आहे ते मी पाठवीन. रसिक साहित्य मधूनच घेतलं होतं ५-६ वर्षांपूर्वी.

स्मृतीचित्रे साधारण १५ वर्षापुर्वी पप्पांनी विकत घेतलेय ते पूर्ण आहे की ती देखील संक्षिप्त आवृत्ती आहे?

पण जी संपुर्ण आव्रुत्ती आहे त्यातही असा अर्धवट एन्ड का आहे? मी बरीच माहिती मिळवायचा प्रयत्न केला पण नाही काही मिळाल.
चारचौघी आणि स्म्रुतीचित्रे ही माझी अत्यंत आवडती पुस्तक आहेत.
मिनोती बहुदा तीच संपुर्ण आव्रुत्ती.

अशोक देवदत्त टिळक म्हणजे रेव्ह. ना वा टिळकांचे नातू मागच्याच महिन्यात निधन पावले. नाशिकला पूर्वी सीबीएसच्या अलिकडे रस्त्याच्या कडेला कम्पाउन्ड वॉलला 'देवदत्त टिळक ' अशी संगमरवरी पाटी दिसत असे. त्याच्या समोरच्या इमारतीत सोपान देव चौधरी रहात. मागच्या पोस्टिंगला मीपुन्हा नाशीकला आलो तर टिळकांचा बोर्डच दिसेना .मी उगीचच मागे पुढे चकरा मारून शोधण्याचा प्रयत्न केला पण ती इमारतच सापडेना आणि ओळखूही येईना. बहुधा टिळकानी ती जागा विकली असावी. आता तर तिथे मला विट्ठल कामतचे हॉटेलच दिसते.
तात्यासाहेब शिरवाडकरांकडे आम्ही जायचो तर ते आपले 'श्रीराम श्रीराम' करीत बहुधा ब्रिस्टॉल नावाची सिगरेट ओढत बसलेले असत :).
एकदा आमच्या सरकारी ओफिसच्या बांधकामाची साईट निवडण्यासाठी आम्ही चक्क तात्यासाहेबानाही घेऊन गेलो होतो. तात्यासाहेब फार साधा आणि निगर्वी , मोठेपणाचा बडिवार न माजवणारा माणूस. अगदी पान टपरीच्या उद्घाटनालाही यायची त्यांची तयारी असे Proud

हूड त्या चर्चबद्दल तुम्हाला जोरदार अनुमोदन.
मी अजून एकदाही हातमपुर्‍याच्या रस्त्यावरून चर्चकडे मान न वळवता गेलेलो नाही.
आताशा तिथे उंच भिंत बांधली आहे बहूतेक.
लहानपणी चौथी-पाचवीत असतांना एकदा आजीकडे खूप हट्ट धरून मी त्या चर्चमध्ये आणि त्याच्यासमोरच असलेल्या एका छोट्याश्या मशिदीत जाऊन आत नक्की काय असते ते बघून आलो. ठोंबरे नावाचे (बालकवींशी केवळ नामसाधर्म्य, टिळकांचे आणि बालकवींचे फार सख्य होते असे ऐकले आहे.) एक ख्रिश्चन आजोबा आमच्या कॉलनीच्या कोपर्‍यावर एका भुताटकी सारख्या घरात एकट्यानेच रहात (तेव्हा आम्हा सगळ्या मुलांना त्या घराची प्रचंड भिती वाटत असे)
ते आजोबा 'पहिली मंडळी' चर्चमध्येच बराच वेळ असत आणि रिटायर्ड झाल्यावरही तिथे काम करीत. कॉलनीतल्या इतर म्हातारबुवांशी बोलतांना टिळकांचा उल्लेख बर्‍याचदा त्यांच्या बोलण्यात येत असे, पण त्यावेळी त्यांचं बोलणं समजण्यासाठी मी खूप लहान होतो.
शाळेत असतांना एका हस्तलिखितात नगर वाचनालय जे बहूधा टिळकांचे घर होते, तिथे जाऊन त्याचे चित्र काढले आणि रे. टिळक व लक्ष्मीबाईंबद्दल माहिती लिहिल्याचंही आठवतंय. पण ती माहिती टिळकांची आणि लक्ष्मीबाईंची साहित्यिक अंगाने ओळख असे काहीसे होते.

मूळ स्मृतीचित्रे वाचण्याची खूप दिवसांपासूनची ईच्छा आहे. मी फार पूर्वी वाचलेल्या आवृत्तीतूनही शेवटची पानं हरवल्यासारखी वाटत होती.

बो-विश , तू म्हणतोस ते चर्च हातमपुर्‍यातले तर नाही? मला ते म्हणायचे नव्हते. हे चर्च चांद सुलताना हायस्कूलच्या समोर आहे. माणिक चौकाच्या कोपर्‍यात. रेव्ह. ना वा टिळकानी त्यांची काव्य प्रतिभा नन्तर ख्रिस्त स्तुतीची कवने करण्यात रुजू केली. विशेषतः ख्रिस्त भक्ती त्यानी भारतीय संस्कृतीची माध्यमे वापरून लोकप्रिय केली म्हणजे कीर्तने, भक्तीगीते. आता टिळकांचीच गीते असल्याने ती प्रासादिक होती आणि खूप पॉपुलर झाली. त्यापूर्वी पास्चिमात्य पद्धतीने प्रार्थना होत. अर्थात तेव्हा पुन्हा जुनाट लोकानी हे काय फॅड म्हणून विरोध केलाच. Proud
टिळकांनी अभंग आणि ओवी फॉर्ममध्ये ख्रिस्त गीते केली. तसेच ओवीबद्ध 'ख्रिस्तायन' लिहिले जे अपूर्ण राहिले. ते पुढे लक्ष्मीबाईनी पूर्ण केले.

पण स्मृतीचित्रात टिळक ख्रिश्चन का झाले याचे उत्तर मिळत नाही. बहुधा ते कवि आणि मनस्वी वृत्तीचे असल्याने 'जे जे पटले तेते केले' या उर्मिनुसार ते झाले असावेत. त्याना ख्रिस्ती धर्मातील करुणेचे व सेवाभावी वृत्तीचे आकर्षण वाटले असावे.
मला वाटते मीही संक्षिप्त आवृत्तीच वाचली असावी. किंवा लक्ष्मीबाई या तशा सिद्धहस्त लेखिका नसल्याने सुरुवातीस बरेच पसरट लेखन झाले असावे म्हणून सम्पादित केलेले दिसते.

बो विश, नगर वाचनालयाचे पलिकडेच मोडक बंगला आहे. हा सुप्रसिद्ध सिनेनट शाहू मोडक यांचा बंगला. अत्यन्त देखणे शाहू हिन्दी पौराणिक सीनेमात काम करीत. विशेष्तः कृष्णाचे. हेही ख्रिश्चनच होते.त्याना ज्योतिषाचा नाद होता. ते आता आता म्हणजे १९९३ ला वारले.

हूड,
ते चांदसुलताना समोरचे 'ह्यूम मेमोरिअल' चर्च आहे. त्याचे स्थापत्य तर अफलातून आहेच, अगदी बघण्यासारखे. तुम्ही 'पहिली मंडळी' चा उल्लेख केला ते हातमपुर्‍यात आहे. क्लेराब्रुस हायस्कूलच्या उजव्या कोपर्‍यात. हातमपुर्‍यातल्या मारूती मंदिरापाशी उभं राहिल्यास समोरच एक दर्गा आणि डाव्या हाताला भिंतीच्या पलिकडे 'पहिली मंडळी सभागृह' की कायसे अशी एक मोठी इमारत दिसेल. तिथेच पूर्वी चर्चची एक अतिशय जुनी वास्तू होती. आता नवीन इमारतीमुळे ती दिसत नाही बहूधा. तिथे आजूबाजूला भरपूर ख्रिश्चन वस्ती आहे.

हो हो शाहू मोडक माहित आहेत तर! नवीन मराठीत असतांना (जेव्हा ती फिरोदियात भरायची) गॅदरिंगला मी बक्षीससुद्धा घेतले आहे त्यांच्याकडून. फार वयस्कर होते तेव्हा ते, पण तरीही फार राजबिंडे दिसायचे. त्यांच्या ज्ञानेश्वरांच्या भूमिकाही खूप गाजल्या होत्या ना?. माझ्या आजीचे तर ते फार आवडते कलाकार होते.
ते ख्रिश्चन होते ही माहिती आजच कळाली.

तू म्हणतो त्या प्रदेशात माझे अर्धे आयुष्य गेले असेल. Happy मी नगर कॉलेजम्ध्ये शिकलो. नन्तरही कोठीच्या खालच्या भागात रहात होतो. पुढे कोठीवर कलेक्टर कम्पाऊन्डमध्ये तर माझा ऑफिशियल रेसिडेन्सच होता. ही पहिल्या मंडळीची भानगड आता पुन्हा गेल्यावर तपासून बघेन. पण खिस्त गल्लीतील चर्च वर पहिली काँग्रिगेशनल मंडळी असे लिहिल्याचे आठवते. पण परत तपासून पाहीन. छे छे स्मृतीचित्रे पुन्हा वाचायला लागेल. ही कोठीवरची ख्रिश्चन पोरे माझ्याबरोबर कॉलेजला होती. नन्तर मी नोकरीनिमित्त नगरला अलो तर त्यातले काही नगर्सेवक झाले होते :). पण गरीब मंडळी . स्वतःची आयडेन्टीटी हरवून बसलेली. त्यांची कुतरओढ हा तर मोठा लिखाणाचा विषय आहे. प्रमोद पिटर शिन्दे, गिल्बर्ट दगडू लोंढे, जेरॉल्ड जेम्स पाथरे , मोनिका एस भोसले अशी नावे आठवतात. आज ते महार आहेत की ख्रिश्चन त्यानाच कळत नाही. गरिबी तीच आहे उलट कन्व्हर्जनने सवलती गेल्या फार फार कुचम्बणा.नोकर्या नाहीत. माझ्या बंगल्याच्या कोपर्‍यावर ही शिक्षीत अर्धशिक्षीत पोरे टाईमपास करीत बसायची तेव्हा वाईट वाटायचे.
त्यातली काही माझ्या वर्गमित्रांचीही असतील. धर्मान्तरीत महारांची फार परवड झाली.

नगर मध्ये ख्रिस्ती धर्मप्रसार झाला तो ब्रितीश मिशनकडून न होता अमेरिकन मिशन्कडून झाला. त्यामुळे तू म्हनतो तो भाग अमेरिकन मिशन चर्चचाच आहे. हातमपुर्‍याच्या बाजूच्या भिन्तीवर(तिकडे डी एड कॉलेज आहे.) नाताळात ख्रिस्त जन्माच्या प्रसंगाचे पोस्टर्स लावतात आणि दिव्यांच्या माळाही लावतात. दिवाळीसारखे वातावरण असते नाताळात. समोरच हातमपुर्‍यातले मुसलमान राहतात. आपण ख्रिश्चनांचे पारम्परिक दुश्मन आहोत हेही त्याना माहीत नाही :). एकदम भाईचारा.

शाहू मोडकानी पौराणिकच भूमिका केल्या ज्ञानेश्वर, कृष्ण वगैरे. आता मोडक बंगल्यात कोण राहते कोण जाणे?

Pages