चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत स्वतंत्र धागा काढा
किंवा आधीचा एखादा वापरा.
विषय जिव्हाळ्याचा आहे.
इथे अवांतर नको

नाही. त्याने फक्त प्लेबॅक सिंगिंग सोडले आहे. तो स्वतःची गाणी करणार आहे.

आणि अरिजित कमी मानधन घेऊन गातो म्हणून सोनू निगम बेकार झाला आहे याला अर्थ नाही. सोनूच्या कॉन्सर्टचे तिकीट मिनिमम ३-४००० चे असते. आत्ताच तर सैय्यारातले परदेसीया हिट झाले. आणि गेल्या वर्षीचे मेरे ढोलना काय जबरदस्त गायले आहे.

पहिल्या बॉर्डर नंतर तब्बल २८ वर्षांच्या गॅप नंतर येत असल्याने 'बॉर्डर २' पाहायला जाण्याची इच्छा अजूनतरी झाली नाहीये. अर्थात ग्लॅडिएटरच्या बाबतीतही सुरुवातीला असेच झाले होते पण त्याचाही २४ वर्षांनी आलेला सिक्वेल थेटरात जाऊन बघितला होता आणि तो आवडलाही होता. त्यामुळे इच्छा झालीच तर कदाचित हा देखील मोठ्या पडद्यावर पाहिला जाईल. नाहीतर नंतर OTT वर आला कि पाहीन.

>>>"इथे ज्या पिक्चरची चर्चा होते ते पडलेले आणि बोरिंग पिक्चर असतात. ">>>
बोकलत 😀 😀 😀
मलाही काहीवेळा असा अनुभव आल्याने वरील विधानाशी पूर्णपणे नाही, पण काहीअंशी सहमत आहे!

@ mbhure
>>>"The Road: trisha menon चा हा तमिळ Thriller आहे. Overall एकदा बघण्यासारखा आहे. तिचा नवरा आणि मुलगा ट्रिपला जात असताना त्यांचा accident होतो. ते दोघेही त्यात दगावतात. हे का झाले ह्याचा शोध घेत असताना एक भयानक गुन्हेगारीचे रॅकेट पुढे येते.">>>
केवळ 'त्रिशा कृष्णन मला आवडते' ह्या कारणासाठी The Road पूर्ण बघितला होता. तिला तिच्या आताच्या वयाला साजेशी मध्यमवयीन महिलेची भूमिका मिळाली आहे एवढी एकच गोष्ट ह्या सिनेमात आवडली. तिच्या मुलाची भूमिका त्या बालकलाकाराने चांगली साकारली आहे, तो 'अत्यंत डोक्यात जाणारा आगाऊ कार्टा' वाटतो खरा!
बाकी संथ चित्रपट बघायला आवडत असतील त्यांच्यासाठी 'एकदा बघण्यासारखा' आहे, पण मला तरी जाम बोअर वाटला हा सिनेमा.

@ mandard
>>>"बॉर्डर २ पण येथे (अबुधाबी) मधे बॅन केलाय.">>>
छान! म्हणजे बॉर्डर २ ब्लॉकबस्टर ठरल्यास धुरंधर प्रमाणे OTT चे हक्क 'चढ्या' किमतीला विकण्यासाठी प्रोडक्शन हाऊस ह्या गोष्टीचा चांगला फायदा उचलणार तर...😀

कधी कधी ट्रेलर फार कंटाळवाणे बनवतात आणि चित्रपट चांगला निघतो.
पण बॉर्डर 2 बाबत अजून मला ट्रेलर जाऊन बघावे अशी इच्छा सुद्धा झाली नाहीये.
कदाचित गदर-2 च्या अपयशामुळे असेल.
गंमत म्हणजे मी गदर-2 चा सुद्धा अजून ट्रेलरही पाहिला नाही.

सनी देओल आपल्याच पिक्चरची 2nd इनिंग खेळतोय वाटते
डर -2 सुद्धा त्याने काढायला हवे
फक्त यंदा शाहरुखला परत घ्यायची चूक करू नये.
त्यानंतर पुन्हा कधी या दोघांना एकत्र बघता आले नाही.

बॉर्डर २ चा ट्रेलर मुद्दाम असा काढला असे आता सांगताहेत. त्यामुळे खूप मोठ्या एक्स्पेक्टेशन्सला सामोरे जावे लागले नाही.
प्रत्यक्षात सिनेमा चांगला निघाला. मी काही पाहिलेला नाही. त्यामुळे या गावगप्पा किती खर्‍या माहीत नाही.

एक खदखदून हसवणारा सिनेमा सुचवा. हसवणारा म्हटलंय, कॉमेडी नको Happy
आणि एक चांगला इंग्रजी / कोरियन सिनेमा सुचवा. ड्रामा असलेला. किंवा फॅमिली व्हॅयूज वगैरे.

गदर-2 अपयशी कसा म्हणता येईल?
बॉर्डर २ चा ट्रेलर मात्र त्यांना जमला नाही पण मुद्दाम तसा नसेल काढला. ट्रेलर बघूनच वरून धवन ट्रोल झालेला. पण बॉर्डर २ चांगला आहे आणि वरून धवनच काम पण.
डर -2 काढायलाच पाहिजे. ते पण शाहरुखला घेऊनच.

ललिता प्रीतीला +१ अजिबातच उत्सुकता नाही. माहितीही नाही. पहिला बॉर्डर सुद्धा पीळ वाटला होता. "ऐ जाते हुए लम्हों" गाणं ( सारखं लागायचं दूरदर्शन वर) आत सुहाग रात चालू आणि बाहेर सैनिक "उरका आणि चला एकदाचं" मोड मधे. एकदाची ती प्रेग्नंट झाली की हा मरायला मोकळा म्हणजे हिला जन्माचे गुंतवून टाका जणू कोणी तरी मसीहा येणार होता पोटी. तिकडे अक्षय मेला की राखी केस भिस्स करून सैरावैरा पळायला मोकळी. Proud एकदम फेक पिक्चर. हे पाहून रडणाऱ्यांना उचलून खऱ्या बॉर्डर जवळ सोडून यावे.

वेगवेगळ्या नावाचे सिनेमे काढायच्या ऐवजी देशभक्ती १, २ , ३ असे सिनेमे काढावेत. एखाद्या भागात युद्ध, एखाद्या भागात हेरकथा, एखाद्या भागात सायंटिस्टने चंद्रावर यान सोडलं, एखाद्या भागात अजून काही. फक्त कलाकारांचे बादरायण संबंध लावावेत एव्हढीच माफक अपेक्षा.

उरका आणि चला एकदाचं >>> Lol
आईने पाठीत धपाटा घालून गिळ लवकर म्हणावं तसं.

सनीचे पिक्चर हे सनीचे पिक्चर असतात. त्याच्यासारखा जोश पडद्यावर कुणाचाच नसतो.
बोकलत , तुम्हाला आवडला होता का बॉर्डर ? Proud

अमलताशच्या अमोलचे शेंगदाणे ना. खरा हिरो तोच ज्याला मिळतो लाडू Proud
माझा वसा आहे, चित्रपटात कुणालाही सुखाने अनप्रोटेक्टेड सुहाग रात करू द्यायची नाही. कुणी दिसले तर विपू करा, मी त्यांना नावं ठेवेन. Happy लोकसंख्या अशी कमी करेन की आपोआपच देश कुठल्याकुठे.

Lol

बाय द वे, ती 'उरका' राणी मुखर्जीची बहीण असल्याचं वाचलं होतं तेव्हा. खखोदेजा.

मी पण. कुणीतरी शर्बाणी मुखर्जी म्हणे. चुलत बहिण बहुतेक. आपल्याला तरी किती पंचायती. Lol

चुलत होय! बरं बरं.
>>> आपल्याला तरी किती पंचायती.
ऑल अबाउट सेफ्टी अ‍ॅन्ड प्रोटेक्शन! Proud

सुहागरात ची पूर्ण तयारी झालेली आहे, आता नवरा बायको आपले दार झाकून घेणार तेवढ्यात लांबची काकू अस्मिता काठी टेकत येते व ओरडते
'रात्री ते दूध पिणार नसाल तर आताच मला द्या, फ्रीझ मध्ये ठेवेन, सकाळी चहाला होईल, किंवा मग विरजण लावून ठेवेन , मुलखाचं महाग दूध' असे म्हणत आहे....

आत सुहाग रात चालू आणि बाहेर सैनिक "उरका आणि चला एकदाचं" मोड मधे >>> Lol

शेंगदाणे >> Lol

'रात्री ते दूध पिणार नसाल तर आताच मला द्या >>> Lol मला "बंदिवान मी..." मधली शेजारची काकू आठवली.

आपल्याला तरी किती पंचायती.
ऑल अबाउट सेफ्टी अ‍ॅन्ड प्रोटेक्शन! >>> Lol आता मला पिक्चर्स मधे मिलिटरीत असलेले लोक जसे लग्न झाल्यावर लगेच युद्धाला बोलावले जातात त्या कथालेखकांची महती समजली.

विकु Lol मॉडर्न डे खुलभर दुधाची गोष्ट झाली.‌
हो, जास्तच दूध झाले तर मिठाईचे दुकान घालू मी आणि स्वाती पार्टनरशिपमधे. सगळ्या अशा पोस्टींना अनुमोदन देणाऱ्या माबोकरांना दोन-दोन किलो पेढे मिळतील.
शेंगदाण्यांच्या नावाखाली "पोएटिक" आगावपणा करणाऱ्यांना पॅकिंग पिनट्स भरवू. Proud

ऑल अबाउट सेफ्टी अ‍ॅन्ड प्रोटेक्शन! >> Lol

लांबची काकू दुधाच्या नावाने येते पण ओच्यात लपवून सुरक्षा आणते, नवविवाहितांच्या काळजीपोटी... खरं तर देशाच्या प्रगतीसाठी..
तर आपले मायबोलीकर कौतुक करणं सोडून नावं ठेवतायत.. Angry

मायबोलीकर एव्हढे चावट असतील असं वाटलं नव्हतं. कुठे विपश्यना आणि कुठे सेन्सॉर पोलीस !
फार एण्ड आपभी ? आपसे ये उम्मीद नही थी Sad
मी तर लाजून तपकिरी झालोय. Blush

आता मला पिक्चर्स मधे मिलिटरीत असलेले लोक जसे लग्न झाल्यावर लगेच युद्धाला बोलावले जातात
<<<<<<
उदा - 'मोहोब्बतें'मधला त्या प्रीतीचा नवरा....

Happy अरे हो की, पण 'मोहब्बते'मधे तिला तेथे सात वर्षे पवित्र ठेवलेय. मोठ्या धूर्तपणे सुहागरात होऊ दिली नाही , त्याला आधीच सीमेवर धाडलं आहे. या नव्या हिरोसाठी. सात वर्षे एखादं माणूस बेपत्ता असले की कायद्यानुसार मृत घोषित केले जाते. मग काय लग्न चौदाव्या वर्षी केलं की काय असे तिचे वय पाहून वाटतं. तेथे मात्र सेलेक्टिव्हली कायदा चुलीत घातलाय. पेट्रियार्कीला सोयीस्कर कायदे आणि अलिखित नॉर्म्स आहेत.

निरू Proud जन-फनहितासाठी !
एले Proud

'मोहोब्बतें'मधला त्या प्रीतीचा नवरा.... >>> एक्झॅक्टली. कोणी कुंकू पुसल्यावर लगेच आनंदाने नाचायला गेलेली हिंदी चित्रपट इतिहासातील एकमेव हिरॉइन असेल ती.

तेव्हा ती पळताना तिच्या आवाजातील चढउतार, मॉड्युलेशन ई चा तज्ञांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. लांबून ती उतारावरून धावत येते. स्क्रीनसमोर अगदी जवळ येते आणि पुढे इतरांबरोबर नाचायला निघून जाते. तेव्हा पळताना तिच्या आवाजात काहीही फरक पडत नाही. लांबून येताना, जवळ आल्यावर आणि पुन्हा लांब जाताना आवाजाची रेंज आहे तशी फिक्स आहे.

मग काय लग्न चौदाव्या वर्षी केलं की काय असे तिचे वय पाहून वाटतं >>> Happy हे लक्षात नव्हते आले.

एले Happy

सरकारच्या निरनिराळ्या परवानग्या / परवाने असतात. तसे सुहाग रात्री साठी परवानगी देणारे एक खाते बनवावे आणि त्यावर मायबोलीवरचे तज्ञ बसवावेत. भारताची लोकसंख्या ७० कोटीवर आणण्यासाठी हे गरजेचे आहे.

एले Lol एवढं झालं की विपश्यना - हरी ओम!

कुंकू पुसल्यावर लगेच आनंदाने नाचायला गेलेली हिंदी चित्रपट इतिहासातील एकमेव हिरॉइन असेल ती. >>> Lol

Pages