क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

“पण कुलदीप च्या जागी अक्षर्/सुंदर असे दिसेल असे वाटते.” - अक्षर ला व्हाईस कॅप्टन केलंय, त्यामुळे तोच खेळेल.

ह्यापेक्षाही (म्हणजे रोकोंनी खोर्‍यांनी धावा काढणे ह्यात मला आता काही नवलाईचे वाटत नाही) सूर्यवंशी, गनी, किशन नि कर्नाटकाने चारशे दोन ओव्हर्स बाकी ठेवून चेस करणे जास्त न्यूज वर्दी वाटले मला. विकेट्स पाटा असतील तरी असे आधी झालेले आठवत नाही. वैभवची इनिंग सेकंड फास्टेस्ट होती ती दिवस मावळेपर्यंत चौथ्या क्रमांकावर गेली हे माईंड ब्लोईंग आहे.

प्लेट लेव्हल संपली कि ह्यातले किती तेव्हढेच धुमाकूळ घालतील ते बघायला मजा येणार आहे.

मला डोमेस्टिक मध्ये धुमाकूळ घालणाऱ्यांचे हुरळून जावे इतके कौतुक वाटत नाही. कारण ते सामने पाहिले नसतात, समोरची गोलंदाजी काय आहे याचा अंदाज नसतो. काही असे फलंदाज असतात जे डोमेस्टिक मध्ये तुफान खेळतात पण वरच्या लेवलला खेळायची त्यांच्यात क्षमताच नसल्याने अचानक साधारण भासतात.
रोको बाबत तसे नाही. त्यांचे आधीच सिद्ध करून झाले आहे. न्यूज यासाठी वाटली की एकीकडे काही जण टपली आहेत की कधी यांचा फॉर्म गडबडतो आणि आम्ही यांना नारळ देतो. पण या दोघांनी गेले काही सिरीज धुमाकूळ घालत आयसीसी रँकिंगमध्ये जगात पहिला दुसरा क्रमांक पटकावला आहे. आणि आता तोच धुमाकूळ त्यांनी डोमेस्टिक मध्ये देखील कंटिन्यू ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या वाईटावर टपलेल्यांचे धाबे दणाणने कायम आहे.

बाकी वैभव सूर्यवंशी तर कधी भारतीय संघात येतो याची मी वाटच बघत आहे. येत्या आयपीएल मध्ये त्याचा एकूण एक चेंडू मी बघणार. हा पोरगा वरच्या लेवलला असाच खेळला तर येत्या काळात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये फार मजा येणार आहे.

ईशान किशन सुद्धा एक गुड न्यूज आहे. हा जर अश्याच फॉर्ममध्ये असेल आणि राहिला तर याला सरळ वर्ल्ड कप प्लेयिंग इलेव्हन मध्ये पहिल्या सामन्यापासून खेळवायला हवे.

“ प्लेट लेव्हल संपली कि ह्यातले किती तेव्हढेच धुमाकूळ घालतील ते बघायला मजा येणार आहे.” +१

इंग्लंड ऑस्ट्रेलिया एका दिवसात 20 विकेट गेल्या.
दोन्ही संघ ऑल आऊट
खेळपट्टी चांगली की वाईट ही चर्चा सोशल मीडियावर पुन्हा रंगण्याची शक्यता

*खेळपट्टी चांगली की वाईट ही चर्चा सोशल मीडियावर पुन्हा रंगण्याची शक्यता* -
हे आता इतकं नेहमीचं झालंय की कसोटी सामनेच दोन दिवसीय ठेवावे की तीन दिवसीय, याचीच चर्चा यापुढे रंगण्याची शक्यता अधिक आहे !! Wink

दोन दिवसीय ठेवावे की तीन दिवसीय, याचीच चर्चा यापुढे रंगण्याची शक्यता अधिक आहे !! Wink>>>

कसोटीला त्रिदिवसीय आंतरराष्ट्रिय सामने म्हणून समजले जावे आसा आदेश निघेल आयसीसीचा.

पुर्वी कसोटी ६ दिवसांचीही होती. मध्ये एक विश्रांतीचा दिवस असे. मर्यादित षटाकांचे तण माजले तसे कसोट्यांची वृक्षतोड हळू हळू सुरु झाली.
आता कसोटीच्या २ किंवा ३ सामन्यांची मालिका आणि ते सामनेही ३ दिवसांत उन्मळून पडतायेत.

इंग्लंडमध्ये सारे सामने पाचव्या दिवशी गेले होते.
कसोटी चार दिवसांची असती तर एखाद दुसरा निर्णायक ठरला असता

त्या पिचबद्दल दिलेले स्पष्टिकरण कोणी वाचले का ? पाटा बनवण्याव्यतिरिक्त इतर चॉईस नव्हता म्हणे. हा दुसरा असा सामना ठरेल बहुधा जो दोन दिवसांमधे आटोपेल. सी ए ला भारी नुकसान होणार आहे त्यांचा संघ चांगला खेळल्याने Happy

हायलाइट्स पाहिली
फालतू पीच होता
बॉल कसाही घुसत उसळत होता. प्रॉपर क्रिकेट खेळून सर्वाइव्ह करणे अवघडच होते.

असली विकेट इतरत्र कुठे असती तर हंगामा झाला असता. दोन दिवसात टेस्ट संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं आर्थिक नुकसानही झालंय.

WTC चा उद्देश टेस्ट क्रिकेट अधिक चुरशीचं व्हावं असा होता. पण प्रत्येक मॅच निर्णायक करण्याच्या अट्टहासापायी टेस्ट क्रिकेटचा आत्माच हरवत चाललाय असं वाटतं.

पर्थ टेस्ट: २ दिवस
मेलबर्न टेस्ट: २ दिवस

४ टेस्ट चा एकूण खेळ १३ दिवस

पण ऑस्ट्रेलिया मधे टफ कॉन्टेस्ट असते
अन् भारतात खराब पिच...

*टेस्ट क्रिकेटचा आत्माच हरवत चाललाय असं वाटतं.* +१
पीच खराब बनवण्याशिवाय सामने निर्णायक करण्यासाठी अनेक इतरही पर्याय असू शकतात. ( उदा. सामन्याचा सरळ निकाल नाही लागला तर स्कोरिंग रेट, घेतलेल्या विकेट्स, इत्यादीसाठी गुण देवून विजेता ठरवता येईल. अर्थात ही विचारार्थ सूचना आहे. ) मला वाटतं, पांच दिवसाचे सामने, ही संकल्पनाच सर्व देशांच्या नियामक बोर्डाना आता नकोशी वाटत असावी !

टेस्ट चॅम्प्यनशिपच्या गुणांकनामूळे निकाली पिचेस बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्या पिचमधे दुर्दैवाचा भागही होता. त्याआधी वेदर असे होते कि एकतर असे फरी पिच किंवा पूर्ण ओसाड पिच असे दोनच पर्याय होते असे वाचले.

मला वाटतं, पांच दिवसाचे सामने, ही संकल्पनाच सर्व देशांच्या नियामक बोर्डाना आता नकोशी वाटत असावी ! >> भाऊ पाच दिवसांची तिकिटे बहुतेक ठिकाणी आधीच विकली जात नाहित. त्यामूळे लवकर सामना संपला तर उत्पन्नावर परीणाम होतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन सामने दोन दिवसांमधे संपल्यामूळे झालेल्या नुकसानीचे आकडे जाहिर केले आहेत.

*भाऊ पाच दिवसांची तिकिटे बहुतेक ठिकाणी आधीच विकली जात नाहित* - टी 20 व एकदिवसीय सामन्यांची तिकिटे विकण्यात ती अडचण अर्थातच येत नाही. पण कसोटी कमी दिवसांची ठेवली तर मात्र सर्व दिवसांची तिकिटे आधीच विकणे सहज शक्य असावं/ सर्व क्रिकेट बोर्डाना तसं वाटत असावं. Wink

*उद्या निर्णायक सामना * - निकाल लागला ! आपण सामना ( 296 वि. 336 ) व मालिका ( 1-२ ) हरलो. आज कोहलीचं अप्रतिम शतक !!! न्युझीलंड , अभिनंदन ! भारत, सावधान !!

जे जे मायबोलीकर कोहली आणि राणा मॅच काढेल या आशेवर होते त्या सगळ्या भोळ्या मायबोलीकरांना मानाचा त्रिवार मुजरा.
सासरला ही बहीण निघाली
भावाची लाडी sssss
नेसली माहेरची साडी Happy
बिचारे भोळे अलका कुबल

दोन्ही संघाच्या बलाबलाचा विचार करता, जी सिरीज भारताने सहज जिंकायला हवी होती, ती ते मोठ्या फरकाने हारले. पहिली मॅच कशीबशी जिंकली आणि पुढच्या दोन्ही न्यूझिलंडने सहज जिंकल्या. न्यूझिलंडने भारताला मायदेशात टेस्ट आणि वनडे सिरीजमधे पराभूत केलं. त्यांचं कौतूक आहे. भारताने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

कोहली कमाल खेळला. आज न्यूझिलंड आणि विजय ह्यामधे तो पाय रोवून शेवटपर्यंत उभा राहिला. रेड्डी आणि राणाने साथही दिली पण ते प्रयत्न अपूरे पडले.

भारताचा विक्रमी विजय
फास्टेस्ट 200+ चेस
15.2 ओवरमध्ये
पहिल्या 2 ओवरमध्ये 8-2 अशी स्थिती झाल्यावर हे विशेष
ॲप्रोच है बॉस !

बाई दवे,
कुलदीप आणि वरून एकत्र हे चांगले कॉम्बिनेशन आहे. मिडल फेजला विकेट टेकर बॉलर असले तर कायम सामन्यात राहू.
म्हणून ऑल राऊंडरमध्ये अक्षर सुंदर असे स्पिनर न घेता पांड्या आणि दुबे हेच बरे. मध्येच अभिषेक शर्मा एखादी ओवर टाकून पसार होईल.

म्हणून ऑल राऊंडरमध्ये अक्षर सुंदर असे स्पिनर न घेता पांड्या आणि दुबे हेच बरे. >> कुलदीप आणला कि अर्शदीप नि बुमरा मधल्या कोणाला तरी बाहेर ठेवून राणाला ऑलराऊंडर म्हणून आणून ८ बॅटसमन (ऑलराऊंडर धरून) खेळवणे जरुरी होते. हे बरोबर किंवा चुकीचे आहे ह्याबद्दल माझे काहीच मत नाही.

दोन्ही संघाच्या बलाबलाचा विचार करता, जी सिरीज भारताने सहज जिंकायला हवी होती, ती ते मोठ्या फरकाने हारले. >> +१. अय्यर नि राहुल अगदीच सुमार खेळले. बॉलिंग पण अगदीच केविलवाणी होती.

सूर्या बुमराचं करिअर खराब करणार बहुतेक असं वाटतय. आता महिन्यांत स्पर्धा सुरू होईल तरी त्याला खेळवत नाहीत खेळवल तरी दुय्यम बॉलरची वागणूक देतात.

Pages