फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही जी केरळमध्ये घटना घडली आहे, तशी घटना घडू शकते, ही शक्यता मी नोव्हेंबर २०२४ मध्येच व्यक्त केली होती....

अशा बायका कधीही एखाद्या पुरुषावर प्रवासात चुकून जरी धक्का लागला तरी राईचा पर्वत / पराचा कावळा करून त्याच्यावर विनयभंगाची केस टाकून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे अशी टांगती तलवार प्रवासात सतत डोक्यावर राहू नये, म्हणून पुरुषांसाठी आरक्षित डबे हवेत.
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 24 November, 2024 - 01:08

त्यामुळे मी 'पुरुषांसाठी स्वतंत्र्य डब्यांची' मागणी नेहमी करतच राहणार>>>>>

मायबोलीवर मागणी करुन काय उपयोग??

मागणी नेहमी करतच राहणार असे मायबोलीवर लिहिले की त्याचा अर्थ मायबोलीवर किंवा मायबोलीकरांकडे मागणी करत आहेत असा होत नाही Happy

यावरून आठवले,
शेकडो लोकं मायबोलीवर रोज चर्चा करतात आणि वर असेही म्हणतात की मायबोलीवर वांझोट्या चर्चा करून काय फायदा Happy

विचार पसरवणे, आणि त्यांची देवाणघेवाण होणे महत्वाचे असते! पुढे यातूनच कायदे तयार होतात, अश्यानेच समाजाची विचारसरणी बदलते.

मी सध्या कुणाशीच सहमत नाही. पण त्या साठी या धाग्यावर माझे मत लिहीले आहे का हे तपासायला हवे. असेल तर मी माझ्याशीही सहमत नाही. म्हणजेच माझेच मत खरे आहे हे खरे.

विमु यांची स्त्री पुरूष समानतेची तळमळ जाणवली. त्यांच्या या मोहीमेत भर घालता येण्यासारखे काही मुद्दे.

१. बांधकाम , रोजगार हमी योजनेत स्त्रियांना पुरूषांइतकाच रोजगार मिळावा.
२. चित्रपट उद्योगात हिरोला मिळतात तेव्हढेच पैसे हिरॉईनला मिळावेत.
३. नायकप्रधान पिक्चर इतकेच पिक्चर्स नायिकाप्रधान यावेत आणि त्यांना तेव्हढ्याच स्क्रीन्स मिळाव्यात.
४. हुंडाबळीच्या केसेस मधे जितक्या स्त्रियांचा मृत्यू होतो, तितकाच पुरूषांचाही व्हावा ( हे थोडं अती आहे पण नाईलाज आहे, कारण यात कुणाचंही काढून घेतलं जात नाहीये, दोघांनाही समान न्याय दिला जात आहे)

हे फक्त नमुने. अजून बरेच आहेत. पण त्यात पुरूषाला शिक्षा होण्याऐवजी फायदाच होत असतो. सामाजिक न्याय ही कल्पना समजावून घ्यायची नसते तेव्हां त्या व्यक्तीला समजावून सांगण्यात अर्थ नसतो. दुर्दैव हे आहे कि इथे काही स्त्री आयड्या सुद्धा गंभीर नाहीत.

विचार पसरवणे, आणि त्यांची देवाणघेवाण होणे महत्वाचे असते! पुढे यातूनच कायदे तयार होतात, अश्यानेच समाजाची विचारसरणी बदलते. +१११
Exactly! सध्या हाच उद्देश आहे!

एक लेखक यांचा 22 January, 2026 - 09:13 रोजीचा प्रतिसाद - आपले मुद्देही बरोबर आहेत. पण स्त्रियांसाठी काम करणाऱ्या 'भूमाता ब्रिगेड' आदी अनेक संघटना आहेत. त्यामुळे मी सध्यातरी या मुद्द्यांना हात घालणार नाही.

बरोबर आहे.
पुरुषांच्या स्वतंत्र डब्यासाठी समर्थन असो नसो पण पुरुषांनी आपली एखादी समस्या मांडल्यास यापेक्षा जास्त प्रॉब्लेम तर स्त्रियांना असतात म्हणून त्यांना धुडकावून लावू नये.

पुरुषांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांना कोणी सिरीयसली घेत नाही.
उलट पुरुष असून रडता काय बायकांसारखे म्हणून ऐकून घ्यावे लागते.

समजा पाकिस्तान सारख्या एखाद्या देशात हिंदूंवर अ त्याचार होणे हे नेहमीचे आहे. पण तुरळक प्रमाणात हिंदूंकडून मुस्लिमांच्या वर function at() { [native code] }याचाराच्या घटना झाल्या कि बघा मुस्लिमांना कुणी वाली नाही असे म्हणून समान हक्काची चळवळ चालवण्यासारखे आहे हे.

खरे तर विमु हे पुरूषांची बाजू घेऊन स्त्रियांच्या फायद्याची चळवळ चालवत आहेत हे लक्षात आले आहे. बसमधे समान आरक्षण ठेवले कि स्त्रियांना आपल्याला विशेष वागणूक मिळतेय असे वाटेनासे होईल आणि त्या त्यांच्या गळचेपीकडे लक्ष देतील, आवाज उठवतील. बसमधे राखीव जागा हे आवळा देऊन कोहळा देण्यासारखे आहे हे त्यांच्या लक्षात येईल आणि मग पुरूषप्रधान सत्तेच्या विरोधातला लढा तीव्र होईल या हेतूने ते हा आवळा काढून घेऊ बघत आहेत.

२. चित्रपट उद्योगात हिरोला मिळतात तेव्हढेच पैसे हिरॉईनला मिळावेत.
३. नायकप्रधान पिक्चर इतकेच पिक्चर्स नायिकाप्रधान यावेत आणि त्यांना तेव्हढ्याच स्क्रीन्स मिळाव्यात.>>>>>
https://youtu.be/LbqE1MBloeE?si=tsAT-Jk1fN25bncu

पुरुषांचे प्रश्न नसतात का, त्यांचे शोषण आणि स्त्रियांकून होत नाही का, किंवा पुरूषांकडून लैंगिक शोषण होत नाही का तर हो हे सगळे होते आणि ते ही तेवढंच चूक आहे.

पण जेव्हा स्त्री-पुरुष समानता हवी तर मग हेच पुरुषांना का नको किंवा जसे स्त्रियांना बाहेर अनुभव येतात तर पुरुषांना काय कमी येतात, उलट अमुक अमुक गोष्टींबाबत स्त्रियांना लगेच माफ केले जाते पुरुषांना नाही असे सार्वत्रिक अनुभव असल्याचे मांडले जाते आणि त्या सार्वत्रिकीकरणावर प्रश्न केले की मग वर मी म्हटले तसे म्हणजे पुरुषांचे प्रश्न नसतात का ... असा त्यावर प्रतिवाद केला जातो.
पुरुषांचे शोषण होते हे साफ नाकारणारेही लोक असतातच. तेच इथे होत आहे असा प्रतिवाद केला जातो.

ज्या हिरोईन किंवा महिला खेळाडूना पैसे कमी मिळतात ते त्या महिला आहेत म्हणून नाही तर त्या आपल्या स्टार व्हॅल्यू वर तितका क्राउड खेचू शकत नाही म्हणून तसे असते.
ज्या महिला खेळाडू किंवा कलाकार हे करतात त्या कमावतात.

माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा काही महिलांना माझ्यापेक्षा जास्त पगार आहे. कारण त्या माझ्यापेक्षा जास्त हुशार कार्यक्षम कर्तृत्ववान वगैरे आहेत. मी माझे पुरुष असल्याचे सर्टिफिकेट CV मध्ये जोडले तरी मला त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळणार नाही.

ज्या हिरोईन किंवा महिला खेळाडूना पैसे कमी मिळतात ते त्या महिला आहेत म्हणून नाही तर त्या आपल्या स्टार व्हॅल्यू वर तितका क्राउड खेचू शकत नाही म्हणून तसे असते.
ज्या महिला खेळाडू किंवा कलाकार हे करतात त्या कमावतात.

माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा काही महिलांना माझ्यापेक्षा जास्त पगार आहे. कारण त्या माझ्यापेक्षा जास्त हुशार कार्यक्षम कर्तृत्ववान वगैरे आहेत. मी माझे पुरुष असल्याचे सर्टिफिकेट CV मध्ये जोडले तरी मला त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळणार नाही.

ऋन्मेष जी तुम्ही एका बडय़ा मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कामाला आहात. लठ्ठ पगार आहे. पण अशा organised sector मधे पूर्वीपासून स्त्री पुरूष वेतन समान होते का? कि कायदा करावा लागला होता? असेल तर कोणता कायदा? किती साली केला?
का?

सर्व प्रश्नांचे एकच उत्तर
जितकी उपयुक्तता तितके वेतन
उद्या मी माझी कंपनी काढून तिथे माणसे कामाला ठेवली तर हाच निकष लावणार.
मी फक्त आउटपुट बघणार ते मला पुरुषाकडून मिळते की बाईकडून मला फरक नाही.
जर माझ्या कंपनीचे स्वरूप असे असेल की तिथे कस्टमर सुद्धा महिला असतील आणि बायकांना कामाला ठेवल्यास माझा बिजनेस वाढत असेल तर मी जास्त पैसे मोजून बायकांना कामाला ठेवेन. उगाच मी सुद्धा पुरुष आहे म्हणून कुठल्या पुरुषाला आयता पगार देऊन पोसणार नाही.

विमु यांना हा प्रश्न धसास लावायचा आहे, मागणी करत राहातची आहे. ती मागणी त्यांनी योग्य त्या ठिकाणी म्हणजे बस व्यवस्थापन, रेल्वे मंत्री वगैरे जागी केलीय का हे विचारतेय. मायबोलीवर मागणी करुन बस किंवा रेल्वे इथे येऊन वाचणार नाही ना.. आणि जरी त्यांनी वाचले तरी अधिकृत पत्र मिळाल्याखेरिज् ते काही करु शकणार नाहीत. असे मागणीपत्रक संबंधितांना देतानाचा फोटो इथे डकवला तरी पुरेसे होइल. विमु खरेच गंभिर आहेत या विषयाबाबत हे सिद्ध होईल.

ऋन्मेषजी तुमच्या सारख्या विद्वान आणि सैन्सिबल व्यक्ती कडून असा प्रतिसाद अपेक्षित नाही. तुमच्या रेप्युटेशन चा सवाल आहै.

बाय दिवे, माझ्या ओळखीच्या कंपनीत एका लेडीज डायरेक्टर‌ने वूमन्स डे ला गिफ्ट म्हणून फक्त स्त्रियांचे प्रमोशन केले होते ते पण असेच कोणत्याही अटी, पात्रता चे निकष न लावता..खूप गदारोळ झाला होता.. आताही तिथे वूमन्स डायव्हरसिटीच्या नावाखाली फक्त मुलींनाच घेतात..
च्या आयला, काम करून घ्यायची असतात ह्यांना की महिला मंडळ स्थापन करायचं असतं तेच कळत नाही..

दुसरा किस्सा :

२०१२ ची गोष्ट आहे एका मोठया नामांकित कंपनीत मी मुलाखतीला गेलो होतो.. पाच राऊंड झाल्यानंतर मला एच आर ने सांगितल की, तुझी निवड झाली आहे थोड्या वेळ वाट बघ.. मी ऑफर लेटर घेऊन येते.

इकडे मी खुश, मनासारखा पगार, चांगली कंपनी..

अचानक काय झालं काय माहीत?

थोड्या वेळाने ती हात हलवत आली आणि म्हणाली की, सध्या आम्ही लेडीज ना घेत आहोत कारण आम्हाला ऑफिसमधलं एटमोसफिअर मेंटेन करायचं आहे..तुझं सिलेक्शन पक्कं आहे फक्त आता लगेच आम्ही नाही घेऊ‌ शकत.. जेव्हा जागा असतील‌ तेव्हा आम्ही काॅल‌ करू..

असा राग आला होता ना? पण काय बोलणार..

दोन‌ महिन्याने त्या एच आर चा काॅल आला होता पण अर्थात मी दुसरीकडे जाॅईन‌ केलेलं.. मी सरळ सांगितले मॅडम मी काम करू शकतो फक्त ते तुमचं ग्लॅमर किंवा‌ अटमोसफिअर मेटेंन करण्यासाठी तुम्ही स्रियांना घ्या.. कदाचित त्या काम सोडून रॅम्प वाॅक पण करतील आणि तुमचं एटंरटेनमेन्ट पण होईल..

आजही किती तरी जाहीराती बघतो मी, ब्रेक घेतलेल्या महिलेला प्राधान्य, सिंगल मदर, स्पेशल वाॅक इन ड्राईव्ह फाॅर वूमन चालत असतात..

पण हेच कधी घटस्फोट झालेल्या पुरूषांना प्राधान्य, किंवा‌ करीअर गॅप असलेल्यांना पुरूषांना प्राधान्य, फक्त पुरूषांसाठी
हे असं का घडतं नाही?

>>>>>>पण हेच कधी घटस्फोट झालेल्या पुरूषांना प्राधान्य, किंवा‌ करीअर गॅप असलेल्यांना पुरूषांना प्राधान्य, फक्त पुरूषांसाठी
हे असं का घडतं नाही?
पुरुषांनी पुढाकार घेउन हे इव्हेन्टस घडवुन आणावेत. त्यांना कोणी थांबवतय का? हे अरण्यरुदन कशाकरता?

पुरुषांनी पुढाकार घेउन हे इव्हेन्टस घडवुन आणावेत.>>>

तेच तर पुरूषांच्या बाजूने पुरूष ही नाहीयेत. ते जाऊ द्या हो
पण स्रियां पण पुढाकार घेत नाही..

आजही किती तरी जाहीराती बघतो मी, ब्रेक घेतलेल्या महिलेला प्राधान्य, सिंगल मदर, स्पेशल वाॅक इन ड्राईव्ह फाॅर वूमन चालत असतात..

पण हेच कधी घटस्फोट झालेल्या पुरूषांना प्राधान्य, किंवा‌ करीअर गॅप असलेल्यांना पुरूषांना प्राधान्य, फक्त पुरूषांसाठी
हे असं का घडतं नाही?>>>
देण्यात येणारे प्राधान्य हे Data based असतं, तसेच त्यात एस्टॅब्लिश्ड सामाजिक विषमतेचे संदर्भ गृहीत धरलेले असतात. (जे एखाद-दुसऱ्या ठरावीक प्रसंगी चुकीचे ही ठरू शकतात ).

काही जणांना मी दोन दगडांवर पाय ठेवणारा(सामान्य भाषेत डबल ढोलकी) वाटू शकेन. पण संधी उपलब्ध करून देण्याबाबत आरक्षण/प्राधान्य असण्यात ( फक्त स्त्रियांनाच नव्हे तर इतरांनाही ) व्यक्तीशः मला काही वावगे वाटत नाही. ( Obviously need to be well supported by data.), पण मिळालेल्या संधीतील कामगिरीच्या मूल्यमापनात डबल स्टँडर्ड्स असू नयेत. एखादी संधी जेव्हा कुणीही घेतो तेंव्हा त्यांत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची तसेच त्या जोडीने येणाऱ्या इतर आवश्यक बाबींची त्याला पुरेपूर कल्पना असते, त्यामुळे काही ठरावीक जेंडर बेस्ड कारणांमुळे माझ्या कामगिरीच्या मूल्यमापनाला माझ्या गटात न बसणाऱ्यापेक्षा वेगळे निकष लावावेत ही मागणी/अपेक्षा फक्त असू नये.
quote-genuine-equality-means-not.jpg

फाविद, तुमची quote देऊन मुद्दे मांडण्याचीशैली छान आहे.
समानता म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध असणे यापेक्षा हे quote समानता म्हणजे काय हे अधिक स्पष्ट करणारे आहे.
एरव्ही फक्त हे quote वाचले असते तर नीट कळले नसते मला.

अजय चव्हाण यांची पोस्ट वाचुन गंमत वाटली. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांचा सहभाग वाढावा म्हणुन प्रयत्न केले जाताहेत. त्यात काहीजणांवर अन्याय होणार. दलितांना मिळणार्‍या आरक्षणामुळे काही ठिकाणी गरजु सवर्णांवर अन्याय होतो तसेच हे आहे. या संदर्भात फाविद्डि यांची पोस्ट पटते.

मी नीट वाचलं नाही, थोडं अवांतर झाले असेल पण वरवर वाचून मला जे ईनजनरल लिहायचं होतं ते लिहून टाकतेय.

---
पुरुषांचेही शोषण होऊ शकते तेही घृणास्पद आहे. अशा गुन्ह्यांना आळा बसायला हवा व शिक्षाही व्हायला हवी. पुण्यात लहान मुलावर बलात्कार झाला होता, बिल्डिंग मधल्या "दादा"नेच केला होता. त्यामुळे लहान मुलांबाबत किंवा मुलींबाबत कुणावरच विश्वास ठेवू नये. लहान असेपर्यंत सगळेच असुरक्षित असतात आणि भयंकर ट्रॉमा होऊ शकतो. मुलगा आहे म्हणून उगाच रिलॅक्स राहणं व कुठेही कुणाबरोबरही सोडणं मला या काळात "फॉल्स सेन्स ऑफ सेफ्टी" वाटतं.

कोणत्याही जेंडरचे शोषण शोषणच आहे आणि त्याला वाचा फोडायलाच हवी. पेट्रियार्कीमुळे आणि मुळातच स्त्रियांविषयी आदर न वाटल्याने स्त्रिया जास्त असुरक्षित आहेत. त्यात जातीच्या फेक उतरंडीप्रमाणे, परदेशात रंगाच्या - त्या अजून असुरक्षित होतं जातात आणि त्यांच्यावर दबावही आणला जातो. अन्याय हा अन्यायच आहे, माणूस/ जेंडर कुठलेही असो. पुरुषांना सुद्धा त्रास होतो, तेही संवेदनशील असतात, त्यांनाही भरडावे- सोसावे लागू शकते, ह्याची जाणीव आहे. कुणावरच अन्याय होऊ नये, आणि कुणावरही झाला तर आपण व्हिक्टिम कुणीही अगदी कुणीही असो त्याच्या बाजूने उभे रहायला हवे. आपले पर्सनल प्रेफरन्सेस/ अजेन्डे मधेच आणू नयेत, ते नैतिकदृष्ट्या चूक आहे. स्त्रियांविषयी होणाऱ्या गुन्ह्याबद्दल मधेच पुरुषांना कुणीच वाली नाही वगैरे बोलून त्या गंभीर गोष्टींची तीव्रता कमी करू नये. किंवा एखाद्या पुरुषाला शोषणातून जावे लागले तेव्हा स्त्रियांना तर मोठ्या प्रमाणात जावे लागते आता तुम्ही सहन करा वगैरे अप्रोच ठेवणं अत्यंत चुकीचे आहे. दोन्ही वेगवेगळे असले तरी तितकेच गंभीर आहे. तितकेच सिरियसली घेणे आवश्यक आहे.

एकूण प्रतिसादांचा मूड बघता विमुं ना टाईमपास करायचा आहे. मी वर विचारलेल्या प्रश्नांना बगल देणारी उत्तरे हेच सांगतात. अशा वेळी शांतपणे अंगावर एक पातळ चादर घेऊन गुडूप झोपी जावं. पण मायबोली वाचणारे अनेक लोक असे असू शकतात जे मेंबर्सही नाहीत. अशांना ही समस्या खरी वाटेल. अस्मिता यांचा प्रतिसाद गोलमोल वाटला. Lol
अशा विषयावर थेट भिडायचं ओ मॅडम. काही नाही होत. दोन चार लोक मग इग्नोर करतील. त्यांची काही पर्वा करायची नाही. खूष करण्यासाठी तत्त्वांना का तिलांजली द्यायची ?

कोणताही जेण्डर, समाज (समाजवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे) जर अन्यायाला बळी पडत असेल तर अपवादात्मक उदाहरणे देऊन त्या अन्यायाचे जस्टीफिकेशन होतेय का हे पाहणे महत्वाचे असते.

नाही हो गोलमाल Lol
ईनजनरल लिहिले आहे पण जेन्युईनली लिहिले आहे. Happy

अस्मिताची पोस्ट बरोबर असली तरी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत पुरुषांना वेगळे डबे देऊन त्यावर उपाय निघणे शक्य नाही. Proud तेव्हा ते नकोच.

( या धाग्यावर लिहीणारे खरंच बसने प्रवास करतात हे गृहीत धरून. विमु यांनी टेस्ला कार घेतलेली नाही या गृहीतकावर ).
खूप वर्षांपूर्वी बसने जाणं येणं सोडलं आहे. शेअर टॅक्सी किंवा शेअर रिक्षा हे पर्याय बरे पडतात. उबेर ओला सुद्धा वापरत होतो. लोकल ट्रेन्स ला टाळू शकत नाही. गर्दीच्या वेळात लोकलने जाणं ही कसरत आहे. ही प्रस्तावना झाल्यावर आता विषयाकडे येतो.

समजा नियम नसता तर किती लोकांनी उठून जागा दिली असती ? कॉलेजला जाताना आम्ही द्यायचो, पण बरेच लोक अगदी कडेवर मूल असलेल्या बाईला उठून जागा देत नसत. एखादी बाई बसलेली असेल तर तीच जागा द्यायची किंवा कधी कधी आमच्या सारख्या कॉलेजच्या मुलांना ओरडायची. तेव्हां आम्ही ओशाळून जागा देत असू. आता उठून उभे राहून प्रवास करणे जिवावर येईल. त्यामुळे जागा देईन कि नाही सांगता येत नाही. पुरूषाच्या शरीराची ठेवण दणकट आहे. त्याला उभे राहून प्रवास करणे अशक्य नाही. स्त्रियांना जागा का द्यावी याचे अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. पण हल्ली पुरूषच आतून वाळवी लागल्यासारखे भुसभुशीत झालेले आहेत. एक सिलींडर उचलून ठेवता येत नाही. जर यांना जेजुरीला (किंवा चेन्नई एक्सप्रेस मधल्या देवळात) बायकोला कडेवर घेऊन चढायला सांगितले तर दुसर्‍याची हलकी बायको घेऊन चढतील. आपली आपल्यापेक्षा दणकट माणसाला देतील.

हा प्रॉब्लेम असल्याने मग उभे रहावे लागले की जी किरकिर होते त्यामुळे ती धुसफुस काढण्यासाठी मायबोली बरी पडते. कारण असाच विचार करणारं पब्लीक इथेच सापडतं. फेसबुकवर धुलाई होते.

Pages