Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिथुन
मिथुन
= १ जोडी. २ युग्म; जोडपें; ३ समागम ४ एकी. ५ बारा राशींतील तिसरी रास.
वरचे अर्थ बहुपरिचित आहेत. आज एक वेगळा अर्थ पाहू. तो म्हणजे,
मिथुन = गाय-बैलासारखा एक प्राणी.
त्याची शिंगे अत्यंत वळणदार आणि प्रमाणबद्ध असतात. हा प्राणी अरुणाचलच्या आदिवासींमध्ये पवित्र व संपत्तीचा मानदंडही मानला जातो. कोणाकडे किती मिथुन आहेत त्यावरून त्याची आर्थिक संपन्नता ठरवली जाते. लग्न करताना वराला वधू मिळवण्यासाठी मिथुन द्यावे लागतात.
(अशोक जैन यांच्या ‘अत्तराचे थेंब’मधून साभार)
मिथुन = बैल !
मिथुन = बैल !
खरेच की.
एका विशिष्ट अभिनेत्याच्या टुकार अभिनयाचे कोडे सुटले 😀
आंतरजालावर शोधुन फोटो पाहिला
आंतरजालावर शोधुन फोटो पाहिला असता या प्राण्यात गाय-म्हैस, बैल-रेडा दोन्हीचा भास होतो. संकर असेल, नसेल पण जेनस एक आहे का?
होय, या गुराढोरांचे Genus
होय, या गुराढोरांचे Genus: Bos आहे.
species भिन्न.
मिथुन : Bos frontalis
या प्राण्यात गाय-म्हैस, बैल
या प्राण्यात गाय-म्हैस, बैल-रेडा दोन्हीचा भास होतो >> या प्राण्यात गाय-म्हैस, बैल-रेडा दोन्हीचा Bos होतो
अनिंद्य
येस बॉस
येस बॉस
वैणिक
वैणिक
= वीणागीत; भावगीत <<<<<<< [सं. वीणा]
पुलंच्या लेखनात वाचलेला हा शब्द :
"सैनिक, वैणिक, वणिक आणि कृषिक यांची वेदना ज्यावेळी एकाच प्रकारची असते त्याचवेळी देश बलशाही होतो".
ताबडतोब ची व्युत्पत्ति लक्षात
ताबडतोब ची व्युत्पत्ति लक्षात येत नाही. फारच भन्नाट शब्द आहे.
आहार निद्रा भय मैथुन ह्या
आहार निद्रा भय मैथुन ह्या प्राणीमात्राच्या चार मूलभूत प्रवृत्ती आहेत असे म्हणतात.
त्यातील सेक्स - समागम ह्या साठी मैथुन असा शब्द आहे ना?
मिथुन हा अपभ्रंश आहे का?
मैथुन आणि मिथुन :
मैथुन आणि मिथुन :
यात अपभ्रंशाचा उल्लेख नेहमीच्या कोशांमध्ये आढळत नाही. या दोघांचा सर्वात पहिला अथवा महत्त्वाचा अर्थ असा :
बरोबर पण अपभ्रंश नाही.
बरोबर पण अपभ्रंश नाही. मिथुनचे तद्धित रूप मैथुन. तद्धित प्रत्यय लागताना मि ची स्वरवृद्धी होऊन मैथुन. मिथुन म्हणजे (नर-मादी यांची) जोडी. ती बनण्याची, एकत्र येण्याची क्रिया, मिलन, समागम म्हणजे मैथुन.
स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
स्पष्टीकरणासाठी धन्यवाद, मानवदा.
तद्धित रूप म्हणजे काय?
तद्धित = नामाला प्रत्यय
तद्धित = नामाला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द.
https://xn--3rc7bwa7a5hpa.xn--2scrj9c/en/dictionary/marathi/%E0%A4%A4%E0...
बरोबर. क्रियापद(धातु) वगळुन,
बरोबर. क्रियापद(धातु) वगळुन, नाम, सर्वनाम, विशेषण यांना प्रत्यय लागुन होणारे शब्द. ते प्रत्यय - तद्धित प्रत्यय. यात मालकी, गुणधर्म, संबंध, क्रम इत्यादि इत्यादि दर्शववण्यास प्रत्यय लागतात.
मैथुन हे प्रक्रिया/अवस्था दर्शक तद्धित असावे.
(धातुंना प्रत्यय लागुन त्यांची नामे, विशेषणे, अव्यय बनतात ते कृत् प्रत्यय -कृदन्त, धातुसाधित वगैरे)
अपभ्रंश नाही. तद्धित >> +१
अपभ्रंश नाही. तद्धित >> +१
तीळ व गूळ हे मूळ शब्द.
तीळ व गूळ हे मूळ शब्द.
यांचा संयोग झाल्यानंतर खालील कोणता शब्द शुद्ध बरोबर आहे ?
क्र. २ ?
( ३ व ४ हे बघितल्यावरच डोळ्यांना अशुद्ध वाटतात).
अखिल भारतीय मराठी साहित्य
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नियम. त्यापैकी खालील लागू होतात.
नियम ७.१
मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत (अपवाद - तत्सम म्हणजे मुळातील संस्कृत शब्दांतील इकार उकार)
तीळ किंवा गूळ शब्द वेगळे असताना ळ हे अकारान्त अक्षर आल्याने ती आणि गू दीर्घ बरोबर.
याच न्यायाने तीळ आणि गुळाचा एकत्र संयुक्त शब्द केल्यावर वरील पर्याय क्रमांक ३ आणि ४ बाद होतात. आता प्रश्न राहिला तो म्हणजे तिळगूळ की तीळगूळ. या संदर्भात काहीतरी नियम असायला हवा, मला सापडला नाही. तिळगूळ योग्य असावं.
शेवटचे अक्षर अकारांत असेल तर
शेवटचे अक्षर अकारांत असेल तर आधीचे दीर्घ लिहावे असा मराठी व्याकरणाचा नियम आहे उदा. वकील, दूध, खूण, मीठ, ईद. पण तीळगूळ आणि तिळगूळ असे दोन्ही वाचलेत.
* तिळगूळ की तीळगूळ. या
* तिळगूळ की तीळगूळ. या संदर्भात काहीतरी नियम असायला हवा, >>> +१
मनात तोच संभ्रम आहे
धन्यवाद !
. .
शब्दातील अगदी सुरुवातीचे वेलांटीयुक्त अक्षर र्हस्व असे शालेय जीवनात शिकल्याचे आठवते. पण सध्या नियम बदललेले असू शकतात.
हरपा असा काही नियम नसावा,
हरपा असा काही नियम नसावा, बघेन तरीही. पहिले दोन्ही शब्द वापरात दिसतात.
हा इतरेतर द्वंद्व होतो ना. त्याचा काही असा नियम आहे का?
सामासिक शब्दांबद्दल नियम आहे.
सामासिक शब्दांबद्दल नियम आहे.
इतरेतर द्वंद्व >> हो, म्हणजे
इतरेतर द्वंद्व >> हो, म्हणजे दोन प्रकारे होऊ शकतो. तीळ आणि गूळ इतकाच अर्थ लावला तर इतरेतर आणि तीळ आणि गुळाचा मिळून एक पदार्थ असा अर्थ लावला तर समाहार द्वंद्व. समाहार - नाव पण अगदी आहाराशी जोडलेलं आहे.
समाहार - नाव पण अगदी आहाराशी
समाहार - नाव पण अगदी आहाराशी जोडलेलं आहे…. 😀
आणि तीळ आणि गूळ दोन्ही एकत्र कुटल्याने “द्वंद / द्वंद्व“ सुद्धा प्रासंगिक आहे याठिकाणी
* समाहार व द्वंद >>> मस्त
* समाहार व द्वंद >>> मस्त
. . .
आताच मी एका दर्जेदार मासिकात तिळमात्र हा शब्द वाचला.
शब्दातील पहिली 'ति' अशी होतेय असे दिसते.
तिळमात्र >> वा! उत्तम उदाहरण.
तिळमात्र >> वा! उत्तम उदाहरण. तिळपापड मध्ये पण र्हस्व दिसते.
तिळाला संस्कृतमध्ये स्नेहफल
तिळाला संस्कृतमध्ये स्नेहफल असे नाव आहे.
यातील स्नेह <<<< [सं. स्निह् = चिकटणे]
>>>>
स्नेह = तेल, स्निग्धता, मैत्री, प्रेम
आजच्या लोकसत्तेतल्या
आजच्या लोकसत्तेतल्या अग्रलेखात एक नवीन शब्द वाचला; आधी कधी न वाचलेला.
चूष
चूष = गोडी; मजा; गंमत
कोशातले उदाहरण:
ही फळे थोडी खाण्यातच चूष आहे.
* चूष >>> छान आहे !
* चूष >>> छान आहे !
पूर्वी काही वेळेस वाचला आहे.
त्याचा दुसरा अर्थ पण टूम असा छान आहे.
याचा अर्थ चोखणे असा होतो का?
याचा अर्थ चोखणे असा होतो का? आयुर्वेदात लेह्य, चोष्य वगैरे प्रकार असतात ना औषधांचे? हिंदीत चूसना पण चूष वरून आलाय का?
सामासिक शब्दातील पहिले पद इ
सामासिक शब्दातील पहिले पद इ -कारान्त वा उ-कारान्त तत्सम शब्द असल्यास काय करावे याबद्दलचा नियम मिळाला. इतर अक्षरांबद्दल नियम मिळाला नाही.
मू़ळ संस्कृत शब्द तिल असल्याने किंवा उच्चाराच्या सोयीसाठी तिळगूळ झाले असावे.
संस्कृत शब्दकोश पाहताना तिलभाविनी - jasmine =चमेली ; तिलपर्णः - turpentine ; तिलपर्णम् -sandalwood असे शब्द दिसले.
तिलोत्तमा - अप्सरा.
द्वंद्व समासाबद्दल हे आधी वाचलं नव्हतं. - बहुव्रीही हा शब्द सुद्धा एक सामासिक शब्द आहे. बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य. बहुव्रीहीचा प्रचलित अर्थ पुष्कळ धान्य ज्याच्याजवळ आहे असा - शेतकरी. बहुव्रीही हा शब्द शेतकरी या शब्दाचे विशेषण. म्हणून ज्या समासात कोणतेही पद प्रधान नसते व तो संपूर्ण सामासिक शब्द एका वेगळ्याच पदाच्या विशेषणाचे कार्य करतो, तो बहुव्रीही समास. हे शालेय अभ्यासक्रमात असलं तर अजिबात आठवत नाही. हल्लीच्या अभ्यासक्रमात इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व एवढेच पाहिलेत.
Pages