बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी एवढं खास नाही यावेळच्या बिगबॉस मधे ,मी तर नाही बघणार त्यापेक्षा मास्टरशेफ इंडिया जास्त एप्न्टरटेंनिंग आहे, ते बघत आहे .त्यावर एखादा धागा आहे का?..

दीपाली सय्यद आणि सागर कारंडे ओळखीचे चेहरे दिसले. कुणीही मजेदार असेल असं काल जो थोडा भाग बघितला त्यात वाटलं नाही.

चांगले आहेत की कन्टेस्टन्ट्स. यंग जेन्झी अ‍ॅक्टर्स बोअर आहेत पण जे जरा सिनियर लोक आहेत ते चांगले खेळतील असे वाटत आहे,
सागर कारंडे, दिपाली सय्यद, रील स्टार फोकस्ड इंडियन उर्फ करण सोनावणे, हिंदी चा अनुभव असलेले विशाल कोटियन, सोनाली राउत आणि राकेश बापट आहेत. खोटी उथळ भांडणे करून अटेन्शन खेचणे वगैरे ला हे लोक लगेच कॉल आउट करत होते आणि फुटेज देत नव्हते ते आवडले मला Happy
ती युवा नेता दिव्या शिंदे इन्टरेस्टिंग होऊ शकेल. छोटा डॉन एन्टरटेनिंग दिसतोय सो फार . मजेशीर आहे तो.
मास्टरशेफ इंडीया मस्त चालू आहे खरोखर. काढा की कुणीतरी बाफ.

मी बघत आहे.आवडले .पण तो थँलेसेमियाचा पेंशट असलेला प्रभू फार डोक्यात गेला पहिल्या दिवसापासून. अशा पेशंटला मुळात घेतातच का?
तन्वीला ,तुला भांडायच आहे,अस सांगून पाठवल असाव.
सोनाली राऊत हिंदीमध्ये असली ,अनुभव असला तरी आवडत आहे.
बघू कसा जातो पुढे सिझन.

Pages