फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला जागतिक महिला दिन साजरा झाला त्याला ५० वर्षे झाली. १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होतं. त्यानंतर दोन पिढ्या होऊन गेल्या. तरीही चित्र बदललं नसेल तर असा दिवस साजरा करायचा काय उपयोग?

आता ट्रॅड वाइफचं ग्लोरिफिकेशन करायची ट्रेंड आहे. पुरुषप्रधान प्रथा परंपरांबद्दल बोललं लिहिलं तर अंगावर येणार्‍यांत संस्कृतिरक्षक महिला ही असतात.
स्त्रियांच्या स्वयंपाक कौशल्याचे गोडवे गाणारे , त्यांना ते आलंच पाहिजे असं सुचवणारं , ज्यां स्त्रियांना ते येत नाही त्यांच्यावर कुत्सित हसणारं लेखन मायबोलीवरच आहे. बाकी सोशल मीडिया जाऊ दे.
तुम्ही ज्यांच्या नावाने रडताय ते ज्येष्ठ नागरिकही याच काळात घडले.

मुळात आमच्याशिवाय स्वयंपाकघर चालायचं नाही, असा एक सूक्ष्म आणि छुपा अभिमान असतो का?

मी ही अमितच्याच बशीत (बसमध्ये ) आहे. आज स्वयंपाक काय करायचा हे गेली जवळपास वीस वर्षे मी ठरवतोय आणि करतोय. आई होती, तेव्हा तिच्या सोबतीने. आता एकटा.

तुमच्या आयांनी आणि सासवांनी तुमच्या नवर्‍यांना आणि भावांना काय संस्कार दिले? तुम्ही तुमच्या मुलांना काय संस्कार देता?

स्त्रीबायांना प्रेजेन्ट टेन्स कमी असतो. त्यामुळं तेंना बसायला जागा देयला पाहिजे.
हे पहील कारन.

दुसर कारन, मानसांच्या मानानं बाईची ताकद कमी असती. गडीमानूस जितका उभा राहील तितका बाई नाही उभ राहू शकत. तोल जातो.

भरत.
सेम हिअर.
जगातले सर्वोत्कृष्ट सैपाकी पुरूषच आहेत.
तरीही रडा रड !

मी इथे प्रत्यक्ष पाहिलेलं उदाहरण दिलं होतं. शेजारीच लेडीज पार्लर असताना एक स्त्री तिच्या मुलीला सलूनमध्ये केस कापायला घेऊन आली आणि सगळा वेळ आतच बसून होती. स्त्री पुरुष समानतेच्या आणि स्त्रियांच्या हकांच्या गप्पा मार णार्‍या इथल्या अनेक आयडींनी ती गोष्ट कशी योग्य आहे हेच पटवायचा प्रयत्न केला. वर बायकांच्या पार्लरमध्ये मुलीचा पालक म्हणून बाप आला तर त्याने वेटिंग एरियात थांबावं असंही लिहिलं.

तरी बरं, ब्युटी पार्लरमधले पुरुष कारागीर सुद्धा असतात. सलुनमध्ये स्त्री कारागीर भारतात तरी नसावी.

शिवाय आता युनिसेक्स सलूनही आहेत. मी गेलो होतो, तिथून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर युनिसेक्स सलून होतं.

स्त्रिया जेव्हा विचारतात, "भावजी कसे झाले आहेत चकली/चिवडा/ पोहे इत्यादी?"
तेव्हा काय बोलावे आणि कसे बोलावे हा मोठा प्रश्नच पडतो. हलव्यावर काटा का येतो ते हलव्यालाच माहित.
समजल ना मी काय म्हणतो आहे.

मायबोलीवर अनेक दा महिला दिनाचा शुभेच्छा
अनेक पुरुष आयडींनी वेळो वेळी दिल्यात
पुरुष दिनाचा शुभेच्छा कुनातरी स्त्रि आयडीने दिल्यात का ???
उलट वरुन बिच्चारे पुरुष गं उगी उगी. तुम्हालाही शुभेच्छा हं. असे म्हनतात

इतका कुत्सित पणा का म्हणून?

पुरुष म्हंजे हात रुमाल का आहेत? आधी सान्गा ?

धाग्याच्या शीर्षकातल्या मुद्द्या संदर्भाने. बसमध्ये डावीकडे पुढली तीन आसने अपंग आणि वृद्ध्यांसाठी राखीव असतात, ते योग्य आहे.स्त्रियांसाठी सुद्धा आसने राखीव असायला हवीत. फक्त ती पुढे उजवीकडे असल्याने पुढल्या भागात उभे राहायची वेळ आलेल्यांचे हाल होतात. त्यांना बसायला मिळत नाही आणि उतरणार्‍यांचे धक्के खावे लागतात. तेव्हा स्त्रियांची राखीव आसने एकतर मागे ठेवावीत किंवा डावीकडे पहिल्या तीन रांगा सोडून असावीत.

>>>>>>तेव्हा काय बोलावे आणि कसे बोलावे हा मोठा प्रश्नच पडतो.
त्यात काय? मत द्यायचे की. यातला गर्भितार्थ मला तरी कळला नाही.

हैद्राबादच्या RTC बसेसमध्ये चांगली स्थिती आहे असे वाटते. एकूण सीट्सपैकी पुढच्या* अर्ध्या सीट्स स्त्रियांसाठी राखीव असतात. स्त्रिया पुढच्या दारानेच चढतात व उतरतात, पुरुष मागच्या दारानेच चढतात व उतरतात.

* सर्वांत पुढच्या दोन सीट्स दिव्यांग व ज्येष्ठांसाठी

>>>>स्त्रिया पुढच्या दारानेच चढतात व उतरतात, पुरुष मागच्या दारानेच चढतात व उतरतात.
उत्तम सुविधा. सेक्श्युअली सप्रेस्ड (का रिप्रेस्ड) समाजात हे गरजेचे आहे.

सगळ्याच स्त्रियांना काही समाज सेक्स्युअली सप्रेसस्ड / रिप्रेस्ड वाटत नसावा. त्यातल्या काही ट्रेनच्या जनरल डब्यात प्रवास करतात आणि बसमधे जनरल सीटवर बसतात. शेजारी पुरुष येऊन बसेल याची त्यांना कल्पना असते.

घरात करणारे कोणीच नाही म्हणुन आज सैपाक काय करायचा ठरवणे पुरुषाच्या गळ्यात पडणे वेगळे आणि घरात करु शकणारी मंडळी असतानाही त्यांनी आज सैपाक काय करायचा ही जबाबदारी एकाच बाईच्या गळ्यात पाडणे वेगळे. बाई ही जबाबदारी नाकारु शकत नाही पण भांडु शकते/मुलांना मदत नाही तर जबाबदारी उचला हे शिकवू शकते/कामाचे वाटप करायचा प्रयत्न करु शकते पण ह्या झगड्यात मानसिक शिणवटा खुप येतो. त्यापेक्षा करुन मोकळे होणे बरे असे काही स्त्रिया ठरवतात. काही खमक्या असतात. त्या आज सैपाक काय करायचा हे ठरवतातच पण प्रतिकारही करत राहतात, घरातल्यांकडुन अपेक्षा ठेवतात/ कामे करुन घेतात. ह्या दोन्ही प्रकारातल्या स्त्रियांना निदान संध्याकाळी घरी जाताना पाच दहा मिनिटे बसायला मिळाले तर थोडा आराम मिळतो.

पुरुषांनाही अशा आरामाची गरज आहेच. तेही तितकेच दमत असतात. पण बहुसंख्य घरी जाऊन आराम करु शकतात. घरात पाय ठेवताच लगेच घराची जबाबदारी घ्यायची अपेक्षा त्यांच्याकडुन हल्लीहल्लीपर्यंत ठेवली जात नव्हती. आता गेल्या पाच वर्षात परिस्थिती जरा बदललीय असे सो मि पोस्टींवरुन वाटतेय. मला खरेखोटे माहित नाही.

मुळात स्त्रियांसाठी राखिव जागा ठेवाव्या लागल्या कारण पुरूष बसस्टॉपवर झुंडशाही करतात. बस स्टॉपवर आली की आधी पुरुष तीवर तुटून पडतात. फक्त सुरवातीच्या स्थानकावर रांगा असतात. पुढे प्रत्येक स्टॉप वर कोणी रांग लावत नाही.. बस आली की धक्काबुक्की करुन आधी पुरूष चढुन घेतात आणि मग बाया. अशा वेळी मागाहुन चढणार्‍या बायांना बसायला जागा मिळणे खुपच कठिण जायचे. आता राखिव जागा असल्याने हक्काने, प्रसंगी कंडक्टरला सांगुन जागा खाली करुन घेऊन बसता येते. ह्या धक्काबुक्की प्रकरणांमुळेच गरोदर स्त्रिया, वृद्ध व अपंग व्यक्तींना पुढील दरवाजाने चढण्याची मुभा बेस्टला द्यावी लागली.

ह्या धाग्याच्या शिर्षकात बेस्ट बस गृहित धरलीय असे वाटते. बेस्ट बस सोडता इतर सार्वजनिक बसप्रवासात फक्त सुरवातीच्या स्थानकात राखिव जागेचा हक्क स्त्रियांना दिलाय. नंतरच्या स्टॉप्सवर नाही. (मुम्बई/नमु सोडुन बाकी पुणे, नागपुर, नाशिक शहराच्या बसबद्दल माहित नाही).

एस्टीसाठी कोणीही रांगा लावत नाही, सुरवातीच्या स्थानकातही. पुरुषांच्या मागुन चढणार्‍या स्त्रिला फक्त तिथेच राखिव जागा मिळते. नंतरच्या स्टॉपवर जागा खाली करुन घेता येत नाही आणि तासा दोनतासाच्या प्रवासात म्हातारीलाही कोण तरुण उठुन जागा देत नाही हे प्रत्यक्ष पाहिले आहे.

त्यामुळे जिथे स्त्रियांनाच राखिव जागा सरसकट मिळत नाहीत तिथे इतरांचा काय पाड… ज्या पुरुषाला सिट हवीय त्याने शक्तीप्रयोग करुन सगळ्यात आधी बस/एस्टीत चढावे. ज्याला हे जमत नाही त्याने स्त्रिया कशा गुपचुप उभ्या राहतात तसे उभे राहावे.

बेस्ट बसमध्ये किती बसायच्या जागा असतात माहित नाही पण चार रांगा म्हणजे आठ सिटा स्त्रियांसाठी असतात. नवव्या स्त्रिला जागा मिळेपर्यंत इतर पुरुषांप्रमाणे उभे राहावे लागते.

<घरात करणारे कोणीच नाही म्हणुन आज सैपाक काय करायचा ठरवणे पुरुषाच्या गळ्यात पडणे वेगळे > स्वतःच्या सोयीची गृहीतके. मी लहानपणापासून स्वयंपाकात मदत करत आलोय. मला त्याची आवड आहे. स्वयंपाकासाठी पगारी माणसं मिळणं कठीण नसतं. वर अमितचंही उदाहरण आहे.

आमच्या भागात बहुतेक बसस्टॉप फुटपाथवर आहेत. बसस्टॉपमध्ये बसायची सोयही आहे. पण रांगेत उभं न राहता वा बसता बससाठी रस्त्यावर उभं राहणार्‍या स्त्रियाच दिसतात. त्या अर्थातच रांग मोडून मध्ये शिरतात. बाई आहे म्हणून फार कोणी बोलतही नाही.

सगळ्यांनी रांगेत चढावे असं न म्हणता शक्तीप्रयोग करून चढावे हे म्हणणे कशाचे लक्षण आहे माहीत नाही.

खरे तर किती पुरुष स्वयंपाकाची जबाबदारी घेतात, शुश्रूषा करतात, नर्सिंग फिल्डमध्ये जातात त्याचा सर्व्हेच व्हायला हवा. एखाद दुसरे आऊटलायर उदाहरण म्हणजे नॉर्म नव्हे.
.
तसेच किती स्त्रियांना हलकट पुरुषांच्या किळसवाण्या स्पर्शाचा अनुभव असतो, तो किती लहानपणी आलेला असतो, त्यातून त्यांना काय त्रास झालेला असतो वगैरेचाही सर्व्हेच व्हावा.

नुसत्या कॉग्निटिव्ह बायसेस वर बोलणे म्हणजे शब्दांचे निरुपयोगी बुडबुडे हवेत सोडणे आहे.

लग्न ठरवताना स्वयंपाकाचं का बोलून घेत नाही? मी म्हटलं तसं जागतिक महिला दिन साजरा व्हायला लागल्याला ५० वर्षे झाली. पन्नास वर्षांत एवढंही जमलं नाही?

मात्र पुरुष दिन साजरा व्हावा. पुरुषांसाठी काही राखिव जागा/सीटस असाव्यात यास मान्यता आहे. मगाशी मजा केलेली.

मी जेव्हा बसने प्रवास करत होते तेव्हा रांगेतुन या अशी (इतरांच्या मते) कचकच करायचे. कोणीही ऐकायचे नाही. तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी बोलुनही कोणी ऐकायचे नाही तर इथे माबोवर लिहिल्याने रस्त्यावर रांगा लावुन लोक चढणार अशी अपेक्षा ठेवणार्‍यांना भारतीय समाज अजुन कळला नाहीय.

‘आता एकट्याने‘ हे तुम्हीच लिहिलेय. मी कशाला सोयीची गृहितके मांडु? तुम्ही जे लिहिलेय त्यावरुन बोलणार ना?

असो. बायकाच रांगा न पाळणार्‍या हे सोयीचे गृहितक आहे असे मी म्हणुन माझ्या बाजुने विषय संपवते. या विषयावर अजुन लिहिण्यासारखे माझ्याकडे काही नाही.

म्हणजे जे पुरुष घरी स्वयंपाक करतात त्यांच्यासाठी राखीव डबा ठेवायला हरकत नाही. फक्त ते ओळखायचे कसे हा प्रश्न आहे.

तसेच ज्या बाईकडे स्वयंपाकाला बाई असते तिला राखीव डब्याची गरज नाही.
ती सुद्धा ओळखायची कशी हा प्रश्न आहे.>>> या प्रतिसादाशी सहमत... दोन्हीकडील कामचोरांना ओळखायचे कसे? जे सरसकटीकरणामुळे मिळणारा फायदा लाटतात आणि वर शिरजोर होतात?? पहाण्यात तर असेही आहेत ज्यांच्या घरी स्वैंपाक करण्यासाठी कुणी आहे, भांडी घासायला मोलकरीण आहे, झाडू पोछा करणारी बाई आहे, कपडे धुण्यासाठी स्वयंचलित धुलाई यंत्र आहे पण अन्याय/ त्यागाच्या बाता झोडायला मात्र हिरहीरीने पुढे. 😂

एक बाप्या जेवन बनवतो म्हनुन जगातले सगळे बाप्ये जेवन बनवतं का ?
कायपन लॉजिक लावतसे.
मुळ विशय काय ?
बाईला बसमधे जागा का ?
धडधाकट मानसानं बाईमानसाला जागा द्यायला पायजे हे गावात अडान्याला पन समजतं.
एसीत बसनार्यांना कळत नाय. अडानी बरे याच्यापेक्शा.
कोन देत नाही जागा. म्हतारे मानसाला पन जागा देत नाय.
लोक बेकार झाले आहेत. बाईमानसाला जागा का देयची यावर भान्डतात.
मूर्ख लोक.

जेवा केवा कामाची वाटनी झाली तेवा बाईनं म्हटलं असल का जेवन मी बनवती म्हनून ?
इतकी वर्श रीतभात पडली. ती लगीच जाती का ?
बाईनं मुलावर सनस्कार करायचे, मग बाप्या काय तम्बाकु मळुन पारावर पिचकार्या मारायला ठेवला का ?
ही पध्धत बघुन बघुन हे असंच असतं असं बाईच्या अन्गवळनी पडलं. तर ती बाई दोशी.
काय बोलतात ह्तली शानी लोक ?
महामुर्ख बरे यापेक्शा.

ब्रिटिश मानसाला पन रूमर सेन्स असतो.
बाईसाठि खुर्ची ओढुन घेतो. तिला बसायला जागा देतो.
गावात पन बाईमानसांना जागा देतात. सान्गायला लागत नाही.
असा कायदा करावा लागला म्हनजे मानसं किती बेकार झालीत ?
कायदा केल्यावर म्हनटात जनरल सीटवर का बसली ?
बाईमानुस आहे. बसु द्या अं गावाकडं म्हनतात.
आटा गावात पन मानसं चाबरट झालीत.
मानुसकी संपत चालली आहे.

>>>>>>कायदा केल्यावर म्हनटात जनरल सीटवर का बसली ?
गुपचूप खुसपटे काढू नका.

हे मान्य आहेच की बायकांच्या सीटस भरल्या नसतील तर तिथेच बायकांनी बसायला हवे.

https://www.maayboli.com/node/77503
या कथेतल्या बाईला तिच्या सासरच्यांनी स्वयंपाक न येण्यावरून टोमणे मारले. अगदी रडवलं.
आता तिचा मुलगा त्याच्या बायकोची स्वयंपाकात धांदल उडताना पाहून तिला हसत असतो .
यावर ती सुनेला - ‘जमेल गं तुलाही.. अनुभवाने सारं काही जमायला लागतं. आपण आपल्या चुकांमधुन शिकत रहायचं फक्त! माणसांच्या स्वभावातली आणि स्वयंपाकातली गुंतागुंत समजायला याच गोष्टी उपयोगास येतात बघ!’ समजावते.
ही बाई कॉलेजात अध्यापिका होती.

हे आक्षेप घेतल्यावर यात फार काही सोशल मुद्दे शोधू नका , ती साधी कथा आहे आणि छान आहे , सासरच्यांच्या टोमण्याकडे पाहायचा नवा दृष्टिकोण मिळाला म्हणून अनेक स्त्री आयड्यांनी समर्थन केलं.

खुसपट नाय ताई.
मागं जाऊन वाचा. बसमधे बाईसाठी सीट का ठेवली ?
तर कमीत कमी काही नाया तरी बसतील. मी असं नाय म्हटलं कि त्या सीट खाली ठेवुन इकडं बसा.
सीटं भरली आनि बाया असल्या तर त्यानी बसायचं नाही का ?
मानसं जागा देत नाहीत म्हनुन कायदा केला ना ? त्यामागं भावना काय ?
ती समजुन उभ्या राहिलेल्या बाईला जागा देयला पायजे.
बाप्याची ताकद बाईपेक्श कमी असती का ?
आसंल तर मग नका देऊ जागा.
आनि त्या सीटवरच बाईनं बसलंं पाहिजे असं कुटं लिहिलं नाही. रुमर सेन्स असल तर ती शउठुन तिकडं जाइल.
पन तू तिकडचं बस असं दापू शकत नाहि.
बायकांची सलून ही बायकांची असतात. तिथं बाप्याला कशाला जायला पायजे ?
त्याला चोळी घालावी लागती का ? कायपन.
उद्या मोरीत जा जाऊ दिल नाय म्हनतील. काय पन बोलतंय.

<आता एकट्याने‘ हे तुम्हीच लिहिलेय. मी कशाला सोयीची गृहितके मांडु? तुम्ही जे लिहिलेय त्यावरुन बोलणार ना?>

माझं वाक्य - आज स्वयंपाक काय करायचा हे गेली जवळपास वीस वर्षे मी ठरवतोय आणि करतोय. आई होती, तेव्हा तिच्या सोबतीने. आता एकटा.

"आई होती तेव्हा तिच्या सोबतीने " हे न वाचायचं कौशल्य कुठे शिकता येईल?

तसंच गेली वीस वर्षे मुख्य जबाबदारी माझी आहे . त्याआधी मी मदतनीसाच्या भूमिकेत असे. माझी आई पूर्ण वेळ गृहिणी होती.

अरे! कोथिंबिरीच्या वड्या आल्या का! Lol काय मजेचे धागे यायचे पूर्वी.
अशा लोकांना बशीत (बसमध्ये) बसवुन बोलावून आणा आणि कथा लिहायला लावा. उभं रहायला लागून जास्त मट्रेयल मिळणार असेल तर गर्दीत उभं करुन आणा. लय मजा!

Pages