Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पालक चा मस्त दिसतोय.. Looking
पालक चा रंग मस्त दिसतोय.. Looking yum
अनेक दिवसांपासून खादाडीच्या
अनेक दिवसांपासून खादाडीच्या धाग्यापासून दूर होतो. सर्वांचेच फोटो मस्त आहेत, त्यांना एक जेनेरिक लाइक करतो.
---
नागपूरला मी नेहमीच जात असतो. मागच्या विकांतालाही नागपुरालाच होतो.
नागपूरला सांभरवाडी हा एक मस्त प्रकार आहे. सांभर == कोथिंबीर आणि इतर मसाले यांची स्टफिंग करून आयताकृती आकारात तळलेला समोसा असे तिचे ओबडधोबड वर्णन करता येईल. सांभरवडीसोबत (पोहे, समोसे आणि इतर कशासोबतही दिली जाणारी) चना तर्री, दह्याची कढी, तळलेल्या मिरच्या देतात.
मायबोलीकरांसाठी हा फोटो -
अरे झक्कास. खरपूस तळलेल्या
अरे झक्कास. खरपूस तळलेल्या दिसून राहिल्या 👌
आम्ही “सांबारवडी” म्हणतो. आमचे अमरावतीकर मित्र आणतात-पाठवतात त्यात भाजक्या शेंगदाण्याचा कूट, चिरलेला सांबार उर्फ़ कोथिंबीर, भाजके तीळ, हिरव्या मिरच्यांचे झणझणीत वाटण असा ऐवज असतो.
Closing technique सुद्धा थोडेसे वेगळे, rolled, instead of envelope-like ends. हे असे रूप :
सोबत फक्त तळलेल्या हिरव्या मिरच्या देतात. तुमच्या फोटोत २-२ चमचमीत supporting beauties आहेत तशा नाही मिळाल्या कधी
याचेच “पुडाच्या वड्या” नामक version कोल्हापुरकर करतात, तेही छान असते. पण त्यांच्या सारणात सुके खोबरेसुद्धा असते म्हणून ….. दोन मार्क कमी. 😀
सांबार वडी मस्ती दिसतेय.
सांबार वडी मस्ती दिसतेय..आम्ही हिलाच पुडाची वडी सुद्धा बोलतो नागपुर ला
मस्त दिसतेय ! खमन्ग आणी
मस्त दिसतेय ! खमन्ग आणी खुसखुशित...
कूट्+भाजके तीळ््इरव्या
कूट्+भाजके तीळ + हिरव्या मिर्च्या व कोथिंबिर - निव्वळ खमंग लागणारच.
सांभरवाडी, सांबरवडी,
सांभरवाडी, सांबरवडी, सांबारवाडी जो काही उच्चार असेल तो, पण चव मात्र अगदी फँटॅस्टिक करते!
आता आठवून लिहितोय; तो गाडीवाला पोराला म्हणतो, "दोन प्लेट साम्ब्बार्वडी दे रे सायेबांना."
साम्ब्बार्वडी दे रे सायेबांना
साम्ब्बार्वडी दे रे सायेबांना. … 😀
Forgot the disclaimer : वरील सांबारवडीचा फोटो मी स्वत: काढलेला नाही, shared it for illustration purpose.
थुकपा
थुकपा
Hot, Spicy Thukpa - perfect
👌
Hot, Spicy Thukpa - perfect for winter eves
वॉव, थुकपा !
वॉव, थुकपा !
So beautiful, so delicious, just looking like a wow!
वाह...! थूकपा
वाह...! थूकपा
काय जबरदस्त दिसतंय!!
थूकपा , सांबार वडी, मस्तच !!
थूकपा , सांबार वडी, मस्तच !!
लाल भोपळ्याचे घारगे....
लाल भोपळ्याचे घारगे....

घारगे सुंदर. थूकपा आवडला पण
घारगे सुंदर. थूकपा आवडला पण मलाच नुडल्स बद्दल विशेष ममत्व नाही.
घारगे छान दिसत आहेत, टपोरे.
घारगे छान दिसत आहेत, टपोरे.
गोड आहेत की तिखटाचे ?
हेलोविन वाल्या देशात कामी येणारी रेसिपी
घारगे खूपच मस्त आहेत. थुकपा
घारगे खूपच मस्त आहेत. थुकपा my favourite. Yummy
सांभरवाडी
सांभरवाडी
थुकपा
घारगे
मस्तच दिसतायेत सगळे....
घारगे गोडच असतात पण तिखट असतील तर मी घेतो.
घारगे गोड आहेत. काल खंडोबाचे
घारगे गोड आहेत. काल खंडोबाचे नवरात्र ( खरे तर षटरात्र) बसले. त्याच्या नैवेद्यासाठी केले.
लाल भोपळ्याचे घारगे....
लाल भोपळ्याचे घारगे....
>>> मस्त दिसत आहेत.
(कधी खाल्ले नाहीत.)
घारगे गोडच आवडतात. नुसतेच
घारगे गोडच आवडतात. नुसतेच खायला किंवा सोबत घोट घोट चहा प्यायला.
लहानपणी आमच्याकडे प्रवासाला शिदोरी म्हणून घारगे किंवा घावणे हे दोन फेमस पर्याय होते.
.. घारगे गोडच असतात…
.. घारगे गोडच असतात…
ऋतुराज, मी कोकणी घरात तिखटाचे घारगे खाल्लेत आणि मला तेही आवडले होते. थोडा गोड अंडरटेस्ट असतो कारण लाल भोपळा जरा गोड असतो चवीला.
मी पण भोपळ्याचे गोडच घारगे
मी पण भोपळ्याचे गोडच घारगे खाल्लेत आमच्याकडे त्याला घाऱ्या म्हणतात .तिखट कधी पाहिले नाहीत.गोड फारसे आवडत नाहीत गोड पेक्षा तिखट आवडतील खायला. रेसिपी माहीत असेल तर द्या अनिंद्य.
Pages