Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गायक, गीतकार, संगीतकार या
गायक, गीतकार, संगीतकार या तीनही कला एकाच व्यक्तीच्या ठायी असतील, हे कसं संभव आहे. आता नव्याने आलेले रॅप स्टार ते करतात. पण ती निर्मिती किती काळ टिकेल? वेस्टर्न म्युझिकमध्ये ही असं होतं. पण आपल्याकडे तरी फार माहीत नाही. जुन्या काळातले शाहीर करत असतील.
फक्त गायक म्हणून पारख करायची असेल तर जुनीच गाणी गाऊन घेण्यात काही वावगं वाटत नाही. संगीत दिग्दर्शक शिकवेल तसं गाणं हे गायकाचं काम असाच दांडगा समज आहे. लता चांगली टेप रेकॉर्डर आहे असं सी रामचंद्र यांनी वाटा वेगळ्या झाल्यावर तिच्याबद्दल म्हटलं होतं.
भरत सर्व स्पर्धकांनी स्वतःचेच
भरत सर्व स्पर्धकांनी स्वतःचेच गावे असा आग्रह मी धरत नाही. पण एकही स्पर्धकाला असे कधी वाटू नये? किमान एकदा तरी असे वाटू नये?
अगदीच परंपरा पण जपायची आहे असे गृहीत धरू. मग हजारो अभंग ओव्या उपलब्ध असताना तेच तेच काय सारखं गात बसायचं? एकाही स्पर्धकाला असे कधी वाटू नये की आपण हा नवीन अभंग गाऊ. स्वतःचे लिहिलेले दूरच, किमान इतरांनी अजून चांगली नवीन गीते लिहिली आहेत ते गाऊन पाहू. जजेस ना कंपॅरिजिनचा चान्सच द्यायचा नाही.
असो. मोठा विषय आहे.
>> पण ती निर्मिती किती काळ
>> पण ती निर्मिती किती काळ टिकेल<<
या प्रश्नाचे उत्तर भवभूतीने अतिशय स्पष्ट शब्दात दिले आहे. काळ अनंत आहे त्यामुळे काय टिकेल काय नाही याचा अजिबात विचार कुठल्याच सर्जनशील व्यक्तीने करायचा नाही.
मला देखील ठाऊक आहे की मी लिहिलेले कुणी वाचत नाही पण मी लिहायचे थांबणार नाही.
जगभरचे स्पर्धक नेहमीच
जगभरचे स्पर्धक नेहमीच लोकप्रिय गाणी गातात कारण ते मुळ गाणे हा बेस धरुन लोकांना यांची गुणवत्ता जोखता येते. लोकप्रिय गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद लगेच मिळतो. स्पर्धकाने त्यात चित्रपटगीतातल्या कलाकाराच्या मॅनरिझम्स जराश्या जरी केल्या तरी प्रेक्षक टाळ्यांनी कौतुक करतात. हिंदीतली कित्येक फास्ट गाणी (जसे गुलाबी आंखे जो तेरी देखी..) जेव्हा मंचावर सादर होतात तेव्हा लोक खरेतर मुळ गाण्याला टाळ्या वाजवत असतात
नवे गाणे गायले तर लोकांच्या पचनी ते पडायला वेळ लागणार आणि अपेक्षित प्रतिसाद तात्काळ मिळणार नाही ही भिती स्पर्धकांच्या मनात असावी.
मी फक्त पहिला इन्डियन आयडॉल पाहिला. राहुल वैद्याने त्यात सातत्याने सोनु निगमची गाणी गायली. सोनु परिक्षक होता पहिल्या भागात. तेच अभिजीत सावंतने अप्रसिद्ध गाणी गायली आणि ती गाणी त्या मंचावर आल्यामुळे प्रसिद्धीस आली. ही त्याच्या गायकीची कमाल होती. तो जिंकला तेव्हा मला त्याने घेतलेल्या रिस्कचे खुप कौतुक वाटले होते.
कार्तिकी गायकवाडने लोकप्रिय गाणी तर गायलीच पण तिच्या वडलांनी संगितबद्ध केलेली व गायलेली गाणीही तिने सादर केली. ही गाणी फार थोड्या लोकांनी आधी ऐकली असावीत. पण तिच्या गायकीत त्या गाण्यांना लोकांचा व परिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
आताचे कार्यक्रम पाहातच नाही त्यामुळे काय चाललेय माहित नाही.
सिंगर साँग writer नसतात.
सिंगर साँग writer नसतात. असतात फक्त सिंगर. Song writer वेगळा असतो. Music composer वेगळा असतो. आणि मग एक कृत्रिम मिश्रण तयार होते त्यात कुणाचाही गाभा मिसळत नाही.
>>> हे मला पटत नाही. कित्येक जुनी नवी हिंदी मराठी गाणी कवी, गायक व संगीतकार यांनीच बनवली जी ६०-७० वर्षांनंतरही लोकांना अपिल होतात ती या सगळ्यांची एकत्र उर्जा असल्याशिवाय का?
चांगलं गाणं गळ्यातून उतरणं व चांगले शब्द लेखणीतून उतरणं या दोन वेगवेगळ्या प्रतिभा आहेत. एखाद्याकडे दोन्ही असल्या तर उत्तमच पण दोन किंवा तीन स्किल्स नाहीत म्हणून कोणी मिडीऑकर ठरत नाही.
जुन्या सारेगमप मध्ये कार्तिकी गायकवाडने तिच्या वडीलांनी लिहीलेली अपरीचित गाणी उत्तम गायली हा तिचा वरचढ पॉईंट ठरला. पण फ्रॅंकली स्पीकिंग आज ती गाणी कुणाच्या लक्षात आहेत? अर्थात म्हणून काही कार्तिकी वाईट गायक नाही.
मैंने दिल से कहा from रोग
मैंने दिल से कहा from रोग मूवी
https://youtu.be/F7Ysxr1bl1E?si=Yc4swNuryK0BOnRO
माझेमन,
माझेमन,
९० च्या गाण्याच्या यूट्यूब वर कमेंट वाचल्या तर आजकालची पोरं म्हणताता Old is gold. आणि मला old म्हणजे ४८ ची वाटतात..
आज ज्याची चलती आहे ते ठराविक लोकांना उद्या आवडतं बहुतेकांना नाही खपत.
म्हणून नवीन गोष्टी तयार करणे थांबवायचे नाही. मी परत परत सांगत आहे, एकदा तर वाटलं पाहिजे नवं करून बघू. सतत नवं करायला आपण सगळेच जिनीयस नसतो.
पण सर्व मराठी समाजाला नुसत्या महाभंकस नॉस्टॅल्जिया ने डसले
आहे. कारण पुढे काय आहे ते कळत नाही त्यासाठी वर्तमानात काहीच करता येत नाही अशा वेळेस हातात भूतकाळात रमण्याशिवाय काहीच उरत नाही.
Nostalgia हा देखील गुण आहे आणि आता देखील त्या अंगाने नवीन काहीतरी करता येतं. पण आपल्याला तेच तेच उगाळून मजा येते. कसलं दळभद्री लक्षण आहे हे.
किती बालगीते मराठी मुलं ऐकतात आणि कोणती? झुक झुक आगीन गाडी? सांग सांग भोलानाथ? कुठलं पोरगं नंदीबैल बघतं आज?
मैंने दिल से कहा from रोग
मैंने दिल से कहा from रोग मूवी ♥️
हो पाहिलं स्वतः तयार केलेलं
हो पाहिलं स्वतः तयार केलेलं गाणं इंडियन आयडल मध्ये अभिजित सावंत गायला होता "मोहोबतें लुटाऊगा " ज्याचा नंतर त्याने अल्बम केला. तेव्हाही बर्याच जणांना राहुल वैद्य सोनू सारखा आवाज आहे म्हणून जिंकावा असच वाटत होतं. पण अभिजित ने बाजी मारली अर्थात प्रेक्षकांचा कौल त्याच्या बाजूने होता.स्वतःच गाणं म्हंटलं हा प्लस पॉईंट होता.राहुल वैद्य खूप डीसपॉइंट झाला होता निकाल ऐकून तेव्हा .पण अभिजित सावंत चा आवाज त्याच्या पेक्षा उजवा होता.अभिजीतला सिनेमात खूप कमी गाणी गायला मिळाली ,अजून मिळायला हवी होती.खूप सुंदर आवाज आहे त्याचा.
अभिजीत सावंत विषय निघाला तो
अभिजीत सावंत विषय निघाला तो सुद्धा रिपीट मोड धाग्यावर आणि सर्वात पहिले हे गाणे आठवले.
एक शक्स रास्ते मे कही छूट गया था..
https://youtu.be/JZL3Eu84AcU?si=6KI9VwYAEtv79Lry
वरच्या लिंकवर एक कडवे कमी आढळले म्हणून ही लिंक
https://youtu.be/-wrkcPw8jMY?si=vHVdedoaz7hpHvQd
मी addiction लागल्यासारखे हे ऐकायचो.
मग मी माझ्या बेस्ट फ्रेंड ला हे ऐकवले.. त्याला सुद्धा addiction लागले.
मग त्याने त्याच्या फ्रेंडला ऐकवले.. आणि व्हायरस सारखे पसरलेले हे आमच्यात
आताही ऐकले तर नशा जाणवते एक...
पण सर्व मराठी समाजाला नुसत्या
पण सर्व मराठी समाजाला नुसत्या महाभंकस नॉस्टॅल्जिया ने डसले आहे. कारण पुढे काय आहे ते कळत नाही त्यासाठी वर्तमानात काहीच करता येत नाही अशा वेळेस हातात भूतकाळात रमण्याशिवाय काहीच उरत >>>>>
हो बरोबर. सध्या सातत्याने काही चांगले निर्माण होत नसेल तर जुने ऐकण्याशिवाय काय पर्याय आहे? नव्यात अगंबाई अरेच्चा, नटरंग ही नावे चटकन आठवली. कट्यार.. मधली नवी गाणीही तितकीच सुरेख होती. बाकी काही आठवण्यासारखे मी पाहिले नाही पण का नसावे?? असणार. पण तरी ही ऐकण्यासारखी नवी शंभरेक गाणी सोडली तर बाकी कोण काय नवे करतेय ज्याला रिपिट वॅल्यु आहे?
मराठी अस्मिता वाहिनीवर किंवा इथल्या सिंधुदुर्गनगरी ह्या मराठी वाहिनीवर आजच्या तरुणांनी रचलेली नवी गाणी ऐकायला मिळतात. मला त्या गाण्यांमध्ये काहीही नाविन्य दिसत नाही. ती आजच्या हिंदी गाण्यांसारखी मुक्तछंदात रानोमाळ भटकणारी आहेत. आणि हिंदी गाण्यांवर पाश्चात्य गाण्यांची छाप आहे. पहिले गाणे संपुन दुसरे सुरु झाले की पहिले काय होते हे आठवतही नाही. परत तेच लावले तरी कळायचे नाही की हे आधी ऐकलेय म्हणुन. कदाचित गायक, संगीतकार पुढे गेलेत पण श्रोते अजुन मागे रेंगाळताहेत. त्यांना सोबत खेचुन नेतील इतक्या ताकदीचे नव्यात सध्या कोणी नाही. मेबी इन द मेकिंग असतील. हल्लीच दुसर्या एका धाग्यावर चांगल्या गाणार्या नव्या गायकांबद्दल चांगले वाचले.
तोवर भुतकाळातली गाणी, ज्यांना प्रचंड रिपिट वॅल्यु आहे ती ऐकायची नाहीत तर मग काय करायचे?
आज ज्याची चलती आहे ते ठराविक लोकांना उद्या आवडतं बहुतेकांना नाही खपत. म्हणून नवीन गोष्टी तयार करणे थांबवायचे नाही. मी परत परत सांगत आहे, एकदा तर वाटलं पाहिजे नवं करून बघू>>>>
करणारे करताहेत की… कोणी थांबवलेय?? आता तर कोणाला ‘मला संधी मिळत नाही‘ म्हणुन गळा काढता येणार नाही. यु ट्युब आहे. बनवणारे लोक संगीत बनवाहेत, यु ट्युब चॅनेलवर टाकताहेत.
मी वर लिहिलेय तसे मराठी वाहिन्या नवी गाणी ऐकवत आहेत. तुम्ही त्या वाहिन्या ऐकत नाहीत त्याला कोण काय करणार?
आता तुम्ही म्हणाल की संगीत स्पर्धेत ही गाणी का येत नाहीत तर तिथली गणिते वेगळी आहेत.
नवी गाणी रचुन ती संगीतबद्ध करुन गाऊन दाखवायची स्पर्धा असेल तर त्यात तसे प्रयोग करणारे तरुण तरुणी येतील. पण अशा स्पर्धा आहेत कुठे??
स्पर्धा उत्तम गायक निवडण्यासाठी आहेत आणि त्यात भाग घेणार्या गायकाला उपशास्त्रिय, लावणी, भक्तीसंगीत, फास्ट पेस्ड आणि अजुन जे काय पाचपन्नास गायनप्रकार असतील ते सगळेच एक नंबर यायला हवेत ही अपेक्षाही आहे
आता या अपेक्षेत तुम्हाला हवे ते प्रयोग कुठे बसतात? गायकाला मी किती वर्सटाईल गायक आहे हे दाखवायचेय. तो प्रत्येक प्रकारातले लोकप्रिय गाणे उचलतो आणि त्या मुळ गाण्याच्या शक्य तितक्या जवळ जायचा प्रयत्न करतो.
एकच माणुस उत्तम गायक, कवी व संगीतकार असणे हे सगळ्यांनाच शक्य नाही. सुधीर फडके हे उत्तम गायक व संगीतकार होते. यशवंत देव उत्तम कवी व संगीतकार होते. ते थोडेफार गायचेही. आता शंकर महादेवन उत्तम गायक व संगीतकार आहे.
आता हे सगळे दळभद्री असेल तर तुमच्या मते जे उत्तम त्याच्या लिंका द्या.
>> सुधीर फडके उत्तम गायक आणि
>> सुधीर फडके उत्तम गायक आणि संगीतकार होते <<
साधना, मी आता शांत बसतो. उगाच तुमच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही. आपण बाबूजींच्या स्वरसाधनेच्या पावसात चिंब भिजा.
तुम्ही फडक्यांना उत्तम समजा
तुम्ही फडक्यांना उत्तम समजा असे मी कुठे लिहिलेय. आणि आता माझ्या भावना सहसा कशानेच दुखावत नाहीत. जर तात्कालिक दुखावल्या तर मी त्या धाग्यांना टाळते. त्यामुळे तुम्ही माझ्यामुळे शांत बसु नका. स्वतःहुन शांत बसावेसे वाटत असेल तर ठिक. पण उगीच माझ्या भावनांमुळे वगैरे नको. फडके अतीभंगार होते हे सोदाहरण स्पष्ट करायचे असेल तर तेही अवश्य करा.
अरे या अभिजीत सावंतची गाणी
धागा ट्रॅक वर आणतो...
अरे या अभिजीत सावंतची गाणी ऐकता ऐकता लफजो मे कह ना सकू पर्यंत पोहोचलो आणि लक्षात आले अरे ही तर आपली तमन्ना
https://youtu.be/SSFZHqu5fCo?si=04FDYmSL_uWqTTyt
तरी ही ऐकण्यासारखी नवी शंभरेक
तरी ही ऐकण्यासारखी नवी शंभरेक गाणी सोडली तर बाकी कोण काय नवे करतेय ज्याला रिपिट वॅल्यु आहे?
>>>>
बहुतांश नवे प्रयोग एकसुरी असतात. एकदा ऐकल्यावर ती गाणी अपिलच झाली नाहीत, नॉस्टॅल्जिक वैविध्यपूर्ण गाणी ऐकून तयार झालेल्या कानांना ते आवडले नाहीत तर उगीच वाहवा करायची का? रहमान, अमित त्रिवेदी, विशाल भारद्वाज, अजय अतूल नविन होते तेव्हा त्यांच्याही गाण्यांत दोष होतेच की. पण श्रोत्याला अक्षरशः खेचून घ्यायची त्यांची गाणी.
आता प्रसिद्धीच्या इतक्या संधी उपलब्ध असताना ती शक्ती नव्या लोकांत नसेल याचा दोष श्रोत्यांवर कसा?
रसिकांचा वेळ/पैसा हा नवकलाकार प्रोत्साहन निधी नसतो. जो समोरच्याला काहीतरी इंटरेस्टींग वाटेल असं करतो त्याला अटेन्शन नी रिपीट व्हॅल्यू मिळते. नाहीतर नागराज मंजुळे, नीरज घायवान वगैरेना कधीच प्रसिद्धी मिळाली नसती.
लोक स्मरणरंजनात अडकलेत हा स्वतःचा गोड गैरसमज करून घ्यायचं कारण नाही. तुम्हांला लोकांना स्मरणरंजनातून बाहेर काढता येत नाही ही तुमच्या कलेची मर्यादा आहे.
या चर्चेत अजून एक मुद्दा आहे.
या चर्चेत अजून एक मुद्दा आहे.
मायबोलीकरांचे सरासरी वय जास्त आहे. इथे मागच्या पिढीतले लोकं जास्त आहेत. त्यामुळे इथे स्मरणरंजनात रमणारा क्राउड मोठा आहे. मायबोलीबाहेरच्या जेन झी अल्फा लोकांना आणि त्यांना काय आवडते याला आपण इथे विचारात घेत नाहीये. आपण आपल्याच आवडीचे निकष लाऊन दर्जा ठरवत असतो. पण हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
>> लोक स्मरणरंजनात अडकलेत हा
>> लोक स्मरणरंजनात अडकलेत हा स्वतःचा गोड गैरसमज करून घ्यायचं कारण नाही <<
एक सिम्पल सर्व्हे करा.
हिट मराठी चित्रपट घ्या: त्यांच्यात
१. समकालीन (कोणताही जॉनरा असू द्या)
२. नॉस्टाल्जिक (म्हणजे जुन्या नाटकांवरून केलेले, बालपणीचे दिवस सुखाचे छाप नोस्टलिजिक, बचपन का प्यार, आणि ऐतिहासिक चित्रपट वगैरे सगळे आले)
३. फ्युचुरिस्टिक / भविष्यवेढी/ SCI-FI
अशा तीन कॅटेगरी करा.
आणि बघा मराठी समाज नोस्टलिजियात रमतो का नाही ते.
नवीन चांगले द्या की. ते
नवीन चांगले द्या की. ते मिळत नसेल तर स्मरणरंजन हाच पर्याय.
हे. मायबोलीबाहेरच्या जेन झी अल्फा लोकांना आणि त्यांना काय आवडते याला आपण इथे विचारात घेत नाहीये.>>>>>
>>>>
९० च्या गाण्याच्या यूट्यूब वर कमेंट वाचल्या तर आजकालची पोरं म्हणताता Old is gold. आणि मला old म्हणजे ४८ ची वाटतात..
वरची कमेंट माझी नाही. मी स्मरणरंजनात खुष आहे आणि आजच्या पोरांना मी जे ऐकतेय तेच गोल्ड वाटतेय असे वरची कमेंट सांगतेय.
नवा चांगला टिकाऊ कंटेंट आणा रे कोणीतरी.
सॉरी पण Youtube वर आजची पोरे
सॉरी पण Youtube वर आजची पोरे फार नसतात.
तिथे 90ज किड जास्त भरले आहेत. किंवा जस्ट पुढची बॅच..
सध्या इंस्टाग्रामचा जमाना आहे.
मला काय फरक पडतोय?? मी
मला काय फरक पडतोय?? मी तसेही स्मरणरंजनातच रमणार.
विविधभारती व श्रीपाद रेडिओ या दोन चॅनेलवर आलटुन पालटुन खेळणार. गाडीत मात्र इतर सरकारी वाहिन्या ऐकाव्या लागतात.
जाउदे.
हो, फरक कोणालाच पडत नाही
हो, फरक कोणालाच पडत नाही
लोक उगाच आमच्या काळाची गाणी अशी आणि तुमच्या काळाची तशी म्हणून एकमेकांच्या आवडीनिवडीवर चर्चा करत बसतात. पण जो तो आपल्या आवडीने गाणी ऐकतो आणि जी बहुतांश जणांची आवड असते तिचे मार्केट तयार होते.
नव्वदीची मेलोडी आता हरवली आहे.
पण आताच्या जनरेशनला त्याने काही फरक पडत नाही. त्यांना जे हवे ते त्यांना मिळत आहे.
तेच…
परत तेच…
समकालीन (कोणताही जॉनर असू द्या) चित्रपटही येतातच की. ते जर नव्या पिढीच्या अवगुंठनातून ( लिव्ह इन) जुन्या पिढीच्या गोष्टी (सासू आणि नॉन सून सून) दाखवणारे असले तरी सडकून आपटतात. तेच सैराट इतरांपेक्षा चांगला धंदा करतो कारण रिगार्डलेस तो कुठल्या काळातला आहे यापेक्षा तो काय म्हणतोय हे लोकांना इम्पॉर्टंट वाटतं, तो भिडतो.
त्यामुळे दोष स्मरणरंजनाचा नाही. समोरच्या कंटेटमध्ये कितपत दम आहे त्याचा आहे.
बाकी साय फाय मराठीच काय हिंदीवाल्यांनाही जमत नाही. त्यामुळे त्या विषयाला पास.
साय फाय सुपरहिरो कोई मिल गया
साय फाय सुपरहिरो कोई मिल गया ने बरोबर भारतीय प्रेक्षकांची नस पकडली होती. आमच्याकडे आजही बघितला जातो. गाणी राजेश रोशनची असल्याने मेलोडीयस होती. आजही टिकून आहेत. आजही ती ट्यून गुणगुणावीशी वाटते. ताजी वाटते.
https://youtu.be/t5OKlU0icRs
https://youtu.be/t5OKlU0icRs?si=RuZ6nRVdxTV6K4oq हे अजून एक गाणं खूप वायरल होतंय ipopstar मधलंच ,हाच तो कुरळ्या केसांचा गायक आवाज जरा वेगळाच आहे पण गाणं मस्तय.
दिल हूम हूम करे ( रुदाली
दिल हूम हूम करे ( रुदाली चित्रपट)
हे गाणं, त्यातला लता मंगेशकरांचा आवाज, संगीत मला पूर्वीपासून आवडते .. दिवसातून एकदा तरी ऐकतेच हे गाणं..!
रॉय चे पोस्ट पाहिले की
रॉय चे पोस्ट पाहिले की स्पर्धक नविन काही का म्हणत नाहीत - इथे हे अस्थानी होईल पण आय्डॉल, सारेगम सारखे कार्यक्रम होतात तेव्हा स्पर्धकांच्या मनाचे त्यांना क्वचितच करायला मिळते. एकदा ऑडीशन झाल्या की कोणी काय गायचे, केव्हा रडायचं , केव्हा कोणाबरोबर नाचायचं , कुणाला काय प्रश्न विचारयचा , कुठे कोणता जोक होणार हे सग्गळं चॅनल चे क्रिएटिवज्स ठरवतात. काही गायकांनी पूर्वी हे मुलाखतीत वगैरे सांगितलेही होते, की चॅनल च्या टॉप ५-६ म्हणून प्रमोट करत असलेल्या गायकांनाच कायम पॉप्युलर भावखाऊ गाणी गायला मिळतात. शिवाय फॉर्मॅट ठरलेले. की एक ९०ज नाइट, एकदा कल्याणजी आनंदजी नाइट, अजून काय तर माँ, भाई बहन असल्या थीम , बाकी सिनेमे प्रमोट करायला जे कलाकार येतील त्यांची गाणी. त्यामुळे गायक टृअॅलेन्टेड असले तरी पण ठोकळेबाजच होतात हे कार्यक्रम.
Dil Mera Churaya Kyun why did
Dil Mera Churaya Kyun why did you break my heart
https://www.youtube.com/watch?v=mSu5cz2GFts
आणि हे ओरिजिनल
Wham! - Last Christmas
https://www.youtube.com/watch?v=E8gmARGvPlI
वरती जशी चर्चा सुरू आहे त्यात
वरती जशी चर्चा सुरू आहे त्यात मराठी आणी हिंदी सोडून बाकी भाषात पण गाणी आहेत.
मला तेलुगु गाणी आवडतात..छान ठेका असतो. हल्लीच झुबीन गर्ग च्या मृत्युनंतर कुतुहल म्हणून आणी असम ला नुकतेच जाऊन आल्यामुळे त्याची असमिया गाणी शोधून ऐकली. सुंदर ठेका, त्याचा मधुर आवाज अगदी तार सप्तकात गेला तरी तसाच गाणारा यामुळेच गाणी आवडली.
मला पं नरेंद्र शर्मा यांच आणी भूपेन हजारिकांनी गायलेल गंगा बेहती हो क्यू पण आवडते.
पण सध्या चे हाॅट फेवरिट मायाबिनी, माया, आखुरी जुर मुर आणी प्रोतिदिने..
कल्लूळाचे पाणी कशाला ढवळीलं,
कल्लूळाचे पाणी कशाला ढवळीलं,
नागाच्या पिल्लाला तू का गं खवळीलं.
कितने दफ़े दिल ने कहा दिल की
कितने दफ़े दिल ने कहा दिल की सुनी कितने दफ़े
https://youtu.be/hKEEbtMkKms?si=ILHlybK4w1rxJ3Mq
Pages