न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०७)मैत्रेयी
०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०९)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
१०)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि भाजी.
११)चमन - राजमलाई
१२)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१३) विकु
१४) स्वाती + १
१५) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१५) सागर + १

आतापर्यंत येणारे एकुण मोठे - १९, लहान २

आपल्या नंबरापुढे शाकाहारी आधी लिहून मग नाव लिहीलं तर? Wink म्हणजे शाकाहारी सायो वगैरे..

फक्त शाकाहारी कोण कोण आहेत ते लिहिल तरी पुरे ना... Happy

०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मैत्रेयी
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि भाजी.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु
१३) स्वाती + १
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१५) सागर + १

आतापर्यंत येणारे एकुण मोठे - २१, लहान २, शाकाहारी ४

काही सजेशन्स :
**दोन मांसाहारी रस्से झालेत, एक व्हेज भाजी झालीय. आता अपेटायजर्स घ्या इतरांनी Happy काय आहे,लोक आल्या आल्या आधी त्यावरच ताव मारतात Happy त्यामुळे २-३ असली तरी सहज खपतात!
स्वाती, तू नॉन व्हेज अपेटाय्जर आणू शकतेस हवं तर.
** पाणी, सोडा, ज्यूस ? कोण आणतंय ?पेपर प्लेट्स, चमचे, ग्लास इ इ पण कुणीतरी आणू शकता.
** पोळ्या - नयनिश, तू पोळ्या विकत आणणार का? २० लोकांना किमान ४०-५० तरी लागतील म्हणून विचरतेय. हवे तर कोणीतरी दोन लोक मिळून पोळ्यांची जबाबदारी घेऊ शकतात.
**सायो, तू कोणती भाजी आणायच्या विचारात आहेस? मी पनीर बटर मसाला करावा म्हणत आहे. Happy
** कोणाला मुक्कामाची गरज असल्यास कळवा! स्वागत आहे Happy

हीही, मैत्रेयी, मी पनीर मखनीच्या विचारात होते पण आता बेत बदलते नी दुसरं काहीतरी आणते.. भाजीकरता काही सजेशन्स?

सायो, खर तर तू मसालेभात आणत आहेस ना, मग बरोबर अजून भाजीपेक्षा कोशिंबीर/रायता वगैरे चालेल का? अगदी आणायचीच असेल तर सजेशन- एखादी कोरडी भाजी किंवा राजमा/छोले/कोणतीही उसळ प्रकारातली भाजी.

चालेल की. पळेल Happy
०१)अनिलभाई
०२)फचिन
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी)
०५)झक्की - रंपा
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला.
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु
१३) स्वाती + १
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना)
१५) सागर + १

आतापर्यंत येणारे एकुण मोठे - २२, लहान ४
(शाकाहारी ४)

किती त्या राजमलाईची हाइप झालीय Happy फार पूर्वी खाल्ल्ली असेल तर त्याला नॉस्टेल्जिक वॅल्यू आहे ते वेगळं. पण तुम्ही पहिल्यांदाच खाणर्‍यांनी फार अपेक्षा केल्यात तर काय होईल ते त्या राजमलाई बाफवर लिहिलंय मी Happy

स्नो स्टॉर्म आत्ता पासुनच आहे हे कळल का?

स्नो नको रे बाबा नाहितर आम्ही शिट्टी वरुन कसे पोचणार?? एकदा पोहोचल्यावर काहिहि झाल तरी ठिक Wink

पोळ्या विकतच आणणार राजभोग मधुन. पोळ्या छोट्या असतात तश्या एका पाकिटात १०. थोड्या जास्त आणिन ५-६ पाकिटं किंवा जास्त. दुसरं कोणी नाही आणल्या तरी चालतील.

माणसा, अरे मैत्रेयीच्या घराच्या कम्युनीटी हॉलमधे आहे गटग.. पत्ता मागु नकोस, वेळ आली कि मिळेल Proud

वार्षिक एवेएठीचा पत्ता मागू नये.. अपमान होईल... Lol

चुकलं चुकलं...

कमीत कमी शब्दांमध्ये अपमान करण्यात येईल. आणि त्याला आपणच जबाबदार रहाल.... Proud

'जास्तीत जास्त' राहीलं ना भौ. Lol

ए.वे.ए.ठी चा पत्ता.

४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

माणुस येतोय म्हणजे आता खार्यख्रम ठेवावा लागेल ना.!!!! Happy

Pages