मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सा. बांचा एक किस्सा.
या ऑक्टोबर मध्ये जेव्हा खूप पाऊस पडत होता त्या वेळेस आम्ही बाहेर जेवायला चाललो होतो. आमच्या घराबाहेर खूप पाणी साठल होत आणि साबा सगळ्यात आधि बाहेर पडल्या होत्या. तेवढ्यात समोरून आमच्या बिल्डींगमध्ये रहाणारी एक अमराठी मुलगी आली. साबा तिला बघुन म्हणाल्या, "अरे वृंदा देखो ये कैसा हो गया है, तले में मले में, तले में मले में," तळ्यात मळ्यातच जसच्या तस भाषांतर केल त्यांनी. Lol

मै अपनि खुर्ची से हसते - हसते पड्या अन बाजु वाले लोक मेरेकु बघ के येडा लोक में काढ्या ...
==============================================
हत्ती :
लोळत होता = लोट - पोट हो रहा था = लोट रहा था

कोणी तरी लिड शब्द वापरला त्याचे असे आहे:
======================
लिसड गया, लिसडना (बरबटणे)

कणेकरांच्या फिल्लमबाजीत आहे हा किस्सा. नूरजहां जेव्हा भारतात आली होती तेव्हा तिच्या सत्काराच्या वेळेस एका मराठी नेत्याने हिंदी उधळलं ते असं: "वो क्या है के, हमारे लहानपणी, जरा वेळ मिळ्ळा की पिक्चर बघनेका, जरा वेळ मिळ्ळा की पिक्चर बघनेका...ऐसा. लेकिन, मगर, उन दिवसोंमें चित्रपटोंमे अडचनी छुटवानेका मार्ग शोधा जाता था." Happy

मी काल घरी गेलो तेव्हा घरात समोरच्या घरातील ४ वर्षाचा (हिंदी भाषिक) मुलगा आणि माझा मुलगा बसले होते. माझी घरात एन्ट्री झाली आणि तो मुलगा स्वता:च्या घरी जायला निघाला तर माझा मुलगा त्याला म्हणतो, "बसो बसो पप्पा नही ओरडेंगे" Lol

अरे हायवेपेसे अंदर आने का, फिर सिधा सिधा , सिधा जाने का, फिर कावळा नाका आताय. उधर उजवी बाजुको वळनेका.... फिर थोडा सिधा फिर डावीकडे वळ्नेका ब्ला ब्ला ब्ला.... शेनारी उभा मोबाइल वरुन दिशा मार्गदर्शन करत होता कोणालातरी ...

थोड्या वेळाने परत तिकडुन फोन आला ...

अरे कावळेनाके पे सरळ वळ्नेका नही.... Uhoh उजवीकडे वळ्नेका......

मैत्रिणीच्या बाबांनी कुठल्यातरी पेशंटला गोळी दिली, आणि म्हणाले ' घाम घाम आयेगा और ताप चला जायेगा'
माझ्या साबांचा किस्सा -
आम्ही नवीन घरात रहायला गेलेलो- शेजार्‍यांशी ओळख व्हायची होती - सासूबाई सोबतीला आलेल्या. शेजार्‍यांनी विचारलं - तुम्ही इथे रहाणार आहात का (हिंदीत) - त्यांना काही केल्या बहू हा शब्दच आठवेना. त्या म्हणाल्या - मेरा बेटा और उसकी बीवी यहा रहेने के लिये आयी है.
शेजार्‍यांना वाटलं, सासवा सुनांच पटत नसावं. Happy

मला तर दमच लागायचा पूर्वी हिंदी बोलून झालं की..
एकदा म्हणालेले - उन गिरा है ना (ऊन पडलंयच भाषांतर)
हल्ली जरा बरी परिस्थिती आहे.

हाहा !!! १ से १ किस्से...

एकदा म्हणालेले - उन गिरा है ना (ऊन पडलंयच भाषांतर) हल्ली जरा बरी परिस्थिती आहे.
>>> हल्ली काय? उन पड्या है ना Happy

माझी एक हिंदीभाषीक मैत्रिण कोल्हापुरात रहाय्ची पेइंगगेस्ट . तिथल्या थंडीची तिला अजिबात सवय नव्हती. घरमालक काकु रोज सकाळी चहाच्यावेळी गप्पा मारताना म्हणाय्च्या ' गुड मॉर्निग ! क्या.. ठंडी कैसे बजती है? ' त्यावर २-३ दिवस तिने नुसतेच हसुन गुड मॉर्निग म्हटले.. पण रोज तोच प्रश्ण ऐकुन त्याना एक दिवस म्हणाली , आंटी मुझे सच मे नही पता कैसे बजती.. तर त्या हसुन म्हणाल्या, 'ये देखो, तुम तो इतना स्वेटर - मोजे डालकर बैठी हो तो कैसे बजेगी ? इसको निकालोगी तो एकदम कुड्कुड बजेगी ..' हे ही तसे डोक्यावरुन गेले .. नंतर हा प्रश्ण बरेच जणांकडुन ऐकल्यावर तिला मतितार्थ कळला .
ठंडी बजना = ठंडी लगना
त्यानंतर नेहमी गंमतीत चालाय्चे .. हमको तो बजती नही.. हमे तो लगती है ठंडी..
आता इथे ती डि. सी. मधे असते. आणी नेहमी म्हण्ते .. इधर कि ठंडी बजती नही , बॅन्ड बजाती है मेरा..

माझी मातोश्री आणि हिंदीभाषिक कामवालि ह्यांच्यातला संवाद!
कामवालि: आन्टी, थैलि किधर है?
आई: वहिपे शोध जरा!
कामवालि: नहि है आन्टी.
आई:फिर वरवन्टे के निचे होगि लेले
ती बया तशीच उभी, मग मीच दिली तिला शोधके Wink

"हमारे गावमे इत्ता पाणी पडा के डबुरले के डबुरले बपक गये"
हि आमच्या गावातील मुस्लिम बान्धवान्ची अहिराणीमिश्रीत हिन्दी आहे....................................

आई ग्ग, आई ग्गं,,,,,,, अशक्य ! अशक्य!!
अरे माझ्या पेटका आपरेशन हुयेला है, इतना हसके मेरा पेट दुखताय ना, सतरा टाका डाला हय, मै कसं करनेका फिर?
मी आठवीत असताना एकदा एक विक्रेता घरी आला, म्हणालअ, 'घरमे कोइ बडा है क्या?' मी म्हंटलं, 'आप्पुनच है, तु बोल',,,,,,,

>>> इधर कि ठंडी बजती नही , बॅन्ड बजाती है मेरा Lol

>>> 'घरमे कोइ बडा है क्या?' मी म्हंटलं, 'आप्पुनच है, तु बोल',,,,,,,

पल्ले, हे माझ्याही बाबतीत एकदा घडलं होतं Lol

होस्टेल चा किस्सा,

थंडी भयानक असायची त्यामुळा आमचा रुममेट (दिल्ली साईडचा) बाथरुममधेच सिगारेट फुकायचा, पण थोड्या दिवसांनी थंडी कमी झाली तरी हे महाशय बाहेर जायचा नाव घेईनात, मग १ दिवस त्याला दम टाकला,

"थंड कम हो गया है, अब बाहेर जाके फुकणा"

वरचे वरवंटेके नीचे वाचून मजा वाटली. मला पोळपाट लाटणे, पाटा वरवंटा याना हिंदीत काय म्हणतात, ते माझ्या केनयातल्या शेजारणीमूळे कळले (ती बनारसची होती )
पण वरचे वाक्य हिंदीत म्हंटले असते तर, सर के नीचे होगी, पट्टे के नीचे होगी, सरपट्टे के नीचे होगी, कसेहि म्हंटले असते, तरी कळलेच नसते की !!!

आणि पल्ली लहापणापासूनच अशी का तू ?

५ वीत असतांना हिंदीमधे 'गाई' वर लिहीलेला एक निबंध .
सरांनी क्लासमधे वाचुन दाखवला . Happy

'गाय एक पाळीव प्राणी है
गाईला चार पाय असतात है
गाईला दोन कान असतात है
गाईला दोन डोळे असतात है
गाय कुरणात गवत खाते है
गाय आपल्याला दुध देते है '

वाक्याच्या शेवटी 'है' लावले की झाले हिंदी Happy

शेंबुड आला की हिंदीत नाक बेह रही है असे म्हणतात त्यामुळे नाक साफ करना अथवा नाक पोछना असे म्हणत असावेत.

आज सकाळी मला 'माहेर' ला हिंदीतलं शब्द आठवलं नाही...
गडबडीत 'माहेरवाल को गई है' म्हणालो...
सासर = ससुराल, तसं माहेर = माहेरवाल झालं माझ्याकडुन.. Proud

आज दुपारी मला हपिसातून निघताना रिक्षेत खूप जांभई आली. हईईईईए. असे. तो रिक्षेवाला दचकून मागे बघू लागला. त्याला वाट्ले रस्ता चुकला म्हणून मी ओरड्ते आहे. मला त्याला सांगताच येईना. जांभई ला काय म्हणायचे हिन्दीत? मी म्हट्ले भैया जोरसे नींद आरही है. व मग उगीचच तीन चार जांभया दिल्या.

Pages