मराठी लोकांचे हिंदी....

Submitted by दक्षिणा on 20 November, 2009 - 03:06

जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.

सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......

घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......

सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...

घरमालक : पोळा???

सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?

घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..

सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.

घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या शेजारी एक काकु राहतात, त्यांनी एका प्लंबरला दुरुस्तीच्या कामासाठी बोलावले होते.
तो पट्ट्ठा नेमकं दुपारच्या झोपेच्या वेळी येऊन दारवरची बेल वाजवली. काकुनी दार उघडले व विचारले
काकू: कोण पाहिजे.
तो: मै प्लंबर, आपने बुलाया था, काम करने के लिए.
काकु: अभी सोने का टाईम है. ६ के पिछे आओ. (६ नंतर या)

थोडे विषयांतर - दुकानाबाहेरील पाट्यांवरूल मजकूर.
चांगला गुड - हा शब्दार्थ नव्हे तर "चांगला गूळ"
पोलीसचे तीळ - पोलीसांसाठी तीळ नव्हे तर "पॉलीशचे तीळ."
स्टील पोलीस करून मिळेल - स्टील पॉलीश - प्लेटींग करून मिळेल.
तसेच मला कंपनीत एका सहकार्‍याने विचारलेला प्रश्न "आज स्नेक खाया क्या" - त्याला म्हणावयाचे होते " आज स्नॅक्स - नाश्ता - खाल्ला का" तसेच दुसर्‍या एकाने एकदा सांगितले "आज नाश्ते में बडा पाव है." - त्याला म्हणावयाचे होते "वडा पाव" त्यांच्या त्यांच्या भाषेतील उच्चार पद्धतीमुळे ही गंमत झाली. त्यांची भाषा, प्रांत याविषयी यात लिहिले नाही.

सगळेच Lol

एकदा दिरांकडे गेले असता, मी व सासूबाई दुपारी हॉलमधे पेपर वाचत होतो व दीर जाऊ जरा "पडले" होते. तेवढ्यात फोन वाजला. मी साहिलला (पुतण्या) फोन घ्यायला सांगितले.

पलिकडून विचारले "श्रीजी है क्या?" (दिरांचे नाव "श्री" )
साहिल - "अं...अं..... वोह ना....."
इकडून आजी कडाडली "अरे अं..अं.. काय करतोस? बाबाचा फोन असेल तर सांग ना झोपलेत म्हणून !"
साहिल (मान हलवत) - "वो ना गिरे हुवे है"
पलिकडे सन्नाटा.
साहिल - "हेलो हेलो.."
इकडे मी व आजी (सा.बा.) ठो ठो करुन हसत सुटलो. तरी बरं गधडा चांगला कॉलेजला जाणारा मोठा मुलगा आहे.

सही हिंदी आहे सगळ्यांच.

माझी मुलगी (व. वर्ष ५) अशीच धडकून हिंदी बोलते. काहिहीsss अडत नाही. डोला बंद करो, झोप जाओ असं.
तिचा मित्र आहे एक (व. वर्ष ३- हिंदी बोलतो) त्याच्याशी अशीच बोलते आणि त्याला पण कळतं हिचं हल्ली.
एकदा मी त्यांना द्राक्षं दिलेली खायला तर हाच घेउन बसला सगळी. माझी मुलगी त्याला विचारत होती की माझी पण आहेत ना तर हा तुझी आहेत म्हणत होता (हिंदीतून) पण देत तर नव्हता आणि वाटी घेउन स्वतःभोवती फिरत लपवत होता. तर मुलगी म्हणते रागावून, "मेरा नही, तेरा है म्हणता म्हणता वळता है"

माझा नवरा पण अफाट हिंदी तोडतो. एकदा आम्हाला एका कॉन्फरन्स करता जानेवारी महिन्यात कडक थंडीत डेनवरला जाव लागल. एका सरदार मित्राकडे जेवायला आम्ही जेवायला गेलो. तर हा म्हणाला
आपके डेनवर मे बहोत थंडी बजती है!
सरदारजी हसून लोट-पोट!

आमचे एक मित्र जोडपे आहे... तर त्याना रस्ता चुकायची फार खोड आहे... ब्रुसेल्स मध्ये पीक टायमाला लांब बसेस असतात आणि दुपारी कमी गर्दीच्या वेळी साध्या ( छोट्या /नॉरमल) बसेस असतात्...तर मैत्रिण पहिले वेळेस आली तेव्हा दुपारी आली आणि पुढच्या वेळेस नवर्याला घेऊन आली तेव्हा संध्याकाळी आली... आणि नेहामी प्रमाणे उशीर झाला आणि तीने फोन केला आम्ही रस्ता चुकलो होतो आणि आता तुमच्या बिल्डींगची बेल वाजवत आहे पण तुम्ही दरवाजा का नाही उघडत? आम्ही म्हणालो पण तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात्...तर ते दोघे भलत्याच ठिकाणी होते... मग कसेतरी पोहोचले ते ...मी चकित झाले अगं एवढसं ब्रुसेल्स, त्यात तु येऊन गेलेली आहेस त्या ठिकाणी परत येताना कसा काय रस्ता चुकु शकतेस? तर तिचा उत्तर "अगं पहिल्या वेळेस लहान बस ने आले..आज लांब (मोठी) बस होती आणि सगळयात मागच्या दाराने उतरले...म्हणुन रस्ता चुकले.." या उत्तरावर मी निरुत्तर... Uhoh ते लोक आता जायाच्या ठिकाणचा मॅप घेउनच जातात आणि पत्ता न चुकता दिशा चुकतात आणि बरोबर उलट दिशेला जातात्...अणि वर हसं नको व्हायला म्हणुन म्हणतात की तेवढाच नविन भाग एस्क्प्लोर केला... Angry ...

तुमच्या स्वतःच्या प्रत्येक पोस्ट खाली संपादन अस लिहीलेले दिसेल, त्यावर टिचकी मारा, पोस्टीतला मजकुर काढून टाका. हा का ना का.

मी एकदा सासर्‍यांना 'अभी तक इधर थंडा शुरु नही हुआ है (इकडे अजून हिवाळा सुरु झाला नाही)' असं म्हंटलं होतं Sad एरवी ते माझं हिंदी निमूट ऐकुन घेतात पण हे ऐकल्यावर हसत सुटले.

>>>हमारे महाराष्ट्र में सब बाई लोग दोपहर को थोडा थोडा "गिरते" है!!!

अरे गोवरी मतलब गाय के संडासका >>> जबर्दस्त

शरदचा मित्र: भाभीजी शरदसाब है क्या?
शरदची बायको: शरदसाब आंघोली को गये है.

शरदचा मित्र: कब गये वो?
शरदची बायको: अभ्भीच गये, पाच मिनिट हो गया

शरदचा मित्रः ऐसे कैसे जा सकते है. मुझे बोला था अभी फोन करने के लिये.
शरदची बायको: वो तो हमेशा जाते है.

शरदचा मित्र: मोबाईल लेके गये होगे ना?
शरदची बायको: नही आंघोलीको वो मोबाईल लेके नही जाते.

शरदचा मित्र: क्यों? बहूत रिमोट प्लेस है क्या?
शरदची बायको: नही रिमोट भी नही लेके जाते.

शरदचा मित्रः अकेले गये है क्या?
शरदची बायको: हां अभी अकेलेच जाते है.

शरदचा मित्रः कब वापिस आयेंगे?
शरदची बायको: आयेंगे दस मिनिटमें.

शरदचा मित्रः क्या? भाभीजी किधर है ये आंघोली?
शरदची बायको: किधर म्हणजे. इधरही है.

माझ्या मावशी कडे इन्दूर ला एकदा वर्तमानपत्रात "आज इन्दौर के स्कूलो मे अवकाश "अशी बतमी आली होती.ती वाचून माझे बाबा मावस भावाला म्हणाले होते,आज शाळेला दान्डी नको मारूस आज तुमच्या शाळेत अवकाशा विषयी काही माहीती देणार आहेत,तुला व्हायचय ना अस्ट्रोनोल्ट!......
मग कितीतरी वेळाने बाबान्ना कळल की अवकश म्हणजे सुट्टी Happy

एकदा मी माझ्या हिंदी मैत्रिणीला सांगत होते, "आज मै नहायी ना इसलिये आनेमें देर हो गयी." असं काही ना काही संदर्भात दोनतीनदा तिला ऐकवल्यावर तिने अगदी जेन्युइनली विचारलं, "तुम रोज नहाती नहीं क्या ?" तेव्हा माझी ट्यूब पेटली. मला तिला सांगायचं होतं की आज मी न्हायले म्हणून आवरायला उशीर झाला Happy

Lol
जोरात सुरु आहे हा बीबी.
ये बीबी हापिसमे नयी वाचनेका, तुम बहुत लोळके खिदळेगा तो लोगोको वाटेगा की तुम येडा हय. Proud

का मराठी लोकांच्या हिंदीला हसता रे ? जसं अमेरिकन्स डोन्ट स्पीक ईंग्लिश, दे स्पीक आमेरिकन तसं मराठी माणसं मराठीतून हिंदी बोलतात.

झुरळाला काय म्हणतात सांगा बरं हिंदीत.

ते राहू दे, ह्याचं भाषांतर करुन दाखवा " तू तूझ्या बापाचा कितवा मुलगा" हिंदीत नाय जमल तर ईंग्लिशमध्ये करुन दाखवा.

आमच्या शेजारच्या काकूंचा प्रसंग....
त्यांच्या घरी लादी पॉलिशवाला भैया आला होता, बाल्कनीत एकाच जागेवर सिलेंडर वर्षानुवर्ष ठेवल्याने तिथे गंज उतरला होता.....

काकू भैयाला :- भैया गॅलरीत नीट घासो, वहां गंजा है.....
भैया :- कहां ? कौन है गंजा ?

मेलो.............मेलो .......... मी आणि माझे कलिग्स साफ मेलो हसुन हसुन........ पोटात दुखतंय
आता तर माबो वरच हे लोण आमच्या ऑफिसमध्ये पसरलंय, त्यातील काही वाक्ये

आने को इतना उशीर क्यो हुवा रे?
फोन पे ज्यादा मत बोलो
खुर्ची जरा सरकओ
इत्यादी... इत्यादी.

'गिरना'चा किस्सा मीच लिहिला होता जुन्या मायबोलीवर. एका मासिकात आलेला होता तो..
सगळे किस्से धमाल Lol
जुन्या मायबोलीवरची लिंक http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -धमाल किस्से आहेत, एकदा वाचून घ्याच.. शिवाय जुन्या माबोशी ओळखही होईल Happy

>>>vaibhavayare123... <<< हाथी किचड में लोटपोट हो रहा था Rofl

अजून एक शंका,

आज ट्रेनमे बहुत गर्दी था |
मेरे पिशवी को भोक था |

ह्या वाक्यांचे आपल्याला हसू येते. का ? ही भाषांची सरमिसळ आहे म्हणून ? का हे चुकीचं (?) हिंदी आहे म्हणून ?

आता वरचीच वाक्य अशी म्हणून पहा.

आज ट्रेनमे बहुत रश था |
मेरे बॅग को होल था |

नाही ना हसू येत ? का ? भाषांची सरमिसळ तशीच आहे. चुकीचं हिंदीही तसच आहे. फक्त मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द आलेत एव्हढच.

मित्रहो मी ह्या गंमतीच्या विरोधात नक्कीच नाहीये पण इंग्रजी शब्द वापरला तर बरोबर आणि मराठी शब्द वापरला तर चूक हे मला पटलं नाही. अर्थात तुमच्यासारखच मला ही हे वाचून हसू आलचं Happy

हा किस्सा आमच्या सोलापूरात सुशिलकुमार शिंदेंच्या नावावर खपवतात-
शिंदेसाहेब जेंव्हा पयल्यांदा दिल्लीला मंत्री झाले तेव्हां पत्रकार परिषदेत त्यांनी, 'ये पत्रकार इतने लंबे क्यूं बैठे है?' अशी झकास सुरुवात केली होती.
बाकी सोलापूरी हिंदीचा एकंदरीत बाज पाहता हे अगदीच अशक्य नाही, अशेंगा अशेंगा ऐसा भी अशेंगा!

Pages