मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>> महाराष्ट्रात आणि भारतात काही समाजांत हुंडा फार मोठा फास आहे <<

आता लग्नाला पोरी मिळत नाहीत. सो या प्रथेला सध्या काही प्रमाणात चाप बसू लागला आहे. काही दिवसांनी उलट हुंडे सुरू नाही झाले तर नवल. लग्न लावून देणारे काही एजंट मुली शोधून लग्न लावायचे स्वतः दीड दोन लाख रुपये घेतात. काही दिवसांनी मुलींनी खरोखर स्वयंवरे ठेवायला हवीत.

मागच्या आठवड्यात भैरप्पांचे ' गृहभंग' हे पुस्तक वाचायला घेतले होते.. खेड्यातील जगरहाटीचे , सामान्य शेतकरी माणसाचे रोजचे जीवन , त्यांच्या आयुष्यातल्या लहान - मोठ्या कौटुंबिक , वैवाहिक आयुष्यातल्या कुरबुरी, समस्या , काही जुन्या जाचक चालीरिती अशी कहाणी होती.. वाचून अर्ध्यात सोडले..

तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या आते बहिणीचा नवरा कर्नाटकातला त्यामुळे त्या बाजूच्या काही गोष्टी कानावर पडायच्या. एक लग्न ठरले आणि मुलगा मुलगी बाहेर जरा फिरून आले. मुलाने मुलीला काही रुमाल छोटीशी भेट म्हणून दिले ते तिने आई, मावशी आत्यांना घरात दाखवले. ती खुश होती पण त्या तिघी चौघींनी आकांडतांडव केले रुमाल देण्याघेण्यावरून. अगदी " आम्ही हे लग्न मोडू" अशी दमदाटीही केली. " हे फारच झाले" असा बोभाटाही केला. ( त्यांना अशी वागणूक न मिळाल्याने मत्सरही असेल.) शिवाय लग्नात आत्या मावश्या बहिणींनी मानापमान करून भांडण उकरून खोडा घालणे तिकडे फार प्रचलित आहे हेसुद्धा कळले. मग काय हे विद्रोही विचार चालूच ठेवणे ही परंपरा जपायला नको का?

'कळीकाळ'-- पुस्तक अभिप्राय

काही दिवसांपूर्वी 'अक्षरनामा' या वेबपोर्टलवर बालाजी घारूळे यांच्या 'कळीकाळ' या कादंबरीतला काही संपादित अंश वाचलेला. तो आवडल्यामुळे कादंबरी आवर्जून वाचली. आवडली.

बदलती गावं, शिक्षणव्यवस्थेची लक्तरं, विद्यापीठांचं राजकीयीकरण, विद्यापीठात उच्चशिक्षण घेणाऱ्या तरूणांचं होस्टेल-लाईफ, याबद्दल यामध्ये अतिशय तब्बेतीत लिहिलेलं आहे. समजा कोसला-झूल-हूल-जरीला-बिढार या कादंबऱ्यांचा अर्क आजच्या काळाला लागू करायचा म्हटलं तर त्यातून जशी एखादी सशक्त साहित्यकृती उभी राहिल तशी ही झालेली आहे.

मागच्या काही वर्षांत भांडवली प्लस उजवी विचारसरणी प्लस राज्यसंस्था अशा तिहेरी मारातून जी शोषणव्यवस्था तयार झालेली आहे, त्यापुढं ही कादंबरी एक भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं करते. विशेषतः शिक्षणव्यवस्थेच्या बाजारीकरणातला तर एकही स्टेकहोल्डर लेखकाच्या नजरेतून सुटलेला दिसत नाही.

यावर कुणी म्हणेल, 'ह्यात काय नवीने? आपल्याकडचे मास्तरलोक त्याच त्याच चावून चोथा झालेल्या विद्यापीठीय इश्यूंवर किंवा भकास तारूण्याबद्दल कादंबऱ्या पाडत असतात. तशी लांबलचक परंपराच आहे आपल्याकडे.' तर तसं नाहीये. हा प्रकार वेगळा आहे. आणि निश्चित वाचण्याजोगा, अनुभवण्याजोगा आहे.

या कादंबरीचा प्रोटॅगनिस्ट रानबा. कादंबरीत अध्येमध्ये चाललेले रानबाचे स्वत:च्याच 'दोन मनांचे संवाद' हा एक अनोखा प्रयोग आहे. त्याचं एक मन थिसीस मांडतं, दुसरं मन ॲंटीथीसीस मांडतं आणि मग दोन्ही मनं मिळून सिंथेसिसपर्यंत पोचतात. हे चांगलं आहे. भजैभालचंद्रमपंथी किंवा नेमाडेपंथी लेखकांचे प्रॊटॅगनिस्ट जसा थेट हल्ला चढवतात तसं हा रानबा करत नाही. याची हल्ला करण्याची पद्धत लोभस आहे.

आशयाचा शांत स्वर, ही या कादंबरीची मौलिकता.! हा स्वर कमावण्यासाठी लेखकानं आधी हे सगळं वास्तव स्वतः भोगून, त्याचं व्यवस्थित आकलन करून घेतलेलं असावं. त्यामुळंच त्याला हे अशा थंड ताकदीनं लिहायला जमलेलं दिसतं. एरव्ही वाद-प्रतिवाद एवढ्या संतुलितपणे करता येऊ शकतात, हे तर आता जवळपास विसरूनच गेल्याचा जमान्याच्या मध्यभागी आपण उभे आहोत. असो.

बाकी, चांगल्या पुस्तकांमध्ये, ते वाचून संपवल्यावर वाचणाऱ्याला "एकटं वाटण्याचा, प्रचंड एकटं वाटण्याचा", जो गुणधर्म असतो, तोही एक आहेच यात म्हणजे.

IMG_20251003_180916~3.jpg

बाकी, चांगल्या पुस्तकांमध्ये, ते वाचून संपवल्यावर वाचणाऱ्याला "एकटं वाटण्याचा, प्रचंड एकटं वाटण्याचा", जो गुणधर्म असतो, तोही एक आहेच यात म्हणजे.
>>>>

हा एकटं वाटण्याचा जो आफ्टर इफेक्ट आहे तो वेगळाच असतो. धन्यवाद ओळख करुन दिल्यावद्दल. या एका शेवटच्या वाक्याने कादंबरीच्या जॉनरचा अंदाज आला

ती अक्षरनामावरची ओळख वाचूनच मी एक दोन दुकानांत शोधत होतो पण मिळाले नाही. त्यात विद्यापीठ आवारातील ठिकाणांचे उल्लेख तेथे काही वर्षे असलेल्या एखाद्याने तशाच दुसर्‍याला सांगावेत (अनिकेत, गोल मार्केट ई) इतक्या सहजतेने व त्याबद्दल माहिती न देता आलेले आहेत ते खूप ओळखीचे वाटले, त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.

टवणे सर,
वाचा. चांगलं पुस्तक आहे Happy

फारएण्ड,
मला एकदा विद्यापीठात राऊंड मारून यात सांगितलेल्या जागा बघून यायचंय. विशेषतः खड्डा कॅन्टीन काय प्रकार आहे बघायचाय. Happy

आणि एबीसीमध्ये तांबडी जोगेश्वरी च्या बॅकसाईडला के सागरचं दुकान आहे. तिथं मिळेल. मी तिथूनच आणलं. ते ठेवतात अशा odd titles ची पुस्तकं.

>> अक्षरनामा' या वेबपोर्टलवर बालाजी घारूळे यांच्या 'कळीकाळ' या कादंबरीतला काही संपादित अंश वाचलेला.>>

आहे अजून. तो वाचला. एकूण लेखनाचा बाज चांगला आहे. पण हे आणखी किती वाचणार? ४३० पानं? ( किंमत ६०० रु.!) आता शिक्षणव्यवस्था, शिक्षणाचे बदकांचे हंस बनवण्याचे कारखाने, नोकऱ्या यात काहीही फरक होणार नाही. लोकसंख्या वाढत आहे आणि यांत्रिकीकरण वाढत आहे म्हणजे नोकरऱ्यांमध्ये ज्ञानी कर्मचाऱ्यांची गरज संपली आहे. परिस्थितीवर कोणत्याही सरकारने, राज्यव्यवस्थेने , कोणत्याही देशांत कितीही पीठ दळलं तरी काहीही होणार नाही. कळीकाळ. ..सध्या इतर देशांत आंदोलनं, सरकारविरोधी उठाव होत आहेत याचं कारण काय तर रोजगार संपत चालले आहेत.

.ती एसटीतील आई आपल्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवते एवढंच होईल.

यांत्रिकीकरण वाढत आहे म्हणजे नोकरऱ्यांमध्ये ज्ञानी कर्मचाऱ्यांची गरज संपली आहे>>>>

उलट आहे ना??? डोके न वापरता करायची कामेच यंत्र करु शकणार आहे. जिथे डोके वापरायचे तिथे माणुसच लागणार.

रोबो/यंत्र हृदयाचे ऑपरेशन करेल पण एकदा हृदय उघडले की आत जे असणार ते १०० % कुठलेही मशिन ह्रुदय उघडायच्या आधी बघु शकणार नाही. इमेजिंग मशिन्सना ते एक लिमिटेशन राहणारच. त्यामुळे उघडलेल्या हृदयात कसे काय कुठे करायचे हे ज्ञानी डॉक्टर मशिनला सांगेल तेव्हा मशिन सांगितल्याप्रमाणे शस्त्रक्रिया करेल. तो ज्ञानी डॉक्टर त्या क्षणी १००० किमी दुर असला तरी चालेल पण त्याने मशिनला सांगावे लागणार ना.

सुरेख परिचय करून दिला आहे संप्रति! Happy
दोन मनांचे संवाद, आशयाचा शांत स्वर, एकटं वाटण्याचा आफ्टर इफेक्ट - ही निरीक्षणे विशेष आवडली.

एस आर डी, तुम्ही प्रत्येक पान वाचल्यावर त्या पानाचे जे काही एक दोन रुपये होत असतील (पुस्तकाची किंमत भागीले पृष्ठ्संख्या) ते वसूल झाले का नाही ते लिहून ठेवता का?

Srd जियो!
तुमच्या पोस्टशी सहमत.
मला नेहमी निळू फुलेंची आठवण येते. "मास्तर..." इत्यादि.
@साधना
तुम्ही जगाच्या फार पाठीमागे आहात.
गृहपाठ म्हणून ढीगभर पुस्तकांची यादी देऊ शकेन.
तूर्तास सँपल म्हणून मिळाले तर हे पुस्तक वाचा
THE SINGULARITY IS NEAR by Ray Kurzweil.

तुम्ही जगाच्या फार पाठीमागे आहात.>>

अरे देवा.. म्हणजे ज्ञानी हवा हा माझा भ्रम आहे. देवही आता वाचवणार नाही म्हणजे Happy Happy असुदे. जे जगाचे होईल ते आपले होईल. उगी चिंता बाळगु नये.

रे कुर्झवेल ज्ञानी असेल पण त्याला वाचुन उगीच मनःशांती नको घालवायला.

on a serious note, the singularity is nearer ची काही पाने दिसली. इन्टरेस्टिण्ग वाटले, तेवढी वाचते आधी.

नुकत्याच निधन पावलेल्या अभिनेत्री संध्या यांच्या विकीपेज वर या गुगलबुकची लिंक दिसली.
Gender , Culture and Performance - Marathi Theater and Cinema before Independece . -Meera Kosambi

माझ्या जवळ असून न वाचलेल्या पुस्तकांची यादी वाचलेल्या पुस्तकांच्या यादीपेक्षा मोठी होऊ घातली आहे. त्यात भर. तोवर इतर कोणाला वाचावंसं वाटलं तर म्हणून इथे लिहून ठेवतो.

>> नेमाडेपंथी <<

हेमाडपंत / हेमाद्रीपंत नावाच्या एका वजीराने सगळीकडे ज्या स्थापत्याची मंदिरे बांधली त्या त्या स्थापत्याला हेमाडपंती मंदिरे असे म्हणतात. बेसिकली दगडे लॉक करून एकावर एक रचायची अशी ती स्थापत्यशैली होती. (अशी माहिती मला आहे पण अलीकडे हेही हिस्टॉरिकली बरोबर नाही असे लोक म्हणत आहेत)
त्या मंदिराच्या स्थापत्यशैलीचा एक अपभ्रंश 'हेमाडपंथी' असा केला जातो. त्यावरून नेमाडपंथी असा श्लेष केला जातो. त्यामुळे नेमाडपंथी, नेमाडेपंथी नाही.

>> बाकी, चांगल्या पुस्तकांमध्ये, ते वाचून संपवल्यावर वाचणाऱ्याला "एकटं वाटण्याचा, प्रचंड एकटं वाटण्याचा", जो गुणधर्म असतो, तोही एक आहेच यात म्हणजे. <<

हा चांगल्या पुस्तकांचा गुणधर्म ? अलीकडे एक्सिस्टेंशियल चिंतन असणाऱ्या किंवा तसा फील देणाऱ्या साहित्याला वैश्विक आणि दर्जेदार म्हणायची समीक्षकी फॅशन आली आहे. म्हणजे मध्यंतरी सगळ्यांनाच किमान (काठेवाडीचा eg ) काफका वगैरे हौस लागलेली होती. ती मराठीतून अजूनही गेली नाही असे वाटते.

>> एरव्ही वाद-प्रतिवाद एवढ्या संतुलितपणे करता येऊ शकतात << वास्तविक आयुष्यात असे वाद विवाद होत नसतात. अगदी मनात देखील असे होत नाही. कल्पनेत ठीक आहे. मग ही कादंबरी वास्तववादी म्हणू नये आणि हा तिचा गुण देखील असू नये. चर्चानाट्य कितीही संतुलित केले तरी ते चर्चानाट्यच असते. मला तर आता अशी चर्चानाट्ये भयानक बोअरिंग होऊन जातात.

मी आत्ताच हा अक्षरनामावरचा अंश वाचला. https://www.aksharnama.com/client/trending_detail/7538

हे वाचून ही कादंबरी वाचण्याची अजिबात उत्सुकता निर्माण झाली नाही. शैलीने देखील मी बांधला गेलो नाही. कॅरॅक्टरने दूरच. 'रानबा' लोल. सॉरी.

पण एक मात्र वाटले की यांना एक चांगला संपादक मिळायला हवा होता. मला त्यांनी ड्राफ्ट पाठवला असता तर मी आनंदाने संपादन केले असते. (फुकट)

टवणे सर , पुस्तकात प्रसंग आणि घटना वाढवून पण विविधता टाळून सांगत असतील तर फार पक्कड घेणार नाही आणि पाने वाढवून उपयोग नसतो हे माझे मत. प्रतीच कमी छापल्या तर किंमत वाढवावी लागते. वाचनालये विकत घेतील तेवढ्या आणि शे दोनशे अधिक छापल्या तर प्रकाशक मोकळा होईल एकाच आवृत्तीत हे त्याचे गणित असावे. हे झाले प्रकाशकांच्या कोनातून पण वाचकांच्या दृष्टीने वेगळे ठरेल. पुस्तके विकत घ्या सांगणे प्रचार होतो पण सहाशे रुपयांचे अगोदरच्या एखाद्या गाजलेल्या पुस्तकासारखे वाटणारे ( इथे कोसला) पुस्तक इतकी किंमत मोजून घरी ठेवेल का हा विचार येतो. वाचनालये जी चांगली चालतात आणि त्यांच्याकडे निधी आहे ते घेतीलच.

वर्तमानपत्र रोज विकत घेण्याची निकड आता टीवी चानेल्समुळे राहिली नाही तरी घेतच होतो पण ती करोना निर्बंधात न मिळाल्यामुळे पटले. मग तीच रक्कम पुस्तके विकत घेण्यात गुंतवली तर सहा सात पुस्तके वर्षात सहज येतील. पण किंमती वाजवी हव्यात.

अलीकडे एक्सिस्टेंशियल चिंतन असणाऱ्या किंवा तसा फील देणाऱ्या साहित्याला वैश्विक आणि दर्जेदार म्हणायची समीक्षकी फॅशन आली आहे. म्हणजे मध्यंतरी सगळ्यांनाच किमान (काठेवाडीचा eg ) काफका वगैरे हौस लागलेली होती. ती मराठीतून अजूनही गेली नाही असे वाटते.
>>>> Lol रॉय .
मलाही आवडतं हे. पण त्यात दोन प्रकारचे लोक आहेत, जे खरेच क्राईसेस मधून जात आहेत आणि अशा प्रकारचे वाचन- लेखन हे त्यांचे कोपिंग मेकॅनिझम आहे. दुसरे जे अनुभवातून जात नाहीत फक्त सामान्य कुतूहल आहे. मग अभिरुची संपन्नता दाखवण्यासाठी आवड असल्याचे- समजल्याचे दाखवतात, त्यांच्यापर्यंत ते तसे पोचतच नाही अर्थात. तिसराही एक गट आहे, जो अनुभव नाही व आवडही नाही म्हणून ह्याला पूर्णपणे अनावश्यक समजून टिका करणारा. ज्यांना अशा प्रकारचे' सर्वायव्हल'च माहिती नाही ते अशा मॅन्युअलला अनावश्यकच समजतील. पण पहिल्या गटात येणारे अत्यंत- अत्यंत कमी आहेत. त्यामुळे मला तुमचा विनोद कळाला आणि पोच द्यावीशी वाटली. Happy

हल्लीच एका मीम मधे - How to transform minor interactions into existential crisis! असं शीर्षक असलेलं पुस्तक पाहिलं होतं. तेव्हाही हसू आले होते. Happy हल्ली फॅशन आहेच, कारण बहुतांश लोकांचे 'फेक'च वाटते.

वास्तविक आयुष्यात असे वाद विवाद होत नसतात. अगदी मनात देखील असे होत नाही.
>>>>>
मनात तर किती वाद/ अर्जुनविषाद योग होतात गणतीच नाही. सोपं उदाहरण - इथले सगळे लेखन आपण आधी मनात स्वसंवाद - आंतरिक वाद होऊनच व्यक्त केलेलं असतं. अगदी वरवर साधं असणारं सुद्धा, सखोल आणि अविचारीपणे लिहिलेले सुद्धा. आपण ती स्टेप स्किप करून लिहूच शकत नाही, फक्त लक्षात येत नाही कारण आपल्या स्वतःच्या cognitive भागाला 'अवेअरनेस' पासून स्वतंत्रपणे पाहता येत नाही. आपल्याला 'ते' म्हणजेच 'आपण' वाटत असतो. दोन्ही एकच वाटते बरेचदा.

सारी खुदाई एक तरफ और रॉय का पर्स्पेक्टिव्ह दुसरी तरफ - असं अनेक वेळा पाहिलं आहे. पण समुहापेक्षा वेगळा पर्स्पेक्टिव्ह म्हणून आवर्जून वाचते अधूनमधून, ही फक्त पोच आहे. Keep being yourself! Happy वेगळं मत मांडण्यापेक्षा मला तुमच्याशी interact करायचं होतं म्हणूनच फक्त लिहिलेय.

existential crisis is reality. जवळ जवळ 7०% लोक ह्यातून जातात आणि तावून सुलाखून बाहेर पडतात. हा प्रकार बरेच काही शिकवून जातो. गौतम बुद्ध ह्याच क्रायसिस मधून गेला होता. त्यामुळे ह्याबद्दल लिहिणे इत्यादिला मी फॅशन वगैरे म्हणणार नाही. ह्याबद्दल लिखाण होत राहणार त्याबद्दल वाद नाही. त्याला कमी लेखणे वा त्याची टर उडविणे योग्य नाही. I think it is part of Being Human.
माझी अपेक्षा एव्हढीच असते की कुठलाही अभिनिवेश न बाळगता तटस्थपणे त्याबद्दल लिहिता यायला पाहिजे.

Don't tell, show.

"Truly, you are not alone. Because we live in a polite culture, nobody talks about crises, depression, or life funks. But it’s something we all experience. These rough patches are a part of being human. And yes, they suck. But it will end in the future. At some point, you might even look back on this period and appreciate some of the things you learned about yourself.
If your crisis relates to a sense of purpose, you might appreciate this on finding your calling."

अस्मिता,

मला म्हणायचं होतं की मनात 'संतुलित' वादविवाद होत नाहीत.

आपल्या परंपरेत मन एक्चुअली माइक्रोलेवल वर एकावेळेस एकच 'विचार' करत असते असे सांगीतिले आहे. म्हणजे मनाचे जे ग्राफिक्स कार्ड किंवा प्रोसेसर आहे तो एकाच कोअर चा आहे. तरीही ही सगळी प्रक्रिया इतकी फास्ट होत असते की मन एकाच वेळेस अनेक गोष्टी करत आहे असा भास निर्माण होतो.

म्हणजे मन हे एक advanced सिम्युलेशन आहे. परंतु आपल्या ऋषींनी मनात आणि बुद्धीत बराच घोळ घातला आहे. तर मन हे अत्यंत चंचल सिम्युलेशन असून मन संतुलित वादविवाद स्वतःशी देखील का होईना करत नसते. म्हणजे मनात एकाच वेळेस नानाविध विचार चालेलेले असतात त्यात मन पसायदान सुद्धा मागत असते आणि त्याचबरोबर कलीगवर कुरघोडी कशी करावी याचे इंट्रिकेट प्लॅन्स देखील आखत असते.

संतुलित विचार स्व-संवादात शक्य नाही कारण असा दोन्ही बाजूचा विचार करणरे मन शेवटी एकच मेंदू मधे असून आपली सगळी डार्क सिक्रेट्स त्याला माहीत असतात तेव्हा दोन्ही मने अंतिमत: आपला फायदा कसा होईल असाच निश्चय किंवा सिंथेसिस करतात. संतुलित वाद प्रतिवाद करणारे लोक बोगस असतात.

वरील प्रतिसादात मन आणि बुद्धी इंटरचेंजेबली वापरले आहे कारण आपल्यात ते डिस्टिंक्शन हे अतिशय आध्यात्मिक पातळीवर करून ठेवले आहे त्याला सध्या फार काही अर्थ नाही.

संतुलित वाद प्रतिवाद करणारे लोक बोगस असतात.
>>> Lol Got it. पोस्ट आवडली व कळाली. मी अशा पद्धतीने (टेक्निकली ?) विचार केला नव्हता लिहिताना. 'कळीकाळ' मी वाचलं नाहीये पण सहज सुचलं ते लिहून टाकलं, स्ट्रेट फॉरवर्डली घेऊन पोचपावती दिल्याबद्दल आभार.

>> माझी अपेक्षा एव्हढीच असते की कुठलाही अभिनिवेश न बाळगता तटस्थपणे त्याबद्दल लिहिता यायला पाहिजे. <<

केशवकूल, असे (बोरिन्ग) लिखाण मी कधीही वाचू शकणार नाही. मला लेखकाचा अभिनिवेशच पाहिजे आहे. तटस्थपणे लिहलेले वाचायचे असेल तर रोजचे वर्तमानपत्र वाचून समाधान व्हायला पाहिजे. लेखकाचा अभिनिवेशच लेखनाला इंट्रेस्टिंग बनवतो. तटस्थ लोक लिहण्याच्या तरी का भानगडीत पडतील? त्यांना प्रेरणाच नसते लिहिण्याची. ड्राइव आणि खाज पाहिजे लेखकाला.

>> स्ट्रेट फॉरवर्डली घेऊन पोचपावती दिल्याबद्दल आभार. <<

मी तुझ्या लेखनाचा फॅन आहे अस्मिता. एक फॅन म्हणून मी ते नेहमी पॉझिटिवलीच घेतो. शिवाय खरेतर ते तसेच दर्जेदार प्रतिसाद असतात. मी मायबोलीवर मोजक्या लोकांचे प्रतिसाद वाचायलाच येतो. त्यात तू आहेस. संप्रति हा एक आय डी सुद्धा यात येतो खरेतर. त्याच्यामुळे खूप नवी पुस्तके कळतात. त्याच्या वाचनाला एक निष्ठा आहे. त्याच्या प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद द्यावेत का असेही मला अधून मधून वाटते कारण त्याला उचकवता आले तर अजून लिहील तरी असे वाटते.

रोजचे वर्तमानपत्र वाचून समाधान व्हायला पाहिजे
>>>> अलीकडे लेखकांपेक्षा वार्ताहरांचाच अभिनिवेश जास्त असतो. तटस्थ लिहिणारे वार्ताहर, संपादक कुठे सापडले तर सांगा. पण एक पटले की काहीतरी खाज असल्याशिवाय लिहिता येणे कठीण आहे.

रॉय सर
अभिनिवेश पाहिजे असेल तर लेक्चर ऐकायची तयारी ठेवा,

>> रोजचे वर्तमानपत्र वाचून समाधान व्हायला पाहिजे <<.

हा हा. (ही ही) खरे एक्सिस्टेंशियल साहित्य कारण 'ही' काय चीज आहे ते शेवटपर्यंत कळत नाही.

लग्नाच्या पहिल्या रात्री ( insert celebrity name )ची 'ही' पाहून त्याने 'हे' केले. (इथे लिंगभाव बदलून सुद्धा 'हे'च होईल)

पुढे ही म्हणजे मेहंदी आणि हे म्हणजे सेल्फी वगैरे असते.

Pages