Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एका फेसबुक ग्रूपमधून स्तुती न
एका फेसबुक ग्रूपमधून स्तुती न करता टीका करणाऱ्यांना नारळ देण्याची प्रथा आहे. बागकामाचा ग्रूप असल्याने नारळच देतात. हँडशेक वगैरे नसतो.
तांबे नसतील पण सोनारांचे ब्लॉग फार वाचले जातात. अध्यात्म हो. अनंत आहे ते.
राजन खान यांचं वाचलंय बरंच
राजन खान यांचं वाचलंय बरंच दिवाळी अंकात वगैरे.
एक कादंबरी त्यांची सत्य की विपर्यास ते माहीती नाही. एक आई हयात नसलेला मुलगा आजोळी बहुतेक यु पित असतो आणि शेवटी त्याला जबरदस्ती त्याच्या बाबांकडे पुण्यात आणलं जातं त्याच्या मनाविरुद्ध, तेव्हा तो टीनेजर असावा. बहुतेक वडील केस जिंकतात आणि ताबा मिळवतात. अनेक वर्ष झाली वाचून त्यामुळे तपशीलात नाही आठवत . त्याने आपल्या नातेवाईकांबद्दल लिहिलेलं मात्र फार धक्कादायक वाटलेलं, बरीच लफडी कुलंगडी. नाव आठवत नाहीये. मागेही इथेच कुठेतरी उल्लेख केलेला मी. एक कथासंग्रहही वाचलेला असं आठवतंय. कथा आत्तातरी आठवत नाहीयेत. काही त्यांचं लिहिलेलं आवडलं, काही नाही.
नेमाडे यांची कोसला मला अजिबात न आवडलेली आणि तरीही मी पूर्ण वाचलेली कादंबरी.
शोभा डे यांची लेखनशैली सुंदर आहे. वाचकाला गुंगवून ठेवते. त्यांचे आत्मचरित्र आधी वाचलंय. >>> यातलं आत्मचरित्र वाचलंय, आवडलं होतं.
बाकी इथे उल्लेख केलेले बरेच लेखक माहीती नाहीयेत, वाचलं नाहीये काही. हल्ली वाचन फार मागे पडलंय.
पिवर वाचक हे भारी आहे. पण तसे
पिवर वाचक हे भारी आहे. पण तसे इतर भाषिकांत तरी असते का? वाचनाची आवड व लिहायची किमान खुमखुमी हे पॅकेज एकत्रच येत असावे.
पूर्वी लायब्रर्यांमधून सरधोपट कादंबर्या आणून वाचणारे असत. त्यांनाही आपण प्रेमकथा वगैरे लिहावी अशी खुमखुमी येत असावी का? माबोवर कधीकधी बालवाडी लेव्हलच्या प्रेमकथा येतात त्या इतर कादंबर्या वाचून प्रेरणा घेणार्यांपेक्षा नव्याने प्रेमात पडलेल्यांकडून येत असाव्यात असे त्या वाचून वाटते. त्यात साहित्याचा अंश कमी आणि प्रेमाच्या भावनेचा भर जास्त असतो. व्यक्त करण्याचा प्रयत्न करूनही साहित्यिक मर्यादांमुळे नीट व्यक्त न करता आल्याने अव्यक्त प्रेम म्हणावे लागेल त्याला
एकच व्यक्ती एका लेखनप्रकाराची खुमखुमी असलेला वाचक तर दुसर्या लेखनप्रकाराबाबत पिवर वाचक असेही असू शकेल. म्हणजे माझे उदाहरण घेतो - मला राजकीय, सामजिक ई विषयांवर लिहायची खुमखुमी असते, पण "कथा व कविता" याबद्दल मी पिवर वाचक आहे. डोक्यात एखादे कथाबीज आले तरी ते वाढवता येत नाही हे माहीत आहे त्यामुळे खुमखुमीही अजिबात नाही. असंख्य कथा व काही कविता वाचूनही स्वतः कधी लिहावेसे वाटलेले नाही. कथा वाचायला मात्र आवडतात. चांगल्या कविताही.
>>> व्यक्त करण्याचा प्रयत्न
>>> व्यक्त करण्याचा प्रयत्न करूनही साहित्यिक मर्यादांमुळे नीट व्यक्त न करता आल्याने अव्यक्त प्रेम म्हणावे लागेल त्याला
किंवा कधीकधी अतिव्यक्तही.
हो
हो
माबोवर कधीकधी बालवाडी
माबोवर कधीकधी बालवाडी लेव्हलच्या प्रेमकथा येतात >> आं! माबोवर
कधीकधीबालवाडी लेव्हलच्याप्रेमकथा येतातअसे लिहिले तर ते स्टॅटिस्टिकली बरोबर होईल ना
अंजू मी पण तीच कादंबरी
अंजू मी पण तीच कादंबरी पहिल्यांदा वाचली. नंतर इतर साहित्य वाचले.
फारेण्ड,
फारेण्ड,
तुमचे म्हणणे पटले.
मी युरोपात राहतो मला इथे लोक वाचताना दिसतात. म्हणजे जागोजागी पुस्तकांची खुली कपाटे असतात, लोक एकमेकांना पुस्तकं देतात. ड्रायव्हर किंवा शाळकरी मुलं, काही ना काही वाचत असतात. मेट्रो मधे हमखास पुस्तके वाचत बसणारी मंडळी दिसतात. बहुतेक सर्व घरांमध्ये लहान का होईना बुकशेल्फ असते. काहीच नाही म्हंटले तरी मांगा तरी वाचतातच.
साधे गणित मांडायचे तर पब्लिक लायब्ररीची मेम्बरशिप दर लोकसंख्येमागे किती आहे ते बघावे. पण या सगळ्यांनाच लिहावेच असे वाटत नाही. खरेतर वाटत असेलही. पण खुमखुमी नसते. शिवाय ते लेखकांचे फॅन वगैरे पण असतात. सहलींना जाताना देखील ती पुस्तके घेऊन जातात. आपल्या इथे सहल म्हणजे देव देव करायला निघणे इथून सुरुवात आहे.
म्हणजे मला म्हणायचे आहे की एकूण आपण प्रकाशित व्हावे अशी महत्त्वाकांक्षा नसलले वाचक जास्त आहेत आपल्या इथे तसे नाही. आणि ते वाचन वयानुसार वाढवत देखील नेतात. मेट्रो मधे मी एक म्हातारी आज्जी परवा AI म्हणजे काय असे डमी लोकांसाठी डायजेस्ट स्टाइलचे पुस्तक वाचताना पहिले. या आज्जीना मी शक्यतो टिपिकल नॉव्हेल वाचतानाच बघत असतो. म्हणजे आज्जी आजही वाचत आहे आणि तिला आजच्या जगाविषयी देखील उत्सुकता आहे. आपल्या इथे मात्र आजचा वाचक हा उद्याचा लेखक तरी असतो किंवा उच्चमध्यमवर्गीय तरी असतो. बस मधे कुणी सामान्य व्यक्ती पुस्तक वाचत शांत बसले आहे असे मला कधीच दिसले नाही. दिसतात त्यांचे अपवाद लगेच सेलिब्रेट होतात. अगदी शिक्षक देखील वाचन करत नाहीत.
गेले ३-४ दिवस या धाग्यावरच्या
गेले ३-४ दिवस या धाग्यावरच्या पोस्टींनी बहार आणली ❤
एवढेच सांगण्यासाठी हा प्रतिसाद.
हा बघा पिवर वाचक असा असतो :
हा बघा पिवर वाचक असा असतो :
मीम
फा
फक्त लिहिण्यासाठी वाचू पाहू नये खरेतर. पण मी केलेलं आहे तेही, कारण लेखनाची पॅशन ह्या दोन्ही गोष्टींपेक्षा जास्त होती. तरीही दरवेळी तसं स्वतःला सांगितले व इथेही जे असेल ते लिहून टाकले आहे. मला वाटतं स्वतःशी ऑनेस्ट आणि सेल्फ अवेअर राहिलो तर आपण कृत्रिम होण्याची भीती राहत नाही. मला लिहायला अतिशय आवडतं, तेथेच मी पुन्हा- पुन्हा स्वतःला भेटू शकते. अगदी श्वास घेण्याइतकं नैसर्गिक आहे माझ्यासाठी.
माझेमन, मीही काफ्काचे मेटामॉर्फसिस अर्धवट सोडून दिले आहे, त्या किड्याचा सोक्षमोक्ष लावा एकदाचा- असं वाटलं होतं.
केकू, रात गयी बात गयी. त्या 'कालबाह्य' शब्दाचा 'मेट्रो' सारखा PTSD येऊ देऊ नका. मी तुम्ही सुचवलेली पुस्तकेही वाचण्याचा प्रयत्न करेन. Escape artist Houdini सारखं राहायचं, अडकायचे नाही.
चर्चा वाचतेय.
माझं वाचन जवळजवळ शून्य आहे. एकेकाळी राक्षस होते पण असो. आता त्या घाणेरड्या अक्षराच्या माणसाच्या जोक सारखे 'मला लिहिता येते पण वाचता येत नाही' - असं म्हणायची वेळ येणार आहे.
हे ही चॉकलेट पोचले. १००%
हे ही चॉकलेट पोचले. १००% डार्क.थोडे कडू थोडे गोड.
रॉय - समजला पॉइंट.
रॉय - समजला पॉइंट.
पिवर वाचक फोटो भारी आहे
चपखल.
गेले ३-४ दिवस या धाग्यावरच्या पोस्टींनी बहार आणली >>> सिरीयसली!
फक्त लिहिण्यासाठी वाचू पाहू
फक्त लिहिण्यासाठी वाचू पाहू नये खरेतर. >> काहीही!
उद्या म्हणाल फोमोसाठी सिनेमे आणि शोज बघू नये. प्युअर का इमप्युअर हु केअर्स! 'इट इज व्हॉट इट इज' शिवाय जगात काही सत्य नाही.
'फक्त' म्हटलं आहे ओ. फक्त
'फक्त' म्हटलं आहे ओ. फक्त तेवढ्यासाठी, पाहण्यासाठी सुद्धा पाहाता यायला हवे व वाचण्यासाठी सुद्धा वाचता यायला हवे. मला याबद्दल क्लॅरिटी असणं म्हणजे हे माझं 'इट इज व्हॉट इट इज'च आहे.
ते जाऊ दे, इतका उशिरा का आलास इथे. फोमो आला नाही की काय
इंग्रजी स्पॅनिश जर्मन वगैरे
इंग्रजी स्पॅनिश जर्मन वगैरे भाषांतले वाचक व मराठी वाचक यांतली तुलना वगैरे चावून चोथा झालेले विषय आहेत. इथे कॅनडामध्ये मागल्या आठवड्यात लिटरेचर फेस्ट (लिटफेस्ट) होता. त्यात हिंदीमधले अनेक साहित्यिक होते, बंगाली अनेक होते, मल्याळम सेक्शन पण होता. या साहित्यिकांच्या मुलाखती वगैरे. मराठी कोणीही नव्हते व इतर अनेक भारतीय भाषांतलेही.
२०-३० वर्षांपुर्वी पुस्तकांची जी किंमत होती तीच आज आहे. तेव्हा ३०० रुपयांचे पुस्तक खूप महाग वाटायचे. बाहेर जेवले तर उडप्याच्या हाटेलात ४०-५० रुपयात चार लोक खाऊ शकत होते. आज मध्यमवर्ग सहज १००० रुपयांचे रेस्टॉरंट आउटिंग करतो. सिनेमाला गेले तर १००० रुपये खर्चतो. पण ३००-४०० रुपयाचे पुस्तक जे आयुष्यभर राहणार आहे, ते घ्यायला कचरतो. वा पुस्तक घ्यायचे हे ध्यानीमनीही नसते. एव्हड्या प्रचंड लोकसंख्येच्या मराठी समाजात पुस्तकाची १०००ची आवृत्ती पण खपत नाही - आज नाही, ३०-४० वर्षांपुर्वीसुद्धा. मी कॅनडात जिथे राहतो त्या भागात (३ सब-अर्ब मिळून) १००० मराठी कुटुंबे असतील असा अंदाज आहे. गणेशोत्सव , दिवाळी वगैरे कार्यक्रमांना अनेक दिसतात. मी फुकट लायब्री चालवतो. त्यात अनेक लोकप्रिय पुस्तके मुद्दाम ठेवली आहेत. त्या लायब्रीचा उप भोग कोणीही घेत नाही. इथे स्थायिक असलेल्यांचे आई वडिल येतात त्यांचा वेळ जात नाही म्हणून त्यांच्यासाठी पुस्तके नेतात. त्या आई वडिलांनीही फारसे कधी वाचलेले नसते.
इतक्या काळात केवळ दोन सभासदांनी नेमाने पुस्तके नेली , वाचली. बाकी सगळे "स्वामी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली, पार्टनर, आपण सारे अर्जुन" हीच पुस्तके नेतात - कारण हीच थोडीफार पुस्तके कानावर पडलेली असतात.
ही गत मराठी माध्यमात शिकलेल्या मध्यमार्गीय सुशिक्षीत - बहुतकरुन शहरातून आलेल्या वर्गाची. कसली झाट्याची वाचन संस्कृती. त्यात लेखक तरी किती होणार.
तेव्हा लेखन वाचन वगैरे एलिटिस्ट चोचले आहेत की काय असे वाटते. तसेही आता अजून अटेन्शन स्पॅन कमी झालेल्या मोबाईल इंटरनेट च्या काळात त्याला काही वैश्विक अर्थ आहे का, सामाजिक फायदा आहे का असेही वाटते.
रॉय यांच्या पीवर वाचकांच्या
रॉय यांच्या पीवर वाचकांच्या व्याख्येत “भेळेचा कागदही वाचणारे* “ येतील का ?
तांबेकाकांना फॉलोवर्स आणि वाचक यातील फरक समजला की ते तुसडेपणा कमी करतील
या लेस्टेस्ट पोस्टी बघून लायब्ररी मेम्बरशिप घेतली ch पाहिजे हे लक्षात आल. बरेच दिवसात काही वाचले नाहीये
* आपण किती वाचनप्रेमी आहोत हे दाखवायला हल्ली मराठी आंजावरील लेखनात हा वाक्प्रचार वापरतात
https://www.youtube.com/
https://www.youtube.com/@menakaclassics
इथे गेल्या ६२ वर्षातील, मेनका, माहेर व जत्रा या अंकातील, कथा ऐकता येतील.
३० लाखांची रॉयल्टी.
३० लाखांची रॉयल्टी.
गेल्या रविवारी महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला लेख
https://maharashtratimes.com/editorial/poet-vinod-kumar-shukla-received-...
टवणेसर, पोचले.
टवणेसर, पोचले.
मी इथे म्हणजे टेक्सासमधे मूव्ह होताना माझ्याकडची बरीच मराठी पुस्तके कॅलगरीतल्या पब्लिक लायब्ररीत डोनेट केली होती. कारण बऱ्याच जणांना सोयीचे होईल व येणाऱ्या पालकांना वाचायला मिळेल. पण तेथेही असेच झाले असेल मग !
वाचन ठप्प झालेले आहे. संपूर्ण
वाचन ठप्प झालेले आहे. संपूर्ण वेळ 'पॉडकास्टस व यु ट्युबवरील 'स्युडो सायन्स' कचर्यात जातो आहे. क्वचित 'लेट देम' - https://www.youtube.com/watch?v=cgvxxurdbxg सारखा छान, प्रॅक्टिकल व्हिडिओ सापडतो पण तेही बार्न्स & नोबल्स मधुन पुस्तक चाळून आल्यावर, शोधला तर. वारंवार बार्न्स & नोबल्स मध्ये चक्कर टाकायला हवी. 'अंकल टॉम्स केबिन' हिंदीत वाचले. मग पुस्तक घेतले पण वाचायचा मूडच होत नाही. शशी भागवत पुन्हा वाचायचे आहेत. मूड होत नाही. कोणतेही आवडीचे काम सुरु केले की गिल्टी फीलिंग येते असे - अभ्यास करायला हवा. पुढे नोकरी मिळणार नाही. मग? 'मग' हे प्रश्नचिन्ह आ वासुन उभे रहाते. टाइम मॅनेजमेन्ट टेक्निक्स वापरले पाहीजेत. वेळ फार कचर्यात जातो आहे
लायब्ररी ही भूतकाळातील गोष्ट
लायब्ररी ही भूतकाळातील गोष्ट झाली आहे. Consume करायला content नसण्याच्या काळातही पुस्तक वाचणारे मर्यादित लोकच होते. आता infinite content तोही ऑनलाइन, फुकट, विविध माध्यमातून उपलब्ध असताना तंगडतोड करत लायब्ररीत कोण जाणार! वर भारतातले ट्रॅफिक! वाचायची हौस असेल ते kindle unlimited चे subscription घेतात, त्याहून जास्त हौस असेल ते सरळ विकत घेतात.
बाकी सगळे "स्वामी, मृत्युंजय,
बाकी सगळे "स्वामी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली, पार्टनर, आपण सारे अर्जुन" हीच पुस्तके नेतात - कारण हीच थोडीफार पुस्तके कानावर पडलेली असतात. >>>
यात थोडा आपल्या माहितीच्या परिघाबाहेर बघण्याची अजिबात उत्सुकता नसणे हा भाग आहे. माझ्याकडे आता बरीच पुस्तके जमा झाली आहेत अनेक विविध विषयांवरची. त्यात नॉन-फिक्शन जास्त आहेत. लोक (भारतातून आलेले सिनीयर सिटिझन्स जास्त, पण माझ्या पिढीतीलही बरेच आहेत नेणारे) भरभरून घेऊन जातात वाचायला. काही लोक अजूनही तीच ती स्वामी मृत्युंजय टाइप शोधतात - पण ती मुळात माझ्याकडेच नाहीत. पण इतर पुस्तके एकदा समोर दिसली की मग कुतूहलाने का होईना पण नेतात - नंतर आवडल्याचे सांगतात. त्या पूर्वीच्या टिपिकल ममव पुस्तकांबाहेर एक मोठा खजिना मराठीतही आहे याची त्यांना कल्पना नाही. या पुस्तकांची ओळख करून दिली तर ते वाचतील. वाचतात. कदाचित विकतही घेतील.
या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख जेथे आहेत (अक्षरनामा ई) तेथे हे लोक जात नाहीत. त्यामुळे त्यांना ही माहीतच नाहीत. वाचनाची हौस असलेला माणूस स्वतःहून शोध घेतो तसे हे करत नाहीत हे खरे.
अमेरिकेत माझ्या ओळखीत मराठी पुस्तके वाचणारे बरेच आहेत. पण त्यात स्वतःहून नवीन, नवीन विषयांवरच्या पुस्तकांचा शोध घेउन वाचणारे कमीच. मात्र माझ्या नॉन-मराठी मित्रांमधे त्यांच्या मातृभाषेतील पुस्तके वाचणारे अगदी नगण्य आहेत. हे माझे अॅनेक्डोटल निरीक्षण आहे, ते ही अमेरिकेत बहुतांश सॉफ्टवेअर मधे असलेल्या देशी लोकांबद्दल. मात्र हा डेटा सेट ममव पुरता नाही. इतरही तितकेच आहेत.
Pages