Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं अजून एक ऐका म्हणून बळजबरी
बरं अजून एक ऐका म्हणून
बळजबरीआग्रह. ऋषभ रिखिराम शर्मा नावाचा सतारवादक आहे, अतिशय अद्भुत वाजवतो हा. मी तर प्रेमात पडले आहे. दिसतोही राजकुमारासारखा, लांबसडक, गोरीपान बोटं सतारीच्या तारेवरून फिरवतो. बोटात सुंदर अंगठ्या, मळहातावर सुंदर मेंदी काढलेली असते. पंडित रविशंकर यांच्या गंडा बांधलेल्या शेवटच्या शिष्यांपैकी आहे. लहानपणापासूनचे व्हिडिओ आहेत. अगदी दैवी आहे याच्या वादनात काहीतरी.हा काशीच्या मणकर्णिका घाटावरचा व्हिडिओ.
The burning ghat
हा मेंटल हेल्थ अवेअरनेससाठीचा चाणक्य
हा तुमही देखोना
अस्मिता, बघते तीनही गाणी आज.
अस्मिता, बघते तीनही गाणी आज.
पोस्ट आवडली.
अस्मिताला पूर्ण अनुमोदन.
अस्मिताला पूर्ण अनुमोदन.
मलाही ऋषभ शर्माचं सतारवादन आवडतं. त्याला टॅटू काढायचे होते हातावर पण हाताला अपाय नको कारण सतार वाजवायची आहे म्हणून मेंदी काढतो तो.
चेरी चेरी लेडी - https:/
चेरी चेरी लेडी - https://www.youtube.com/watch?v=lrIKt5uDWZo&list=RDlrIKt5uDWZo&start_rad...
.
Cheri, cheri lady
Like there's no tomorrow
Take my heart, don't lose it
Listen to your heart
>>>>सध्या आठ दिवस हे गाणं
>>>>सध्या आठ दिवस हे गाणं डोक्यात ........पहीलीच सिरीयल तरी काय काम केलंय, मस्तच.
जगण्याच्या समईत तुझ्या अभंगांच्या वाती
आहाहा काय सुंदर गाणे आहे गं अन्जु. अमेझिंग.
एक जुनी आरती सध्या गुणगुणतेय
एक जुनी आरती सध्या गुणगुणतेय जी माझ्या आईने मला शिकवली होती.
अंबाबाई तारी तारी आले संकट दूर करी,
आले संकट दूर करी.
सोबत बाबाही आठवतात आरती म्हणणारे, त्यांनीही वेगळ्या आरत्या शिकवल्या होत्या, ज्या माहेरच्या कोकणात फेमस आहेत.
मंगलदायक सुखकर सकला, शंकरतनया भवभय हरणा.
अहंभाव मी जाळूनी आधी, आरती करीतो गजवदना.
(ही आरती मध्ये भावाने फॅमिली grp वर दिलेली, तेव्हा माझ्या चुलतभावाने एक आठवण सांगितली, तो सिंगापुरला असतो, २० वर्षांपूर्वी बाबांकडून घेऊन ती त्याने महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवात गायली होती तेव्हा त्याला, तू लिहिली आहेस का विचारलेले, तेव्हा तो म्हणाला नाही, ही आरती आमची हेरिटेज आरती आहे.)
अजून एक आहे सत्यनारायणाची.
जय देवा नारायणा, नमो ऋषिकेशी, नमो ऋषिकेशी.
पूजा करितो सत्यदेवाशी, हृदयी ठेऊनिया भावासी,
पंचारती करितो, पूर्ण तोष हो मजसी, तोष हो मजसी.
अशा सणासुदीच्या दिवसांत ह्या आरत्या आवर्जून आठवतात. आई बाबा सतत मनात असतातच पण ह्या रूपाने त्यांचा आवाज कानात घुमतो, ते म्हणत असताना दिसतात.
हो, माझेमन. मेंदी मुलींनेच
हो, माझेमन. मेंदी मुलींनेच काढावी असा काही तरी स्टिग्मा आहे म्हणून टॅटू काढणार होता पण ती शाई रक्तात मिसळते म्हणून काढला नाही. ऋषभ साधारण वर्षभरापूर्वी पासून माहिती आहे पण येथे काल दिले. द बर्निंग घाट इतका आवडला की येथे शेअर केले.
त्यांचा सतार आणि सगळीच वाद्य बनवायचा घरचा बिझनेस आहे. पंडित रविशंकर यांच्या शेवटच्या शिष्यांपैकी नसून शेवटचाच आहे. Esthetically beautiful व्हिडिओ करण्यासाठी तो मेंदी, अंगठ्या वगैरे घालतो. अर्थात वादनामागे वर्षानुवर्षे केलेली मेहनत असतेच. पण हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हाही भाग महत्त्वाचा. हिंदुस्तानी क्लासिकल संगीत समजायला अवघड आहे तसं कारण ती एक भाषा आहे, जी कळणं/ शिकणं कठीण आहे म्हणून तो सोप्या पद्धतीचे फ्युजनही करतो. तसे गेम ऑफ थ्रोन्स/ हॅरी पॉटर वगैरेंच्या थीम्सचे भरपूर व्हिडिओ आहेत त्याचे.
राभु, तुला आवडेल.
तुला गाण्यातले कळते त्यामुळे नक्कीच.
>>>>अशा सणासुदीच्या दिवसांत
>>>>अशा सणासुदीच्या दिवसांत ह्या आरत्या आवर्जून आठवतात.
मी सुद्धा 'कुलदीप पै' यांची 'देवी' प्लेलिस्टच ऐकते आहे. आज देवळात जाउन येणार आहे. आमच्याकडे आई रामाची 'धूपाअरती' म्हणे (पोळ्या करताना :)) कारण आई-बाबा नास्तिक होते. बाबा तर खूपच व्होकल त्या बाबत.
धूप दीप झाला आता कर्पूर आरती
छत्रसिंहासनी बैसले जानकीपती बैसले अयोध्यानृपती
सानिका अभंगची गाणी आवडत आहेत.
सानिका अभंगची गाणी आवडत आहेत.
पैंजणाचा नाद आला
सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गं
Porque Te Vas / Drop It Like
वॉक करताना रिपीट मोड वर -
Porque Te Vas / Drop It Like It's Hot - Snoop Dogg & Jeanette
https://youtu.be/Vx6Lj3JOjpQ?si=0FwK_AjTialMX-k4
पंडित रविशंकर यांच्या
पंडित रविशंकर यांच्या शेवटच्या शिष्यांपैकी नसून शेवटचाच आहे >>> त्याला पंडितजींनी आपली सतार दिली आहे ना?
माधव, तसा उल्लेख कुठे आढळला
माधव, तसा उल्लेख कुठे आढळला नाही पण मी फार खोलात जाऊन वाचलेही नाही. त्याची सतार त्याच्या बाबांनी - संजय रिखिराम शर्मा यांनी स्वतः च्या हाताने घडवलेली असते. त्यांचा वाद्यनिर्मितीचा व्यवसाय आहे. त्यासाठी खास भोपळेही लावलेले असतात असं एका मुलाखतीत ऐकलं.
>> सोडूनी गोकुळास बा रे
>> सोडूनी गोकुळास बा रे चाललास <<
विठाबाई नारायणगावकर यांच्यावर एक एकांकिका पोरांनी केली होती साथीच्या आधी. तिच्यात हे गाणे त्यांनी रचले होते. हे गाणे ईअरवर्म आहे नक्की. हा मेकिंगचा आणि गाण्याचा मूळ वीडियो. https://www.youtube.com/watch?v=393m1EVVa88
हे गाणे ऐकून मी तेव्हा प्रणव पटवारी या नव्या लिरिसिस्ट ला फॉलो केले. मात्र पोरगा अध्यात्मात आणि उजव्या विचारसरणीच्या अतिरेकात बुडून पूर्ण वाया गेला. नाहीतर चांगली गाणी लिहू शकला असता.
मराठी ब्रेथलेस - बेला
मराठी ब्रेथलेस - बेला शेंडे
https://youtu.be/GFZOXvT9qjI?si=pbFi3263GrgOJgew
>> ऋषभ शर्मा <<
>> ऋषभ शर्मा <<
अस्मिता हा १५ ऑक्टोबर ला आमच्या शहरात येणार आहे. मीही हा कार्यक्रम बघायला जाणार होतो परंतु कार्यक्रमाच्या नावच 'सितार फॉर मेंटल हेल्थ ' असे आहे त्यामुळे जावे का नको असे झाले.
दिसायला राजबिंडा आहे पण मला त्याचे 'मॅन'रिजम किंचित स्त्रैण वाटतात. खैर, परंतु मला त्याचे एकूणच सगळे हे एक फसाड वाटते. मला वाटते एफ्लुएंट क्लास मधे शास्त्रीय संगीताबद्दलचे एक कुतूहल आणि divinity चे फॅसिनेशन असते ते तो कॅप्चर करायचा प्रयत्न करतो. तो तशाच कोणत्या तरी सिरीज मधे होता का? ज्यात आपले अतुल कुलकर्णी देखील होते? Bandish Bandits? मला तो त्या सिरीज मधला करैक्टर वाटतो. तो बराच पॉपुलर झालेला आहे आणि त्याने शंकराला पकडले आहे. हे जरा कंट्राडिक्टरी आहे. शंकर शिव आणि तसे सगळे शैव सिंबॉलिज्म आणि आणि त्याचे स्वतः चे सगळे प्रेझेंटेशन यात काहीच ताळमेळ नाही. म्हणजे तो दिसतो नवाबी दरबारी वादकासारखा पण शिव शिव करतो. मला त्याचा देखील इश्यू नाही. त्याचा वाद्यवृंद लहान आणि क्यूट आहे. त्यामुळे मला त्याची काही वादने आवडतात. पण मला त्याचा फसाड कळतो म्हणून त्याचे काहीच दैवी वाटत नाही. मला कधीही त्याने हायटन केले नाही. मात्र कधीतरी तो तसे दैवी वाजवेल असे देखील वाटते. कदाचित थोडे वय वाढल्यावर.
>> सोडूनी गोकुळास बा रे
>> सोडूनी गोकुळास बा रे चाललास <<
कहा गये ये सब लोग?
हे गाणे २०१६ मधे आले होते यावर मला विश्वासच बसत नाही आहे. बापरे इतका काळ उलटून गेला?
त्या मुलीचा आवाज कशाला तिखट आहे. कुठं गेली असेल ही? पेटी वाजवणारी मुलगी?
त्या वयात एक प्रचंड ऊर्जा असते ती सगळी डेसिपेट झाली की काय?
हा मेकिंगचा आणि गाण्याचा मूळ
हा मेकिंगचा आणि गाण्याचा मूळ वीडियो>>> हो मी पाहिला हा गाण्याच्या धुमाकुळानंतर! अॅडिक्टीव्ह आहे
तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय
तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय
माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय
अपनी आँखों को बनाकर यह जुबां
अपनी आँखों को बनाकर यह जुबां
कितने अफ़साने सुना लेते हैं
दर्द सीने में छुपा लेते हैं
अहल ए दिल यूं हीं निभा लेते हैं
दर्द सीने में छुपा लेते हैं
अभी.. मुझ मे कही...बाकी थोडी
अभी.. मुझ मे कही...बाकी थोडी सी है जिंदगी..
सोनू निगम
काल लेकीने चौथ्यांदा की पाचव्यांदा अग्निपथ लावला.. मी सुद्धा येता जाता थांबून अर्धा अधिक बघितला.. पण नेमके हे गाणे मिस झाले म्हणून एकदा ऐकायला युट्यूबवर लावले... पण हे कधी एकदा ऐकून थांबलो असे झालेच नाहीये
पण हे कधी एकदा ऐकून थांबलो
पण हे कधी एकदा ऐकून थांबलो असे झालेच नाहीये >>> १००++
काल मी या गाण्याचे युट्युब
काल मी या गाण्याचे युट्युब वरचे शॉर्ट व्हिडिओ, आणि रियालिटी सिंगिंग शो मधील लाँग व्हिडिओ सुद्धा बघत होतो.
एका शो मध्ये विनित नावाचा एक स्पर्धक होता ज्याचे वडील गेल्यानंतर चार दिवसांनी त्याचा परफॉर्मन्स होता त्यात त्याने हे गाणे म्हटले होते. बाकी त्यातील गोष्टींना स्क्रिप्ट मला स्टंट म्हणा पण हे अश्या परिस्थितीत आणि मनस्थितीत परफॉर्म करणे ते सुद्धा शंभर टक्के देत, रिस्पेक्ट वाटतोच!
थोड्यावेळाने असे बरेच विडिओ बघून जेव्हा समाधान होऊन गाणे बदलले तेव्हा शेजारी आपले काहीतरी खेळण्यात मग्न असलेला मुलगा पटकन म्हणाला, अरे का बदलले? खूप चांगले गात होते ते काका.. तो कधीच गाणी ऐकत नाही. आयुष्यात पहिल्यांदा त्याने कुठल्यातरी गाण्याला दाद दिली. मग त्याला सोनू काका सुद्धा दाखवले
हे डोक्यात अडकलंय कहीं एक
हे डोक्यात अडकलंय कहीं एक मासूम नाजुक सी लडकी
शंकर हुसैन - खय्याम - कमाल अमरोही - मोहम्मद रफी.
या चित्रपटातली अपने आप रातों में चिल्मने सरकती है आणि आप यूं फासलों से गुजरते रहे ही दोन्ही गाणी अशीच संथ लयीत , हलक्या आवाजात स्वतःशीच गुणगुणल्यासारखी आहेत. तिन्हीचं काव्यही सुरेख आहे.
विविध भारतीवरच्या एकही फिल्म्स से या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग कोणीतरी यु ट्यूबवर टाकलं आहे.
https://youtu.be/9t49uOfcp_A
https://youtu.be/9t49uOfcp_A?si=4ZC9fDVoXnHz7CyZ
"मन धावतया" -राधिका भिडे
कालपासून जवळपास चार पाच ओरिजनल रील्स या गाण्याच्या पाहिल्या .गाणं ट्रेंडींग वर आहे.रिपीट तर होतंयच पण आता सगळ्या हौशी रील्सवाल्याचं लाडकं गाणं होणार हे . पण आवडलं हे गाणं,राधिका भिडे ने सुंदर गायलंय आणि कंम्पोज केलंय.
मी राधिका भिडेचंच गाणं
मी राधिका भिडेचंच गाणं लिहायला आले सिमरन. सध्या तेच डोक्यात. मला राधिका भिडे खूप आवडली, व्हर्सटाईल आणि एक्सप्रेसिव्ह वाटली, इम्प्रेशन पडतं तिचं.
मलाही पहिल्यांदा ऐकले तेव्हाच
मलाही पहिल्यांदा ऐकले तेव्हाच आवडलेले हे गाणे
त्या शो ची पूर्ण क्लिप सुद्धा बघायला छान आहे. म्हणजे जज सोबत संवाद वगैरे. मी त्या जजना फार ओळखत नाही. पण ही आवडली
हा शो कुठला, जजेस कोण हे मला
हा शो कुठला, जजेस कोण हे मला माहिती नव्हतं, अजूनही माहिती नाहीये. ही क्लिप कोणीतरी शेअर केली, ती बघितली.
एनिग्मा - सॅडनेस... Simply
एनिग्मा - सॅडनेस... Simply immortal!!!
https://youtu.be/4F9DxYhqmKw?si=pdhI3l4p8CQQ_SlX
हो ह्या गाण्याच्या खूप
हो ह्या गाण्याच्या खूप क्लिप्स फिरतायत .आणखी एका याच शो मधल्या कुरळ्या केसांच्या मुलाची गाण्याची क्लिप फिरतेय ती पण छान आहे.
अन्जू मला पण हा शो गाण्यामुळे कळला.आयपॉपस्टार(I Popstar)Amazon MX Player वर दिसेल.हा शो इतर शो पेक्षा वेगळा आहे यात सहभागी झालेल्या कंटेस्टंट ना स्वतः लिहिलेली आणि कंपोझ केलेली गाणी सादर करावी लागतात.राधिका भिडे ही रत्नागिरी ची असून गायिका शमिका भिडे ची लहान बहीण आहे जी झी मराठीवरच्या लिटिल चॅम्प मध्ये होती.
https://youtu.be/WpBn9w-Js_c?si=ZdOYG739e6XsWxV1
हे एक गाणं सारखं रिपीट होतंय म्हणजे दर चार रिल्स मध्ये आहेच.
हा गायक सुद्धा टॅलेंटेड आहे आणि हंबल ते सुद्धा त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये दिसतं.लागोपाठ मिलयन्समध्ये व्यूज मिळणारी गाणी आहेत याची .त्यातही आपला मराठी पोरगा आहे म्हणून अजून त्याच्या व्यूज वाढवतेय.
मला नेहमी हाच प्रश्न पडायचा
मला नेहमी हाच प्रश्न पडायचा की सगळ्या त्या गाण्यांच्या स्पर्धांमध्ये लोक आपलं स्वतः चे गाणे का गात नाहीत? ते ते रटाळ बाबूजी गदिमा लावणी अजय अतुल वगैरे दळण दळत बसतात.
मी फक्त नवीनच गाणं गाणार जे तुम्ही आतापर्यंत ऐकले नाही असे एकही स्पर्धक का म्हणून शकत नाही?
त्याचे उत्तर मला एकूण पालक मुलांना कसे घडवतात त्यात दिसते म्हणजे सगळ्यात आधी कॉपी करायला शिकवायचे. Rote मेमोइझेशन का म्हणतात ते. तो आपला पहिला फंडा. स्वतः चा मार्ग शोधू देणे हा टॅबू तोही क्रिएटिव्ह क्षेत्रात. एकूण परंपरेचे ओझे वाहत राहणे.
आपल्या इथे म्हणून सिंगर साँग writer नसतात. असतात फक्त सिंगर. Song writer वेगळा असतो. Music composer वेगळा असतो. आणि मग एक कृत्रिम मिश्रण तयार होते त्यात कुणाचाही गाभा मिसळत नाही.
म्हणून मला या राधिकेचे गाणे जास्त आवडले. आणि लोक नव्या गाण्यांसाठी किती भुकेली आहेत हे देखील कलावंताना कळते हे ही नसे थोडके.
त्या लिटिल चॅम्प चा तर इतका प्रचंड वैताग आला होता साला. एकालाही एखादा नवा अभंग गावा एखादी नवी कविता गावी असे वाटले नाही?
Pages