नमस्कार मायबोलीकरांनो,
मजेत आहात ना सगळे?
कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?
या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?
यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.
या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.
खेळ अगदी साधा आहे.
आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.
तर हे आहे तुमचे पहिले कोडे....
नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?
कसली भारी भारी कोडी घालतात
कसली भारी भारी कोडी घालतात इथे.
कोडी आणि उकल मस्तच.
कालपासून इथे उकल उकल वाचून मला शाळेतील पदावलीची उकल आठवली
कंचेभागुबेव भयानक नियम आठवला
सगळेच सवाल-जवाब मस्त. अमितव
सगळेच सवाल-जवाब मस्त. अमितव यांचा माबोवाचकांना माबोलेखक होण्याचा पंच वाचून फुटलो
आता पुढचे कोडे जरा सोपे द्या…
आता पुढचे कोडे जरा सोपे द्या…
इथल्या कोड्यांपेक्षासुद्धा
इथल्या कोड्यांपेक्षासुद्धा काही शशक जास्त अवघड वाटताहेत मला. बऱ्याच डोक्यावरून गेल्या.

अमितव यांचा माबोवाचकांना माबोलेखक होण्याचा पंच वाचून फुटलो >> छान होता पंच. माझी सर्व ऊर्जा शब्दखेळ तयार करण्यात आणि शशक लिहिण्यात वापरली गेली, त्यामुळे येथे काही सुचत नाही.
चकाकते पण सोनं नाही,
चकाकते पण सोनं नाही,
प्रकाश देते पण गरम नाही,
दिवसा लपून राहणे हा गुण,
मुलांना आवडतो हा एक सद्गुण!
एक लय सोप्पं:
एक लय सोप्पं:
रामाच्या दु
कानात उ
तम चिवडा मिळतो.
म्हणजे ओ काय?
त्तम
त्तम
हो, पण थोडे अशुद्ध चालते
हो, पण थोडे अशुद्ध चालते
नाही तर हे कोडे हे कोडे उरतच नाही
संयोजक, काजवा ?
संयोजक, काजवा ?
चांदोमामा?
चांदोमामा?
३ खोल्या आहेत आणि त्यापैकी
@मॅगी चांदोमामा सद्गुण कसा होइल?
@माधव, काजवा, सद्गुण कसा होइल?
--------------------------------------------------
३ खोल्या आहेत आणि त्यापैकी एका खोलीत तुम्हाला जाउन १ तास रहायचे आहे. तुम्ही कोणती निवडाल?
- विषारी सापाच साप असलेली खोली जिथे जमिन सापांनी आच्छादून गेलेली आहे.
- बंदुकधारी टेररिस्ट ज्यांच्याकडे लोडेड गन्स आहेत व तुम्हाला मारण्यास ते टपून बसलेले आहेत
- ५ सिंहीणी आहेत अशा की ज्यांनी ३ वर्षात काहिही खाल्लेले नाही.
चांदोमामा मुलांनी आवडून
चांदोमामा मुलांनी आवडून घ्यायचा अशी रीत आहे. मुलांना आवडतो हा सद्गुण.
फटाक्याचा सवाल इतकाही अवघड नव्हता. मानव यांनी योग्य दिशेने प्रवास सुरू केला होता. पण त्यांचं लिहून व्हायच्या आतच मी उत्तर देऊन टाकलं.
सामो, तिसरी खोली. तीन वर्षे
सामो, तिसरी खोली. तीन वर्षे काही खाल्लं नाही म्हणजे सिंहिणी कधीच मेल्या. त्यांचा सांगाडा उरला असेल.
भरत बरोब्बर!
भरत बरोब्बर!
उत्तम चिवडा माधव
उत्तम चिवडा
माधव
रामाच्या दुकानात उत्तम चिवडा
रामाच्या दुकानात उत्तम चिवडा मिळतो.
अरे हां "मुलांना आवडणे" हा
अरे हां "मुलांना आवडणे" हा सद्गुण" आहे त्याच्यात बरोबर भरत, आता कळले.
हे काय, तासभर होत आला! भरत,
हे काय, तासभर होत आला! भरत, पुढचं कोडं घाल की.
लांब शेपटी खार नसे
लांब शेपटी खार नसे
दो शिंगांची ना गाय
थय थय नाचे आकाशी
अनुपम गाणे गाय
दोन कवाडां मध्ये एक श्रोत,
दोन कवाडां मध्ये एक कर्ण, काही घ्यायला गेल्यास म्हणे पैसे काढ नं. (५)
@भरत: वीज
@भरत: वीज
या सवालाच्या जवाबातली एक ओळ
या सवालाच्या जवाबातली एक ओळ सुटली आहे आणि खाडाखोडही आहे. शिवाय ती वस्तू वा प्रक्रिया मी पाहिलेली नाही, इतर काही गोष्टींचे संदर्भही कळले नाहीत. त्यामुळे अर्थ कसा लावावा ते नीट कळत नाही. त्यामुळे who ऐवजी how असे हे कोडे.
सवाल - अधांतरी परि ब्रह्मा नाही
दात दोन मुख चार
नंदी वाहन नच शिवशंकर
जल एकच आहार
जवाब - विहिरीवर मी भस्ति पाहिला
भरीत एक पखाल
दोनच काळ्या दौत दंत
अन् मुले तियेची चार
बैलावरती बसली होती.
नाही मानव.
नाही मानव.
धूमकेतू?
>>> लांब शेपटी खार नसे
धूमकेतू?
>>> अधांतरी परि ब्रह्मा नाही
हे मोटेचं वर्णन आहे का?
धूमकेतूला शेपटी जुळते पण दोन
धूमकेतूला शेपटी जुळते पण दोन शिंगे आणि थयथय नाचे, गाणे कसं जुळवायचं विचार करतोय.
हो विहिरीवरील बैलाने ओढलेली मोट.
दात दोन का? कारण व्हर्टिकल पाणी फेच करायची मोशल हॉरिझाँटल फोर्स मध्ये बदलायला एकमेकांत दाते गेलेली दोन चक्रे एक उभं आणि एक जमिनीला समांतर लावतात. जेणेकरुन बैल जमिनीवर गोल फिरला की आडवं चाक फिरेल आणि त्याचे दाते उभ्या चाकात गेलेले असल्याने उभं ही फिरू लागेल.
मुख चार.. कारण त्याला चार कळशा सदृष लावलेलं असेल ज्यात पाणी भरेल.
इथे एका व्हिडिओत दाखवलं आहे.
मस्त! आवडलं.
@किल्ली बरोबर, मानवनी उत्तर
@किल्ली बरोबर, मानवनी उत्तर फोडले होते
@भरत, ढग?
मस्त अमित!इथे बैल रहाट ओढताना
मस्त अमित!
इथे बैल रहाट ओढताना दिसत आहेत.
अधांतरी खांबही आहे.
---
वीज नाही. धुमकेतू नाही. आपल्यातल्या बहुतेकांनी हाताळलेली गोष्ट.
बीभत्स रस आहे का त्यात?
बीभत्स रस आहे का त्यात?
काय लोक तरी! साधं निरागस
काय लोक तरी! साधं निरागस कोडं आहे.
फटाक्यातलं रॉकेट?
फटाक्यातलं रॉकेट?
Pages