नमस्कार मायबोलीकरांनो,
मजेत आहात ना सगळे?
कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?
या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?
यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.
या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.
खेळ अगदी साधा आहे.
आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.
तर हे आहे तुमचे पहिले कोडे....
नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?
टीव्हीचा अॅन्टेना?
टीव्हीचा अॅन्टेना?
रॉकेट जुळतंय. शेपटीला मल्टिपल
रॉकेट जुळतंय. शेपटीला मल्टिपल पर्सनॅलिटीत शिंग बनवू शकतो.
हसून हसून माझं पोट दुखू लागलं
हसून हसून माझं पोट दुखू लागलं. उत्तर सांगितल्यावर तुमचंही दुखेल.
पतंग?
पतंग?
चतुर (dragonfly)?
बरोब्बर.
बरोब्बर.
पतंग उडतो आकाशी
त्या शेपुट , शिंगे दोन
हवेत जातो सरसर
सांगे आणिक दुसरे कोण.
इतर सवालजवाब आध्यात्मिक, पौराणिक किंवा साहित्यिक आहेत. काही फारच ओपन एंडेड. त्यामुळे ते देत नाही.
रसास्वादासाठी सवाल आणि जवाब दोन्ही इथे लिहून काढेन.
तोवर खेळ पुढे चालवा.
पतंग अनुपम गाणे गातो होय रे?!
पतंग अनुपम गाणे गातो होय रे?!

तिथे अमित रॉकेटच्या मल्टिपल पर्सनॅलिटीज तयार करून राहिला!
हे त्या शाहिराला विचारावं
हे त्या शाहिराला विचारावं लागेल.
पतंग उडवणारा गाणे गातो. हा
पतंग उडवणारा/री गाणे गातो/ते. हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी चल फिरू... अशी एक शाळेत कविता होती.
ती गात असेल. 
लिंग निरपेक्ष केलं. नाही तर भजी तळायला लावशील
काल बायकोने नवर्याला खाल्लं, का नवर्याने बायकोला, का नवर्याने चिप्सला.. असा कर्ता बदलला तसा इथे पण. थोडं रेड हेरिंग, संदिग्ध हवंच ना.
(No subject)
भरत, पौराणिक अध्यात्मिक ओपन
भरत, पौराणिक अध्यात्मिक ओपन एंडेड असतील तरी द्या. मजा येते. तुम्ही थोडी मदत करा, गूगल पण आहे थोडीफार आणखी मदत करायला.
>>> भरत, आध्यात्मिक, पौराणिक
>>> भरत, आध्यात्मिक, पौराणिक किंवा साहित्यिक ओपन एंडेड असतील तरी द्या. मजा येते.
हो.
मजा येतेय भरत, त्या सवाल
मजा येतेय भरत, त्या सवाल जबाबात.
बरं वेळ मिळाला तर माझे कोडे सोडवा. ( सवाल जबाब आले तर माझे नंतर सोडवा.)
दोन कवाडां मध्ये एक कर्ण, काही घ्यायला गेल्यास म्हणे पैसे काढ नं. (५)
अक्षर छल कोडे आहे. charade + container clue.
मानव यांचे कोडे सोडवू आधी.
मानव यांचे कोडे सोडवू आधी.
कर्ण म्हणजे कान. काना?
एटीएम मशीन/ डेबिट कार्डचा पिन
एटीएम मशीन/ डेबिट कार्डचा पिन

कार्डवर एनएफसी असेल तर कॉसन्ट्रिक वर्तुळांचे आर्क असतात ते कानातील आवाजासारखे दिसतात. अगदीच फारफेच्ड आहे, पण काही तरी चर्चा चालू करू
वेन्डिंग मशीन?
वेन्डिंग मशीन?
कर्ण म्हणजे कान. काना?
कर्ण म्हणजे कान.
काना?अमित
दिशा चुकली.
दु कान दार ?
दु कान दार ?
भारी विकु! सहीच!
भारी विकु! सहीच!
बिन्गो विकु.
बिन्गो विकु.
ओह! पण दोन कवाडं कुठली? लोल
ओह! पण दोन कवाडं कुठली? लोल 'दु'चं काय? दु म्हणजे २ असं? आणि तो कंसातला ५ कशासाठी होता?
वा मानव आणि विकु!
वा मानव आणि विकु!
यात एका सवालात चार वेगवेगळे प्रश्न आहेत. उत्तरेही चार.
कोण तपस्वी तपास करितो ?
अखंड स्नाना करितो कोण?
सर्व रसांना कोण ओकितो?
प्राशन करिते त्यांचे कोण?
५ म्हणजे ५ अक्षरी शब्द.
५ म्हणजे ५ अक्षरी शब्द.
दु -कान -दार.
दोन कवाडे = दारे. त्यात मध्ये कर्ण म्हणजे कान.
अखंड स्नान - शंकराची पिंड?
अखंड स्नान - शंकराची पिंड?
प्राशन करितो - शंकराने हलाहल प्यायला?
उत्तरांत देव आहेत. पण हे
उत्तरांत देव आहेत. पण हे नाहीत. मला त्यामागच्या कथा माहीत नाहीत.
बरोबर उकल भरत.
बरोबर उकल भरत.

दोन = दु
दु दार आणि त्यामध्ये कान.
ओह ओके, धन्यवाद.
ओह ओके, धन्यवाद.
>>>
कोण तपस्वी तपास करितो ?
अखंड स्नाना करितो कोण?
सर्व रसांना कोण ओकितो?
प्राशन करिते त्यांचे कोण?
<<<
ब्रह्माच्या मुखांतून वेद निर्माण झाले असं पुराणं म्हणतात - सर्व रसांना ओकणारा ब्रह्मदेव असेल का?
की व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं म्हणून व्यास?
प्राशन करिते आपण सगळेच मग.
तपस्वी 'तपास' करितो हा श्लेष आहे का? तपासकाम करतो की तपाला करितो?
शंकर हा तपस्वी?
द्वारका पाण्याखाली गेल्यामुळे कृष्ण (विष्णू?) अखंड स्नान करतो आहे?
वेद अनादि आहेत ना? कोणी न
वेद अनादि आहेत ना? कोणी न लिहिलेले?
ब्रह्मदेवाची गल्ली चुकली.
ब्रह्मदेवाची गल्ली चुकली.
>>> ब्रह्मदेवाची गल्ली चुकली.
>>> ब्रह्मदेवाची गल्ली चुकली.
मग आम्हा मर्त्य मानवांना काही होप्सच नाहीत!
सर्व रसांना ओकणारा सूर्य(देव)
सर्व रसांना ओकणारा सूर्य(देव)
प्राशन करणारी पृथ्वी (आणि इतर सूर्य मालेतील ग्रह)
तपस्वी: धृव तारा?
अखंड स्नाना: आकाश गंगा? (हा उगाच त्यात गंगा आहे म्हणुन टोला)
Pages