गंमतखेळः सवालजवाब

Submitted by संयोजक on 12 August, 2025 - 11:25

नमस्कार मायबोलीकरांनो,

मजेत आहात ना सगळे?

कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?

या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?

यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.

या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.

खेळ अगदी साधा आहे.

आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.

तर हे आहे तुमचे पहिले कोडे....

नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> गाई गाई
Lol

दोन गाई? एकदम? असं विचारत नाही आता. Proud

असं विचारत नाही आता. >>>दोन गाई? एकदम? >
हे काय आहे मग Lol

माझं बरोबर आहे असं सांगून मानवदादा 'गाई गाई' करायला गेले आहेत.

पुढचं कोडं -
जे बोलू शकत नाही पण उत्तर देऊ शकते.

जास्तीतजास्त टिपी करायचा आहे तेव्हा वेळ न घालवता पुढचं पांचट कोडं घ्या. Happy

मी रोज दाढी करतो तरीही माझी दाढी वाढतच जाते.

प्रतिध्वनी कसं? मी "आज कोणता वार आहे" असं विचारलं तर प्रतिध्वनी तोच प्रश्न येईल ना? बुधवार असं थोडीच म्हणेल प्रतिध्वनी ?

प्रश्न विचारलेला नाही फक्त 'बोललं' आहे म्हणून तसं म्हटलं असेल. मी जेथून उचललं तेथे. मलाही आवडलं -पटलं होतं. हाकेला ओ देणं अशा अर्थाने घेतलं.

मी रोज दाढी करतो तरीही माझी दाढी वाढतच जाते. >>> नाभिक? इतरांची दाढी करतो पण स्वतःची नाही त्यामुळे त्याची दाढी वाढत जाते.

स्वातीचे बरोबर.
भरत, डस्टर आमच्याकडे काळं नसायचं भुरकट असायचं. आमचं डस्टर असं असल्याने तुमचं चूक. Happy

कुठे गेले सगळे? सुधारले की काय! Wink
हे लक्षात आहे का लहानपणीचे -
हे बावन रूपयांना एक गाय तर टू गायींची किंमत काय? Proud

५२ पत्ते आणि जोकर ?
लॉजिक विचारू नका. ५२ आल्यावर पत्तेच असणार असं मी ठरवलं आहे. Lol

नाही, नाही. मलाही मोठं 'नाठ्याठोम' म्हणायचा आनंद होतो आहे. Lol

'हे बा वन' असं वाचायचं म्हणजे एक रूपयाला एक गाय आहे तर टू गाई दोन रूपयांना. Lol त्या वरच्या बैलाच्या गर्लफ्रेंड.

Pages